बंधन भाग 27

Love, Social Issues

भाग 27
( गेल्या भागात 'गुरुकुल ' मध्ये डिसेंबर महिन्याच्या कार्यक्रमांपैकी एक वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला ज्यात अनघाला उत्कृष्ट अध्यापनासाठीचा पुरस्कार मिळाला.त्यामुळे ती खूश होती. त्यात साखरपुडाही जानेवारीत होता त्यामुळे ती अजूनच आनंदात होती. डिसेंबर अखेरचा कॉलेज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम गेल्या भागात सुरु होता. जिथे अनघाची ओळख राजेशची होते. तो नेमका कार्यक्रमासाठी आलाय की अजून काही कारण आहे नेमक काय चाललय त्याच्या डोक्यात पाहुया आजच्या भागात)

राजेशने खंदारे मॅडमना ओके मी आहे इथेच असं सांगून तिथून काढता पाय घेतला. मग मॅडमही त्यांच्या खुर्चीत जाऊन बसल्या.कार्यक्रम संपत आला की टेक्स मेसेज कर एकत्रच हॉलबाहेर पडु उगीच गर्दीत चुकामुक नको असं मॅडमनी अनघाला सांगून ठेवलं. त्यामुळे तिही तिच्या खुर्चीत बसली. हळुहळु पाहुणे मंडळी येऊ लागली. प्राचार्यांसह भाऊसाहेब, विक्रम आत आले तसे बाहेर रेंगाळणारी प्राध्यापकमंडळी, अॉफिस स्टाफचे कर्मचारी आत येऊन आपापल्या चेअर्सवरती बसु लागले. आठ सव्वा आठच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिला परफॉरमन्स गाण्याचा होता प्रथम वर्ष एमसीए च्या एका विद्यार्थ्याने शंकर महादेवन यांच्या 'गणनायकाय गणदैवताय गणाधीशाय धीमहीः ' या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि जमलेल्या सगळ्या श्रोत्यांची मनं जिंकली आणि कार्यक्रमाचा खर्‍या अर्थाने आता शुभारंभ झाला. त्यानंतर द्वितीय वर्ष बी.एस.स्सी च्या मुलींच्या ग्रुपने माधुरी दिक्षितच्या 'बडी मुश्किल बब्बा बडी मुश्किल ' गाण्यावर थिरकायला सुरुवात केली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवत आणि विद्यार्थ्यांनी शिट्ट्या वाजवत त्यांना चिअरअप केलं. गाण्याचा आणि नृत्याचा कंटाळा येऊ नये म्हणून दोन परफॉरम्समध्ये कॉमिक स्कीटही मुलं सादर करीत होती. कधी कधी सुत्रसंचालन करणारी मुलं परफॉरमन्स करणार्‍या विद्यार्थ्यांची फिरकी घेत होते तर सुत्रसंचालनातून प्राध्यापकांवर फिशपॉंन्टसुद्धा टाकत होते. कार्यक्रम ऐन रंगात आला होता इतक्यात साडेनऊच्या सुमारास स्वयंसेवक असणार्‍या मुलांपैकी एकजण धावत अनघापाशी आला.
" मॅडम किमया पुजारी तुमचीच स्टुंडन्ट ना?" 
" हो का काय झालं ?" तिने आश्चर्याने विचारलं.
