बंधन भाग 21

Love, Social Issues

भाग 21
( गेल्या भागात भाऊसाहेब स्वतः कॉलेजला गेले. त्यांनी प्राचार्य, उपप्राचार्यांची मिटिंग बोलावून प्रवेशप्रक्रियेच्या संदर्भातील फाईल्स स्वतः तपासल्या. त्यात झालेला आर्थिक घोळ त्यांच्याही लक्षात आला. त्यांनी विक्रमला बोलावून त्यालाही याविषयी जाब विचारला. हा सगळा प्रकार अनघाच्या हुशारीमूळे उघडकीस आला हे कळताच त्यांनी तिचेही याबद्दल कौतुक केलं पाहुया पुढे)

कॉलेजला सकाळी अचानक आलेले भाऊसाहेब त्यांची प्राचार्यांसोबत बराच वेळ चाललेली मिटिंग, भाऊसाहेबांच्या केबिनमधुन बाहेर पडल्यानंतर करंबेळकर सरांच्या चेहर्‍यावरचा तणाव हे सगळं पाहून सामंतसरही चांगलेच धास्तावले होते. त्यांना विक्रमसोबत यावर सविस्तर बोलायच होतं पण उगीच कुणाला संशय नको म्हणून लगेच त्याला भेटणं त्यांनी टाळलं होतं. 
" काय डॅड आज जेवताना लक्ष नव्हतं तुमचं?" रात्रीच्या जेवणानंतर बडिशेप चघळत राजेश सामंतांच्या शेजारी येऊन बसला. आज घरी आल्यापासून बाबा अस्वस्थ आहेत हे त्याच्याही लक्षात आलं होतं.
" नाही नथिंग " सामंत सर विचार करित म्हणाले.
" What happened Dad " राजेश पुन्हा त्यांच्या चेहर्‍याकडे पाहत म्हणाला.
" काही नाही रे या खंदारे मॅडमचं अति लक्ष देण एक दिवस गोत्यात आणेल आम्हाला! आमच्या मॅनेजमेंन्ट डिपार्टमेंन्टला येणार्‍या मुलांकडुन कॉलेजच्या फी पेक्षा एक्स्ट्रा फि घेतली जाते ते लक्षात आलय त्यांच्या."
" काय सांगता पण कसं मग आता " त्यालाही हे ऐकुन धक्का बसला होता.
" अरे अॅडमिशन्स सुरु आहेत ना तेव्हा काही पालकांनी आरडाओरड केली एवढी फि कशी ब्रोशरवरती तर कमी रक्कम आहे वगैरे आणि ब्रोशरवरची अमाउंन्ट बदलली तर लक्षात येईल ना सगळ्यांच्या म्हणून पैसे एक्स्ट्रा घेतले तरी ते इकडे तिकडे कुठेतरी चार्जेस म्हणून दाखवायचे हि विक्रमचीच आयडिआ!" ते डोक्याला हात लावून बोलत होते.
" मग आता " राजेशने विचारलं.
" अरे या मॅडम गप्प राहतील तर शपथ त्या गेल्या प्रिन्सिपलकडे आणि आमचे अति प्रामाणिक प्रिन्सिपल ते तर काय भाऊसाहेबांना काय सांगितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आज भाऊसाहेब आलेले रेकॉर्ड चेक करायला."
" व्हॉट हे सगळं इथपर्यंत पोहचलं." राजेशला हे सगळ ऐकुन आश्चर्यच वाटलं. तेवढ्यात विचार करता करता सामंत जरा स्थिर होत म्हणाले,
" एक एक मिनिट या सगळ्याला खरी कोण जबाबदार असेल तर ती अनघा येस मला शिवा म्हणाला होता तिनेच हे वाढीव फिचं खंदारे मॅडमना सांगण्याचा चोमडेपणा केलाय."
" कोण अनघा हि तिचा काय सबंधं ?" राजेशने लगेच विचारलं. त्याने पहिल्यांदाच सामंतांच्या तोंडून हे नाव ऐकलं होतं.
" आहे रे एक नवीन प्रोफेसर गेल्या वर्षीच जॉईन झालीय. खंदारे मॅडमची डिट्टो कॉपी तो प्रामाणिकपणा,डेडिकेशन अँन्ड अॉल " ते कुत्सिकपणे म्हणाले.
" Don't worry Dad होईल नीट सगळं आणि विक्रम आहेच ना !" तो थोडासा हसत त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाला तसे तेही थोडे निर्धास्त झाले.
.........,,.,.,.......
