बंधन भाग 128

Social Love

भाग 128

( गेल्या भागात अनघा नीतूसोबत पुन्हा त्याला भेटायला हॉस्पिटलला जाते. तिथे पुन्हा त्यांच्यात वाद होतात. गेल्या भागात विशाल च्या येण्यामुळे बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्यात. पाहूया पुढे)


               तो डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडला. आपला मित्र त्याच्या बायको विषयी इतका भरभरून बोलायचा, तिच्यासोबत असण्याचं, समजून घेण्याचं कौतुक करायचा. आपल्या शिवाय जगू शकत नाही ती याच्या बाता मारायचा आणि त्याचीच आज अशी झालेली अवस्था याने विशालला वाईट वाटलं होतं. पण सगळ्यात जास्त त्याला आश्चर्य वाटत होतं ते अनघाच्या वागण्याचं. विक्रमने तिच्याविषयी जे जे सांगितलं होतं त्यावरून विशालच्या मनात वेगळीच प्रतिमा तयार झाली होती तिची! प्रामाणिक, तत्ववादी, जिद्दी, हुशार, कणखर पण तितकीच प्रेमळ, जीव लावणारी, मधाळ स्वभावाची अशी मुलगी पण तिचा हा पैलू मात्र विशाल साठी नवा होता आणि तितकाच धक्कादायक ही. तिच्यासारखी इतकी प्रगल्भ आणि हुशार मुलगी कोणाचं काहीतरी ऐकून, इकडच्या-तिकडच्या चर्चा कानावर आल्या म्हणून ज्याच्या वरती प्रेम केलं अशा माणसावरती संशय घेऊ शकते किंवा समोरच्याच न ऐकता आपलं तेच खरं अशी हटवादी कशी वागू शकते तेच त्याला कळत नव्हतं. विक्रम वागला त्यावरून तिला जे सहन करावं लागलं त्याबद्दल विशालने बऱ्याचदा त्याला झापलं होतं. तू स्वतः वरती थोडा ताबा ठेवायला हवा होता. असं एखाद्याला धडा शिकवायची  ही रीत नव्हे अस कितीतरी वेळा विशालने त्याला सांगितलं होतं. पण आज पहिल्यांदा त्याला मित्राची बाजू घ्यावीशी वाटली. त्याच्या अशा अवस्थेची दया आली. तो याच विचारात जिना उतरत होता इतक्यात मागुन हाक आली.

" डॉक्टर प्लीज थांबा."

त्याने मागे वळून पाहिलं. तो थांबला.

" प्लीज "

" मॅडम मला नका आग्रह करु. मला नाही इच्छा बोलण्याची."

" तरीही....... दिवसभरात इतक्या पेशंटशी बोलता ना तुमच्या क्लिनिकमध्ये मग आज माझ्याशी बोला!"  ती आर्जवी नजरेने म्हणाली तसं त्याने नजरेनेच ओके म्हटलं.
.........................................................

            थोड्या वेळात ते हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये पोचले. त्याला विक्रमच्या बोलण्यातूनच आजवर ती कळलेली. तिला भेटण्याची त्याची इच्छा होती पण या अशा घटनेने तिची भेट होईल असं स्वप्नातही त्याला वाटलं नव्हतं. त्याचं बोलणं तर विशालच्या कानात घुमत राहीलं होतं. तो खुर्ची सरकवून शांतपणे बसला. ती समोरच्या खुर्चीवर बसली. त्यांनी बोलायला सुरुवात करण्याआधी ती भराभरा बोलू लागली.

" डॉक्टर...... सॉरी पहिल्यांदा मी......"   ती बसल्या बसल्या म्हणाली.

" इट्स ओके,  Calm down मॅडम. कसय मी डॉक्टर नंतर आधी त्याचा मित्र सुद्धा आहे हे असं काही घडेल खरंच वाटलं नव्हतं मला."

" मलाही!  खूप त्रास झाला त्यांना..... I agree " ती शांतपणे म्हणाली.

"  हं.  त्रास तर झालाच आणि त्याचा हा दृश्य परिणाम होता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्याच्याशी बोलणं टाळत होता. त्याच्या त्या लेटर चे उत्तर वेळेस दिलं नाही किंवा तुमचं लग्न ठरणार या इतपतच हे सगळं मर्यादित होतं का! याच कारणामुळे त्याने हे असं......"