" ती चक्कर येऊन तिच्या रुममध्ये पडली रुमचा दरवाजा उघडा होता म्हणून मुलींच्या लक्षात आलं. तिच्या मैत्रीणी थांबल्यात तिच्यासोबत तुमच्यासाठी हा निरोप दिलाय तिचा रुम नंबर " तो घाईघाईत बोलला आणि अनघाच्या हातात छोटासा कागद ठेवून निघून गेला. ती काही विचारायच्या आतच तो तिथून गर्दीत दिसेनासा झाला. तिने कागद उघडून पाहिला ' सी विंग रुमनंबर बेचाळीस ' असं त्यावर लिहिलेलं होतं. तिने इकडेतिकडे पाहिलं तर जवळ कुणी शिपाईसुद्धा दिसत नव्हते. शंकर पहिल्या रांगेत पाहुण्यांना कोल्ड्रिंक सहर्व करित होता. शिवा तिला हॉलच्या दुरच्या एका कोपर्‍यात उभा दिसला अनघा बसली होती तिथून तिला त्याला हाक मारलेलीही ऐकू गेली नसती. दिनेश तर गर्दित कुठे दिसतच नव्हता. मघापासुन सुरु असलेला समुहगीताचा एक परफॉरमन्स एव्हाना संपला होता आणि सुत्रसंचालन करणारे दोन्ही मुलं त्यांच्या बोलण्यातून फटकेबाजी करित होते आणि अॉडियन्सची हसुन पुरेवाट झाली. कोणाचं लक्ष नाही ना पाहुन ती खुर्चीतून उठली आणि हॉलच्या मागच्या छोट्या गेटने बाहेर आली असं कार्यक्रम अर्धवट टाकून  एकटीच बाहेर मेनगेटने गेल्यावर कुणीतरी काहीतरी विचारलच असतं म्हणून ती मागून बाहेर पडली. तो मार्ग थेट नक्षत्रगार्डनजवळ पोचत होता. गार्डनजवळ पोचल्यावर तिने सरळ चालायला सुरुवात केली आणि ती कॉलेजच्या आवारात दहा मिनिटात पोचली. आवारातून ती कॉलेजच्या मेनगेटपाशी आली. बाहेर सगळा शुकशुकाट होता. प्राध्यापकांच्या फोरव्हिलर्स एका रांगेत शेडमध्ये पार्क केलेल्या होत्या. तिने मधला पॅसेज क्रॉस केला हॉस्टेलचे लाईट्स लांबुन दिसत होते. ती दहा पंधरा मिनिटात हॉस्टेलच्या आवारात पोहचली. हॉस्टेलच्या आवारात खुर्चीत बसणारा वॉचमॅन आज गायब होता असो कार्यक्रम पहायला वरती गेला असेल असं तिला वाटलं. तिने पटकन जिने चढायला सुरुवात केली आणि पहिल्या मजल्यावरुन लिफ्टने ती थर्ड फ्लोरला पोचली. तिने इकडेतिकडे पाहिलं तर कुणीच दिसलं नाही.
" किमया किमया कुठे आहेस ?" अश्या हाका मारित ती रुमनंबर बेचाळिस पर्यंत पोचली. समोर पाहते तर रुम लॉक होती आणि आजुबाजुलाही कुणी दिसत नव्हतं. तिने पुन्हा हाका मारुन पाहिल्या पण हॉस्टेलच्या फ्लोलरवरच्या लाईटस च फक्त सुरु होत्या बाकी आसपासच्या कुठल्याच रुम ओपन नव्हत्या. तिने इकडेतिकडे पाहिल कुणीच नाही आहे आपल्याशिवाय या विचाराने तिच्या हाताचे तळवे गरम झाले. मुलांनी मस्करी केली असेल असा विचार करित ती तिथून लिफ्टने खाली आली आणि पायर्‍या उतरुन हॉस्टेलच्या आवारात आली. नेहमी गजबजणारं हॉस्टेल कस शांत झालं होतं. फक्त वरती कॉलेजच्या कार्यक्रमाचा आवाज स्पिकरवरून अंधार कापत तिथपर्यंत येत होता. तिने एक दिर्घ श्वास घेतला. मोबाईलमध्ये पाहिलं तर साडेदहा वाजत आले होते अजून कार्यक्रम संपायला एक दीड तास बाकी होता. ती हॉस्टेलमधुन चालत बाहेर आली आणि मधला पॅसेज क्रॉस केला तेवढ्यात समोरून एक फोरव्हिलर बाहेर आली आणि अनघाला पाहून ड्रायविंग करणार्‍याने गाडीची काच खाली केली.
" Hey अनघा, What are you doing here?" 
" अरे राजेश नथिंग हॉस्टेलला गेले होते एका स्टुंडन्टची तब्येत बिघडली होती." ती कपाळावरचा घाम पुसत म्हणाली.
" Ok, Shall I drop you?" तो म्हणाला.
" No No thanks मी आतमध्येच जातेय प्रोग्रॅमला." 
