बंधन भाग 44

Love, Social Issues

भाग 44

( गेल्या भागात अनघा विक्रमवरती चिडल्यामुळे तो इथून पुढे तिच्याशी बोलायचं नाही ठरवतो. कॉलेजमध्येही त्यांची दुसर्‍या दिवशी भेट होत नाही. तो राजेशला भेटायला जातो पण तिथे त्याचं राजेशसोबत भांडण होतं. तिथून कॉलेजला येताना त्याला अनघा चक्कर येऊन पडलेली दिसते. बघूया आज हॉस्पिटलला काय होतय.)

विक्रमने गाडी आशिर्वाद हॉस्पिटलसमोर थांबवली. कारचा दरवाजा उघडला आणि इकडेतिकडे नजर टाकली. समोरून दोन सिस्टर्स येत होत्या.

" मॅडम, जरा " त्याच्या चेहर्‍यावरचे हावभाव पाहूनच त्यांच्या लक्षात आलं. दोघींनी तिला खांद्याच्या आधाराने आतमध्ये नेलं. तिच्यात चालण्याइतपतही त्राण नव्हतं. तिची अशी अवस्था पाहून त्याला काहीच सुचेना. तो धावत नर्सच्या मागून आतमध्ये आला. 

...........................

तो आत आला तर रिसेप्शनिस्टने त्याला थांबवलं.

" Excuse Me Sir " 

तो रिसेप्शनपाशी गेला. " येस, मॅडम काय झालय त्यांना ?"

त्याने पॅनिक होऊन रिसेप्शनिस्टला विचारलं.

" हो, हो, नर्स आहेत आतमध्ये. डॉक्टर आले की तपासल्यावरती कळेल आता. पण त्यांना अॅडमिट करावं लागेल. तुम्ही प्लिज हा फॉर्म फिलअप करा." 

तिने असं म्हटल्यावरती त्याला टेन्शन आलं. त्याने फॉर्म ओढून घेत पटापटा भरायला सुरवात केली. त्यात एक कॉलम होता,  ' Relation with patient ' त्याने क्षणाचाही विचार न करता ' Husband ' असं लिहून टाकलं आणि खाली साईन केली आणि फॉर्म तिच्या हातात दिला. तिने फॉर्मवरुन नजर फिरवली आणि ओके, डोन्ट व्हरी म्हणत त्याला धीर दिला.

...................... 

समोरुन नर्स आली तसं त्याचं लक्ष गेलं.

" मॅडम, कश्या आहेत त्या? मी भेटू शकतो का?" 

" त्या बेशुद्ध आहेत. सलाईन लावलय नुकतच. तुम्ही जाऊन या आत. This way room no.30" असं म्हणत नर्सनी हाताच्या इशार्‍याने रुम दाखवली.

" Ok Thanks " म्हणत तो धावत तिकडे गेला.

................

दरवाजा लोटून तो आत आला. बेडवरती अशी गलितगात्र झालेली, कोमेजलेली ती पाहून त्याला अस्वस्थ वाटलं. तिला सलाईन लावलं होतं. नर्स शेजारीच उभी राहून सलाईन बॉटल चेक करित होती. तो आत आला तशी ती नजरेनच Come in म्हणाली आणि बाहेर जायला वळली. 

तो येऊन बेडशेजारच्या चेअरवरती बसला. अनघाच्या चेहर्‍याकडे पाहून मनातून तुटल्यासारखं वाटलं त्याला. आपल्यामुळे एका मुलीचं शारीरिक, मानसिक, भावनिक पातळीवरती झालेलं नुकसान, मानहानी पाहून मनातून आपण कोडगे आणि निर्लज्ज असल्यासारखं वाटलं त्याला. 

" मॅडम, ओला नॅपकिन मिळेल का जरा?" 

" हो थांबा हा " नर्सने म्हटलं. तिने शेजारी ठेवलेल्या इक्विपमेंन्ट्स मधुन एक स्वच्छ कोरडं नॅपकीन थोडसं गरम पाण्यातल्या बाऊल मध्ये भिजवून त्याच्या हातात दिलं. 