" म्हणजे ? मला नाही समजत आहे. काय म्हणायचं तुम्हाला?" 

" म्हणजे हेच कि एखादा मनुष्य सुसाईड सारखा पाऊल उचलतो तेव्हा त्याला कोणतीही एक गोष्ट रिस्पॉन्सिबल नसते. हे असं काही करण्याअगोदर रिसेंट घडलेली एखादी गोष्ट निमित्त ठरू शकते अशा कृतीसाठी इतकच."

" म्हणजे हे असं काही करायचं काही दिवसांपासून त्यांच्या डोक्यात!"   ती घाबरुन म्हणाली.

" नाही नाही अगदी तसच नाही म्हणता येणार. पण बरेच दिवस, बरेच महिने मनात साचलेलं, व्यक्त न करता आलेलं सगळं.... त्याचा उद्रेक असतो हा. फॉर एक्झाम्पल, आता एखादा बलून पाहा. तो मोठा व्हावा म्हणून खूप हवा भरली अगदी गरजेपेक्षा जास्त मग काय होईल?"

" मोठा होईल फुगा आणि टचकन फुटून जाईल."

" दॅट्स राईट. असंच होतं माणसाचं. थोडासा स्ट्रेस, थोडासा एकटेपणा, थोडीशी स्वतःच्या वागण्यावरून चार चौघांनी केलेली टिका काही प्रमाणात सहन करू शकतो. पण त्याचा त्या फुग्यातल्या हवे सारखा अतिरेक झाला तर माणूस कोलमडून पडतो आणि याला बऱ्याच छोट्या छोट्या घटना जबाबदार असतात. बऱ्याच दिवसांपासून, महिन्यांपासून सुरू असलेली ती प्रोसेस असते आणि एका क्षणी या सगळ्याचा कडेलोट होतो आणि हे असं काहीतरी... मग आपण म्हणतो अरे इतका ठणठणीत माणूस, व्यवस्थित खातपित होता, काम करत होता, हसत होता, बोलत होता आणि अचानक काय झालं !" 

ती गप्पपणे त्याचं ऐकत होती. ऐकता ऐकता तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

" पण ते म्हणाले की, त्यांनी स्वतःच्या चुकांची शिक्षा...."


" तो ढीग म्हणेल ओ. असं वागणारा माणूस स्वतःच्या तोंडाने आपल्याला काय होतं हे सांगेल का आणि त्यातून तो कसा आहे You know better काही झालं तरी त्याचं नाक नेहमी वरती असतं."

" हं. मग आता काय I mean." 

" मॅडम तो काही शरीराने आजारी नाही आणि खचणार्‍यातला वगैरे सुद्धा नाहीये पण आत्ताची किंवा हे वर्षभर जी परिस्थिती आहे त्यात काही तरी आशादायी घडलं तर बरं वाटेल त्याला. आपलं मन आजूबाजूच्या परिस्थितीनुसार दुखतं आणि हसतं सुद्धा आता हे तुम्हाला माहीतच आहे."


" हं."   ती  थोडाश्या विचारी चेहऱ्याने म्हणाली.

" जस्ट डोन्ट वरी. होईल सर्व ठीक. तुम्ही कराल ते!"

" हो नक्कीच!" 

" सो ऑल दि बेस्ट."  त्याने अंगठा उंचावून म्हटलं तसं तिच्या नजरेत नवी आशा उमलली.
.........................................
              


