भाग 136
( गेल्या भागात भाऊसाहेबांनी विक्रमला इमारतीच्या उद्गाटनाचा मान दिला आणि पुन्हा सगळी जबाबदारी त्याच्याकडे सुपुर्त केली. घरीही त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे पाहूया पुढे)
त्याने डोळ्यांवरून एक हात फिरवत ओके ओके थँक यु सो मच म्हणून एकदाचा फोन ठेवला. मघापासून उभ्याने उभ्यानेच चार- पाच कॉल घेऊन झाले होते. कॉलेजमध्ये नव्या इमारतीच्या उद्गाटनाच्या कार्यक्रमाची बातमी वर्तमानपत्रांमधून छापली गेली होती. भाऊसाहेब गुरुकुल, गुरुकुल चे डायरेक्टर हे विषय मध्यंतरीच्या काही महिन्यांमध्ये पत्रकारांच्या आवडीचे विषय झाले होते त्यामुळे त्याचं बरं होणं, त्यानंतरच्या काही दिवसातच हा उद्गाटनाचा कार्यक्रम, त्याला भाऊसाहेबांची हजेरी, त्यांची स्वखुशीने मान्यता आणि विक्रम कडे पुन्हा कॉलेज ची जबाबदारी सोपविण्याचा त्यांचा निर्णय या सगळ्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरदार सुरू होती. त्याच्या ओळखीतले जवळचे प्राचार्य, मित्र, हितचिंतक म्हणवणारी मंडळी अशा सगळ्यांचे अभिनंदनाचे फोन येत होते. तो हॉस्पिटलला असताना भेटायला न येऊ शकलेली मंडळी, त्याचे मित्र असं कोणी ना कोणी फोन करत होतं. सगळ्यांना ओके बरं, थँक्यू असं बोलून त्याला गेल्या दोन-तीन दिवसांपासून कंटाळा आला होता. ' हुश्श सुटलो ' या आविर्भावात मोबाईल ठेवणार इतक्यात प्राचार्यांचा फोन! नाईलाजाने त्याने कॉल उचलला.
" हॅलो सर. ते परवा कार्यक्रमाला आलेल्या गेस्ट ना थँक्सचं फॉर्मल लेटर पाठवायचं तर तुम्ही जरा लेटर्सचा मजकूर बघून घ्या न. मी ड्राफ्ट सेंड करू का ?"
तो काही बोलण्याआधीच करंबेळकर सरांनी काम सांगून टाकलं.
" हा...... ओके आणि......"
तो बोलत होता. ती हलकेच खोलीचा दरवाजा उघडून चेहऱ्यावर मोठं हसू घेऊन आत मध्ये आली. तो कॉलेजला निघण्यासाठी तयार झालेला पाहून तिचा चेहरा खट्टू झाला. मघाचं हसू कुठल्या कुठं पळून गेलं. तिने पाहिलं तर तो अजून फोनवरती बोलत होता. ती खोलीतून निघून गेली तेव्हा पासून त्याचे फोन सुरू होते अगदी अर्ध्या तासापासून! इतक्यात तिचे लक्ष बेडवरच्या ब्लेजर कडे गेलं. कडक इस्त्रीचं ब्लॅक रंगाचं ब्लेजर बेडवरती टाकलं होतं. खरं तर ठेवलं होतं पण तिला ते ' टाकल्यासारखं ' वाटलं. ती पुढे झाली. त्याचं लक्ष फोन मध्ये! तिने वॉर्डरोब उघडला आणि त्यातून ब्लॅक कलरचं जॅकेट बाहेर काढलं. त्यावरुन हात फिरवला तशी एक नकोशी आठवण मनात तरंग उठवून गेली. आशिष सोबतचा तो पूर्ण दिवस! त्या दिवशी आशिष सोबत असूनही ती तिथे नव्हती! हौशीने तिने त्याच्यासाठी घेतलेली पुस्तकं आणि ते जॅकेट. तिनं क्षणभरात तिच्या मनातला तो विचार झटकून त्याच्याकडे पाहिलं. त्याचं लक्ष अजुनही तिच्याकडे नव्हतं. तिने आपल्याच नादात पटकन जॅकेट बेडवरती ठेवलं. ते ब्लेजर उचलून वॉर्डरोबमध्ये ठेवून दिलं आणि वॉर्डरोब बंद केला. ती त्याच्याकडे वळली.
