बंधन भाग 10

Love, Social Issues

भाग 10 
(नवव्या भागात विक्रमने सांगितल्याप्रमाणे कंप्युटर लॅब मध्ये नवे कंप्युटर्स मागवले गेले त्यामुळे प्राचार्य, भाऊसाहेब स्वतः लॅबमध्ये ते पाहायला आले त्याच वेळी अनघाला पण कंप्युटरलॅब मध्ये गर्दी का याची शंका आली त्याच वेळी तिला प्युन शंकर भेटला त्याच्यासोबतच्या बोलण्यातून बर्‍याच गोष्टी तिला विक्रमबद्दल समजल्या आणि त्यात महत्वाचं हे होतं कि भाऊसाहेब डायरेक्टर नसुन विक्रम सद्या 'गुरुकुल ' चा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तिला तर विक्रमबद्दल बरंचसं कुतुहल वाटतंय पाहुया पुढे)

दुपारी कंप्युटरलॅबला जाऊन विक्रम नवे कंप्युटर्स पाहून आला सोबतच पुन्हा काही गरज लागली तर सांगा असंही त्याने निकमसरांना सांगून ठेवलं. कॉलेजच्या इनफ्रास्टक्चर च्या बाबतीत, सुविधांच्याबाबतीत त्याला कुठलाही हलगर्जीपणा नको होता. या असल्या गोष्टींमुळे कॉलेजच्या ग्रेडवरती परिणाम झाला असता शिवाय इथे शिकणार्‍या मुलांनी बाहेरच्या विद्यार्थ्यांना कॉलेजविषयी इथल्या फॅसिलिटीज विषयी चांगल्याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत शेवटी बिझनेस मध्ये मॉब पब्लिसिटी महत्वाची या तत्वाने तो विचार करत होता. तो खालून जाऊन केबिनमध्ये आला आणि निवांत बसणार इतक्यात राजेशचा फोन आला.
राजेश - "  हाय विक्रम, कुठे आहेस ?"
विक्रम - " कुठे असणार अॉवियसली कॉलेजला बोल तु काय म्हणतोयस ?"
राजेश - " काय नाही रे बरेच दिवस भेटलो नाही म्हटलं बघावं विकेंण्डला जमतं का ? "
विक्रम - "  अरे I totally forgot that उद्या सॅटर्डेला पण हॉलीडे येतोय. सॅटर्डे, सण्डें फ्री आहे मी "
राजेश - " वॉव ग्रेट! मस्त प्लॅन करुया मग बोल कुठे जायचं ?"
विक्रम - " आमच्या फार्महाऊसला येस तिकडेच जाऊया"
राजेश - " जो आपकी मर्जी हुजुर " तो हसत म्हणाला.
विक्रम - " ओके आणि बाकी सगळ्यांना पण सांग "
राजेश - " ओके डन बाय सी यू टुमॉरो " 
विक्रम - " Ok " 
.........................
दोन दिवस सुटीचे होते त्यामुळे घरीही जितेंद्र, नीता ही बाहेर जाण्यासाठी प्लॅन करत होते आता त्यांचं प्लॅनिंग म्हणजे मुव्हीला जाणे, हॉटेलला जेवणे, आईसक्रिम खायला जाणे एवढंचं पण त्यांना मजा यायची. त्यातून विक्रम, नीता आणि जितेंद्र तिघांचं बाहेर एकत्र जाणं हल्ली व्हायचं नाही. तिघांची तीन तर्‍हांची कामं त्यातून हे दोघे घरी असले तरी नीता घरी असेलच याची गॅरिंटी नसायची. तिच्या सोशल वर्कमुळे तिचं फिरणं, लोकांना भेटणं सुरु असे. आज मात्र नीताच्या डोक्यातूनच बाहेर जाण्याची आयडिआ निघाली मग जितेंद्रनेही हो म्हटलं आणि दोघे मिळून विक्रमच्या रुममध्ये आले.
" विक्रम काय करतोयस " जितेंद्रने आत येत विचारलं.
" अरे जीतू ये ना काय म्हणतोस ? " 
" काही नाही. तू काय वॉर्डरॉबचं इतकं निरिक्षण करतोयस ?" विक्रमने वॉर्डरॉब उघडलेलं पाहून त्याने विचारलं.
" अरे काही नाही ते उद्या मी नाहीय ना म्हणजे दोन दिवस नसणार आहे " विक्रम म्हणाला.
" डोन्ट टेल मी दाद्या तू बाहेर चाल्लायस " नीता जितेंद्रच्या मागून म्हणाली.
" अरे तू आत कधी आलीस ?" विक्रमने विचारलं.
" ते सोड तू विकेंण्डला पण घरी नाही थांबू शकत का ज्जा बाबा !"  ती चिडून पाय आपटत पुढे येत म्हणाली.
" अगं आम्ही फार्महाऊसला चाललोय " त्याने तिला शांत करत म्हटलं.
" हं आम्ही म्हणजे तू, राजेशभैय्या आणी ते तुमचं टोळकं " ती रागाने म्हणाली तसा जितेंद्र फसकन हसला. 
