बंधन भाग 23

Love, Social Issues

भाग 23
( गेल्या भागात कॉलेजच्या सगळ्या प्रवेशप्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर भाऊसाहेब निर्धास्त व्हावेत म्हणून विक्रम मुद्दामहुन त्यांना फाईल्स नेऊन दाखवतो. त्याने सगळी परिस्थिती व्यवस्थित हाताळली हे पाहून भाऊसाहेबांना आनंद होतो. हा आनंद ते गंगाआत्याला बोलून दाखवतात पण त्याच वेळी ती अरुंधतीने विक्रमसाठी स्थळं पाहायला सुरुवात केल्याचं भाऊसाहेबांच्या कानावरती घालते. गेल्या भागात अरुंधतीसुद्धा विक्रमकडे समिहाचा विषय काढते पण तो यात फार रस न दाखवता भाऊसाहेबांना विचार असं तिला सांगून मोकळा होतो.)

सप्टेंबर संपुन अॉक्टोंबर उजाडला. पावसाचा जोर आता ओसरु लागला आणि अॉक्टोबरच्या उन्हाचे चटके जाणवायला लागले. दिवाळीचे दिवसही जवळ येऊ लागले. कुमुदने ( अनघाच्या आईने) अनघाच्या बाबांना पुन्हा आठवण करुन देऊन अनघाचं नाव वधुवरसुचक मंडळात नोंदवायला सांगितलं. बाबांनीही अनघाच्या आईची बडबड ऐकून हे काम पटकन करुन टाकलं. अॉक्टोबरच्या मिड टर्मच्या परिक्षाही संपल्या. दिवाळीची सुटी सुरु झाली. अनघासाठी मनासारखं स्थळ आलं तर पुढच्या वर्षी ती माहेरी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला येईल. आपल्या घरातली ही तिची शेवटची दिवाळी म्हणून कुमुद भावूक झाली पण श्रीधरनी तिला समजावलं. अनघाला मात्र तिघांनी हे जाणवू न देता सगळ्यांनी दिवाळीचा छान आनंद घ्यायचं ठरवलं सोबत अनघाला परिक्षांचे पेपर्ससुद्धा तपासायचे होतेच.
................... 
दिवाळीची सुट्टी सुरु झाली तरी विक्रम मात्र मोठी सुट्टी म्हणून  अजिबात नेहमीप्रमाणे उत्साही नव्हता ना त्याने मित्रांना फोन करुन बाहेर जाण्याचा काही प्लॅन ठरवला. शेवटी राजेशचाच त्याला फोन आला.
राजेश - " विक्रम आहेस कुठे तू ?" 
विक्रम - " कॉलेजला सुट्टी मग घरीच असणार ना!" तो कंटाळलेल्या सुरात म्हणाला.
राजेश - " काय यार तू पण ! चल ना काहीतरी प्लॅन करुया?" राजेश उत्साहाने म्हणाला.
विक्रम - " नको रे !" विक्रमच्या तोंडून हे उत्तर त्याला अपेक्षितच नव्हतं. त्याला वाटलं होतं नेहमीसारखं विक्रम उत्साहाने कुठेतरी ट्रिप प्लॅन करेल पण त्याचा मुडअॉफ  झाला.
राजेश- " का रे ? What happened तू आणि बाहेर जायला नको म्हणतोयस strange " राजेश हसत म्हणाला.
विक्रम - " मूडच नाही रे कॉलेजला काय झालंय तुला माहितीय ना तेव्हापासून लक्षच नाही लागत कश्यात. कॉलेजला गेलं की त्या अनघाचा प्रताप सतत आठवत राहतो आणि घरी भाऊसाहेब समोर आले कि त्यांच्यासमोर सारखं ' everything is fine चा मूड ठेवून रहावं लागतं तरी बरं त्यांना फाईल्स दाखवल्यापासुन शांत आहेत ते!" तो बोलत होता. 
राजेश- " हो रे I can understand डॅडही हल्ली टेंन्शनमध्ये असतात Ok just let it go असु दे नेक्स्ट टाईम प्लॅन करु काहीतरी आणि काही हेल्प हवी तर सांग." राजेशच्या बोलण्याने त्याला धीर आला.