             ती घरी पोहोचेपर्यंत दुपार उलटून गेली होती. तिने विचारलं तर कॉलेजमध्ये मिटींग होती असं कारण ठोकून दिलं तिने! घरी आल्यानंतरही विशाल सोबतच त्याचं बोलणं, विशालने तिला कँन्टीनमध्ये सांगितलं ते सगळं तिच्या कानात घुमत राहिलं. सकाळी तो तिच्याशी भांडला होता ही गोष्ट ही तिला आता दुय्यम वाटू लागली होती. सकाळचा तिचा रागही उतरला होता. माणसाच्या चिडचिड करण्यामागेही किती कारणं असतात असं वाटतं तिला. रात्री जेवतानाही तिचं लक्ष नव्हतं. गेले दोन दिवस उत्साहाने घराबाहेर पडणारी ती आणि घरी आल्यावरती अशी उदास, आपल्याच तंद्रीत राहणारी ती. कुमुद, श्रीधरला तिच्या वागण्याचा अलीकडे काही अंदाजच लागत नव्हता. जेवणानंतर कोणाशी फारसे न बोलत झोप आलीय सांगून ती खोलीत गेली. बेड वरती पडूनही झोप काही डोळ्यात उतरत नव्हती. विशाल सोबत बोलतानाचा त्याचा चेहरा, त्याचे भरलेले डोळे आठवत होते. त्यानंतरच विशालचं बोलणंही मनात सतत घोळत होतं. आपण त्याला त्रास दिला. असं कसं वागलो आपण त्याच्याशी!  ती उठली आणि कपाट उघडलं तसा हँगरला अडकवलेल्या दुपट्यावर तिची नजर खिळली. तिने तो हातात घेतला. आरशासमोर उभी राहिली आणि अंगाभोवती तो लपेटून घेतला तस तिला आठवलं तो सांगली बाहेर कॉलेजेस मध्ये लेक्चर साठी जायचा, कॉलेजच्या कामासाठी बाहेर जायचा तेव्हाही आपल्याला त्याची आठवण यायची मग तेव्हा असंच करायचो आपण! त्याचे हात आपल्या भोवती गुंफल्यासारखे वाटायचे. त्या आठवणीत तिने पुन्हा उशीला डोक टेकलं. तो आहे, आत्ता इथेच आपल्या जवळ या कल्पनेनेच कधीतरी तिचा डोळा लागला.
..........................................................

           उषाताई दरवाजा लोटून आत आल्या. तो केव्हाचा उठून बसला होता. त्याच्याकडे पाहून त्या प्रसन्नतेने हसल्या. तो शुद्धीवरती आल्या दिवसापासून त्या पाहत होत्या. शांतपणे आराम करणं त्याला ठाऊकच नव्हतं. त्या आत आल्या.

" गुड मॉर्निंग."  त्याने नेहमीच्या उत्साहाने म्हटलं.

" गुड मॉर्निंग. काय म्हणतो पेशंट. बरं वाटतंय का?"

" हो, तुम्ही इतकं करता मग का नाही पेशंटला बरं वाटणार!" त्याने मस्करीच्या स्वरात म्हटलं तशा त्या हसल्या. त्यांनी ग्लासात पाणी ओतलं आणि सकाळी घ्यायच्या गोळ्या त्याला दिल्या.

" थँक्यू "

" मोस्ट वेलकम. बरं, थोड्यावेळाने जितेंद्र येतील तुमच्यासाठी नाश्ता घेऊन. खाऊन घ्या. ओके."  त्यांनी बाहेर निघताना त्याला बजावलं तसं त्याने होकारार्थी मान हलवली.
....................................

        त्या निघुन गेल्या. त्याने डोकं मागे भिंतीला टेकलं. त्या कितीही मायेने त्याची काळजी घेत असल्या तरी आता त्याला घरची आठवण येऊ लागली होती. घर, त्याची खोली, कॉलेज सगळंच. सकाळ झाली की हे सगळं नजरेसमोर उभं राहायचं. हे असं हॉस्पिटलमध्ये दिवसेंदिवस पडून राहणं नकोस वाटत होतं. पण कधी कधी त्याला वाटायचं इथे बरं आहे. घरी गेल्यानंतर पुन्हा तेच...... आता घरी सोबत बोलणारी, काळजी घेणारी माणसं असतील. आत्याचं प्रेमाने विचारपूस करणं, मम्माचं काळजी घेणं असेल, नीतूची बडबड, नीतू जितेंद्रची लहान मुलांसारखी भांडणं, नेहमीसारखचं दिवसभरातून एकदा तरी साहेबांचं आपली चौकशी करणं. सगळं असेल पहिल्यासारखं पण तरीही........ त्याच्या मनात एकामागोमाग बरंच काही सुरू होतं.   इतक्यात दरवाजा उघडला गेल्याची चाहूल लागली. फरशी कडे एकटक पाहणारी आपली नजर त्याने वरती वळवली.

