बंधन भाग 28

Love, Social Issues

भाग 28
( गेल्या भागात कॉलेजच्या गॅदरींगला राजेश अनघाला भेटतो. सहजच प्रोग्रॅम पाहण्यासाठी आल्याचं तो खंदारेमॅडमना भासवतो पण इथुनच त्याचा आणि विक्रमचा प्लॅन सुरु होतो. आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यामुळे कुणाचं तरी पितळ उघडं पडेल याची तिला कल्पनाही नव्हती. एखाद्या क्षेत्रात महिला प्रामाणिकपणे जेव्हा काम करत असतात आणि स्वतःच्या गुणांवर,बुद्धीमत्तेवर, एकनिष्ठतेवरती पुरुषाच्यापेक्षाही चांगलं काम करून दाखवतात तेव्हा अश्या स्त्रियांना गप्प करण्याचा पुरुषांच्या लेखी एकमेव मार्ग म्हणजे तिचं मानसिक खच्चीकरण करणं आणी त्यासाठी तिच्या चारित्र्यावरती शिंदोडे उडवायचे किंवा तिचा शारीरिक छळ करायचा नाहीतर अत्याचार करायचा आणि हे आजचं वास्तव आहे. अरुणा शानबागसारख्या कित्येकजणींनी ते भोगलय अजूनही दररोज कितीतरी जणी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला अश्या वर्तणुकीला बळी पडताहेत. आजचा भाग तुमच्यासाठी अनपेक्षित आणि धक्कादायक वाटेल याची कल्पना आहे पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही सामाजिक वास्तवाला स्पर्श करण्याचा प्रयत्न कथेतून केला आहे. त्यामुळे आजचा भाग वाचल्यानंतर कथा फॉलो करणे सोडू नका पुढे बर्‍याच आनंदी घटना तुम्हाला वाचायला मिळतील.Keep Patience & Keep Following)