" थँक्स " तो म्हणाला. नर्सला कळलच नाही त्याचं काय चाललय. 

त्याने अलगद हाताने तिच्या चेहर्‍यावरून ते नॅपकीन फिरवलं. चक्कर येऊन मातीत पडल्यामुळे तिच्या चेहर्‍याला धुळ लागली होती. केसात मातीचे कण अडकले होते. त्याने तिच्या केसावरुनही हळुवारपणे नॅपकीनचा हात फिरवला. त्याच्या डोळ्यातली काळजी पाहून ती मध्यमवयीन नर्सही कौतुकाने त्याच्याकडे पाहत म्हणाली.

" Your wife is very lucky " 

यावर तो उपहासाने स्वतःवरतीच हसला.

................

तो त्या रुममधून बाहेर आला. कॉलेजचं सकाळसत्र सुटुन बराच वेळ झाला होता. दुपारचा एक वाजत आला. तिची आई वाट पाहत असेल घरी असा विचार त्याच्या मनात आला.सलाईन लावल्यामुळे इतक्यात तरी डॉक्टर डिसचार्ज देणार नाहीत याची कल्पनाही होतीच त्याला. त्याने तिच्या घरी फोन केला. कुमुदनेच पलिकडून फोन उचलला.

" हॅलो, मी विक्रम बोलतोय "

" हा बोला सर आज अचानक कसा काय फोन केलात ?" कुमुदलाही असा दुपारी त्याचा फोन आल्याचं आश्चर्य वाटलं.

" अ....म्हणजे मी जरा हॉस्पिटलला आलो होतो मॅडमना घेऊन." 

" काय! काय झालं अनघाला? कुठलं हॉस्पिटल आणि तुम्ही कुठे आहात?" कुमुदने घाबरुन प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

" आई, Cool Down तुम्ही शांत व्हा आणि ऐका जरा....अहो त्यांना थोडस चक्कर आल्यासारख वाटलं कॉलेजमध्ये म्हणून आलो आम्ही इकडे....तर थोडा विकनेस आहे ना म्हणून सलाईन लावलय आता एवढचं....संध्याकाळ पर्यंत येऊ आम्ही."

" अरे देवा! तुम्ही थांबा तिथेच मी यांना पाठवते." ती सलाईन लावलय हे ऐकुन अजूनच घाबरली.

" ऐका ना नको I mean मी आहे इथेच You Don't Worry "  त्याने कुमुदला धीर देत म्हटलं. दोन क्षण पलिकडून शांतता. त्याने पुन्हा विचारलं,

" हॅलो...... हॅलो आई ऐकताय ना "

" अ हा हो, सर ती खचलीय खरतर मनानेच तुम्हाला तर माहितच आहे सगळं......." कुमुद उसासे टाकत हतबल होऊन बोलली.

कुमुदच्या या बोलण्यावर काय बोलायचं ते त्याला सुचेना.

" अ हो......." एवढीच त्याने प्रतिक्रिया दिली.

" ते म्हणतात न मन प्रसन्न तर शरिर प्रसन्न पण तिचं मनचं शांत नसतं. चिडचिड करते सतत हल्ली, नीट खाणं- पिणं नाही त्या घटनेनंतर. झोपत नाही सारखा तोच विचार करित बसते खोलीत एकटीच हल्ली रियाशी पण बोलत नाही, तिच्यासोबत बाहेर फिरायला, सिनेमाला जात नाही. विचार थांबत नाहीत म्हणून रात्र रात्र पुस्तकं वाचते, नोट्स काढते, कॉलेजचं काम करत राहते. मला तर काळजीच वाटते तिची अश्याने आजारी पडेल ती. " 

कुमुदचं ते बोलणं ऐकून तो गप्पच झाला.