" गुड मॉर्निंग."

ती छानसं हसत समोरून चालत आली.  शांत खोलीत तिच्या हायहिल्स सँडल्सचा आवाज भाव खाऊन गेला! कितीतरी दिवसांनी तिने ऑफव्हाईट रंगाची सिल्क साडी नेसली होती. तिच्या हातातल्या गुलाबाच्या मोठाल्या बुकेने त्याचं लक्ष वेधून घेतलं. त्याने निरखून पाहिलं तर तिच्या बोटांच्या नेलपेंटचा रंगही लाल होता !

" तुम्ही कशाला येता? सकाळी काही कामं नसतात का तुम्हाला!"   त्याने नजर दुसरीकडे वळवली. ती हातातल्या बुके सह त्याच्या समोर येऊन बसली.

" हो असतात ना. कॉलेजलासुद्धा जायचं असतं. पण हल्ली मनच नाही लागत कॉलेजमध्ये! सकाळी त्याला भेटलं की दिवस छान जातो. हे काय आताही त्यालाच भेटायला चाललेय. म्हटलं जाता जाता हॉस्पिटल वाटेवरती आहे तर तुमची चौकशी करून जावं."

" काही गरज नाही."   त्याने रागीट सुरात पटकन म्हटलं.

" हं, बरं. फुलं कशी आहेत?  छानयत ना! तुमच्या छोट्या फुलराणी कडून घेतली."   तिने फुलांवरून हात फिरवत म्हटलं.

" हं." 

" आज म्हटलं फुलांची भेट देऊ त्याला! तसा काही फार हट्टी नाहीये तो तुमच्यासारखा. जास्त अपेक्षा नसतात त्याच्या. फार त्याच्या मागे मागे फिरावं लागत नाही न मला म्हणून मजेत चाललेलं असतं आमचं."

" हं." 

" हं काय नुसतं!  त्यापलीकडे अलीकडे काही बोलता येत नाही वाटतं तुम्हाला.  त्याला बोलायला आवडतं पण खूप आणि मला ऐकायलासुद्धा! लाघवी आहे तो. असा तोर्‍यात नसतो ना!  समजून घेतो मला आणि काळजी सुद्धा घेतो. कधी बोलून नाही दाखवतं. त्याला ते आय लव यू वगैरे म्हणणं पोरकटपणा वाटतो ना तरी कळतं मला त्याला काय म्हणायचं असतं ते!"

" हे पहा जा ओ तुम्ही कोणाकडेही पण माझा पिच्छा सोडा."

" असा कसा सोडणार तुमचा पिच्छा!  मी आता ज्याच्याबद्दल सांगितलं त्या माणसाला तुम्ही जवळून ओळखता! तुम्हाला जितकं त्याच्याबद्दल माहित तितकं कोणालाच नाही. पण अलीकडे माझं आणि त्याचं बोलणचं नाही होतं. तो चिडला आहे का माझ्या वरती काय माहित. पण हल्ली भेटच होत नाही आमची. भीती वाटते मग तो माझ्यावरती रागावून निघून नसेल न गेला की मधल्या काही महिन्यांमध्ये हरवला तो कुठेतरी! इतका लांब गेला का की पुन्हा भेटणारच नाही. त्याला गमवायचं नाहीये मला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर व्यक्ती. I can't live without him असल काही नाही बोलणार मी पण ती व्यक्ती माझ्याजवळ असते तेव्हा मी सगळ्यात जास्त आनंदी असते."

 तो खाली मानेने शांतपणे ऐकत होता. फरशीवरती स्थिरावलेली त्याची नजर पाणावली. तिने आपला हात पुढे केला आणि अलगद त्याचे अश्रू पुसले.

" अशी कशी जाईन तुला सोडून!"  तिने त्याचे डोळे पुसत म्हटलं.