" Ok, I've to leave उद्या बाहेर जायचय मला सकाळी सो मी निघतो डॅड थांबलेत ओके बाय बाय सी यु." म्हणत त्याने गाडीचा काचा खाली केल्या आणि स्टार्ट करुन तो पुढे गेला. अनघाने पुढे चालायला सुरुवात केली इतक्यात तिच्या मागून कुणीतरी आल आणि ती मागे वळायच्या आत तिच्या मागे उभ्या असणार्‍या माणसाने रूमाल तिच्या नाकासमोर धरला आणि रूमालावरच्या क्लोरोफॉमने ती जागीच बेशुद्ध पडली.  पुढच्या काही सेकंदातच पुढे गेलेली राजेशची फोरव्हिलर मागे आली आणि तो उतरला.
" चल गाडीत टाक तिला लवकर पटकन " अस म्हणत तो ही त्या माणसासोबत खाली वाकला आणि दोघांनी मिळून तिला उचलून राजेशच्या गाडीच्या मागील सीटवरती ठेवलं.
" चल हे घे थँक्स फोर हेल्प डॅडना कळायच्या आत घरी पोच" असा दम त्यांच्या नोकराला देत त्याने हजार रुपये त्याच्या हातावरती ठेवले. तो येस सर म्हणत तिथून निघून गेला. इतक्यात मघाशी बेशुद्ध पडल्यानंतर तिच्या हातातून तिची क्लच खाली जमिनीवर पडली होती. त्यात काही पैसे, छोटासा हँकरचीफ आणि तिचा मोबाईल होता. मोबाईलच्या आवाजाने त्याचं जमिनीवर लक्ष गेलं पटकन त्याने मोबाईल पाहिला तर श्रीकांतचं नाव झळकत होतं तो कॉल राजेशने कट केला आणि मोबाईल स्वीचअॉफ करुन आतल सिमकार्ड बाहेर काढलं. क्लच आणि मोबाईल हातात घेऊन ड्रायविंग सीटच्या समोर ठेवल आणि कारचा मागचा दरवाजा लावला आणि पुढे येऊन बसत गाडी स्टार्ट केली. थोडं अंतर गेल्यानंतर पुलावरुन गाडी  जाताना त्याने तिचा मोबाईल, सीम आणि पर्स या वस्तू कार विंन्डोतून हात लांब करित तलावात फेकून दिल्या आणि कुत्सितपणे सीटला डोक मागे टेकत तो हसला. 
.............................
त्याने गाडी शहराच्या वर्दीच्या रस्त्यातून एका छोट्या अरुंद वाटेने वळवली. जो भाग निर्मनुष्य होता.शहराची वर्दळ आता बर्‍यापैकी मागे पडली होती. रस्त्याच्या एका बाजूला अंतराअंतराने असणार्‍या घरातल्या बाहेरच्या लाईट्स तेवढ्या दिसत होत्या. बर्‍याच अंतरानंतर एक धाबा होता जिथ तुरळक गिर्‍हाईक होते. गल्ल्यावरचा मालक शटर ओढून तोही बंद करण्याच्या बेतात होता. हळुहळु गाडी आता डांबरी रस्त्यावरुन कच्च्या धुळभरल्या वाटेवरुन जाऊ लागली आणि दहा एक मिनिटात एका जुन्या सिमेंट पत्र्याची शेड असलेल्या आणि लोखंडी दरवाजे असलेल्या ठिकाणी येऊन थांबली. तो गाडीतून खाली उतरला आणि खिश्यातून किल्ली काढुन तो दरवाजा उघडला. ते एक जुन गोडावून होतं. त्याने उभ्यानेच एक नजर गाडीच्या मागच्या सीटवरती टाकली. अनघा अजुनही गुंगीतच होती. त्याने गाडीचा दरवाजा उघडून तिला गाडीतून बाहेर काढलं आणि आत नेलं. आतमध्ये अंधार होता फक्त नाही म्हणायला कोपर्‍यात उंचीवर एक छोटीसी चौकोनी सिमेंटची खिडकी होती. तिला त्याने हाताला धरुन आत ढकलून दिलं तशी ती थंडगार कडाप्प्याच्या जमिनीवर बसवलेल्या फरशीवर आदळली आणि तिला हळुहळु शुद्ध आली. आजुबाजुचा अंधार पाहून हा कॉलेजचा परिसर नाही ते तिच्या लक्षात  आलं. तिने वरती पाहिलं तर अंधारात दरवाजावर दोन्ही  हात कमरेवर घेऊन उभा असणारा एकजण दिसला. तो पुढे आला पण तो राजेश आहे हे ती ओळखू शकली नाही.