" सर हे असच चालू राहिलं तर काय होईल !" कुमुदने शंका बोलून दाखवली.

" नाही तस होणार, होईल सगळं ठीक. ओके, मी संध्याकाळी ड्रॉप करेन त्यांना. तुम्ही नका टेन्शन घेऊ." तो तिला धीर देत म्हणाला.

" बरं पण काही वाटलं तर लगेच फोन करा." ती फोन ठेवताना म्हणाली. त्याने ओके म्हटलं.

तो तिच्या आईच्या बोलण्याचा विचार करित होता इतक्यात पुन्हा फोन आला.

" हॅलो, तुम्ही येताय ना कॉलेजला. सर It's very urgent म्हणून तुम्हाला त्रास दिला." प्राचार्यांचा दुसर्‍यांदा फोन आला होता. त्याला जाणं गरजेचं होतं. तो तिला अॅडमिट केलं होतं त्या रुममध्ये गेला. तिथे मघाच्या नर्स मॅडम होत्या.

" मॅडम, मला जरा.....I've to go अर्जंट काम आहे. मी लगेचच जाऊन येतो."  त्याला असं नर्सला विचारणं जीवावर आलं होतं.

" Ok, Ok पण लवकर या." त्या म्हणाल्या.

" हो मी येतो लगेच पण तोपर्यंत त्या शुद्धीवरती आल्या तर त्यांना एकटीला बाहेर जाऊ देऊ नका."  

" हो हो You don't worry "  त्या मॅडम म्हणाल्या तस त्याला बरं वाटलं. 

तो धावत बाहेर आला आणि त्याने गाडी कॉलेजच्या दिशेने वळवली.

....................

केबिनमध्ये आल्यावर त्याने पटकन प्राचार्यांना फोन केला आणि शिपायांपैकी कोणालातरी वरती पाठवण्यास सांगितलं. तोपर्यंत त्याने फाईल ड्राॅवरमधून काढली आणि एकदा चेक केली.

" सर बोलावलत " दारातून शिवा आत आला.

" हो Come, ही फाईल खाली प्राचार्यसरांना नेऊन दे."

" बरं " तो विक्रमचा चेहरा न्याहाळत म्हणाला.

" Ok चल मी निघतो." विक्रमने म्हटलं तस शिवा फाईल घेऊन खाली जायला केबिनमधून बाहेर आला.

विक्रमने बाहेर येऊन केबिन लॉक केलं. शिवाने मागे वळून पाहिलं. त्याला विक्रमची निघण्याची घाई बघुन नवल वाटलं.

" इतकी कसली घाई! या विक्रमसाहेबांचं हल्ली काय चाललेलं असतं कळतच नाही बुवा "  शिवा स्वतःशीच पुटपुटत तिथून निघाला.

...............

तो पुढल्या अर्ध्या तासात पुन्हा हॉस्पिटलला  पोहचला तेव्हा त्याला आत आलेलं पाहताच रिसेप्शनिस्टने बोलावलं.

" Excuse me Sir, डॉक्टर व्हिजिटला आल्या होत्या मघाशीच आणि मॅडमचे रिपोर्टस पण आलेत तुम्ही डॉक्टरांना भेटून या."

" त्या आल्या का शुद्धीवरती ?" 

" हो मघाशीच पण तुम्ही डॉक्टरांना भेटा आधी."

" ओके, थँक्स " तो म्हणाला आणि रिसेप्शनिस्टने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांची केबिन गाठली.

........................

" मॅडम "  

" सर या या Come " मॅडम खुर्चीतूनच प्रसन्न चेहर्‍याने त्याच्याकडे पाहत म्हणाल्या तसा तो आत आला आणि शांतपणे त्यांच्यासमोरच्या चेअरवरती बसला.

" मॅडम, Anything serious ?" त्याने काळजीच्या सुरात विचारलं.

" No No घाबरण्याचं काही कारण नाही." त्या रिपोर्टसवरुन नजर फिरवित म्हणाल्या. त्यांच्या शब्दांनी त्याचं मन जरा शांत झालं इतक्यात डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली.