बाहेरुन दरवाजा उघडला गेल्याची चाहूल तिला लागली. ती दाराजवळच खाली बसुन पाय पोटाशी घेऊन रडत होती. दरवाजा उघडला गेला तशी ती उभी राहिली. समोर विक्रम होता पण त्या काळ्याठिक्क अंधारात तिला त्याचा चेहरा दिसला नाही तिला वाटलं तो मघाचाच माणूस परत आलाय. ती त्याला बाजूला करित दारातून बाहेर पडू लागली तसं विक्रमने जोरात तिच्या हाताला हिसका दिला आणि तिला आत लोटून तो आत आला आणि दरवाज्याची कडी आतून लावली. ती त्या हिसक्याने जमिनीवरती आदळली.
" ए कोण आहेस तू घाबरट पळकुटे नालायक हिम्मत असेल ना एवढीच तर बाहेर उजेडात भेट." ती बोलत होती.
" ए तू कोण समजतेस ग स्वतःला मर्दानी?" तो तिच्यापाशी येत गुडघ्यावरती बसत म्हणाला.
" हं तुला काय कळणार शौर्य, धैर्य रात्रीच्या अंधारात असले उद्योग करणार्‍या तुमच्या सारख्या पुरुषांना चाबकाचे फटके दिले पाहिजेत." 
" ए Just Shut Up हा काय गं अजुन मस्ती उतरली नाही तुझी आ गेला दिड तास या अंधार्‍या खोलीत एकटिच पडून आहेस भितीबिती वाटतच नाही वाटत तुला." तो तिची हनुवटी आपल्या मुठीत घेऊन ओढत म्हणाला.
" हं भिती अंधाराची मला नाही वाटत खरतर या अंधारालाच तुझ्यासारख्या श्वापदांची भिती वाटत असेल." तिच्या नजरेतला तो जाळ पाहून त्याचा संताप होत होता.
" ए तुझी फाल्तुची लेक्चरबाजी ऐकायला वेळ नाही मला तू कॉलेजच्या अॅडमिन्शच्या प्रकारात का लक्ष दिलस गरज काय होती हा साधी दीडदमडीची एम्लोयी तू पगार घ्यायचा आणि गप्प बसायचस ना!" तो बोलला.
" ओ अच्छा अच्छा असा प्रकार आहे तर म्हणजे त्या प्रकरणात तुझे हात चांगलेच पोळलेले दिसतायत. पण लाजा कश्या नाही वाटत रे तुम्हाला त्या बिचार्‍या भाऊसाहेबांसारख्या देवमाणसाला फसवायला आणि त्या बिचार्‍या गरीब शेतकर्‍यांच्या पोरांकडून पैसे घेऊन त्यांना लुबाडुन काय मिळणार अरे तळतळाट लागेल कुठे फेडाल रे हि पाप." तिचे ते शब्द शिसाच्या रस ओतल्यासारखे त्याच्या कानात जात होते. 
" ए जस्ट शट अप हा " त्याने अनघाच्या कानाखाली एक जोरात थप्पड मारली. तशी ती कोसळली आणि दोन्ही हात पुढे टेकले. तिच्या दोन्ही हातांच्या बोटांवर त्याने पाय ठेवले. त्याच्या बुटांच्या जोराने तिची बोटं चिरडली तशी ती वेदनेने कळवळली. ती मोठमोठ्याने हसायला लागली तिचं ते हसणही त्याला 'तू काहीच बिघडु शकत नाही रे माझं' असच जणु सांगतय अस त्याला वाटायला लागलं. त्याने पुन्हा तिच्या दुसर्‍या गालावर थप्पड मारली.
" मला मारून काही होणार नाही तुझ्या असल्या धमक्यांना मी भिक घालणार नाही." तिचा तश्याही अवस्थेतला ठाम निर्धार त्याला पाहवत नव्हता.
" ओके चल एक डील करुया तू या प्रकरणातून लक्ष काढून घे सॉरी म्हण की घरी जायला मोकळी तुला सहीसलामत घरी पोचवायची जबाबदारी माझी." विक्रम शेवटच बोलला एवढं होऊनही ही मुलगी वाकायला तयार नाही ना तिला कसली भिती याच त्याला नवल वाटलं.
" अरे हट सॉरी माय फूट मी गप्पही बसणार नाही सॉरी तर अजिबात नाही." ती निश्चयाने म्हणाली तशी त्याने परत तिला एक थप्पड मारली. बोलून तिचा घसा कोरडा पडला होता.
" पाणी पाणी " ती वरती नजर करित म्हणाली.तस त्याने बाजूचं कोपर्‍यातल मातीचं मडकं पाहिल त्यावरती ग्लासही होता. त्याने मडक्यातल पाणी ग्लासमध्ये भरलं आणि तो ग्लास तिच्या चेहर्‍यापासुन उंचावरती धरला. ग्लासमधलं पाणी तिच्या चेहर्‍यावरती पडलं आणि ते चेहर्‍यावरुन गळ्यापर्यंत खाली ओघळलं. तिची चाळीदार ओढणी भिजली.