दुसर्‍या दिवशी कॉलेजला त्यांना कळलं कि भाऊसाहेबांनी विक्रमलाही या विषयाबद्दल विचारलं होतं आणि त्याला या सगळ्या प्रकारात लक्ष घालून ते मिटवायला सांगितलं होतं. त्यामुळे त्यांची चिंता वाढली होती. विक्रमने यात आपल्याला गुंतवलं तर आपली काही खैर नाही याची त्यांना कल्पना होती शिवाय हा सगळा प्रकार गेल्या दोन अडीच वर्षांपासुन सुरु होता. त्यामुळे भाऊसाहेबांनी मागचे रेकॉर्ड तर चेक केले नसतील ना याचीही त्यांना मनातून भिती होती. त्यांनी लेक्चर संपल्यानंतर खाली येऊन कुणी आजूबाजुला नाही ना हे पाहुन जाधवसरांना फोन लावला.
" हॅलो सामंतसर How're you ? " पलिकडुन 'गुरुकुल ' चे माजी उपप्राचार्य बोलत होते. 
" Ya,I'm fine " सामंत कसनुसं हसत म्हणाले.
" मग कॉलेज कस चाललंय Of course छानच असेल" ते उत्साहाने बोलले.
" सर तेच बोलण्यासाठी फोन केला होता " हळुहळु सामंतांनी मुद्द्याला हात घातला.
" हा बोला ना काही प्रोग्राम वगैरे आहे का कॉलेजला?" त्यांनी विचारलं.
" नो नो सर मला थोडं पर्सनल बोलायचं होतं सर भाऊंनी रेकॉर्ड्स चेक केलेत. खंदारे मॅडम एच.ओ.डी. आहेत आता त्यांच्या सगळ लक्षात आल." या दोन वाक्यासरशी काय कळायच ते जाधवसरांना लक्षात आलं. ते सामंतांवर भडकले.
" What ! सामंतसर प्लिज मला यात अडकवू नका आणि तसही तेव्हा झाल्या त्या गोष्टी तेव्हा झाल्या मी सगळं मॅनेज करत होतो ना तेव्हा विक्रमसाहेबांचा खुप फायदा करुन दिलाय मी आणि तुमचाही ओघानेच. आता निंबाळकरांना तुम्ही मॅनेज करु शकत नाही त्याला मी काय करु " ते धडाधडा बोलत होते.
" So please Don't call me again to talk on this matter Bye " जाधवसरांनी चिडुन फोन कट केला.जाधवसर यात काहीतरी मदत करतील निदान एखादा सल्ला तरी देतील याची त्यांना आशा होती पण ती फोल ठरली.
..........................
सामंतसरांचं फोनवरचं बोलणं आणि फोन कट झाल्यानंतर चिडलेला चेहरा काळेसरांनी पाहिला. मघापासुन ते अॉफिसमध्ये उभे होते आणि त्यांचं लक्ष सहजच सामंतसरांकडे गेलं. अॉफिसमधून चालत ते पुढे आले. मागून येत त्यांनी सामंतांच्या खांद्यावर हात ठेवला तसे ते दचकले.
" दचकायला काय झालं सर मीच आहे " अंधुकसं हसत काळेसर बोलले.
" नो नो मी कश्याला घाबरु !" चेहर्‍यावर आत्मविश्वास आणत सामंतसर म्हणाले.
" हं तेच म्हणतोय ना मी आता तरी निदान घाबरुन का होईना हे उद्योग थांबवा." काळेसर म्हणाले.
" What do you mean " सामंत चिडुन म्हणाले.
" सर चिडताय कशाला मी कश्याबद्दल बोलतोय ते तुम्हाला पण आणि मलापण चांगलचं माहितीय तेव्हा आता तरी निदान भाऊसाहेबांनी या सगळ्या प्रकारात काहीतरी अॅक्शन घेण्याआधी हे थांबवा आणि नीट वागा." काळेसर म्हणाले.
" तुम्ही काळेसर काही बोलूच नका.इतकी वर्ष प्रमाणिकपणे काम करुन काय मिळवलत ओ एका वन रुम किचनच्या फ्लॅटमध्ये फॅमिलीसोबत राहताय आणि तिथच रहा आयुष्यभर अहो इतक्या खस्ता खाऊन शिक्षण घेतलं जीव तोडून इथवर पोचलो ते काय परत तसच जगण्यासाठी!" सामंतसर काळेसरांच्या सल्ल्यावर चिडले.
