बंधन भाग 47

Love, Social Issues

भाग 47 

(  गेल्या भागात अनघा- विक्रमचं लग्न सुरळीत पार पडलं. तिच्यासोबत सप्तपदी घेताना त्याने मनातून तिला सात वचनंसुद्धा दिलीत अर्थात त्याच्या मनात काय सुरु होतं याची तिला कल्पना नव्हती पाहुया आता लग्नाच्या दिवशी अजुन काय काय घडणार ते )

विवाहाचे सर्व विधी पार पडले होते. खाली खुर्च्यांवरती बसुन एकमेकांशी गप्पाटप्पा मारित बसलेली पाहुणेमंडळी आता वधुवरांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवरती येऊ लागली. ती त्याच्याशेजारीच उभी होती. पहिल्यांदा फोटोग्राफरने कुटुंबाचे एकत्रित फोटोज काढण्यासाठी दोन्हींकडच्या मंडळींना एकत्र बोलावलं तसे रिया, नितू आणि जितेंद्र उड्या मारित पुढे आले आणि या दोघांशेजारी लागूनच उभे राहिले. भाऊसाहेब पुढे झाले तसे मग अरुंधतीलाही त्यांच्याशेजारी जाऊन हसतच उभं राहावं लागलं. गंगात्याने हातानेच कुमुदलाही तिच्या शेजारी येऊन उभं राहायला सांगितलं. आपल्या लेकीचं लग्न राजेशिर्केंच्या घरात झालय यावरती अजुनही श्रीधर, कुमुदचा विश्वास बसत नव्हता. ते आनंदी असले तरीही त्या सगळ्यांसोबत उभं राहण्याचा त्या दोघांना संकोच वाटलाच. शेवटी एकदाचे फोटोज काढून झाले मग नितू आणि जितेंद्रने पुन्हा हौशीने त्यांच्या लाडक्या वहिनीसोबत बसुन, उभे राहून अश्या वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोज काढून घेतले. त्या दोघांना तिचं वाटणारं कौतुक पाहून तिच्या आईबाबांचा जीव भांड्यात पडला. नितू आणि जितेंद्रला तर त्यांची वहिनी खूपच आवडली होती आणि नितूची समिहा घरात वहिनी बनून न येण्याची इच्छा पुर्ण झाली म्हणून ती अजुनच खुश होती.

.......................

आता एकेक करुन पाहुणेमंडळी वधुवरांना भेटण्यासाठी पुढे येऊ लागली. प्राचार्यांनी पुढे येत दोघांच्या हातात गिफ्ट दिलं. त्यांच्यासोबत इतरही प्राध्यापक होतेच.

" Congrats both of you "  प्राचार्यांनी त्याला शेकहँन्ड करित आनंदाने म्हटलं. अनघा आपल्यापेक्षा अनुभवाने लहान पण कॉलेजच्या डायरेक्टरची बायको असल्याने आपल्याला तिच्यासमोर मान वाकवत मॅडम मॅडम म्हणावं लागेल असले नको ते विचार सामंतासारख्या काही प्राध्यापकांच्या डोक्यात आले असले तरीही प्राचार्य त्याला अपवाद होते. करंबेळकर सर, निंबाळकर सर, काळे सर खंदारे मॅडम असे काहीजण मात्र या लग्नाने खूश होते. त्यांनीही पुढे येत आपल्या शुभेच्छा दोघांना दिल्या.

" थँक्यु तुम्हाला सगळ्यांना तुम्ही वेळात वेळ काढून आलात." विक्रम त्यांचे आभार मानीत म्हणाला.

" सर थँक्स काय त्यात !" काळेसर हसत म्हणाले.

" हो ना सर, You both are big part of our college." निंबाळकरसर काळेसरांच्या बोलण्यावरती मान हलवित म्हणाले. तेवढ्यात मल्होत्रासर मागून आले आणि पुढे येत त्यांनी विक्रमचं अभिनंदन केलं.

" सर, मला वाटलं तुम्ही येणार नाही." विक्रम म्हणाला तसे मल्होत्रा सर हसत म्हणाले,

" का ? यायला नको होतं. " 

" नाही, Don't take it wrong " तो छानस हसत म्हणाला.

" By the way Wish you happy married life " ते पुन्हा शुभेच्छा देत म्हणाले.

" मॅडम तुम्हालाही शुभेच्छा खुप " ते अनघाकडे लक्ष देत म्हणाले तस तिने चेहर्‍यावरती हसु आणित थँक्स म्हटलं.

" थँक्स अगेन " तो म्हणाला. तसे सगळे बरं येतो आम्ही आता म्हणत स्टेजवरुन खाली उतरायला निघाले. त्यानंतर भाऊसाहेबांसोबत त्यांच्या ओळखीतली काही मंडळी भेटवस्तू देण्यासाठी पुढे आली. दोघांनीही हसुन त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या भेटवस्तू स्विकारल्या. 

" बरं तुमचं चालू द्या आम्ही जरा पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था पाहून येतो."  असं बोलून भाऊसाहेब तिथून निघून गेले. भेटवस्तू स्विकारण्याचं आणि समोर आलेल्या पाहुण्याला थँक्स म्हणण्याचं काम विक्रम करित होता या सगळ्यात अनघा आपल्या शेजारी उभी असली तरीही ती फार कोणाशी बोलत नाही आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही.

..........................

 वरती येणार्‍या पाहुण्यांची गर्दी ओसरली तस त्याने तिच्याकडे नजर टाकली.

" मॅडम, बसताय का तुम्ही थोडावेळ ?" त्याने विचारलं तस तिने मानेनच नको म्हटलं. इतक्यात पुढून पंकज, जयेश आणि सुमित आले. त्याचं त्यांच्याकडे लक्ष गेलं तसा तो पुढे आला,

" अरे, What pleasant surprise ?" तुम्ही सगळे कधी आलात ?"  त्याने आश्चर्याने विचारलं. लग्नाच्या सगळ्या गोष्टी इतक्या पटकन ठरल्या आणि ज्या परिस्थितीत हे सगळं ठरलं ते पाहता आपल्या मित्रांना लग्नाविषयी सविस्तर सांगण्याचं विक्रमने टाळलं होतं फक्त लग्नाच्या आधी काही दिवस लग्नपत्रिका मित्रांना वाॅट्सअॅपवरुन पाठवली त्यामुळे पहिल्यांदा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. लगेच कॉल करुन त्यांनी त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. पण आपल्या जवळच्या मित्राचं लग्न चुकवून कसं चालेल म्हणून त्यांनी लग्नाला हजेरी लावलीच.

" अरे सरप्राईज तर तू आम्हाला दिलसं असं अचानक लग्न करुन !"  जयेश अनघाकडे नजर टाकीत हसत म्हणाला आणि त्याने विक्रमला शेकहँन्ड करित त्याचं अभिनंदन केलं.

" हो रे, हॅलो वहिनी !" सुमीत हातातलं गिफ्ट नाचवित म्हणाला. तिनेही मग मंदसं हसून हॅलो म्हटलं.

" काय रे यार,  तू पण अस घाईत लग्न केलंस आमची निदान वहिनींशी ओळख तरी करुन द्यायची आधी " पंकजनेही सुमीतच्या बोलण्याला दूजोरा दिला.

" ओके ओके She is Aangha आपल्याच कॉलेजला प्रोफेसर आहेत." विक्रम तिच्याकडे पाहत म्हणाला.

" होयययय काय ! आम्हाला माहितच नव्हतं."  तिघेही एका सुरात खूप काही समजल्याच्या आविर्भावात त्याला म्हणाले आणि तिघांनीही एकमेकांना नजरेनेच खूणवाखूणवी केली.

" पण तुझी ती समिहा ! I mean तुझ्या मम्माने शोधलेली रे! तू मम्माला हो म्हणणार होतास ना त्याचं काय झालं." पंकजने मस्करीच्या सुरात म्हटलं.पण त्याच्या या बोलण्यावर तिने पटकन नजर वरती वळवली. पंकजचे ते शब्द ऐकुन बरेच उलटसुलट विचार तिच्या मनात यायला लागले, ' कोण असेल ही समिहा आणि विक्रमना आवडली होती असेल का ती कि फक्त भाऊसाहेबांच्या शब्दासाठी हे लग्न झालंय ' अश्या अनेक शंका कुशंका तिच्या मनात यायला लागल्या. विक्रमने हातानेच त्यांना जरा गप्प बसण्याची खूण केली पण पंकजपाठोपाठ जयेशही सुरु झाला,

" हो रे पंकज.... She was bold and beautiful हा म्हणाला होता ना आपल्याला." 

जयेशच्या या बोलण्यावरती मात्र विक्रमची पंचाईत झाली. त्याला अनघाच्या चेहर्‍याकडे पाहवेना. 

" अरे ते गिफ्ट कितीवेळ धरून ठेवलयस दे इकडे आणि तुम्ही जेवलात कि नाही ! या ना इकडे." असं बोलून त्याने सुमितच्या हातातलं गिफ्ट काढून तिच्या हातात दिलं आणि त्या तिघांना घेऊन तो थोडं दुर गेला. तिला त्यांचं काय चाललय काहिच कळलं नाही. इतर पाहुण्यांसोबत बोलत ती तिथे उभी होती.

.........................

" चला चला जेवायला! झालं ना आता गिफ्ट देउन " विक्रम त्या तिघांना म्हणाला तसं त्यांनी आता बडबडायला सुरुवातच केली.

" ए हाकलवतोस काय आम्हाला ! आमच्या busy schedul मधून तुझ्या लग्नासाठी वेळ काढून आम्ही सांगलीला आलो आणि तू असा!" सुमित बाकीच्यांकडे पाहत म्हणाला.

" ओके ओके थँक्स अँण्ड I know that पण तुम्ही त्या समिहाचा विषय कश्याला काढायचा आता." विक्रम हळू आवाजात म्हणाला.

" अरे! आम्ही काय आमच्या मनचं सांगितलं. तूच म्हणालेलास I don't like typicall बहु type girls मी बा माझ्या मम्माच्या चॉइसने मुलगी बघणार मग रे!" पंकज हातवारे करित म्हणाला.

" रे हळु बाबा! हो म्हणालेलो पण....." विक्रमचं हे बोलणं मध्येच तोडत जयेश म्हणाला, 

" पण ही भेटली ना असचं ना by the way चॉइस कुणाचा? भाऊसाहेबांचा का तूच प्रेमात पडलास तिच्या?" जयेशने डोळे मिचकावित विचारलं तसे सगळे खो खो हसायला लागले.

" ए प्रेमाबिमात काही नाही. साहेबांनी तिच्या घरच्यांना शब्द दिला सो आणि त्यांची इच्छा मी मोडत नाही You know !" त्याच्या या बोलण्यावर पंकज म्हणाला,

" हम्म राईट, ए पण काहीही बोल, She is damm pretty." तो ते उभे होते तिथून अनघाकडे नजर टाकीत म्हणाला तसा विक्रमला राग आला.

" ए शहाण्या, वहिनी आहे तुझी ती पण अॉफिशियल !"

" ए You Jealous ! ए बघा तरी." पंकजने बाकी सगळ्यांना हसत म्हटलं.

" ए ओके मस्करी पुरे पण यार Congrats to both " पंकजने हसुन त्याला आलिंगन दिलं. जयेश आणि सुमितनेही त्याचं अभिनंदन केलं.

" बरं, निघतो आम्ही आता." जयेश म्हणाला तसे सगळे बाय म्हणत जायला निघाले.

"Ok, See you soon " त्याने त्यांना बाय म्हटलं.

मित्र तर निघून गेले पण त्या समिहाचा विषय तिच्यासमोर काढून गेले आता ती काय विचार करित असेल आणि तिचा काहीतरी गैरसमज झाला तर काय करायचा असा प्रश्न त्याला पडला.

.......................

पाठवणीची वेळ जवळ आली तसे तिचे आईबाबा मन घट्ट करुन पुढे आले. निघण्याची वेळ झाली होती. पाहुणे मंडळी, त्यांची स्नेहीमंडळी, भाऊसाहेब, अरुंधती, आत्या, जितेंद्र, नितू वधुवराच्या मागे आनंदाने उभे होते आणि दुसर्‍या बाजूला त्या क्षणी एकाकी आणि हतबल असणारे एका मुलीचे आईवडिल, बहिण आणि त्यांचा मित्रपरिवार. आपल्या घरात नव माणूस कायमसाठी येणार, आपल्यासोबत राहणार, आपल्या सुखदुःखात, आनंदी क्षणांमध्ये सहभागी होणार म्हणून एकीकडे उत्सुकता आणि नव्या नात्यांची हूरहुर होती. भविष्याची स्वप्न होती तर दुसर्‍या बाजुला आपलं माणूस दूरावणार याची खंत होती.  आपण जिला जन्म दिला इतके वर्ष वाढवलं, तिचं दुखणखुपणं पाहिलं, तिला घडवलं, मोठ्ठ केलं तो कधीकाळी इवलासा असणारा जीवच आता इतका मोठा झाला की तो आपल्याशिवाय अख्ख आयुष्य काढु शकतो ही वेदना होती. श्रीधर डोळ्यांतले अश्रु पुसत पुढे आले. त्यांनी भाऊसाहेबांचा हात दोन्ही हातात घट्ट धरला.

" काळजी घ्या, समजुन घ्या, चुकलं तर क्षमा करा." इतकच ते बोलू शकले आणि त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला.

" श्रीधरराव, नका असे रडु! आणि तुमची लेक मी नेत असलो तरी आमची नितूपण एक दिवस जाईलच की अशी माझ्यापासून दूर !" ते श्रीधरना समजावित असं बोलले आणि श्रीधरच्या जागी नितूला भाऊंचा चेहरा दिसला आणि तिचे डोळे पाणावले. तिने अनघाच्या खांद्यावरती हात ठेवला आणि तिला शांत केलं.

" आत्या, आईसाहेब समजून घ्या हा थोडस " कुमुद दोघींना हात जोडून म्हणाली तसं आत्याला भाऊसाहेबांचं लग्न डोळ्यासमोर उभं राहिलं आणि भाऊसाहेबांच्या आईसमोर असच समजुतीने हात जोडणारी अरुंधतीची आई! आत्याला वाटलं, काय अजब किमया आहे निसर्गाची! कालची मुलगी आजची सुन होते, उद्या कोणाचीतरी आई होणार असते आणि तीच सुनबाई एक दिवस सासुबाईही होते. आत्याने कुमुदचे हात हातात घेतले आणि डोळे पुसले.

" कुमुदताई रडु नका अजिबात. आम्ही काही लांब नाही आहोत. पंधरा वीस मिनिटांवरती तर आहेत आपली घर!" नका चिंता करु."  आत्याने असं म्हटल्यावरती कुमुदला थोड बरं वाटलं.

" अनु, काळजी घे हा आणि फोन करित जा. रियाला मेसेज कर." कुमुदने अनघाच्या चेहर्‍यावरुन मायेनं शेवटचा हात फिरवला तशी रियाही रडवेली झाली.

" ताई, take care. सर त्रास दिलात तिला तर बघा मग तुमची काही खैर नाही!" रियाने डोळे पुसत विक्रमकडे पाहत म्हटलं.

" हो, Don't worry " तो तिला म्हणाला. त्याने पुढे होत  तिच्या आईबाबांनाही डोन्ट व्हरी म्हटलं. 

नोकरमंडळींनी गाडीचे दरवाजे उघडले. तिने शेवटची आईला मिठी मारली आणि बाबांकडे पाहिलं.

" रियु, टेक केअर " इतकचं बोलली ती आणि गाडीच्या दिशेने वळली. श्रीधर - कुमुद, रिया चालत पुढे आले. तिने शेवटचं एकदाच मागे वळून पाहिलं. तिच्या मागेच विक्रम उभा होता आणि त्याच्या मागे उभे असणारे तिचे आईबाबा तिला दुरुन पाहत होते. तिला वाटलं, किती विचित्र प्रसंग असतो ना हा, नवरा की आईबाबा दोघांमध्ये शेवटी त्यालाच निवडावं लागतं. ती डोळे पुसत गाडीत पटकन बसली आणि मागून तोही बसला. श्रीधर-  कुमुद आणि  श्रीधरचे मित्र अजुनही उभे होते. सगळ्या गाड्या जायला वळल्या. ड्रायव्हरने गाडी सुरु केली तस तिने मागे वळून गाडीच्या काचेतून पुन्हा मागे पाहिलं. ते अजूनही हॉलबाहेरच उभे होते. गाड्या अंतर कापत पुढे पुढे जाऊ लागल्या तसे त्यांचे निरोप देण्यासाठी हलणारे हात मात्र छोटे छोटे होत गेले. आपल्यापोटचा वाढलेला जीव दुसर्‍याला दान करुन रिक्त झालेले हात! 

क्रमशः

Stay tuned....48th part  खूप स्पेशल असणार आहे......

🎭 Series Post

View all