बंधन भाग १( जलद कथालेखन स्पर्धा)

रुपाली चे आईवडील कामाच्या व्यापात व्यस्त असलेमुळे रुपालीला होस्टेलमध्ये ठेवायचा निर्णय घेतला होता.

बंधन

भाग..१)

" हे का झाले??? कसे झाले?? झाले ते वाईट झाले का ??? कि हा नियतीचा खेळ आहे???" असे अनेकानेक प्रश्नांची उत्तरे शोधत रुपाली शाॅवर खाली उभी राहून आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून देत होती.शाॅवरच्या पाण्याबरोबरच तिचे अश्रू ओघळत होते. तिच्या डोक्यात प्रश्नांनीं काहुर माजविले होते.

रुपाली ...!!!

रुपाली नरेश आणि मधुरा यांची एकूलती एक मुलगी.नरेशचा मोठा बिझनेस होता. मधुरा ही त्यांच्या बरोबर बिझनेस मध्ये हातभार लावत होती.रुपाली जेव्हा लहान होती तेव्हा घरी तिला सांभाळायला आया माई होती.तिच्याजवळच दिवस रात्र रुपाली राहायची.

आता रुपालीचे शालेय शिक्षण सुरू झाले.बघता बघता तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले असलेमुळे तिला हायस्कूल मध्ये प्रवेश घ्यायचा होता. नरेशचा बिझनेस देखील दिवसेंदिवस वाढत होता.मधुराला आणि नरेशला त्यांच्या बिझनेस साठी काही काही दिवस बाहेर जावे लागत होते.आता तर कामाचा व्याप वाढल्यामुळे घरात हे दोघे फक्त झोपायला यायची.रुपाली कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नव्हता.

म्हणून त्यांनी तिला पुढील शिक्षणासाठी बाहेर म्हणजेच दुसऱ्या शहरात होस्टेलमध्ये ठेवायचा निर्णय घेतला. शहरातील नामवंत शाळेत जिथे वसतिगृह त्याचबरोबर शिक्षणाचा दर्जा उत्तम आहे अशा शाळेतच प्रवेश घेतला . जेणेकरून ती आता आपले शिक्षण पूर्ण करेल. नरेशची ओळख त्याचबरोबर पैसा असलेमुळे तिला प्रवेश मिळण्यासाठी काही अडचण आली नाही.

रुपाली ला होस्टेल मध्ये जाणे पसंत नव्हते .ती वारंवार आपल्या आई वडिलांना या साठी विरोध दर्शवित होती.पण त्यांनी तिचा विरोधाला दुर्लक्षित करून तिथे प्रवेश घेतला.

अगदी जड अंतःकरणाने रुपाली तिथे दाखल झाली.सुरवातीचे दिवस तिला अवघडच जाऊ लागले.मग एक एक करत वर्गात मैत्रीणी होत गेल्या. तसे तिला जरा बरे वाटू लागले. काही मुली अभ्यासात हुशार होत्या.तर काही फक्त आपल्या वडिलांच्या पैशाच्या जोरावर मिजाशी मारत होत्या.

रुपाली तशी अभ्यासात हुशार होती.तिला तिच्या आया माई ने अ आ इ ई चे धडे नंतर पाढे काही बालकथा राजा राणीच्या , काही बोध कथा शिकविल्या होत्या.रुपाली आपल्या आई वडिलांच्या व्यस्त जीवनात आया माई कडेच जास्त वेळ रहायची.आता तर होस्टेल मध्ये आल्यापासून तिला तितकेसे तिचे आई वडील आठवत नव्हते पण आया माईच्या आठवणीने मात्र ती कासावीस व्हायची.

सकाळी शाळा,नंतर संध्याकाळी स्पोर्ट्स,डान्स क्लास, संगीत क्लास अशा विविध प्रकारचे क्लासेस पण तिच्या शाळेत होते.

आता ती जरा रमली होती शाळा होस्टेल जीवनात.पालक मिटींग असेल तेव्हा मात्र तिचे आई वडील आवर्जून यायचे.

बघता बघता रुपाली दहावीच्या वर्गात गेली.आता बोर्ड एक्झाम मग तिच्या वर आई बाबांचे जास्त दडपण."अभ्यास चांगला कर.चांगल्या मार्काने पास झाली पाहीजे.आता या आपल्या बिझनेस ची जवाबदारी तुलाच सोपविणार आहोत आम्ही.तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर.यासाठी तू दहावी परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाली पाहिजे. इथेच तुझे पुढील शिक्षणपण पूर्ण करायचे.मग उच्च शिक्षणासाठी तुला परदेशात जावे लागेल." असे नेहमी ते बोलत होते. पण हे सगळे तिला ओझेच जास्त वाटत होते.

आता तिची सहामाहीची परीक्षा झाली.तिला बऱ्यापैकी मार्क मिळाले पण यासाठी तिला तिच्या आई वडिलांनी खुप बोलले " हे असले मार्क असण्यापेक्षा नापास झालेले बरे" हे ऐकून तिचे खच्चीकरण झाले.

फायनल परीक्षा जवळ आली.रुपालीने आपले सारे लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले. जास्तीत जास्त वेळ ती अभ्यास करायला लागली.
*********
आज फायनल परीक्षेचा निकाल.सकाळ पासून रुपाली टेंशन मध्ये होती. शेवटी निकाल जाहीर झाला.तिने तर आपला श्वास रोखला.तोच " हे रुपाली तुझे मार्क बघ यार.काय तू तर डिस्टिंक्शन मध्ये पास झाली.अभिनंदन डियर." मैत्रिणींचा एकच जल्लोष.