" येस... नको...... सर न्यू कन्स्ट्रक्शन आहे ते. सगळे क्लासरूम क्लीन ठेवा. न्यू इयर मध्ये स्टुडन्टना बसायला देणारच आहोत तिथे. मुलांना म्हणावं दोन महिने थांबा जरा. उगीच प्रेक्षणीय स्थळ असल्यासारखं तिकडे फिरत बसू नका." तो बोलत होता तशी ती फसकन हसली.
" What! " हळू आवाजात तो जरासा चिडला. तिने मान हलवून ' काही नाही ' म्हटलं.
" हा तर सर....." त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. ती दोन पावलं पुढे सरकली आणि दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकले.
" अ...... " तो थोडासा तिच्या पासून दूर सरकला. तिचे हात त्याला बाजूला करता येईना!
" हा बोला ना सर. Carry on!" पलीकडून प्राचार्य बोलत होते.
" तर तुम्ही सगळ्या स्टाफला सूचना...."
ती हळूच हसत पुन्हा पुढे सरकली. त्याच्या केसातून तिने गमतीने हात फिरवला.
" सगळ्यांना सांगा, मुलं उगीच रेंगाळताना तिथे दिसली तर....स्पेशली कपल्स.. लक्ष द्या जरा. नोटीस बोर्डवरती सूचना लिहा तशी."
तो बोलत होता. तिने कळूनही न कळल्या सारखं केलं,
" OK Sir, Bye. Have a nice day."
त्याने फोन ठेवला.
" What's this! काय डेलिसोप सुरु आहे का ?"
तिचे हात त्याने दूर झटकले. तो जायला वळला तसा तिचा चेहरा उतरला.
" It'.....It's ok...... निघूया ?"
तिचा खट्टू चेहरा पाहून तो नरमाईनेच म्हणाला. दारापाशी गेला तर ती तिथच गप्प उभी!
"अनु......." तो चालत पुन्हा तिच्या पाशी आला.
" चल ना. कॉलेजला नाही यायचं का! बघ लेट होईल ना ग.... मला आपल्या शाळेत पण जायचय."
ती हाताची घडी घालून तशीच उभी होती.
" जा तू मग." तिने चेहरा दुसरीकडे वळवला.
" अरे! बघा ना इकडे......"
" You may go now! " तिने बेडवरचं जॅकेट उचललं आणि वॉर्डरोब जवळ गेली.
" हे काय! दे. आता काढलयस तर घालून जातो ना!" तो सहजपणे म्हणाला.
" काही नको!" तिच्या नाकावरचा राग बघून फार विचारण्यात अर्थ नाही ते त्याच्या लक्षात आलं.
" ओके जातो मी.....बघा यायचं तर या!"
इतकं बोलून तो जायला वळला.
" जा नी कॉलेजमध्येच रहा." ती चिडून म्हणाली तसा तो हसत मागे वळला.
" Wow... Nice idea! कधी जाऊया सांग!"
" छे! काही बोलायलाच नको." तिने रागातच वॉर्डरोब उघडलं. तो चालत पुढे आला आणि वॉर्डरोबला टेकून उभा राहिला.
" काय झालं ? सांग न." त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं.
" असच..... मी येऊन इतके दिवस झाले आपण फिरा....."
" ओह.....अच्छा Let me guess हा. पंधरा दिवस झाले ना! बापरे किती दिवस झाले नाही!"
मस्करीच्या सुरात तो म्हणाला तसा तिने रागाने एक कटाक्ष टाकला.
" Ok, So Let's go. चला मॅडम कुठे जाऊया मग?"
" नको." ती हिरमुसल्या चेहर्याने म्हणाली.