विक्रम - " हेल्प तर हवीच आहे रे त्या अनघाला नाही माफी मागायला लावली तर बघ. मी नंतर सांगतो तुला काय करायचय ते ओके बाय " म्हणून त्याने फोन ठेवला.
.................
दिवाळीची सुटी संपून पुन्हा कॉलेज सुरु झालं आणि म्हणता म्हणता डिसेंबर जवळ आला. अनघाच्या नावाची नोंदणी वधुवरसूचक मंडळात केल्यानंतर आता महिना दिड महिना लोटला आणि स्थळांच्या पालकांकडून चौकशीचे फोन यायला सुरुवात झाली. काहीजण मंडळातून स्वतः फोन नंबर घेऊन संपर्क करित होते तर काहींनी मंडळातील काम पाहणार्‍या कोअॉरिडिनेटरकरवी बोलणी पुढे जातायत का ते पाहायला सुरुवात केली. अनघाच्या काही फार अपेक्षा नव्हत्या पण शक्यतो मुलगा सांगलीतच राहणारा आणि इथेच नोकरी असणारा असेल तर लेकीला कधीही भेटता येईल अशी सर्वसामान्य आईवडिलांसारखी तिच्या आईवडिलांचीही इच्छा होती. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातलं एखादं स्थळ आलं तर विचार करुन सांगतो हेच उत्तर तिचे आईबाबा द्यायचे. त्यातून प्राध्यापिका होणं हे तिचं स्वप्न होतं त्याप्रमाणे जॉबही मिळाला. तो लग्नानंतर सोडण्याची अट मुलाच्या पालकांनी घातली तर ते स्वतःहूनच स्थळ नाकारायचे. अश्यातच वधुवरसूचक मंडळातून फोन आला.
" अनघाची आई का ?"
" हो बोलतेय बोला ना वंदनाताई " पलिकडून मंडळातल्या एक बाई बोलत होत्या.
" अहो तुम्हाला हवं तसच अगदी स्थळ आलंय. कालच ते लोक नावनोंदणी करुन गेले. मुलगा M.Tech आहे आणि आपल्याच सांगलीत 'राजारामबापू इंन्सिट्युट ' ला प्रोफेसर आहे. त्याचं लहानपणही इथेच गेलं आणि आता नोकरीमुळे वास्तव्यही इथेच. घरी आईबाबा आणि हा एकुलता एक. मुलगा सुस्वभावी आहे आणि दोघेही एकाच क्षेत्रात छान जमेल दोघांचं."  पलिकडून एवढं सगळं ऐकुन अनघाची आई खूशच झाली.
" काय सांगता मस्तच! मी हिच्या बाबांना सांगते तुम्ही त्यांना अनघाचे फोटो दाखवलेत का?" 
" नाही अजून, म्हटलं तुमच्या कानावर घालावं पण दाखवते. फोटोज काय हो मुलाच्या आईला मोबाईलवरुन सुद्धा पाठवता येतील.हल्ली मोबाईलने सगळ शक्य झालंय."  वंदनाताई बोलत होत्या.
" बरं पण त्यांना आधी दुसरं स्थळ सुचवू नका हा!"  अनघाची आई उत्साहाने बोलली त्यावर त्याही तयार झाल्या.
" बरं एक विचारायचच राहिलं मुलाचं नाव?" आईने आठवणीने विचारलं.
" अरेच्चा! ते सांगितलच नाही ना हा श्रीकांत श्रीकांत वझे."
" बरं बघुया तुम्ही त्यांना अनुचे फोटो आणि माहिती तरी द्या." आई आशावादी नजरेने म्हणाली
" ओके ओके पाहते मी ते बाय" वंदनाताई आश्वासकपणे म्हणाल्या. त्यांना तरी हे लग्न जुळण्यात कोणतीच अडचण वाटत नव्हती.
........,,,.,,.....