आता तिचा तिथल्या मोठ्या नामवंत महाविद्यालयात प्रवेश झाला.कॉलेजमध्ये नवनवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या.रुपालीमध्ये खुपसा बदल होत होता.ती जरा माॅडर्न कपडे,हेयर कटींग,चप्पल ,बुट कपड्यांना मैचींग घालू लागली. ती आता पहील्या पेक्षा अधिक सुंदर दिसत होती.

कॉलेज मध्ये अभ्यासा व्यतिरिक्त दुसऱ्या म्हणजेच स्पोर्ट्स,भाषण स्पर्धा,डान्स स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली.

तिच्या क्लासमध्ये एका नवीन मुलीने प्रवेश घेतला.ती जास्त कोणा बरोबर बोलत नव्हती.एकटीच रहायची. कधी कधी तर ती आपल्या बेंचवर बसून डोळे मिटून बसायची.

एके दिवशी तिला काही नोट्स हव्या होत्या म्हणून तिने रुपाली जवळ मागितली तेव्हा पहील्यांदाच तिचे रूपाली बरोबर बोलणे झाले.

एखाददुसरा शब्द बोलणारी रागिणी . वर्गात नेहमीच शांत बसणारी.पण रुपाली बरोबर तिची मैत्री एका नोट्सच्या कारणाने झाली. रागिणीअभ्यासात म्हणावे तितके हुशार नव्हती.हां पण पासींग पुरते मार्क मिळायचे तिला.

" रुपाली उद्या माझा वाढदिवस आहे तू येशील का घरी आमच्या.कारण पार्टी रात्री आहे."रागिणी ने रुपालीला विचारले.

" अरे रात्री वाॅर्डन मॅम परवानगी देतील का नाही हे पहावे लागेल.जर दिली परवानगी तर नक्कीच येईन मी."रुपाली म्हणाली.

रुपालीने आपल्या वाॅर्डनला परवानगीसाठी विचारले.तशी त्यांनी लवकर परत येण्याचे बजावून परवानगी दिली.

रुपाली ने आनंदाने रागिणीला कळविले कि मी येत आहे.

रागिणी ने," तू तयार हो मी गाडी पाठवेन तुला आणायला." असे म्हटले.

रुपाली तयार झाली.आज तिच्या मैत्रिणी च्या पार्टीमध्ये ड्रेस कोड होता लाल रंग. रुपाली ने त्या प्रमाणे लाल रंगाचा गाऊन घातला जो तिच्या वाढदिवसाला आई बाबांनी पाठविला होता तो.आज ती त्या मध्ये खुपचं सुंदर दिसत होती.

बरोबर वेळेवर तिला नेण्यासाठी गाडी आली.वाॅडर्न ने निघताना बजावले वेळेवर परत ये नाहीतर आत घेणार नाही.

रुपाली रागिणी च्या घरी पोहोचली.तिथे तिचे घर खुप छान सजविले होते.रागिणी तिची वाट पाहत उभी होती तिला पहाताच पळतच जाऊन तिची गळा भेट घेतली.

दोघी मैत्रिणी आत गेल्या.पाहुणे, मित्र मैत्रिणी नातेवाईक अगदी घर गजबजून गेले होते.रुपालीला रागिणी ने आपल्या आई-बाबांची ओळख करून दिली.

तिचे काही मित्र मैत्रिणी बरोबर ही रुपाली ची ओळख करून दिली.रागिणी आपल्या नातेवाईकांबरोबर बोलत होती तेव्हा रुपाली तिच्या मैत्रिणी बरोबर बोलत होती.तोच तिथे एक तरुण मुलगा पुढे आला आणि रुपाली ला म्हणाला," हाय...!! मी राहुल.रागिणीचा बाल मित्र."

" ओ हाय.मी रुपाली."
मग दोघे जरा वेळ बोलत होते.नंतर रुपाली रागिणीला म्हणाली " मी निघते गं.वेळ झाला कि होस्टेल चे गेट बंद केले तर बाहेरच बसावे लागेल."

" अगं जरा वेळ थांब ना.मी सोडेन तुला.आणि हो परवानगी तर घेतली आहेस न."

यांचा संवाद ऐकून राहुल पुढे येऊन म्हणाला " डोन्ट वरी.मी सोडतो तुला."

राहुलने रुपालीला होस्टेल मध्ये सोडले.दोघांनी आपापले फोन नंबर्स शेअर केले.

आता दोघे रोज \"हाय,हॅलो जेवण झाले का, अभ्यास काय म्हणतो.\"इतके बोलणे करत होते.

त्यांची मैत्री खुप जमली होती.
रुपाली ची फायनल परिक्षा होती.ती अभ्यासात मग्न होती.तोच तिला राहुलचा मेसेज आला " तू आज भेटू शकतेस का? "

यावर हिने," काही महत्त्वाचे काम आहे का? कारण मला अभ्यास आहे" असा रिप्लाय दिला.

" ओके.तुझी परीक्षा झाल्यावर मग भेटू" राहुलचा मेसेज.

क्रमशः
©® परवीन कौसर....बंधन

©® परवीन कौसर....