" आता सॅटर्डे- संन्डे आहे ना. आमच्या लाईफ मधले दोन दिवस तर देऊच शकतो तुमच्यासाठी !"
" हो का! नको पण. मला तुमचं सगळं लाईफ पाहिजे....."
" बरं." तो हसला तसा तिचा चेहरा आनंदला. कितीतरी महिन्यांनी बाहेर त्याच्या सोबत फिरायला जायचं या कल्पनेने तिला मस्त वाटत होतं.
................................................
घरी सगळं आता पूर्ववत झालं होतं. त्याचं हॉस्पिटलमध्ये असणं, त्यानंतर राजेशचे उघडकीस आलेले उद्योग, ती पुन्हा घरी येईल की नाही, तिचे आई-बाबा यासाठी तयार होतील की नाही ही चिंता या सगळ्या घरगुती वाद- विवादांमध्ये अख्ख घर अडकलं होतं. अरुंधती लहानग्या विक्रमला घरी सोडून गेल्यानंतरचे दिवस असे भाऊसाहेबांना बेचैन करणारे होते. तशीच स्थिती इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा झाली. बाहेरच्या कामांमध्ये त्यांचं चित्त लागत नव्हतं. विक्रमचं हॉस्पिटल मध्ये असणं त्यांच्या जिव्हारी लागलं होतं. पण आता सगळं सुरळीत झालं होतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांच्या कामामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांमध्ये जितेंद्रचंही कारखान्याकडे दुर्लक्ष झालं होतं. नीतूही घरी थांबायची. पण आता पुन्हा सगळ्यांनी आपापल्या कामांमध्ये डोकी खुपसून घेतली. आज ' कुठे जायचा प्लॅन बरं ' अस आडून आडून चिडवायला घरी कोणी नव्हतं. अरुंधती नी आत्या फक्त घरी होत्या. ' आम्ही जरा जाऊन येतो. सोमवार पर्यंत येऊ.' असेच काही तरी त्याने निघताना आत्याला सांगितलं मग तिनेही फार चौकशी न करता गालात हसत बरं म्हटलं.
....................................................
" काही बोलायचं नाही असा पण केलाय का मघापासून?"
तो शांतपणे गाडी चालवत होता. तिचे डोळे इकडे तिकडे भिरभिरतच होते. त्याचं लक्ष होतं.पण तिच्या चंचलतेचं त्याला कधी कधी हसू यायचं. ' कशी आहे न ही!'
" हसायला काय झालं?" तिने डोळे बारीक करत म्हटलं.
" आ......नथिंग. कुठे काय!"
" हा..... विक्रम तू पहिल्यांदा मला भेटलेलास तेव्हा तुला काय वाटेललंं?"
तिने सहज विचारलं. त्याला बेसावध असताना बाँम्ब पडल्यासारखा वाटला त्याच्यावर! ' बापरे! हे काय आता नवीन.' मनातून तो जरा चरकलाच. आता काय बोलायचं त्याला कळेना. चुकून आपण काहीतरी म्हणायचो आणि नेमका त्याचाच राग यायचा तिला!
" कधी बरं ?" जरासा अंदाज घेत त्यानं विचारलं.
" ते आपण पहिल्यांदा भेटलो ना कॉलेजमध्ये! मी नवीन होते तेव्हा कॉलेजच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल बोलायला पहिल्यांदा मी आलेली तुला भेटायला केबिनमध्ये!"
ती म्हणाली तसा तो प्रसंग त्याच्या नजरेसमोर तरळला. आपल्या समोर घाबरलेली, चाचरत बोलणारी ती! तेव्हा ती केबिन मधून बाहेर पडली तर तिच्या बोलण्याचं आपल्याला हसू आलेलं. ती थोडी बावळट वाटलेली त्याला. तिला बोलायचं तर बरंच होतं. पण शांतपणे, आत्मविश्वासाने बोलता येईना! कॉलेजमध्ये नवीन जॉईन झाली होती तेव्हा म्हणून कदाचित...... त्याचं मन लगेच तिची बाजू घेऊ लागलं आता.