 " कुठे आणलय तू  मला " ती ओरडायला लागली.
" ए मुकाट्याने गप्प बसायच हा " तो तिचा हात खेचून तिला ढकलीत तिच्यावरती ओरडला तशी तिने जोरात त्याच्या कानशीलात भडकावली.
" You rascal तुझी एवढी हिम्मत! आता नाही सुटत तू माझ्या तावडीतून!" तो त्याचा दुखावलेला गाल चोळत म्हणाला आणि तिथून बाहेर आला आणि बाहेर येऊन त्याने दरवाजा बाहेरुन बंद करुन ठेवला तशी ती आतून हेल्प हेल्प म्हणून दारावर मोठमोठ्याने थापा मारून ओरडू लागली आणि लाथा मारू लागली.
" हं अब आयेगा मजा " तो हसत म्हणाला आणि त्याने मोबाईल खिश्यातून काढत फोन लावला.
" हा कुठेयस? मी पोचलोय सगळा प्लॅन ठरल्याप्रमाणे सक्सेसफुल पण यार ही पोरगी आहे की तलवार. I can't handle her तू ये लवकर हा इकडेच तुमच्या जुन्या गोडाउनला." एवढं बोलून राजेशने फोन ठेवला.
....................
पुढच्या अर्ध्या तासात विक्रम त्याच्या कारने गोडाऊनला पोहचला तोपर्यंत राजेश बाहेर येरझार्‍या घालीत होता. अनघाचा आतून आवाज येणं जरा थांबलं होतं. ओरडून कंटाळली असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. विक्रमची गाडी समोर उभी झाली आणि राजेश धावत गाडीपाशी आला. तो गाडीतून खाली उतरला. त्याने येताना ब्लेझर चेंन्ज करून शर्टपँन्ट आणि जॅकेट अश्या कॅज्युअल ड्रेसमध्ये तो आला.
" काय झाल? काय म्हणते ती ?" त्याने गाडीतून उतरत विचारलं.
" काय म्हणनार? बोंबलून घसा सुकला असेल गप्प आहे " तो चिडत म्हणाला.
" हं ओके बघतो मी  आज तिने नाही माफी मागितली तर बघच " विक्रम म्हणाला.
" हो चल बघूयाच ना !" राजेशने त्याच्या खांद्यावर हात टाकत दरवाजाकडे पाहत म्हटलं.
" चल ओके बाय गुड नाईट  अँन्ड थँक्स " विक्रमचं अस उत्तर देणं राजेशला अनपेक्षित होतं.
" What ? म्हणजे तुला अस म्हणायचय की मी जावं काय इथुन विक्रम Don't be silly यार हि सगळी मेहनत माझी होती आणि आता फायदा तु करुन घेणार का?" राजेश त्याच्याकडे पाहत हसत म्हणाला.
" काय काय बडबडतोयस एक एक मिनिट तुला वाटतय तस काहीही करणार नाहीय मी आणि तुही करणार नाहीयस ओके." विक्रमच्या या बोलण्यावरती राजेशला आश्चर्य वाटलं.
" मग तू नक्की काय करायचं ठरवलयस?" राजेशने पुन्हा विचारलं.
" हे बघ प्रत्येक माणूस आपल्या जीवाला घाबरतो तीही घाबरली असेल थोडी भीती दाखवली की बरोबर सॉरी म्हणेल बस " तो म्हणाला पण राजेशला हे पटतच नव्हतं.
" चल बाय " राजेश काही म्हणण्याआधीच विक्रम गोडाउनचा दरवाजा लोटून आत गेला.
क्रमशः

🎭 Series Post

View all