त्याचं लक्ष तिच्या भिजलेल्या चेहर्‍याकडे गेलं.
" ओके तुला मघाशी सांगितल ते नाही ना मंजूर मग आत्ता काय तुला इथे डांबून काय करणार आणि तुला मारून मी माझे हात कश्याला रक्ताने लाल करुन घेऊ हा पण तुला उडायला असच सोडणार नाहीय मी."
" म्हणजे " तिने विचारलं आत्ता तिच्या नजरेत भिती होती. तिचं अंग भीतीने शहारलं. ती भिंतींच्या दिशेने मागे मागे सरकली. तसा तो तिच्या अजुन जवळ आला.
" नो Don't touch me नाही तू सोड मला प्लीज." ती गयावया करु लागली. तिच्या मनात पहिला श्रीकांतचा विचार आला तस तिने त्याला दुर ढकलायला सुरुवात केली.
" का ग आत्ता भिती वाटली का गुड पण म्हणून मी तुला आत्ता नाही सोडणार. मघाशी सांगत होतो तेव्हा नाही पटलं तुला Then, Now Don't Stop Me " त्याने तिला जवळ ओढली आणि नको आई आई म्हणून ती मोठ्याने किंचाळली. त्याच्या गळ्यातलं गोल्डन लॉकेट खाली पडलं. त्याला दूर लोटण्याएवढ बळच तिच्यात उरल नव्हतं. रात्रीच्या त्या अंधारात तिचे हुंदके आणि ओरडणं फक्त ऐकु आलं. रात्र हि जणू केविलवाणी झाली.
.......................
दाराबाहेर राजेश मघापासुन उभा होता. त्याला माहित होतं विक्रम कितीही काही बोलला तरी एकदा त्याला राग आला आणि एखादी गोष्ट नाही मनासारखी घडली तर तो वाट्टेल तस वागू शकतो. त्याचा अहंकार, त्याचा पदाचा, दिसण्याचा, शिक्षणाचा अतिअभिमान त्याला तिच्यापुढे झुकु देणार नाही. राजेशने त्या छोट्याश्या खिडकीजवळ त्याचा मोबाईल धरला होता आणि आतून जे जे ऐकु येत होतं ते सगळ त्यात रेकॉर्ड झालं आणि तो रेकॉर्डेड व्हिडिओ त्याने कट केला आणि मोबाईल हातात घेऊन तो गोडावूनजवळून बाहेर आला आणि गाडीत बसला.
" विक्रम मी इतकी तुझी हेल्प केली आणि पायातला काटा फेकून द्यावा तस तू मला दूर फेकलस ओके एन्जॉय देन हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस. Your downfall begins now. See You Soon बिच्चारी अनघा मी वाचवल असत गं तुला पण माझ्या कानाखाली मारल्याची हिच शिक्षा तुला. तुला आणि त्या विक्रमला मी सोडणार नाही इतक लक्षात ठेव." स्वतःशीच बोलत तो मोठ्याने हसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली.
...................
" आई तू बस ग थोडावेळ इथे शांतपणे. येईल तिचा फोन." मघापासुन अस्वस्थ असणार्‍या आईकडे पाहत रिया म्हणाली. अनघाने खंदारेमॅडमच्या घरी पोचल्यानंतर कॉल करेन अस आईबाबांना तिने कॉलेजला निघताना सांगितल होत पण त्याप्रमाणे काही फोन आला नाही म्हणून श्रीधर आणि कुमुद अस्वस्थ होते. आई सारखी भिंतीवरल्या घड्याळाकडे पाहत होती. बाबा सारखा घराचा दरवाजा उघडून बाहेर कुणी आलय का पाहत होते. तिघांचा जीव अनघाच्या फोनची वाट पाहून मेटाकुटीला आला. जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत त्यांना झोपही लागली नसती. तिघेही बाहेर हॉलमध्ये होते.
" रिया खंदारे मॅडमना कॉल करुन बघतेस?" आईने न राहून विचारलं. रियाने हो म्हणत मॅडमचा नंबर डायल केला. पलिकडून पटकन कॉल उचलला गेला.
रिया - " हॅलो खंदारे मॅडम " 
मॅडम - " हा बोल कोण बोलतय ?" 
रिया - " मी रिया कारखानीस मॅडमची बहीण "
मॅडम - " हा बोल काय ग इतक्या रात्री कॉल केलास अनघा पोचली ना घरी अग आमचा प्रोग्रॅम संपला सव्वाबाराला मी उठून पाहिल तर अनघा भेटलीच नाही ना. मी टेक्स मेसेज केला तर नो रिप्लाय तरी वाटलच मला प्रोफेसर्स पैकी कुणी घरी ड्रोप केल असेल बरं तु का फोन केलेलास ?" त्यांनी जे सांगितल ते रिया ऐकतच राहिली आणि त्यांच्या या प्रश्नाने तिला काय बोलाव तेच सुचेना.