" सांग ना." तिने पुन्हा म्हटलं तसा तो भानावर आला.
" काही नाही ग असच......काय वाटणार? सगळा कॉलेजचा स्टाफ माझ्यासाठी सेमच! त्यातली कुणी काम घेऊन आली भेटायला तर फार अॉबझेरवेशन करण्याच्या फंदात मी पडायचो नाही!"
"मग तुला कोणीच आवडायचं नाही का? I mean इतक्या छान छान मुली आपल्या स्टाफमध्ये असताना तु कोणाकडे बघायचा सुद्धा नाही. जरा अवघडच आहे या वरती भरोसा ठेवणं." ती मस्करी करतेय की रागावून बोलतेय त्याला कळेना.
" नाही गं असं काही.... See मला ना मुळात अशा मुली आवडायच्या नाहीत. अश्या ' बहु टाईप ' मग का लक्ष द्यायचं! You know that everything."
" हं....." ती खट्टू चेहर्याने म्हणाली.
त्याच्या लक्षात आलं, तिला काय ऐकायला आवडलं असतं ते! ' त्या दिवशी सुद्धा अशीच दिसत होतीस तू! किती घाबरली होतीस तू तरी पण किती छान दिसत होतीस ' असं काही तरी त्याच्या तोंडून ऐकायचं होतं तिला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
" अनु , माझ्या साठी तू कोणीही नव्हतीस. काय म्हणतात ते खिजगणतीतही नसणारी व्यक्ती! भाऊसाहेबांनी नेमलेली एक एम्लोयी चारचौघांसारखी बस इतकच बाकी नथिंग! पण ....... आता तू आहेस म्हणून मी आहे न. दहा माणसांमध्ये तुला उभं केलं तर डोळे झाकूनही मी तुझ्यापाशीच येणार न. बाकी चार माणसांपेक्षाही तुझं असणं माझ्यासाठी कणभर जास्त महत्त्वाचं. माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान कणभर जास्त उंचीच. In short तुझ्यासाठी सगळंच थोडसं एक्स्ट्रा."
तो गाडी चालवता चालवता बोलत होता. ती कान देऊन ऐकत होती मनातून हसत.
................................................................
इतक्यात गाडी सिग्नल ला येऊन थांबली आणि तिने गाडीच्या काचेतुन बाहेर पाहिलं.
" काहीतरी गिफ्ट घेऊया का माधव काकांसाठी?"
" हो...... पण काय?" तो पाण्याची बॉटल उघडत म्हणाला. तेवढ्यात काचेवरती टकटक झाली. तिने काच खाली केली बॉयकट चेहऱ्याचे दोन डोळे बारीक करून काचेतून कोणीतरी डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत होतं. तिने काच खाली केली.
"बोला." तिच्या चेहऱ्यावरती ओळखीचं स्मित पसरलं.
" काय गं तुला इतक्या सगळ्या गाड्यांमध्ये आमची गाडी कशी ओळखता येते?" तिने आश्चर्याने विचारलं.
" मला नंबर पाठय." ती बोट उंचावत म्हणाली.
" हुशारय. हो न विक्रम." तिने त्याच्याकडे पाहत म्हटलं.
" हो.... तुमच्या पेक्षा जास्त."
त्याने हसतच वॉलेटमधले पैसे काढून फुलवाली च्या हातात दिले. तिने परडीतली गुलाबाची ताजी, टवटवीत फुलं त्याच्या हातात दिली.
" थँक्यू." त्याने म्हटलं.
" दे तिला! काय ग त्याच्यापासन ब्रेकअप का करते सारखं सारखं तू !" तिने एक हात टेचात हातातल्या परडीवरती धरला.
" ए वात्रट, तुला काय माहित ग. असं बोलतात." अनघाने तिला दटावलं.
" ए मोठीय मी! मला कळत. भांडू नको त्याच्याशी !"
