बंधन भाग 59

Love, Social

भाग 59

( गेल्या भागात दोघे सगळ्यांच्या आग्रहाखातर गोव्याला जायला निघतात. पण जाताना एक बाईकवाला त्यांचा पाठलाग करतो तो कोण ते कळेलच. पोचेपर्यंत रात्र होते आणि रस्त्यात एका दारुड्या माणसामुळे ती घाबरते. म्हणून पुढे न जाता रात्री एका लॉजला थांबायचं ते ठरवतात पाहूया पुढे )

विक्रमने कार एका लॉज समोर उभी केली. मघाशी मोबाईलवरुन त्याने जवळपासचं लॉजिंग पाहिलं होतं. आत्याला आम्ही बर्‍यापैकी पोहचलोय काळजी करत नको बसु असं सांगायला घरी फोनही केला होता त्याने. एवढ्या रात्री जवळच थांबण्याची व्यवस्था झाली ते बरं झाल अस त्याला वाटलं. आत्यासोबत थोडं बोलल्यावरही त्याचं मन शांत झालं होतं. त्यामुळे जरा रिलॅक्स मूडमध्ये तो चालत येत होता इतक्यात अनघा ओरडली आणि नंतरचा तो सगळा घडलेला प्रकार त्यानंतर तिचं घाबरणं  ते सगळ बघून तोही अस्वस्थ झाला होता. काही मिनिटांपूर्वी शांत झालेलं त्याच मन तिची अवस्था पाहून अस्वस्थ झालं मग तिला कसबस समजावित त्याने गाडी जवळच्या लॉजपाशी घेतली.

" इथे थांबूया आता उद्या निघू पुढे " त्याने कारमधुन उतरत म्हटलं तशी ती आज्ञाधारक मुलासारखी गाडीतून खाली उतरली आणि त्याच्या मागोमाग चालू लागली.

.............................

ते रिसेप्शनपाशी आले. समोर काउंटरवरती स्वतः मॅनेजर होते.

" Hello, We are going to Colva. Any room available for tonight ?"  

" Yeah, Sure. Let me check " मॅनेजरने हसून म्हटलं आणि समोरच्या कंप्युटर स्क्रीनवरती नजर फिरवत मानेनेच ओके म्हटलं.

" Sir, Show your ID Please " 

त्याने दोघांची आयकार्ड्स मॅनेजरच्या हातात दिली. मॅनेजरने पटकन नावं, पत्ते, नंबर अशी बेसिक माहिती कंप्युटरवरती टाईप केली.

" Sign please " त्याने आदराने हसत रजिस्टर समोर केलं. विक्रमने पटकन नाव लिहून पुढे सही केली आणि रजिस्टर तिच्याकडे सरकवलं. तिने पेन हातात घेतलं आणि लिहिलं, अनघा रा... इतक्यात त्याची नजर तिने लिहिलेल्या शब्दांवरती गेली. त्याने रजिस्टर स्वतःकडे ओढलं आणि समोरचं पेन उचलून नाव लिहिलं, ' अनघा कारखानीस ' ! ती अवाक होऊन पाहतच राहिली त्या नावाकडे आणि त्याच्या चेहर्‍याकडे सुद्धा! त्याने रजिस्टर मॅनेजरकडे सुपुर्त केलं. त्याने रुमच्या किल्ल्या विक्रमच्या हातात दिल्या.

" Thanks sir and welcome to Goa. " मॅनेजरने हसतच दोघांकडे पाहत म्हटलं.

........................

नोकराने दोघांच्या बॅगा रुममध्ये आणल्या. विक्रमने हसून त्याला थँक्स म्हटलं तसा तोही माय प्लेजर म्हणून निघून गेला. हँण्डला धरुन दोन्ही बॅगा त्याने आतमध्ये घेतल्या तशी ती त्याला मदत करायला पुढे आली.

