बंधन भाग 29

Love, Social Issues

भाग 29
( गेल्या भागात अनघा अजिबात विक्रमची माफी मागत नाही त्यामुळे त्याच्या दुखावलेल्या अहंकारामुळे त्याच्या हातून जे व्हायला नको तेच घडतं. गेल्या भागापर्यंत स्वतःला एकमेकाचे दोस्त मानणारे राजेश आणि विक्रम वेगळे होतात. विक्रम त्याला जायला सांगतो त्यामुळे चिडलेला राजेश अनघाला मारतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तिथून विक्रमला धडा शिकवण्याच्या इराद्याने निघतो. गेल्या भागाच्या शेवटी अनघा घरी येते पण बेशुद्ध अवस्थेत. पाहूया अनघा आता शुद्धीवर आल्यावर तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा कसा सामना करते.)

रियाचं ओरडणं ऐकून श्रीधर, कुमुद धावतच बाहेर आले आणि समोर बेशुद्ध अवस्थेतल्या अनघाला पाहून आई धाय मोकलून रडू लागली. रियाने आतमधुन शाल आणून अनघाभोवती पांघरली आणि आईच्या मदतीने तिला घरात नेलं. श्रीधरना अनघाची ही अवस्था पाहून रडावस वाटत होतं पण बापाने रडुन कस चालेल म्हणून त्यांनी अश्रुंना आवर घातला. रियाने पटकन फॅमिली डॉक्टरना फोन केला आणि डॉक्टरांच्या मिसेस ज्यासुद्धा डॉक्टर होत्या त्यांना तातडीने घरी यायला सांगितलं तोपर्यंत कुमुदने आणि रियाने तिला उचलून खांद्यांना आधार देत स्वतःच्या रुममधल्या बेडवरती झोपवलं. बाबा बाहेर डॉक्टरांची वाट पाहत राहिले.
....................
इमर्जन्सी असेल म्हणून डॉक्टर मॅडम तातडीने त्यांच्या घरी पोचल्या. त्यांनाही अनघाला अश्या अवस्थेत पाहून धक्का बसला. त्यांनी तिचं बीपी तपासलं. हाताच्या नाडीचे ठोके चेक केले. 
"बीपी वाढलय बहुदा घाबरल्यामुळे असेल " त्या स्टेथस्कोपने तिला तपासत म्हणाल्या. आईबाबा रिया स्तब्ध होऊन डॉक्टरांकडे पाहत होते.
" I'm sorry to say but तुमची शंका खरी आहे हा फक्त किडनॅपींगचा प्रकार नाही आहे Unfortunately, It's matter of rape " डॉक्टर एकेक शब्द तिघांच्या चेहर्‍याकडे पाहत धीराने उच्चारत होत्या. आईच्या मनात मघापासुन जी शंका चुकचुकत होती ती आता डॉक्टरांनी शब्दात बोलून दाखवली. त्यांचे ते शब्द ऐकून आईने कानावरती हात ठेवला आणि ती रडायला लागली. रिया तिला धीर देत होती. मॅडमच्याही डोळ्यात अश्रु तरळले.
त्या म्हणाल्या,
" तुम्हाला धीराने घ्याव लागेल. तुम्ही असे खचलात तर तिच्याकडे कोण लक्ष देणार. I think गुंगीच इंन्जेक्शन दिल्यामुळे ती बेशुद्ध आहे. येईल ती शुद्धीवर डोन्ट व्हरी. पण  उठल्यावर ती पॅनिक होईल, आदळाआपट करेल,रडेल ओरडेल मोकळ होऊ द्या तिला आणि समजा तस नाहीच झालं आणि एकदम शांतच राहिली तर उगीच बोलायला फोर्स नका करु तिला. फिजिकल विकनेस असेल तिला आणि मानसिक ताणही त्यामुळे तिच्या सोबतच रहा. एकटीने बाहेर जाऊ देऊ नका आणि कधीही गरज लागली तरी कॉल मी." एवढ बोलून डॉक्टर उठल्या. बाबा त्यांच्या मागोमाग दारापर्यंत आले.
" कारखानीस तुम्ही तरी असे डगमगून नका जाऊ. Take care of her. Ok " असं बोलून डॉक्टर निघून गेल्या. बाबा मात्र जागीच खिळून उभे राहिले. कस स्वतःला सावरायच आणि पुढे काय होणार माझ्या लेकीचं हाच प्रश्न त्यांच्यासमोर होता.
....,................
" राजेश Where did you go ? वाजले किती पाहिलेस? ही काय बाहेर भटकायची वेळ झाली! मी प्रोग्रॅम संपल्यावर बघीतल तर तू नव्हतास होतास कुठे तू ?" रात्री दोनच्या सुमारास राजेश घरी पोहचला आणि सामंतसर दारात त्याला पाहताच त्याच्यावर बरसले.