" काय करतात त्या I mean जॉब कि हाऊसवाईफ ?"

" She is Professor "  तो म्हणाला तशी त्यांनी नकारात्मक मान हलवली.

" का ? काय झाल?"  त्याने डॉक्टरांच्या हावभावाकडे पाहत विचारलं.

" त्यांना काही stress आहे का? कामाचं प्रेशर किंवा घर आणि जॉब मॅनेज करताना तारांबळ होते का? " त्यांच्या या प्रश्नांच्या गोळीबारावरती काय रिअॅक्ट व्हावं त्याला कळेना. तो शांत राहिलेला पाहून दोन क्षणांनी त्याच पुढे बोलायला लागल्या.

" मानसिक ताण आलाय त्यांना खूप म्हणून विचारलं.  अर्थात घर आणि जॉब मॅनेज करताना सगळ्याजणींची परिस्थिती तशीच असते म्हणा मग ती धुणीभांडी करणारी कामवाली असो कि अश्या हाय प्रोफाईल जॉब करणार्‍या लेडीज असोत फरक असतो तो नवर्‍यांच्या विचारांमध्ये निदान There should be difference अहो एखाद्या घरकाम करणार्‍या बाईच्या अशिक्षित नवर्‍याला नसेल कळत तिचे त्रास, तिची दगदग पण तुमच्या सारखे Well- educated नवरेही अस वागायला लागले तर काय म्हणायचं. तुम्ही मघाशी तिला एकटीला इथे सोडून तुमच्या अर्जंट कामासाठी बाहेर गेलात सर. "

त्या डॉक्टरमॅडमच्या या बोलण्यावरती त्याची नजर पटकन वरती वळली.

" Yes I can understand, तुम्ही husbands सुद्धा तुमच्या फॅमिलीसाठीच सगळं करत असता पण तुमच्या बायका तुमचं घर पण सांभाळतात आणि तितक्याच एनर्जीने तुमच्याच घरासाठी पैसेही कमावतात. Wife is not a machine ना! " त्या बोलत होत्या आणि तो गप्पपणे ऐकत होता. त्याचं मघाचं तिथून निघून जाणं आणि त्या व्हीजिटला आलेल्या असताना पेशन्टंसोबत कुणीही नसणं त्यांना आवडलेलं नव्हतं ते त्याला त्यांच्या बोलण्यावरुन स्पष्ट जाणवलं.

" मॅम सॉरी " तो म्हणाला.

" It's ok " म्हणत त्यांनी पुन्हा रिपोर्ट पाहिले.

" हिमोग्लोबीन लो आहे. जेवतात ना त्या नीट.....कालचं डिनर झालं होतं का नीट ? "

त्यांच्या या प्रश्नावरती त्याला रात्रीचं तिचं फोनवरचं बोलणं आठवलं. ती डिसर्टब होती आणि त्याच भरात आपल्यावरती चिडली या सगळ्यात तिने रात्रीचं जेवणसुद्धा घेतलं नसावं असं त्याला वाटलं.

" अ.....हो ठिक जेवली."  इतकच तो म्हणाला.

" Does she feel weakness during menstruation? "   मॅडमच्या या प्रश्नावरती मात्र त्याला काय बोलायचं समजेना.

" व्यवस्थित आहार नाही घेतला, Stress घेतला तर हिमोग्लोबीन कमी होईल शिवाय विकनेस येईल ते वेगळचं. मी काही टॅबलेट्स आणि सिरप देतेय."  त्यांनी औषधांची प्रिस्क्रिप्शन लिहून त्याच्या हातात दिलं.