" It's ok. I'll manage " त्याने तिला म्हटलं. बॅगा आतमध्ये आणल्या आणि रुमचा दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावून तो तिच्याकडे वळून काही बोलणार तोच ती बोलली,

" सर तुम्ही मघाशी नाव I mean तुम्हाला चालेल का मी माझ्या नावाने चारचौघांमध्ये वावरलेलं!" ती असं म्हणाली. तो चालत तिच्यासमोरच येऊन उभा राहिला. तिच्या डोळ्यात पाहत त्याने म्हटलं,

"  मॅडम, You've your own identity since your childhood. You've lovely parents. त्यांनी तुम्हाला जन्म दिला. खस्ता खाऊन मोठं केलं. तुम्हाला शिकवलं आणि एका क्षणात त्यांचं नाव त्यांची ओळख तुम्ही पुसुन टाकणार ! " त्याच्या या बोलण्यावर ती पाहतच राहिली त्याच्याकडे.

" पण सर सगळेच थोडी न असा विचार करतात. लग्न झाल्यानंतर सासरचं जे जे ते सगळं मुलीचं असतं." ती शांतपणे म्हणाली.

" हो म्हणजे स्वतःच्या आईबाबांनी दिलेल नाव आणि ओळख पुसुन टाकायची असा अर्थ नसतो. ते सासरच्यांमध्ये मिसळणं, एकरुप होणं वगैरे I don't believe such things ! प्रत्येक माणसाला जन्मतःच त्याची ओळख असते आणि ती पुसुन टाकायचा हक्क कोणालाही नाही आणि नावात काय आहे हो स्वतःचं नाव लावलं तर तुम्हाला सासरच्यांची पर्वा नाही असा अर्थ नाही होतं." तो जॅकेट उतरवत म्हणाला. 

" आणि मॅम तुम्ही लग्नानंतर कॉलेजच्या डॉक्युमेंन्ट्स वरती साईन कारखानीस म्हणूनच केली असेल ना " त्याच्या या बोलण्यावर तिने होकारार्थी मान डोलावली.

" मग काय प्रोब्लेम आहे! You're well- educated girl आणि तुम्ही एका पोस्टवरती काम करताय सो तुम्ही आतापर्यंत ज्या नावाने वावरलात, यश मिळवलत, कौतुक मिळवलत स्वतःची ओळख निर्माण केलीत मग माझ्या नावाच्या कुबड्यांची काय गरज!" त्याने हसत म्हटलं आणि त्याची बॅग ओपन केली तरी ती तशीच विचारात उभी.

" मॅडम, Come on, It's ok इतका कसला विचार त्याचा आणि माहेरचं नाव वापरणार्‍या कितीतरी बायका अाहेत अगदी अॅक्ट्रेस पासून ते सामान्यांपर्यंत! So leave it. " 

" हं.....राईट "  ती त्याच्या बोलण्यावरती म्हणाली.

त्याने बॅगेतून त्याचा नाईटड्रेस काढला आणि तो वॉशरुमला निघून गेला. तिने मनातून त्याला थँक्स म्हटलं. 

...........................

तो वॉशरूममधून येईपर्यंत ती तशीच बेडवरती बसून राहिली. तिने तिची बॅग उघडली तर त्यात दोनच ड्रेस तिने सोबत आणले होते बाकी सगळ्या साड्याच होत्या. बाहेर फिरायला जायच म्हटलं की नवीन लग्न झालेली कपल्स किती आनंदात असतात. मुली तर बाहेर जायच म्हणून किती वेगवेगळी शॉपिंग करतात. जीन्स, टिशर्ट, वनपिस,कुर्ती किती वेगवेगळे ड्रेसेस हौसेने सोबत नेतात नाहीतर आपण आपल्या मनासारख्याच आपल्या इच्छासुद्धा मेलेल्या असा विचार करित तिने बॅगेतून एक अॉफव्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस बाहेर काढला. क्षणभर त्या ड्रेसकडे पाहिलं आणि स्वतःवरच ती विशादाने हसली. मनातून वाटलं, काय अवस्था झालीय आपल्या आयुष्याची! आता रंगांचंसुद्धा आकर्षण वाटत नाही. सगळे रंग सारखेच. ती बॅग बंद करणार इतक्यात तो नेव्हीब्लू कलरच्या नाईटड्रेसमध्ये बाहेर आला. 

" तुम्ही या फ्रेश होऊन मी डिनर अॉर्डर करतो. तुम्हाला कोणत्या डिश आवडतात?" त्याने मोबाईलवरती नंबर डायल करत सहजच विचारलं.

" I don't know so much about Goan dishes तुम्हाला आवडेल ते करा अॉर्डर " तिने वॉशरुमच्या दिशेने जात म्हटलं. त्याने ओके म्हणत डिनर अॉर्डर केलं.