" डॅड Cool Down मी काय लहान आहे का आता! होतो मित्रांसोबत ओके मला झोप येतेय खूप बाय बाय गुड नाईट." जांभई देत बेफिकिरपणे तो बोलला आणि हॉलमधून भरभर पायर्‍या चढत वरती रुममध्ये निघून गेला.
" राजेश Listen to me राजेश " सामंतांना त्याचं असं अर्धवट सारवासारव करित बोलणं पटलेलं नव्हतं. ते त्याला थांबवत होते पण तोपर्यंत तो रुममध्ये निघून गेला.
......................
विक्रमने अनघाच्या घरुन गाडी थेट हायस्पीडने घराकडे वळवली. दारावरची बेल भराभरा वाजवली तरी कुणीच दार उघडत नव्हतं. शेवटी आतून दरवाजाची कडी उघडल्याचा आवाज झाला तर समोर गंगाआत्या उभी! तिला पाहून त्याला काय बोलाव सुचेना. आत्याच त्याला बघून आश्चर्यचकीत झाली.
" विक्रम काय हे हाताला खरचटल कसं आणि शर्टची बटणं कशी तुटली ? रस्त्यावर हुज्जत नाही ना घातलीस कुणाशी ?" आत्याने त्याला पाहून प्रश्न विचारायला सुरुवात केली.
" आ नाही नाही तस काही " तो आत येत नजर लपवीत म्हणाला.
" बरं वाजले किती पण! भाऊसाहेब येऊन तासभर झाला. होतास कुठे?" आत्याने विचारलं तसा तो आवंढा गिळून शांत उभा राहिला. आत्याने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला तसा तो भानावरती आला.
" आ कक काही नाही आत्या मी झोपायला जातो गुड नाईट." एवढ बोलून तो पटकन रूममध्ये निघून गेला. आत्याही दरवाजाला कडी घालून झोपायला गेली.
......,..,.............
त्याने रूममध्ये धावत येत रुमचा दरवाजा लावून घेतला. कपाळावरचा घाम रूमालाने पुसला. धावत धावत तो बेसिनजवळ गेला आणि बेसनचा नळ सुरु करुन पाण्याचे हबकारे चेहर्‍यावरती मारले. चेहर्‍यावरून पाण्याचे थेंब ओघळत होते. त्याने शेजारी ठेवलेल्या हँण्डवॉशने हात पटापट धुतले तरी त्याला चैन पडेना. पाण्याचे थेंब त्याच्या चेहर्‍यावरून ओघळत होते. त्याची नजर बेसिनसमोरच्या आरश्याकडे गेली. त्याच्या या अवतारावरती त्याचाच विश्वास बसेना जणू आपल्या समोर कुणीतरी मवाली माणूस उभा असच त्याला स्वतःला आरश्यात पाहून वाटलं आणि गोडावून पासुन ते अनघाच्या घरापर्यंतचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोरून गेले. तिला तश्याच अवस्थेत सोडली तर आपल्याला कुठे आणलं होतं कुणी आणलं होतं आणि हे सगळ आपण केलय हे तिच्या लक्षात येईल म्हणून त्या अंधार्‍या खोलीतच त्याने तिला थोडा वेळ बंद ठेवल आणि नंतर गुंगीच इन्जेक्शन देऊन तिला बेशुद्ध केलं.तिला गाडीत ठेवून गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवली. कुणीतरी पाहिल म्हणून तिच्या घरासमोर न थांबता गाडीतूनच त्याने तिला ढकलून दिलं होतं आणि तिथून निघून आला होता. सगळं पुन्हा त्याला आठवलं आणि त्याने मान खाली घातली.
" बापरे! काय होऊन बसलं हे माझ्या हातून! आजवर कधीच कुठल्या मुलीशी नीट बोललो पण नाही मी आणि आज एका मुलीलाच इतकं क्रुरपणे शी! I misbehaved with her यार! छे! काय घडलं हे! कसा वागलो मी एखाद्या सराईत गुंड मवाली लोकांनासारखा शी! " तो स्वतःशीच आरश्यात पाहत पुटपुटला. त्याला स्वतःचीच चीड आली आणि त्याने बेसिनच्या शेजारच्या लाकडी टिपॉयवरती हाताची मुठ जोरात आपटली.
त्याने टॉवेलने चेहरा पुसला आणि कपडे चेंन्ज करुन बेडवरती पडला.पण झोप काही डोळ्यात उतरेना. या कुशीवरुन त्या कुशीवर काहीच सुचत नव्हत त्याला. डोळे बंद केले तर काही मिनिटांपुर्वी घडलेलं सगळ डोळ्यासमोर येत होतं. त्याच्या मनात सारखे तेच ते विचार घोळत होते आणि अनघाचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.
क्रमशः

🎭 Series Post

View all