" हसु नको " ती जितेंद्रला ओरडली.
 " अरे वा रे वा काय गं गेल्या आठवड्यात वर्ध्याला गेलेलीस आणि तुला टि.व्ही.वर बघून ओरडली तेव्हा शहाणे मीच बाजू घेतली तुझी विचार आत्याला." जितेंद्र तिचे कान पिरगळत म्हणाला. " बरं धन्यवाद हा !"  ती रागात म्हणाली.
" काय नीतू एरव्ही विक्रमदादाचं किती कौतुक सुरु असतं बघ तुझ्यासोबत येतोय का तो. "  जितेंद्रने तिला चिडवीत म्हटलं त्यावर ती आणखी चिडली.
" हो करेक्ट आहे जितूदादाच माझं सगळं ऐकतो." 
" हो बाईसाहेब ! ए नीतू ए नीतू भाई ऐक ना " विक्रमने तिच्या खांद्यावर हात टाकत म्हटलं तरी ती रुसली होती.
" अगं बर्‍याच दिवसांनी भेटतोय आम्ही तू आणी जितू जा ना" तो म्हणाला.
" हं "  ती घुश्य्यात म्हणाली
" पुढच्या वेळी आपण तिघे बाहेर जाऊ प्रोमीस " त्यावर ती जरासं हसली.
" Ok, जा " 
" Thanks बरं जा लवकर झोपा जा दोघे मी पण झोपतो" विक्रमने दोघांना समजावून पाठवलं.
" ओके गुड नाईट " जितू म्हणाला आणि नीतूला समजावत बाहेर गेला.
....................
दुसर्‍या दिवशी शनिवार होता. विक्रम लवकर तयारी करुन गंगा आत्याला बाय करुन बाहेर पडला. नीतू अजून झोपलीच होती. जितेंद्र मॉर्निंग वॉकला गेला होता. आत्याने काही बनवून देऊ का विचारलं तर डोन्ट व्हरी आम्ही बघतो म्हणत त्याने आत्याचा निरोप घेतला. आधी राजेशला पिकअप करावं म्हणून त्याने गाडी सामंतांच्या घराच्या दिशेने वळवली. बाकी पंकज, सुमित आणि जयेश राजेशच्याच घरी येणार होते. त्यामुळे त्यांची वाट पाहायची नव्हती. घरी सामंत सर नव्हते आणि असते तरि काही फरक पडला नसता. सामंतांकडे घराची दुसरी किल्ली होती त्यामुळे राजेशने घर लॉक केलं आणि सगळे पटकन गाडीत बसले.
.....................
सकाळचं वातावरण त्यात  पावसाळी हवा, हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि घाटाघाटांच्या रस्त्यावरुन अंतर कापत धावणारी गाडी सगळ्यांचे मुड एकदम मस्त बनले होते. विक्रम ड्रायव्हिंग करणार म्हणजे त्यांना चिंताच नव्हती त्याचं ड्रायव्हिंग स्कील अफलातून होतं त्यामुळे पहाटे उठलेल्या पंकज,सुमितला गाडीतच झोप लागली. जयेश पाठिमागच्या सिटवर त्यांच्या सोबत बसला होता तो मग पुढे होऊन पुढे ड्रायव्हिंग सीटवरच्या विक्रमशेजारी बसलेल्या राजेशसोबत गप्पा मारु लागला. दोन अडीच तासात ते फार्महाऊसला पोहचले.
.......................
शहरापासुन दूर एका गावात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली ती टुमदार वास्तू होती. राजेशिर्केंच्या बंगल्याचा थाट त्यात नव्हता पण तिथे गेल्यानंतर शांत वाटायचं. तिथेच बसुन रहावंसं वाटायचं इतकी शांतता तिथं होती दररोजच्या गजबजाटापासुन दूर निवांत जागा,दुरदूरपर्यंत घरांची वस्ती नाही, आजुबाजुला हिरवाई समोर बाग आणि या सगळ्याची देखभाल करणारे माळी काका म्हणजे माधव काका जे गेली कित्येक वर्ष ही प्रोपर्टी सांभाळत होते.भाऊसाहेबांच्या विश्वासातले होते आणि ते या सगळ्याची स्वतःचं घर असल्यासारखी काळजी घ्यायचे त्यामुळे कुणालाही चिंता नव्हती. विक्रमने कालच त्यांना आम्ही येणार आहोत असा फोन केला होता त्याप्रमाणे माळी काकांनी सगळी तयारी करुन ठेवली. नीता किंवा जितेंद्र इकडे फार फिरकत नसत पण विक्रमला लहानपणापासुन इकडे यायला आवडायचं म्हणून आधी हट्टाने भाऊसाहेबांसोबत यायचा आणि मोठा झाल्यावर स्वतःचं ड्राईव्ह करत यायला लागला. तो आणि त्याचे मित्र माधवकाकांना नवीन नव्हते. त्यांची गाडी गेटपाशी आली तसा हॉर्न ऐकताच माधवकाकांनी गेट उघडला. सगळे एकदाचे गाडीतून खाली उतरले.