" Thanks मॅडम " तो उठत म्हणाला. डॉक्टर म्हणाल्या,

" सर, नवरा बायको एकाच घरात राहतात, नवर्‍याच्या खाण्यापिण्याच्या सवयींपासुन ते त्याच्या दुखण्या -खुपण्यापर्यंत सगळ्याची काळजी बायकांना. तुम्ही Husbands नी  निदान बायकोच्या मनाची काळजी घेतलीत, तिच्या साध्या साध्या गोष्टी जरा लक्षात ठेवल्यात  तरी पुष्कळ आहे." त्यांच्या या बोलण्यावरती त्याने मागे वळून होकारार्थी मान हलवली.

...............

तो हॉस्पिटलच्या मेडिकलमधुन औषधं घेऊन आत आला आणि तिच्या रुममध्ये जाऊन बसला तोपर्यंत तिला झोप लागली होती. आता मात्र तिच्याकडे पाहताना त्याला डॉक्टरांचं बोलणं आठवलं. त्याला वाटलं, नवरा होणं किती सोप असतं ना चारचौघांसमोर फेरे घेतले, अक्षता पडल्या कि झालं वेळ लागतो तो जोडीदार व्हायला. 

तो याच विचारात असताना तिला जाग आली. त्याला समोर बसलेलं पाहून ती उशीच्या आधाराने उठुन बसली. 

" हळु, कशाला उठताय ?"

" घरी जायच....घरी जायचय मला." ती डोक उशीला टेकत म्हणाली. तिचा आवाजही दमल्यासारखा वाटला त्याला.

" हो जाऊया सलाईन संपलं कि मी ड्रॉप करतो Don't worry "  

" तुम्ही बराचवेळ थांबला होतात ना नर्स बोलल्या मघाशी." ती पुन्हा त्याच्याकडे वळून म्हणाली.

" त्यात काय It's Okey तुम्हाला एक सांगू ?" तो म्हणाला तशी तिने होकारार्थी मान हलवली.

" तुम्ही.....तुम्ही असा स्वतःला त्रास करुन परिस्थिती बदलणार आहे का? तुमच्या अश्या वागण्याने indirectly तुमच्या आईबाबांना त्रास देता तुम्ही." तो अस बोलत होता पण त्याची नजर खाली वळली होती. मनातून त्याला वाटलं, असे उपदेश तिला आपण करणं चुकीचं आहे. 

" हं, मला कळते आईबाबांची कन्डिशन पण मी तरी काय करु ?"  ती उदास चेहर्‍याने म्हणाली. 

इतक्यात नर्स आतमध्ये आली. तिच्या हातात ट्रे होतात त्यात ज्युसचा ग्लास होता. ती आत आली आणि विक्रमसमोर  येउन उभी राहिली.

" सर, तुम्ही ज्युस मागवला होतात."

" हो  " म्हणत त्याने ट्रेमधला ज्युसचा ग्लास हातात घेतला आणि तिच्यासमोर धरला.

" घ्या, तुम्ही काहीच खाल्ल नाहीत दिवसभर " तो ग्लास हातात धरत म्हणाला तशी तिने नकारार्थी मान हलवली.

" मॅडम प्लीज "  त्याच्या या आर्जवामुळे तिने ग्लास हातात घेतला आणि ज्युस प्यायला सुरुवात केली. यावर ती नर्स छानसं हसत म्हणाली.

" That's like good girl !" बरं, थोड्यावेळाने तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता यांना." यावर त्याने ओके म्हटलं.

....................

संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्याने डॉक्टरांनी तिला डिसजार्ज दिला. त्याने बिल पे केलं आणि तो रुममध्ये आला मागून दुपारच्या त्या नर्समॅडमही आत आल्या.

" चला मॅडम घरी जायचय ना ?"  त्यांनी अनघाकडे पाहत हसत म्हटलं आणि तिची पर्स, औषधांची कॅरीबॅग त्याच्या हातात दिली. 

" चलो " त्या तिला हाताला धरुन आधार देत उठवीत म्हणाल्या. बाकी दोघींच्या मदतीने त्या मॅडमनी तिला बाहेर गाडीत बसवलं. विक्रम त्यांच्या मागून बाहेर आला.