" अरे बापरे! हो का ?" तिनं कौतुकानं त्या ' बॉयकट ' चं नाक चिमटीत पकडलं.
" आ......" ती कळवळली.
" ठकुबाई कुठची?"
इतक्यात सिग्नल पडला. गाड्या पुढे सरकु लागल्या.
" टाटा." आपल्या नाकाचा शेंडा चोळत, हात हलवत, दात मिचकावत ती रस्ता ओलांडून निघून गेली.
.............................................
" अरे भयानकच आहे ही!" ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
" हो ना. मला भेटणाऱ्या भयानकच निघतात. ही, ती नीतू , नताशा, समि....."
तो समिहाचं नाव घेणार इतक्यात त्याने घाबरूनच अवंढा गिळला. तिने नाक फुंरगटून चेहरा काचेकडे वळवला. त्याने हातातली गुलाबाची फुलं तिच्या नजरेसमोर धरली.
" आता हे कोण घेणार ? अच्छा. नको का? बरं....."
तिने पटकन हात पुढे केले आणि फुलं आपल्या हातात घेतली.
" थँक्यु " लटक्या रागाने तिने म्हटलं.
..............................................
थोडं अंतर पुढे गेल्यानंतर काही दुकानांपाशी त्याने गाडी थांबवली. दोघे गाडीतून खाली उतरले.
" विक्रम काय गिफ्ट घ्यायचं रे ?"
" बघ तुला काय आवडतं ते!"
" तसं नाही...... पण काय द्यायचं बरं. हे, आत्या, भाऊसाहेब यांना गिफ्ट द्यायचं म्हटलं तरी काय घ्यावं हा प्रश्न पडतो."
ती विचारी चेहऱ्याने म्हणाली.
" हं....थंडीचे दिवस सुरू झालेत आता. एखादा स्वेटर किंवा शाल."
" हो चालेल. त्या क्लॉथ सेंटरमध्ये पाहूया का ? " दोन मजली इमारती कडे तिने बोट दाखवलं.
" ओके." ती समोरच्या दुकानामध्ये गेली.
तो गाडीला टेकून उभा होता आजूबाजूची दुकान न्याहाळत! तिथे दोन- तीन पावलांवर एक टपरीवजा ज्वेलरी चे दुकान होतं. एक बाई छोट्याच्या स्टुलावरती बसल्या होत्या. समोर चारपाईवरती ट्रे मांडुन ठेवलेले. त्यात सोनेरी, चंदेरी, हिरव्या रंगाच्या बांगड्या, वेगवेगळ्या रंगांची लेडीज ब्रेसलेट्स, अंगठ्या, नेलपेंन्टच्या बॉटल्स अस काही ना काही होतं. वीस रुपये, पंचवीस रुपये, चाळीस रुपये, जास्तीत जास्त शंभर रुपये. ते शंभर रुपयेही काहीजणींना महाग वाटायचे मग घासाघीस सुरू व्हायची. कॉलेजातल्या मुली ग्रुपने स्टॉल पाहायला यायच्या. उत्सुकतेपोटी काही वस्तू हातात घेऊन पाहायच्या. आवडल्या तर घ्यायच्या. बायकांची, मुलींची स्टॉलपाशी ये-जा सुरू होती.
" चलो निघुयात ?" ती हातात खरेदीची पिशवी घेऊन बाहेर आली.
" हं....."
" काय रे चल..." गाडीचा दरवाजा उघडणार तोच तो म्हणाला," झुमके छान आहेत ना!" ती पटकन मागे वळली.
" कुठे ?" तिने आश्चर्याने विचारलं.
" ते " त्याने स्टॉल वरती बोट दाखवलं तशी ती हसली.
" काहीही..... साधसं असतं ते. दोन दिवस यूज केलं की त्याचा गोल्डन कलर ब्लॅक होईल." ती सहजपणे म्हणाली तसा त्याचा चेहरा ओशाळला.
" हो का! ओके."