" हॅलो, रुम नं. 32 I'd like to order 2 Sorpotel and 2 Bebinca "

" Ok sir, Wait for few minuts. Do you like to order anything? " समोरुन काउंटरवरच्या माणसाने म्हटलं.

" No, Thank you " म्हणत विक्रमने फोन ठेवला इतक्यात ती वॉशरुममधून बाहेर आली. तिला कसतरीच वाटत होत त्याच्यासमोर उभ राहताना. अॉफव्हाईट कलरचा पंजाबी ड्रेस, गळ्याभोवती लपेटून घेतलेला व्हाईट दुपट्टा, बटरफ्लाय क्लिपने गुंडाळलेले केस अश्या अवतारात ती वॉशरुममधुन बाहेर आली. तिने आतमध्ये वॉशरुमच्या आरश्यात स्वतःकडे पाहिलं तेव्हा वाटलं, किती गबाळ्यासारखे राहतो आपण. इतक्या लांब तेही हनिमूनसाठी आलेल असताना अश्या अवतारात आपल्याला बघून विक्रमसरांना काय वाटेल! आणि या प्रश्नाचं उत्तर आरश्यात पाहत तिने स्वतःच्या मनाला दिलं, 'काय वाटणार ? आपल्यासारख्या निर्जिव मुलीसोबत लग्न केल्याचा पश्चात्ताप वाटेल.' हाच विचार मनात घोळवत ती बाहेर आली होती. तो मोबाईलवरुन प्राचार्यांनाच कामाविषयी मेसेजेस करत होता आणि त्याच लक्ष तिच्याकडे गेलं. मनातून इतका आनंद झाला त्याला! त्याच्या ओठावर शब्द आले, ' तुम्हाला कस कळलं माझा फेवरेट कलर व्हाईट आहे. ' पण ते शब्द त्याने मनातच ठेवले आणि तो क्षणभर पाहतच राहिला तिच्याकडे. त्याने मनातून म्हटलं, ' White...My favourite... आज व्हाईट...special माझ्यासाठी कि काय!'  इतक्यात डोरबेल वाजली आणि तो भानावरती आला. तिच्याकडे पाहतच त्याने दरवाजा उघडला.

" Sir your dinner " सर्वन्टने त्याने दिलेल्या अॉर्डरप्रमाणे पार्सलचा ट्रे विक्रमच्या हातात दिला. 

" Thanks "

" Most welcome sir " सर्वन्टने प्रसन्न चेहर्‍याने म्हटलं आणि तो निघून गेला तसा त्याने दरवाजा बंद केला.

........................... 

" चला डिनर आलं " त्याने टिपॉयवरती ट्रे ठेवला आणि फॅब्रिक चेअरवरती बसून पॅकेट्स ओपन करायला घेतली. ती त्याच्यासमोरच्या चेअरवरती बसली. 

" सॉरी हा आपण डिनअरला बाहेर जायला हव होत खरतर बट आता लेट झालाय तुम्ही पण दमला असाल दिवसभराच्या जर्नीमुळे म्हणून.."  त्याने गप्पांना सुरुवात केली. हाताने पॅकेट्स ओपन करत तो बोलत होता आणि ती तो कस सर्हर्व करतो ते पाहत होती.

" It's ok " ती म्हणाली.

" चलो, Now everything is set. Hope you enjoy what I've made for us " त्याने हसत म्हटलं. पाचएक मिनिटात टिपॉयवरती पॅकेट्स उघडून डिशमध्ये व्यवस्थित सर्हर्व केलं. प्लेटमध्ये चमचे ठेवले आणि तिच्यासमोर रेडी प्लेट ठेवली. 

" थँक्स  "  ती चमचा प्लेटमध्ये घोळवत म्हणाली. त्याने पाण्याच्या बॉटल्स सुद्धा टिपॉयवरती ठेवल्या. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये टेबलला बसल्यासारखच वाटलं तिला. तिने पहिला घास खाल्ला. त्याने अजून त्याचा चमचा प्लेटमध्येच ठेवला होता. तिने पहिला घास खाल्ला आणि त्याने पटकन विचारलं,

" So Is the food tasty ?"  त्याने पहिला घास खाताना विचारलं.