" मॅडम थँक्यु "  त्याने त्यांचे आभार मानले. फार प्रेमळ वाटल्या त्याला त्या.

" It's ok, आमची ड्युटीच आहे ही." त्या प्रसन्न चेहर्‍याने हसत म्हणाल्या आणि आत जायला निघाल्या. त्याने कारचा दरवाजा उघडला इतक्यात त्या मागे वळून उभ्या होत्या तिथूनच म्हणाल्या,

" By the way सर तुम्ही दुपारचं लन्चंही नाही घेतलेलं तुम्हीही खाऊन घ्या आता." यावर त्याने येस म्हटलं आणि गाडी स्टार्ट केली.

......................

त्याने गाडी तिच्या घरासमोर थांबवली. रिया आणि कुमुद बाहेर अंगणातच अस्वस्थपणे फेर्‍या मारित होत्या. गाडी समोर थांबताच त्यांचं पटकन लक्ष गेलं. रिया धावत कारपाशी गेली. विक्रमने वळून हाताने कारचा मागचा दरवाजा उघडला. तिने रियाच्या हातात हात दिला. रियाने तिच्या खांद्यावरती हात टाकत तिला आत नेलं. अनघाची ही अवस्था पाहून दिवसेंदिवस रियाला अजुनच खचल्यासारखं वाटत होतं. तिच्या मनात एकच प्रश्न येत होता, ' ताई कधी सुखी, आनंदी दिसेल आपल्याला.' 

कुमुद कारपाशी आली. रिया अनघाला घेऊन आतमध्ये गेली आणि कुमुदने विक्रमकडे लक्ष देत बोलायला सुरुवात केली,

" सर थँक्यु ,काय म्हणाले डॉक्टर " डॉक्टर काय म्हणाले ते ऐकण्यासाठी तिचा जीव कासावीस झाला होता.

" वीकनेस आलाय आणि स्ट्रेस घेतलाय त्यांनी " तो नजर दुसरीकडे वळवित म्हणाला. तिच्या आईच्या नजरेला नजर द्यायची त्याची हिम्मत होईना.

" हो ते तर होणारच मी दुपारी म्हटलं हेच तुम्हाला. देवा! तिची हि अवस्था बघवत नाही हो त्यातून लग्नसराईचे दिवस आणि तिच अशी आजारी पडून कसं चालेल." तिच्या डोळ्यात आसु आले.

" आई, प्लीज तुम्हीतरी अश्या रडु नका. होईल.....होईल ठिक सगळं." कुमुदला धीर देत त्याने म्हटलं.

" बरं मी निघतो, गोळ्या औषधं वेळेवरती द्या त्यांना आणि प्लीज थोडस तरी जेवायला लावा त्यांना." कुमुदने हो म्हटलं.

" आणि She needs to take rest सो मी प्राचार्यांकडून  तीन चार दिवसाची रजा त्यांच्यासाठी sanction करुन घेतो." तो गाडीत बसत म्हणाला.

" हो बरं होईल प्लीज " कुमुदलाही ते ऐकुन बरं वाटलं. त्याला बाय करुन ती आतमध्ये गेली.

त्याने डोक मागे सीटला टेकलं आणि एक दिर्घ श्वास घेतला. तिची दिवसभरातली अवस्था आठवून त्याला काहीच सुचेना. त्याने मोबाईल हातात घेऊन अॉन केला आणि वॉलपेपरचा तिचा फोटो दिसला. त्या हसत्या फोटोकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला,

" अनु, Everything will be fine मी तुला तुझ्या आयुष्यातले सगळे रंग पुन्हा मिळवून देईन." त्याच्या तोंडून शब्द उमटले. मोबाईल अॉफ करुन त्याने घरी जायला गाडी वळवली.

क्रमशः

Like, Comment & खूप खूप शेअर करा..नव्या भागांना पटकन वाचण्यासाठी फॉलो करा.

🎭 Series Post

View all