" मग......चाळीस पन्नास रुपयात कोणी गोल्ड नाही देणार तुला. तू पण ना वेडायस अगदी. खरंच!"
ती दरवाजा उघडून आत मध्ये बसली. हातातली पिशवी व्यवस्थित ठेवून दिली. तो बाहेरच उभा होता अजून! तिने त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर तिला मघाचं तिचं बोलणं आठवलं तस काहीश्या विचाराने ती सहज म्हणाली,
" विक्रम, कोल्ड्रिंग हवय."
" चला......" तो म्हणाला.
" चला कुठे..... प्यायचं नाही. असंच जाताजाता गाडीतून प्यायला. आण ना एक फ्रुटीची बॉटल."
" ओके." तो चालत पलीकडच्या हॉटेलच्या दिशेने गेला.
ती गाडीतून उतरली. तिथूनच तिने तो स्टॉल न्याहाळला आणि हळूहळू चालत पुढे गेली.
..........................................................
" काय देऊ ताई ?" आत स्टुलवरती बसलेल्या बाईंनी विचारलं.
वरती तारेला अडकवलेल्या झुमक्यांकडे तिने बोट दाखवलंं. त्या बाईंनी ती पारदर्शक पॅकिंग पिशवी काढून तिच्या हातावर टेकवली. त्या छोट्याश्या पॅकिंगवरती त्याची प्राईज लिहिलेली होती. पन्नास रुपये! कर्णफुलाची डिजाइन आणि त्या कर्णफुलांनाच चिकटून गोल आकाराचे झुमके.
गोल्डन आणि व्हाईट रंगाचे मणी. त्यावरुन तिने हात फिरवला. हातातली क्लच उघडली. त्यात तिचे क्रेडिट कार्ड होतं. शंभर पाचशे च्या नोटा होत्या. तिने शंभर ची नोट काढून बाईंच्या हातात दिली.
" घालून पहा. छान दिसतील हो तुम्हाला." बाईंनी उरलेले पैसे तिच्या हातावरती ठेवत म्हटलं. ती त्यावर छानसं हसली.
...................................................
तिने मागे स्टॉल कडे वळून पाहिलं आणि गाडी पाशी आली. आत मध्ये बसताच ते पॅकिंग पटकन उघडलं. आणि ते झुमके हातात घेतले. तिच्या चेहऱ्यावरती हसू फुललं. तिने साडीला मॅचिंग असणारे सोन्याचे इयरिंग्स काढले नी क्लच मध्ये ठेवून दिले. ते झुमके कानात घालताना तिच्या चेहऱ्यावरती लाली पसरली.
.........................................
तो गाडीचा दरवाजा उघडून ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला.
" घ्या." त्याने बॉटल तिच्या हातात दिली.
तिने बॉटल हातात घेतली तर त्याचं लक्ष तिच्या कानांकडे गेलं.
" कसेयत?" तिने त्याच्याकडे पाहत हसर्या नजरेनं विचारलं. त्याने हात पुढे केला आणि तिच्या कानापाशी नेला.
" काय ?"
तिने लाजून नजर खाली वळवली. तिचे दोन्ही खांद्यांवर झुकलेले केस आणि त्यात लपलेले ते छोटुसे झुमके. त्याने अलगद हाताने एका खांद्यावरती रुळणारे केस किंचित बाजूला केले. आता मात्र सगळे केस उजव्या खांद्यापाशी आले. आता एका कानातला झुमका तरी गालावरती उठून दिसू लागला. तो क्षणभर पाहतच राहिला.
" चल पुरे. आता निघू या." त्याचा हात आपल्या गालापासून बाजूला करत ती लाजत म्हणाली.
" ओके." त्याने पुढे पाहत गाडी स्टार्ट केली.
आपल्या हौसेखातर तिने ते खरेदी केले. तिच्या सोन्याच्या कानातल्यांपेक्षाही तिला हे जास्त महत्त्वाचे वाटले कारण आपल्याला आवडले म्हणून याचाच आनंद त्याला होता.
क्रमशः
137 सोमवारी संध्याकाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा