बंधन भाग 51

Love, Social

51
(  गेल्या भागात विक्रम त्याचा सायकॅट्रिस्ट मित्र डॉक्टर विशालशी फोनवरून बोलतो आणि जयपूरला आल्यानंतर भेटूया अस सांगतो. गेल्या भागात लग्नानंतरच्या फंक्शन्स नंतर अनघा पहिल्यांदा सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. सगळं बर दिसत असलं तरीही तिला आलेल्या पॅनिक अॅटॅकमुळे तो अस्वस्थ आहे पाहूया आता पुढे )

विक्रमची जयपुरला निघण्याची तयारी झाली. तिला त्रास नको म्हणून स्वतःची बॅग त्यानेच पॅक केली. याआधीही त्याची सगळी कामं तो स्वतःच करायचा त्यामुळे अनघाने त्याला मदत वगैरे करावी अशी अपेक्षा नव्हती त्याची आणि तिनेही त्याच्या कामात लूडबूड केली नाही. ती किचनमधून रूममध्ये आली तेव्हा तो आरश्यासमोर त्याच्या सवयीप्रमाणे उभा होता. टॅन कलरचा फॉर्मल वेअर ब्लेझर ठिक करत त्याने वॉर्डरोबचा ड्रॉवर ओपन केला. इतक्यात अनघाने दरवाजा अंदाज घेत थोडासा बाजूला केला. त्याचं लक्ष पटकन तिच्याकडे गेलं.
" निघालात ?"  तिने आतमध्ये येत विचारलं. येताना तिने भाऊसाहेबांच्या स्टडीरूममधून काही पुस्तकं वाचायला आणली होती हे त्याच्या लक्षात आलं.
" हो "  तो रिस्टवॉचचं ड्रॉवरमधलं कलेक्शन पाहत म्हणाला. कुठलं वॉच छान दिसेल असा विचार करत असतानाच त्याने त्या ड्रॉवरमधलं एक रिस्टवॉच हातात घेतलं आणि हाताच्या मनगटावरती धरलं. वॉच मनगटावरती बांधण्यासाठी घड्याळाचे पट्टे एकमेकात अडकवण्याचा प्रयत्न चालला होता. पाच एक मिनिटांनी त्याने अनघाकडे पाहिलं. ती चेअरवरती बसून वाचत होती. विक्रमकडे तिचं लक्षच नव्हतं.
" मॅडम, इकडे या जरा हे वॉच बघा काय झालं."  त्याने अगदी साधाभोळा चेहरा ठेवीत म्हटलं तशी ती चेअरवरुन उठली आणि मिररजवळ तो उभा होता तिथे आली.
" बघु जरा " म्हणत तिने त्याने तो रिस्टवॉच बांधत असलेला हात आपल्या बाजूने वळवला आणि तिने तिच्या दोन्ही हातांनी घड्याळाचे पट्टे एकमेकांत अडकविण्याचा प्रयत्न केला. ती मान खाली घालून अगदी नीट त्याच्या हाताच्या मनगटावरचं घड्याळ बांधत होती. तिचं लक्ष नसताना तो मुद्दामहून थोडस पुढे सरकला. तिच्याकडे पाहायचं म्हणून चाललेला त्याचा खटाटोप शेवटी व्यर्थच ठरला आणि ते घड्याळ रिपेअरिंगसाठीचं आहे हे तिच्या लक्षात आलं.
" सर या वॉचच्या पट्ट्यांना क्रॅक गेलेत ते लागणार नाहीत नीट. तुम्ही दुसरं वॉच बघा त्यातलं." ती बिचारी त्याचं घड्याळ त्याच्या हातात देत म्हणाली.
" हो हो Ok Ok I didn't see it. " असं बोलून त्याने वेळ मारून नेली. पटकन ड्रॉवर ओढला आणि दुसरं रिस्टवॉच काढलं. ती पुन्हा तिच्या पुस्तकांजवळ गेली. त्याने मनातून म्हटलं, ' तुमच्या आयुष्यात हॅपीनेस आणायचा माझा पहिला प्रयत्न आहे. I hope जयपूरला माझं अर्ध काम होईल. बेस्ट लक पण नाही म्हटलं मला.'  या विचारानेच त्याने शेजारीच पॅक केलेली बॅग हातात घेतली. तिचं लक्ष गेलं तस ती चेअरमधूनच म्हणाली,
" सर Best of Luck तुमच्या लेक्चरसाठी." त्याने मग मंदस हसून थँक्स म्हटलं.
......................
विक्रम गेल्यानंतर मग तिने थोडा वेळ वाचनात घालवला. नंतर थोड्या वेळाने नीतू आली तेव्हा तिच्यासोबत गप्पा मारण्यात वेळ गेला. नीतूच्या नेहमीच्या एन.जी.ओ. बद्दलच्या गोष्टी नाहीतर तिचे दोन्ही दादा तिला कसं छळतात याच्या गमतीजमती ती अनघाला सांगायची. दुपारचं जेवण झाल्यानंतर मग ती पुन्हा रुममध्ये येऊन बसली. अजून कॉलेजला जायला तिने सुरुवात केली नव्हती त्यामुळे नोट्स काढणं, मुलांच्या प्रॅक्टीस क्लासटेस्टचे पेपर चेक करणं अशी कॉलेजची कामं सद्यातरी थांबली होती. सद्यातरी प्राध्यापकांच्या वॉट्सअॅपग्रुपवरुन काय चाललय कॉलेजला तेवढं समजायचं बाकी गेले दहा एक दिवस तिचं कॉलेजला जाणं झालचं नव्हतं. बर्‍याच दिवसांनी असं रुममध्ये शांतपणे बसताना तिला तिच्या घरची तिची खोली आठवली. तिने कोपर्‍यातल्या तिच्या सामानाच्या बॅगा बाजूला घेतल्या. अजून घरुन तिचे ड्रेस, साड्या, कागदपत्र अश्या काही वस्तू यायच्या होत्या. तिने बॅगा बेडवरती ठेऊन उघडल्या खर्‍या पण सगळ सामान कुठे ठेवायचं तिला कळेना. तिने वॉर्डरोब ओपन केलं तर ती चकितच झाली. मुलांचं कपाटं म्हटलं की कसेबसे कोंबलेले कपडे कपाट उघडलं की ढिगाने खाली कोसळतात पण विक्रमने सगळा वॉर्डरोब व्यवस्थित लावून ठेवला होता. सगळे शर्ट्स, जॅकेट्स व्यवस्थित हँगरला अडकवलेले होते. टिशर्ट्स, कच्युअल वेअरिंग ट्राऊजर्स एका बाजूला आणि फॉर्मल वेअरिंग शर्ट्स, ब्लेझर्स दुसर्‍या कप्प्यात. वेगवेगळ्या कलरच्या शेड्समधलं ब्लेझरचं त्याचं कलेक्शन बघून ती अवाकच झाली. तिने ड्रॉवर ओपन केला तर त्यात रिसवॉचचं वेगळं कलेक्शन होतं. वेगवेगळ्या ब्रँड्सचे वॉचेस त्यात होते. मघाशी त्याने हातात घेतलेल्या वॉचवरती तिची नजर गेली. तिने ते हातात घेऊन पाहिलं आणि पुन्हा ठेवून दिलं. दुसर्‍या एका छोट्या कप्प्यात पर्फ्युमसच्या बॉटल्स ठेवलेल्या होत्या आणि साईडच्या कप्प्यात सनग्लासेस. एवढा टापटीप वॉर्डरोब पाहिल्यावरती त्यात आपण आपले साधेसे ड्रेस आणि साड्या ठेवायची तिची हिम्मतच होईना. तिने ते वॉर्डरोब पुन्हा बंद केलं. बॅगमधल्या कपड्यांवरती एक हात फिरवला आणि तिला घरची आठवण आली. बॅगेतल्या कपड्यांमध्येच बाबांनी लग्नाच्या दिवशी तिला दिलेलं गिफ्ट तिला सापडलं. तिने उत्सुकतेनं त्याच्यावरचं चकचकीत रॅपर उघडलं तर आतमध्ये फ्रेम होती. आईबाबा, रिया आणि ती असा ग्रुपफोटो होता तो!  गेल्या वर्षी गणेशचतुर्थीच्या दिवशी बाप्पाचं घरी आगमन झाल्यावरती चौघांनी बाप्पासमोर उभं राहून हौशीने काढलेला फोटो. तो बाबांना इतका आवडला की तो त्यांनी फ्रेमच करुन घेतला होता. तिची त्या घरातली शेवटची गणेशचतुर्थी म्हणून असेल कदाचित कारण मे पर्यंत लेकीचं छान लग्न झालेलं असेल याच कल्पनेत होते ते! पण मध्ये जे काही घडलं त्याने त्यांची सगळीच स्वप्न उद्धवस्त झाली होती. तिने त्या फोटोवरुन अलगद हात फिरवला तसे डोळ्यात अश्रु दाटले. तिने लगेच आईला फोन केला.
" हॅलो अनु, कशी आहेस? " आईने पहिल्या रिंगलाच पलिकडून फोन उचलला आणि किती बोलू किती नको असं होऊन गेलं तिला!
" मी मस्त तुम्ही कसे आहात?"  दाटलेल्या आवाजाने तिने विचारलं.
" आम्ही ठिक! आठवण येते तुझी. रिया तर इतकी दिवसभर आठवण काढते म्हणून सांगू! मग स्वतःच लहानपणचं काय काय सांगत राहते."  कुमुद भराभरा बोलत होती आणि ती आईचा आवाज कधी न ऐकल्यासारखा कानात साठवत होती.
" काय ग, गप्प का तू ? ठिकय ना सगळं ?"  कुमुदने काळजीने विचारलं.
" अ हो हो ठिकय. सगळे छान आहेत इकडे!" ती डोळे पुसत म्हणाली.
" आणि विक्रम.....ते बरं वागतात ना ग तुझ्यासोबत? " कुमुदने थोडस घाबरतच विचारलं.
" हो ग आई, डोन्ट व्हरी." असं ती बोलली तेव्हा कुमुदचा जीव भांड्यात पडला.
" बर, तु पण घे हा सगळ्यांशी सांभाळून! माणसं खूप आहेत तिकडे वेळ लागेल रमायला पण होईल सवय मग." कुमुदने तिला समजावित म्हटलं.
" हो बरं मी ठेवू का आता नंतर करेन. बाबांना सांग त्यांनी दिलेलं गिफ्ट छान आहे. टेक केअर हा." तिने असं म्हटलं आणि कुमुदनेही बरं टेक केअर म्हणत फोन ठेवून दिला. तिने पुन्हा कपडे व्यवस्थित बॅगेत ठेवले इतक्यात बॅगेच्या कप्प्याच्या एका कोपर्‍यात तिचा हात गेला आणि तिने हाताने ते लॉकेट बाहेर काढलं आणि क्षणभर हातात धरलं. त्या रात्रीचा तो तिच्यासाठी असणारा एकमेव पुरावा! लग्नाच्या आदल्या रात्री बॅगा भरताना सगळ्यांच्या नकळत तिने ते लॉकेट बॅगेच्या तळाशी एका कोपर्‍यात ठेवून दिलं होतं. त्या लॉकेटकडे पाहिलं की त्या प्रसंगाची आठवण तिला व्हायची पण आता त्या लॉकेटकडे पाहून पहिल्यासारखं तिला रडू यायचं नाही. अगतिक वाटायचं नाही आता उलट तिला वाटायचं पेटून उठाव आणि त्या नालायक माणसाला इतक्या मरणयातना द्याव्या कि मृत्यु त्याला जवळचा वाटेल. क्षणभर तिच्या कपाळावरच्या शिरा ताणल्या जायच्या. हातात इतकं बळ यायचं की वाटायचं हा माणूस कधी भेटला आयुष्यात तर मारून टाकावं आणि आपल्याला आपणच न्याय द्यावा. पण हे सगळे विचार हवेतच विरून जायचे आणि ती पुन्हा ' अनघा ' बनायची जी एका साध्याश्या घरातली संस्कारी, सुशिक्षित मुलगी आहे. जिला आजुबाजुच्या समाजात चार लोक कुणाची तरी मुलगी म्हणून, सुन म्हणून ओळखतात. तिच्या कामाच्या ठिकाणी चार माणसं तिचा हुशार मुलगी म्हणून आदर करतात. तिला वाटायचं, आपले विचार खूप हिंस्त्र बनलेत तरीही तिला वाटायचं, एकदा हा माणूस भेटावा आणि त्याला आपण जाब विचारावा. विचारावं त्याला, मी काय बिघडवलं होतं तुझ? का तू माझ्या आयुष्याची माती केलीस? तिने ते लॉकेट पुन्हा तसच बॅगेत कोपर्‍यात ठेवलं. तिला बॅग लॉक करताना मनात विचार आला, कुठे असेल तो ! त्याचं लग्न झालेलं असेल तर बिचारी त्याची बायको त्याची पति म्हणून सेवा करित असेल, त्याचा संसार सांभाळित असेल. तिला बिचारीला कल्पनाच नसेल तिच्या नालायक नवर्‍याने एका पोरीचं आयुष्य उध्वस्त केलय पण.......पण त्याचं लग्न नसेल झालं तर त्याच्या आयुष्यात येणारी मुलगी किती दुर्दैवी असेल! हे सगळे विचार तिच्या मनात बॅग उचलून ठेवताना येत होते. बॅगा कोपर्‍यात ठेवताना कॉर्नरपिसवरच्या विक्रमच्या फोटोकडे तिचं लक्ष गेलं तस तिच्याही नकळत तिचा चेहरा हसला.
....................

विक्रम जयपूरला दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत पोहचला. प्रवासाने त्याला कंटाळा आला होताच त्यामुळे लगेच विशालला फोन न करता तो आधी हॉटेलला पोहचला तोपर्यंत रात्रीचे आठ साठेआठ झाले. Radisson Blue च्या फाईव्ह स्टार हॉटेलची ती इमारत बघूनच त्याला आता शांतपणे आराम करता येईल या कल्पनेनचं बरं वाटलं. 
............................
तो आत पोहचला आणि काउंटरवरती 'अतिथी देवो भव 'या प्रमाणे चेहर्‍यावरती हसु ठेवत काउंटर मॅनेज करणार्‍या मुलीने विचारलं.
" Hello Good Evening Sir, What can I do for you ?" 
" Ya....Good evening..Vikram Rajeshirke. I've booked a room for 2 days." त्याने डोळ्यावरचा गॉगल उतरवित म्हटलं.
" Let me check."  तिने कंप्युटरस्क्रीनवरती दोन सेकंदात चेक केलं आणि रुमची चावी त्याच्या हातात दिली.
" Thanks "  तो चावी हातात घेत म्हणाला.
" Pleasure is mine Sir " ती प्रसन्न चेहर्‍याने हसत म्हणाली. तेवढ्यात रुमसर्वीससाठी एकजण आला आणि त्याने त्याची बॅग रूममध्ये नेण्यासाठी आपल्या हातात धरली.
........................
तो लिफ्टने त्याच्या रुमपर्यंत आला. डाव्या उजव्या दोन्ही बाजूंना हॉटेलच्या रुम्स होत्या आणि ये- जा करण्यासाठी मध्ये पॅसेज होता. तो त्याच्या रूमच्या दरवाजापर्यंत पोहचला तर समोर दोन ट्रॅव्हल्सबॅगच्या कडा हातात धरून एक मुलगी उभी होती. ती अशी मध्येच उभी असल्यामुळे त्याला रूममध्ये तिला बाजूला व्हा सांगितल्याशिवाय जाता येणार नव्हतं.
" Excuse me Mam, Please " त्याने त्याच्या रूमकडे हाताने निर्देश करित तिला मधूनच बाजूला व्हायला सांगितलं तशी पाठमोरी असणारी ती त्याच्या आवाजाने वळली.
Boat Neck चा Floral print चा गुडघ्यापर्यंतचा वनपिस, हातात Nyka ची हँन्डक्लच, Wrap around straps च्या हायहिल्स अशी ती चालत दोन पावलं पुढे आली. जबरदस्त आत्मविश्वास होता तिच्या चालण्यात! तिने हातातल्या क्लचसह स्वतःच्या गालाजवळ आलेल्या केसांच्या बटा बाजूला केल्या. हाल्प अप हाल्फ डाऊन अशी व्हेवी हेयरस्टाईल जी तिच्या चेहर्‍याला अजूनच खुलवीत होती. लाईट ब्राऊन कलरचे आयशॅडो, डार्क मस्कारा आणि हलक्या हाताने रेखलेले डोळ्यांभोवतीचे लिक्वीड आयलायनर, गालावरती पिंक ब्लश, न्युडकलरची लिपस्टिक यामुळे बोलताना समोरच्या माणसांचं लक्ष लगेचच तिच्या फक्त चेहर्‍यावरतीच स्थिरावायचं. 
"  Yes !  What happened ? " तिने त्याला विचारलं आणि तीच पुढे डोक्याला हात लावीत बोलली, Oh !  I'm so sorry, अॅक्चुली माझ्या बॅग्ज इथपर्यंतच पोचवल्या सर्वंन्टने and I've no key of my room " ती असं म्हणाली त्यावरती तो म्हणाला,
" Why any problem ?" 
" No big issue, की मिळायला थोडासा वेळ लागेल. By the way, Hi I'm Jui."  तिने शेकहँन्डसाठी हात पुढे करित हसत म्हटलं.
" Oh, Nice name " त्याने शेकहँण्ड करित म्हटलं.
" Thanks for the complimemt and I must say You're nice " तिच्या या बोलण्यावरती त्याने छान स्माईल केलं. इतक्यात एकजण तिच्या रुमची किल्ली घेउन आला.
" मॅडम " त्याने किल्ली तिच्या हातात देत म्हटलं.
" थँक्स " ती इतका वेळ ताटकळत राहूनही न चिडता त्या नोकराला छान चेहर्‍यावरती हसु ठेवत बोलली.
" Got key " तिने हातातली किल्ली त्याला दाखवित लहान मुलीसारखं हसत म्हणाली.
"  मी तुम्हाला थोडा त्रास दिला तर चालेल का? I think चालेल राईट." ती मोठ्याने खळखळुन हसत बोलली तस खांदे उडवीत हसत त्याने ओके शुअर म्हटलं.
तिने चालत जात तिची रुम उघडली.
" विक्रम, प्लीज जरा हेल्प " असं म्हणत तिने तिच्या बॅग्ज जराश्या त्याला सरकवायला सांगितल्या. त्याने बॅगचं हॅन्डल धरलं आणि तिच्या समोरच असणार्‍या रुमच्या दाराजवळ बॅग्जस नेवून टेकवल्या.
" Thank God ! Thank you so much " तिने हसतच रूमच्या दारातून बॅग आत सरकविल्या. तो जायला वळला तस तिने त्याच्या खांद्यावरती हात ठेवित म्हटलं,
"  Hey, Its dinner time. Would you like to join with me ?' तिने किचिंतस हसत विचारलं.
" No thanks but I want to take rest sometime . You please carry on."  त्याने शांतपणे तिच्यासोबत डिनरला नाही म्हटलं.
" Ok then thanks again " ती तिच्या रुमचा दरवाजा बंद करित म्हणाली. तो इट्स ओके म्हणून तिथून त्याच्या रूममध्ये निघून गेला.
.......................
 

विक्रम फ्रेश होऊन बेडवरती निवांत लोळत पडला. बर्‍याच दिवसांनी असं बेडवरती झोपताना जरा जीवात जीव आल्यासारखं वाटलं त्याला! त्याने दोन्ही उश्यांवरती डोकं टेकवलं.
" वाव!  This is like heaven किती दिवसांनी शांत झोप येईल आज " तो मस्त लोळत स्वतःशीच म्हणाला." देवा, लग्न झालं नायी तोपर्यंत जमिनीवर यावं लागलं. भविष्यात काय होणार God Knows !" मग त्याने कूस बदलली आणि बेडवरचा मोबाईल हातात घेतला. स्क्रीनवरती अनघाचा हसरा फोटो होताच! 
" हसते काय अशी मला ! " त्याने मोबाईलच्या वॉलपेपरकडे पाहत हसत म्हटलं आणि मोबाईल समोर धरला, " अनु, कधी हसणार ग तू अशी! हसशील लवकरच Definitely. मी तुझं लाईफ आधीपेक्षापण सुंदर बनवीन पण तू बोललं तर पाहिजे ना! तू बोलतच नाहीस माझ्यासोबत नीट. चल असु दे. आता झोप आली मला आणि Come in my dreams. I'm waiting लवकर ये." तिच्या फोटोकडे पाहत तिला रागवल्यासारखं तो म्हणाला. त्याने मोबाईल बाजूच्या टेबलवरती ठेवला. झोपण्याआधी गुडनाईटचा मेसेज तिला करायला तो विसरला नाही.
......................................
तिने एकटीनेच रूममध्येच डिनर अॉर्डर केलं. जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी तिने एकदा रुमचा दरवाजा उघडला. विक्रमच्या रुमच्या दाराकडे तिने क्षणभर एक नजर टाकली आणि स्वतःच्या रुमचा दरवाजा पुन्हा बंद करुन घेतला. ती निवांतपणे बेडवरती येउन बसली. क्लचमधून गोल्ड फ्लेक्सचं पाकिट काढलं आणि लायटरने सिगारेट पेटवली. सिगारेटचे झुरके ओढता ओढता तिच्या मोबाईलकडे तिचं लक्ष गेलं. तिने गॅलरी ओपन केली. त्यात विक्रमचा फोटो होता !
" विक्रम, सॉरी विक्रम राजेशिर्के! तर विक्रम, Do you know, इथली पाप इथचं फेडावी लागतात. पण तू काळजी नको करू, कसं आहे ना तुझा हा छान, well maintained  मुखवटा आहे ना जो घेऊन तू सगळ्यांसमोर फिरत असतोस तो मुखवटाच आता मी फाडेन! नताशा घाबरत नाही कोणालाच!  मग कळेल सगळ्यांना तू खरा कसा आहेस ते! सो भेटूया लवकरच सांगलीला. See you soon. " तिने स्वतःशीच बोलत मोबाईल अॉफ केला. तिच्या सिगरेट्सच्या धुरात तिच्या डोळ्यातले भावही बदलत गेले.
..................................
अनघाने रात्री रुममध्ये आल्यावरती मोबाईल पाहिला तर विक्रमचा एकतासापुर्वीचा गुडनाईटचा मेसेज होता. तिने तो झोपला असेल असा विचार करितच रिप्लाय चा मेसेज केला नाही. आज झोपण्याआधी थोडावेळ गॅलरीत उभं रहावं आणि छान आकाश पाहावस तिला वाटलं. तिच्या रुमला घरी काही अशी प्रशस्त गॅलरी नव्हती आणि इकडे आल्यापासून रात्री विक्रम असायचा आजूबाजूला म्हणून कधी गॅलरित जाणचं झालं नाही. ती शांतपणे जाऊन गॅलरित उभी राहिली. बाहेरची छान हवा अंगावरती येताना बरं वाटत होतं. इतक्यात काहीतरी फुटल्याचा आवाज तिच्या कानावरती पडला तशी ती धावत गॅलरीतून आत आली. 
" बापरे! सरांचा फोटो खाली कसा पडला असा !" विक्रमचा कॉर्नरपिसवरचा फोटो खाली फरशीवरती पडला होता आणि फोटोच्या काचा जमिनीवरती विखुरल्या होत्या.
" एवढी हवा नव्हती! कमाल आहे!" ती पटकन खाली वाकली आणि तिने काचा उचलायला सुरुवात केली तस काचेचा तुकडा तिच्या बोटात घुसला आणि रक्त आलं.
" आई ग " म्हणत ती कळवळली. फोटोचे असे तुकडे तुकडे झालेले बघून थोडस मन घाबरल्यासारखं झालं. त्या विखुरलेल्या काचेत एक छान हसरा फोटो होता हेही आता कोणाला वाटलं नसतं इतके त्या काचांचे तुकडे तुकडे झाले होते. ती तशीच त्या काचांकडे पाहत राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all