" या या साहेब " माळी काका विक्रम गाडीतून खाली उतरताच म्हणाले. सोबत पंकज आणि सुमीतसुद्धा उतरले. त्यांची एव्हाना झोप मस्त झाली होती. राजेशने खाली उतरताच हात वरती झटकत मस्त आळस दिला. 
" या रे आणि काका आमच्या जेवणाची काळजी करू नका, वी विल मॅनेज " विक्रम काकांना म्हणाला.
" बरं साहेब मग मी आहे इथंच काय लागलं तर सांगा" ते म्हणाले.
" हा,चला ए चला रे आत " विक्रम मोठ्याने सगळ्यांना म्हणाला तसे सगळे गाडीजवळून विक्रमच्या मागोमाग यायला निघाले. 
आत आल्यावर सगळे आधी सोफ्यावर टेकले.
" पोचलो एकदाचे " राजेश सोफ्यावर ताणून देत म्हणाला.
" हा यार " त्याला दुजोरा देत जयेश म्हणाला.
" ह्यांनी दोघांनी मस्त झोप काढली" राजेश जयेशला म्हणाला.
" यार तू झोपायचंस ना " हातातल्या कागदाचा बोळा करून तो राजेशवर फेकून मारित सुमीतने म्हटलं.
" हा रे एकतर सकाळी आम्ही घरी आलो तेव्हा तू होतास साखरझोपेत नी आम्हाला नाव ठेव." पंकजने पण सुमीतची बाजू घेतली.
" बाकी विक्रमचं ड्रायव्हिंग वा लाजवाब हा! काय झोप लागली यार !" सुमीत जोराचा आळस देत म्हणाला.
" हा रे थँक्स यार विक्रम "  पंकजने विक्रमकडे पाहत म्हटलं. हे लोक सोफ्यावर येऊन बसले होते आणी विक्रम दाराबाहेर शुज काढत होता. सोफ्यावर बसलेल्या पंकजने मान मागे वळवत विक्रमला हात उंचावत थँक्स म्हटलं. 
" It' Ok यार थँक्स काय !"  विक्रमने आत येत पंकजच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.
" ओके चला पण पटकन फ्रेश व्हा It's party time चलो "  विक्रम आळसावलेल्या मित्रांना चिअरअप करित म्हणाला. त्याबरोबर सगळे उठले आणि फ्रेश व्हायला गेले. विक्रमने इकडे तिकडे पाहत फार्महाऊसच्या आतल्या भागावरुन एक नजर फिरवली. सगळं नीटनेटकं अन स्वच्छ दिसत होतं त्याला मनातून माधवकाकांचं कौतुक वाटलं. त्याला म्हणूनच माधवकाका जास्त आवडायचे त्यांना कोणतंही काम सांगावं लागायचं नाही. आपली जबाबदारी,आपलं काम लक्ष देऊन मन लावून ते करणार अगदी गंगाआत्यासारखं. त्याला माधवकाकांवरुन अचानक आत्याची आठवण झाली. आत्या जरी घरातलं काम पाहणारी, स्वयंपाकघर सांभाळणारी, रोज भाऊंना भेटायला येणार्‍या माणसांचा चहा नाश्ता पाहणारी, घरांतल्यांची काळजी करणारी असली तरी ते कधीच तिला मोलकरिण मानायचे नाहीत. अगदी विक्रमच्या जन्माआधीपासुन ती त्या घरासाठी झटत होती म्हणून भाऊसाहेब तिला बहिणच मानायचे. आत्याच्या विचारातून तो बाहेर आला आणि फ्रेश व्हायला वरच्या त्याच्या रुमकडे वळला.
....................
सगळे फ्रेश होऊन एकदाचे बाहेर हॉलमध्ये जमले आणि विक्रमची वाट पाहू लागले इतक्यात तो खाली आला. साधीशी ट्राऊजर आणी टिशर्ट या पेहरावात त्याला पाहून सगळ्यांचे मूड ' पार्टि मूड ' बनले. विक्रमला नेहमी ब्लेझर किंवा शर्ट पँन्ट जॅकेट अश्या रुपात पाहायची सगळ्यांना सवय होती. त्याच्या पर्सनॅलिटीला चार चॉंद लागायचे त्यामुळे पण त्याच्या या प्रभावी व्यक्तीमत्वामुळे आणि तो 'गुरुकुल ' सारख्या एका मोठ्या एज्युकेशन संस्थेचा मॅनेजिंग डायरेक्टर असल्याने त्याच्या मित्रांनाही त्याच्याशी मनमोकळेपणाने वागणं कठिण होऊन जायचं. इकडे फार्महाऊसवर मात्र मित्रांसोबत आल्यानंतर तो त्यांच्यातलाच एक होऊन जायचा. त्यांच्यासोबत धम्माल मजा करणारा एक मित्र असायचा.
क्रमशः

🎭 Series Post

View all