मांडीवरच्या बुकेमध्ये तिने चाचपडल्यासारखं केलं आणि अंगठी बाहेर काढली तस त्याला आश्चर्य वाटलं. साखरपुड्याच्या दिवशी तिने त्याच्या बोटामध्ये घातलेली अंगठी होती ती! त्याच्या हाताच्या जखमेमुळे मलम पट्टी वगैरे करताना नर्सने काढून जितेंद्र कडे सुपुर्त केलेली! इतके दिवस त्याच्या लक्षातच आलं नाही ते.

तिने त्याच्या उजव्या हाताकडे पाहिलं. आपल्या दोन्ही हातांनी तिने त्याचा हात अलगद त्याच्या मांडीवरती ठेवला आणि हळूच बोटात अंगठी सरकवली. तिने चेहरा वरती वळवला. क्षणभर त्याच्याकडे पाहिलं. ती किंचित हसली. आणि लगोलग त्याच्या बोटातल्या अंगठीवरती तिने ओठ टेकले. गोड शहार्‍याने त्याने किंचीत हात मागे घेतला. त्याच्या चेहर्‍यावरती स्मितहास्य पसरलं.

" अनु.....काय हे. घर नाही आपलं."  तो गालात हसला. तिने नजर वरती वळवली.

" नसु दे.  इतके दिवस बोलत नव्हतास मग आता विचारूनच टाकलं. मग कधी देणार माझं उत्तर."

" हं.......मी काही तुझ्यासारखा वेळखाऊ नाही. आम्ही झटपट ठरवुन मोकळे होतो. बाकी उत्तर ' नाही ' कस असेल!"

" खरंच. थँक्यू विक्रम आणि मोठ्ठ सॉरी."  तिने त्याच्या चेहऱ्यावरती आपला हात टेकवला.

" इट्स ओके पण मॅडम तुम्ही मला सोडून नाही जाणार यावर आम्ही कसा विश्वास ठेवावा बरं."  त्याने हसत म्हटलं.

" विक्रम तुझ्यापासून दुरावले होते फक्त सोडून नव्हते गेले आणि जाणारही नाही कधी समजलं का?"  तिने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं.

" हो का. थँक्यू फॉर दिस."  त्याने हातातल्या अंगठीकडे नजर टाकली.

" बरं असू दे."   तिने आपल्या हातातली त्याने घातलेली अंगठी त्याच्या नजरेसमोर नाचवली.

" हे काय! कधी घातलीस ?" 

" विक्रम वेडायस का तू!  घालायला काढली कुठे होती!"

तसं त्याने पटकन नजर वरती वळवली.

" हा काढलीच नव्हती. अशा कोणासाठी तरी तुला कसं विसरणार."

" ग्रेटच आहात. दंडवतच घातला पाहिजे."  तो हसला.

" असु दे. हसण्यासारखं काय!  तू स्वतः खरेदी केलेली.  लग्नाची, एंगेजमेंन्ट ची सगळी तयारी आत्या, भावोजींनी केलेली. फक्त ही रिंग्स तू स्वतः जाऊन घेतली होतीस. तुझ्या आवडीची. आत्या म्हणालेल्या मागे एकदा. तुझी पहिली आठवण मग अशी कशी काढून ठेवणार."

" बरं, बरं. इमोशन्स पोचल्या तुमच्या. धन्यवाद आपले."

तशी ती हसली. तिने आपला हात त्याच्या हातावरती ठेवला.


" I'm always with you."
 

तसं नजरेने त्याने ओके म्हटलं. ' थँक्यू डिअर ' त्याचे ओठ पुटपुटले.
.................................................

        ती रूम मधून बाहेर आली. सुटकेचा निःश्वास टाकला तिने. तो आजही रागवेल याचीच भीती वाटलेली तिला. आज किती महिन्यांनी आपण त्याच्याशी बोललो, किती दिवसानंतर हसलो याचच तिला अप्रूप वाटत होतं. आपला आनंद कोणाला आणि कोणत्या शब्दात सांगाावा तेही कळेना . आज बर्‍याच दिवसांनी तिला हलकं वाटत होतं.  किती दिवसांपासूनची तिची इच्छा होती, त्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या हातांनी पुसावं. त्याला सांगावं मी आहे तुझ्यासोबत.पण मन तयार होईना. आणि आज ते सत्यात उतरलं होतं. आता मनात कसलाच किंतु, परंतु नव्हता. सगळं सूर्यप्रकाशासारखं लख्ख दिसत होतं. कसली चलबिचल आता मागे उरली नव्हती. ती याच खुशीत बाहेर आली. समोरून जितेंद्र आला.