त्याच दिवशी संध्याकाळी वंदनाताईंनी अनघाच्या आईला वॉटसअॅपवरुन श्रीकांतची माहिती आणि फोटोज पाठवून दिले. त्यासोबत श्रीकांतच्या घरच्यानी अनघाचे फोटो पाहिले आणि ती मंडळी तुम्हाला भेटण्यासाठी तयार आहेत ही गुड न्युजही मेसेजने कळवली. वंदनाताईंना कुमुदनी लगेच तो मेसेज पाहून फोनही केला आणि आभार मानले. दिवसभरात हे इतक्या पटापट जुळून येईल याची तिला कल्पनाच नव्हती. तिने आधी श्रीधरना हाक मारली.
" अहो या ना बाहेर लवकर " कुमुदच्या हाका मारण्याने अनघाचे बाबा आतून बाहेर आले. कुमुद झोपाळ्यावरती बसली होती.
" अहो या बसा तुम्हाला एक गंम्मत दाखवते." असं म्हणून आईने त्यांना तिच्या शेजारी बसायला सांगितलं.
" हो हो एवढी आरडाओरड करायला झालं काय!" कुमुदची थट्टा करित ते म्हणाले यावरती कुमुदने तिचा मोबाईल त्यांच्या समोर धरला.
" हे बघा तरी तुमच्या भावी जावईबापुंचे फोटो. मी सकाळी म्हटलं होतं ते वंदनाताईंनी एका मुलाबद्दल सांगितलंय हाच तो श्रीकांत." अनघाची आई उत्साहात म्हणाली. त्यावर बाबांनीही तिच्या हातातून मोबाईल आपल्या हातात घेतला.
" वा! मुलगा तर छान आहे गं " त्यांनाही श्रीकांत आवडला.
" हो ना शिवाय प्रोफेसर आहे. आपल्याच शहरातला आहे मला वाटतं आपण भेटावं एकदा यांना." अनघाची आई म्हणाली.
" हो हो तुझं बरोबर आहे पण अनुला विचारलं का ?" ते म्हणाले इतक्यात रिया आतून बाहेर आली. दाराआड उभी राहून तिने सगळं बोलणं ऐकल होतं. आतून धावत बाहेर  येत तिने श्रीधरच्या हातातून मोबाईल काढून घेतला.
" ए मला पण बघु थांबा ताईला दाखवते " असं म्हणत त्यांना बोलूही न देता ती धावत आत गेली.
" ए हळू ग माझे बाई " आई बाहेरुन तिच्यावरती डाफरली तरी तिने लक्ष दिलं नाही.
.......,,,,,,,...................
" ए ताई ताई  ताई हे बघ काय ते !" असं म्हणून पुस्तकात डोक खूपसुन असणार्‍या अनघासमोर तिने मोबाईल धरला.
" काय आहे आणि कोण हा!"  तिने आश्चर्याने विचारलं.
" हा श्रीकांत आणि भविष्यात माझा होणारा जिजू." ती हसत म्हणाली त्यावर अनघानेही मोबाईल उत्सुकतेने हातात घेतला.
" प्रोफेसर आहे हा !" रिया अनघाकडे पाहत बोलली.
" काय ! खरंच " ती म्हणाली.
आणि एक न्युज सांगु ?" रियाने हळु आवाजात विचारलं. 
" काय " अनघाने पटकन विचारलं.
" ते तुला भेटायला येणार आहेत." ती एक्साईट होत म्हणाली आणि मोबाईल पुन्हा आपल्या हातात घेतला.
" ओके ठिक आहे पण माझ्या इमॅजिनेशन मध्ये जरा वेगळी इमेज होती पण ठिकय आता हा इतका काही वाईट नाही " नाक मुरडत फोटो वेगवेगळ्या अँगलने पाहत रिया म्हणाली त्यावर अनघाला हसु आलं.
" चला आता तुम्हाला दररोज चॅटिंग करायला,कॉलवर बोलायला कुणीतरी मित्र भेटणार!" रिया अनघाला चिडवायला लागली त्यावर ती लाजली. 
" ओये भारी ! कितनी सोणी दिखती क्या बात! अशीच लाजत राहशील तर माय गॉड जीजू एकदम फिदा हा " रियाने अनघाचे गाल ओढले आणि तिची चेष्टा सुरु झाली. रियाच्या चिडवण्यामुळे तिलाही श्रीकांतला भेटण्याची आता उत्सुकता वाटत होती.
क्रमशः

🎭 Series Post

View all