" छानय I don't know names of dishes " तिने थोडस हसत म्हटलं. त्यावर त्याने पदार्थांची नाव सांगायला सुरुवात केली.

" Oh ! ओके,  I'll tell you. This's Sorpotel one of the famous food of Goa. Onion, Garlic addded with different spices actually it's type of non-veg. This multilayered cake is dessert. हे फक्त पॅनकेक सारखं दिसत हा पण अॅक्चुयली नॉट पॅनकेक It's called as ' Bebinca'. 

" ओके ओके समजल सगळं थँक्यु हा " ती हसतच म्हणाली.

" हा काय बरं " अस म्हणून थोडासा नाराजीनेच तो जेवायला लागला. त्याला तिच्याकडून कॉमपलिमेंन्टची अपेक्षा होती. त्याला वाटत होतं, ती कौतुकभरल्या नजरेने आपल्याकडे पाहिल नी म्हणेल, ' सर You're so genius ' किंवा ' तुम्ही किती छान बोलता ' असं काहीतरी तिने बोलाव म्हणून त्याचा आटापिटा सुरु होता पण तस काहीच झालं नाही. ती शांतपणे जेवत होती. त्याच जेवतानाही सगळं लक्ष मात्र तिच्याकडे होतं. 

.................................

जेवणानंतर त्याने टेबल व्यवस्थित आवरलं. सर्वन्ट येऊन रिकाम्या प्लेट्स वगैरे घेऊन गेला. 

......................

" चलो लेट झालाय अॉलरेडी You take rest उद्या निघायचय "  तिला झोपायला सांगताना त्याने बेडवरची एक पिलो उचलली. बॅगेतून त्याने ब्लँकेट्स आणली होती. त्यातल एक तिच्या हातात दिलं. 

" मला सांगायचत ना बॅग्स भरताना मी आणलं असतं ब्लँकेट माझ्यासाठी! तुम्ही कश्याला उगीच एवढं "  तिने ब्लँकेट हातात घेत म्हटलं.

" त्यात काय एवढं! असु दे ओके गुडनाईट " त्याने फरशीवरती ब्लँकेट अंथरलं आणि त्यावर उशी ठेवली. दुसरं ब्लँकेट पांघरण्यासाठी घेतलं. तिला अंधाराची भिती वाटते म्हणून त्याने लाईट स्वीच अॉफ केला नव्हता.

" बरं,  झोपा तुम्हीही " ती बेडवरती बसत म्हणाली. तो खाली झोपला असला तरी त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं पण लक्ष नाही अस त्याने दाखवलं. तिने उशीला डोक टेकण्याआधी दुपट्टा नीट केला. केसांचा क्लीप बाजूला केला तसे सगळे केस मोकळे सुटले. तिने क्लीप बाजूलाच ठेवत उजव्या हाताने गालावरती येणारे केस कानाच्या मागे घेतले. ती झोपण्यासाठी खाली वाकली तसे सगळे केस खांद्याच्या एका बाजूला झुकले. तिने पुन्हा हाताने ओढणी सावरली. तो शांतपणे बिछान्यावरती कूस वळवून तिच्याकडे पाहत होता. ' मॅडम, तुम्ही किती सुंदर दिसता हो maybe तुम्ही मनानेच निरागस आणि सुंदर आहात म्हणून असेल. but I'd just lost myself in your presence.' मनातच बोलत तो छानस हसला आणि तिला डोळ्यात साठवता साठवता निद्रादेवी प्रसन्न झाली.

क्रमशः

प्रिय वाचक, वेबसाईटला प्रोब्लेम असतो तरीही गेल्या तीन महिन्यात मी लिहिणं सोडलेलं नाही.माझ्या वैयक्तीक कारणामुळे पोस्ट करायला कधीच मी लेट केला नाही लेट होतो जेव्हा वेबसाईट ठिक नसते. याशिवाय 'बंधन ' साठी मलाही पुस्तक वाचावी लागतात,रिसर्च करावा लागतो. तुमचा प्रतिसाद प्रचंड आहे पण ...Waiting for something more from you all....

Like, Comment, Share

पार्ट फेसबुकला ईराटिम शेअर करते त्यामुळे उशीर होतो ते काम माझ्या हातात नाही तरीही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत फेसबुकला भाग पोचवण्याचा प्रयत्न असतो.

🎭 Series Post

View all