रिया - " हो हो तेच सांगायला अहो ताई पोचली घरी पण ती दमली होती मग लगेच झोपली तुम्हाला सांगायला म्हणून कॉल." रियाचं बोलणं आईबाबा एकमेकाकडे पाहत ऐकत होते.
मॅडम - " It's Ok बरं झाल कॉल केलास पण ओके बाय गुड नाईट मीही जरा झोपते आता आणि तिलाही आराम करु दे तसही उद्या सगळ्यांना थोडा ब्रेक म्हणून सुट्टीच आहे कॉलेजला." 
रिया - " Ok Thanks गुड नाईट." 
रियाने फोन ठेवला.
" काय काय म्हणाल्या ?" आईने घाबरुन विचारलं.
" अग त्या घरी पोचल्यासुद्धा प्रोग्रॅम संपला तेव्हा ताई भेटलीच नाही त्यांना. त्यांनी मेसेजेस केले तर रिप्लाय पण नाही दिला. त्यांना वाटल ती घरी आली असेल." रिया बोलली आणि आई मटकन सोफ्यावरती बसली.
" अहो कुठे असेल अनु ? मला भिती वाटतेय एवढ्या रात्री कुठे शोधायचं तिला." आई आता रडायला लागली.
" हो मॅडम शेवटची आशा होत्या त्यांनाच काही माहित नाही बाकी आता कुठल्या प्राध्यापकांना फोन लावणार आणि त्यांना काहिच माहित नसल तर उगीच नको ती चर्चा." बाबा चिंतित चेहर्‍याने म्हणाले.
" कुमुद तू जरा शांत हो आपण थोडा वेळ वाट बघु नाहीतर आता पोलीस स्टेशनला जाव लागेल." श्रीधररावांच्या या बोलण्यावरुन आई अजुनच रडायला लागली. रियाने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तीही या प्रकाराने घाबरली होती. तिचा एकतरी फोन येईल अशी आशा अजूनही तिला वाटत होती. 
.......................
रात्रीचे दोन वाजले तरी तिघांच्या चेहर्‍यावर झोपेचा लवलेशही नव्हता. आता शेवटचा उपाय म्हणून बाबांनी रियाला घेऊन पोलीस स्टेशन गाठायचं ठरवलं.
" कुमुद तू थांब घरी आणी आली तर आम्हाला लगेच कळव येतो " म्हणत बाबा आत टॉर्च आणायला गेले. 
" आई आम्ही जातोय ना तू शांत रहा ना थोडी " रिया कुमुदला समजावत होती इतक्यात घराबाहेर गाडीचा आवाज आला. रियाने धावतच जात दरवाजा उघडला आणि ती बाहेर आली तर समोर एका आलीशान फोरव्हिलरचा दरवाजा उघडला गेला आणि एखाद थंड पडलेल प्रेत जस ढकलुन द्याव तस अनघाला गाडीतून ढकलुन दिलं.ती जमिनीवरवरच्या धुरळ्यात पडली आणि क्षणात वेगात गाडी स्टार्ट झाली आणि रिया धावत जाईपर्यंत ती दिसेनाशी झाली. तिने धावत रस्त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पण नंबरप्लेट, गाडी चालवणार्‍याचा चेहरा काहिच तिला अंधारात दिसलं नाही. ती धावत अनघाच्या जवळ आली. ती बेशुद्ध होती.आपल्या हाताने रियाने  तिचा मातीने माखलेला चेहरा पाहिला. विस्कटलेले केस, अस्थाव्यस्थ कपडे, चेहर्‍यावरती मारलेल्याच्या खुणा, गळ्यापाशी उठलेले व्रण रिया तिला पाहून मोठ्यांदा आई म्हणून किंचाळली.

क्रमशः

वाचकहो हा भाग कितीही धक्कादायक असला तरी कथेचं हे अपरिहार्य वळण होतं. आता यात विक्रम वा राजेशने कोणतेच पुरावे मागे सोडले नाहीत. रियासुद्धा विक्रमला गाडीत पाहु शकली नाही. इथे अंधार हा प्रतिकात्मक म्हणून वापरला गेलाय. कारण अशी कृत्य करणार्‍या कोणत्याही पुरुषाला नाव, जात,धर्म, क्लास नसतो ती एक प्रवृत्ती असते हेच दाखवायचा हा प्रयत्न. पण अनघा या सगळ्या विरोधात लढुन उभी राहणार आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ही एक प्रेमकथा सुद्धा आहे. अनघासोबत तिला कोण खरी साथ देत पाहूया पुढचे भाग वाचायला विसरु नका. एक आगळीवेगळी प्रेमकथा: बंधन

🎭 Series Post

View all