" वहिनी काय हो एकट्याच हसताय?"  त्याने आश्चर्याने विचारलं तशी ती भानावर आली.

" नाही, असंच. तुमचे बंधुराय बोलले एकदाचे आमच्याशी न चिडता."

" काय सांगता! बरं झालं बुवा तुम्ही बोलायला लागलात एकमेकांशी ते."

" हा ते चिडले होते जरा."

" वैनी पुरे आता तुमचं हे चिडणं, रागावणं. दोघांनीही जरा एकमेकांचं ऐकत जा की!"

" हो. नाही होणार आता असं." 

" बरं वैनी, तो राजेश..... म्हणजे नाताशाने सांगितलं सगळं मला."

" हं, आता राजेश ने जे काही केलय ते भाऊसाहेबांना पर्यंत पोचायला हवं. करू आपण तेही लवकरात लवकर."  ती थोडासा विचार करत म्हणाली.
....................................................

" May I come in ?"

" या मॅडम प्लीज कम."   डॉक्टरांनी प्रसन्न मुद्रेने तिचं स्वागत केलं. ती आत मध्ये आली.

" Please have a sit." 

" थँक्स."   ती खुर्ची सरकवून बसली.

" डॉक्टर,  सरांची तब्येत ठीक आहे ना?  काही प्रॉब्लेम नाही ना?"  काळजीचे भाव तिच्या चेहर्‍यावर होते. डॉक्टरांनी एकवार तिच्याकडे पाहिलं.

" काळजीचं कारण नाही पण It's suicide attempt लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही ही. शरीराने ते बरे होतील इन फॅक्ट झालेत. फक्त मनाची काळजी घ्या इतकचं. तुमच्या मम्मा म्हणालेल्या, की तुमचे.... तुमच्या दोघांच्या रिलेशन मध्ये मध्यंतरी प्रॉब्लेम्स.... त्या सगळ्याचा हा परिणाम असेल किंवा त्यातून येणारे एकटेपण वगैरे. तुमच्या नोकर मंडळींनी तर सांगितलं, त्यांचं खाणपिणं,  झोपणं-  उठणं, बाहेर पडणं सगळं डेली रुटीन कॉलॅप्स झालं होतं. अरुंधती मॅडमनी मला काही टॅब्लेट्सची पाकीटं दाखवली होती. त्यांच्या रूम मध्ये सापडलेली. गेल्या काही महिन्यांपासून ते झोपेच्या गोळ्या घेत होते. त्याचं प्रमाण वाढलं होतं."

" काय!"    ते ऐकून तिला धक्काच बसला.

" मन शांत नसतं तेव्हा झोप, खाण्यापिण्यात लक्ष नसतं माणसाचं  मग स्वतःच्याच विचारांपासून सुटका म्हणून कृत्रीम झोपेचा माणसं आधार घेतात. त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत आणि हो बी केअरफुल."

" हा....."     हे सगळं ऐकुन तिला मनातून रडू आलं. त्याच्या या अवस्थेची इतक्या दिवसात किंचितही कल्पना नव्हती याचं तिला वाईट वाटलं.

" मॅडम "

" आ......हा येस डॉक्टर."

" डोन्ट वरी. बरे आहेत ते. तुमच्या मधले काही प्रॉब्लेम संपले असतील तर आनंदच आहे."

" बरं त्यांना डिस्चार्ज "

" हो, व्हाय नॉट ?   लवकरच. फक्त पुन्हा असं काही होणार नाही....."

" डोन्ट वरी डॉक्टर नाही काही होणार अस. मी असेनच घरी. असा वेडेपणा पुन्हा त्यांना कधीच करु देणार नाही."

ती आश्वासक नजरेने म्हणाली. तिच्या बोलण्याने डॉक्टरही निर्धास्त झाले. ती त्याची काळजी घेईल याची खात्री त्यांना वाटू लागली.

क्रमशः

129 रविवार रात्री

🎭 Series Post

View all