" हो बरोबर असेलही तुमचं मी काय कमावलं इतक्या वर्षात बँकबॅलन्स नसेलही कदाचित भरमसाठ पण या मुलांचं खुप प्रेम मिळालं, भाऊसाहेबांची प्रेमळ थाप पाठिवर मिळाली बस पुरे आहे मला तेवढं तुम्ही तुमचं पहा आता." एवढं बोलून काळेसर निघून गेले. त्यांना प्रत्युत्तर द्यायची इच्छा असुनही ते काहीच बोलू शकले नाहीत. कारण सामंतांना माहित होतं जाधवसर उपप्राचार्य असताना बी.कॉम चं डिपार्टमेंन्ट नॉनग्रॅनटेबल होतं म्हणून आपण बी.कॉमच्या मुलांकडून वाढीव फि घेऊ आणि अर्धा फायदा तुमच्या खिश्यात अशी अॉफर जाधवसरांनी काळेसरांना दिली होती पण काळे सर यासाठी तयार नव्हते वरती मला कॉलेजचा पगार पुरेसा आहे मुलांच्या पैश्यावर मजा मारण्यापेक्षा मी उपाशी राहिन पण अस काही करणार नाही असे खडे बोल काळेसरांनी जाधवसरांना तेव्हा सुनावले होते. त्यामुळे जाधसरांसोबत सामंतही यात सामील आहेत हे काळेसरांना माहित होतं फक्त दुर्दैवाने या सगळ्याचा कर्ताकरविता विक्रम आहे हे त्यांना अजूनही माहित नव्हतं.
......................
भाऊसाहेब विक्रमला त्या दिवशी केबिनमध्ये जे बोलले होते ते त्याच्या डोक्यातून गेलं नव्हतं. त्यातुन सामंतसरांनी या प्रकरणाच्या भितीने त्याचं डोकं भंडावून सोडलं. हा प्रकार शांत झालेला नसताना काही करणे म्हणजे पुन्हा नवीन प्रोब्लेमला आमंत्रण ठरलं असतं म्हणून पुढच्या प्रवेशप्रक्रियेत हस्तक्षेप करणं त्याने टाळलं होतं. नव्या जुन्या सगळ्याच विद्यार्थ्यांकडुन कॉलेजच्या नियमाप्रमाणेच प्रवेश शुल्क घ्या असं त्याने अॉफिस कर्मचार्‍यांना बजावलं होतं. तरिही हा सगळा प्रकार कसा पुढे आला हा प्रश्न त्याच्यासाठी अनुत्तरीतच होता. एके दिवशी त्याने सहजच खंदारेमॅडमना बोलावून घेतलं. त्यांना या सगळ्या प्रकाराची नेमकी किती माहिती होती हे त्याला पहायचं होतं.
" मॅडम कशी चाललीयत अॅडमिशन्स ?" त्याने बोलता बोलता विषय काढल्यासारखं दाखवलं.
" उत्तम अगदी पण बरं झालं ना हा फिचा गोंधळ समजला आपल्याला उगीच यात मुलांचं नुकसान झालं असतं." मॅडम आनंदाने म्हणाल्या त्यावर त्यानेही मान डोलावली.
" हं पण मॅडम तुम्ही ग्रेट आहात याचं श्रेय तुम्हाला! तुमच्या वेळीच लक्षात आलं म्हणून " तो पुढे काही बोलणार इतक्यात मॅडम म्हणाल्या,
" नो सर All credit goes to Aangha" मॅडमच्या तोंडुन हे वाक्य ऐकुन त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
" What! I mean कारखानीस मॅडम. मॅडमना कसं सगळं लक्षात आलं हे ! "  त्याचं आता खंदारेमॅडमच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष होतं.
"मी अॅडमिशन्स सुरु झाले तेव्हा सातार्‍याला होते अनघानेच मुलांचे अॅडमिशन फॉर्म्स पाहिले. तिला फि पाहून शंका आली आणि तिने माझ्या कानावर घालून या सगळ्या गोष्टीचा सिरियसनेस पटवून दिला नाहीतर मलाही यातलं काही कळलं नसतं."  मॅडम कौतुकाने बोलल्या.
" Oh! I see कारखानीस मॅडमने पाहिलं तर हे सगळं."  त्याच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणात बदलले आणि अनघाचा प्रचंड राग त्या क्षणी त्याला आला. 
क्रमशः

🎭 Series Post

View all