बंधन भाग ३ ( जलद कथालेखन स्पर्धा)

राहुलची आई लग्नाच्या बंधनातून मुक्त झाली पण राहुल रुपाली दोघेही एका वेगळ्या बंधनात बांधले गेले होते.


बंधन
भाग..३)

‌या दोघींचें संभाषण राहुल आणि त्याच्या बहीणी ने ऐकले. दोघांच्या डोळ्यात पाणी आले.दोघेही आपल्या आईजवळ गेली. तिच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागले.

हे दृश्य पाहून रुपाली चे मन एकदम गलबलून आले.ती देखील आपल्या डोळ्यांच्या कडा पुसू लागली होती. तोच ती एकदम म्हणाली" आई आज रडण्याचा नाही आनंद साजरा करायचा दिवस आहे.आज तुम्ही या लग्न रुपी पिंजऱ्यातून या बंधनातून मुक्त झाला आहात.आता तुम्ही खुल्या आकाशात उंच झेप घ्या.आज पासून तुम्ही कोणाच्या ही बांधील नाही राहीला.तुमचे आयुष्य तुमच्या मनाप्रमाणे जगा.चला लवकर केक कट करा.आ मग मी ही जाते .वेळ. होतो न."

तिचे बोलणे ऐकून राहूल ने आपले डोळे पुसत म्हटले" हो आई रुपाली बोलते ते खरेच आहे.तु आज मुक्त झाली आहेस.आज पासून त्या व्यक्तीबाबत आपल्या घरी चर्चा करायची नाही.ते आता आपले कोणीच नाही आणि नव्हते ही.चल तु फ्रेश हो.आणि केक कट कर.जेवण करु मस्त . मग रुपाली ला सोडून येतो ."

************************
आज रविवार असलेमुळे राहुल ची बहीण स्वयंपाक करणार असे ठरवले होते.सुट्टी असलेमुळे तिला स्वयंपाक करायची हुक्की आली.आता तिचा सगळा साग्रसंगीत स्वयंपाक.ज्या ज्या वस्तू हव्यात त्या राहुल कडून मागविल्या. रुपालीला ही लवकर घरी बोलावले.
राहुल बाजारात गेला तसा येता येता रुपालीला घेऊन आला.रुपाली तिला मदत करायला किचनमध्ये गेली .
" आज माझे एकटीचे राज्य आहे किचनमध्ये. तू जा आई बरोबर बोलत बस." असे म्हणत तिला बाहेर पाठविले.

" अरे व्वा मस्तच बनविले आहे जेवण." आई म्हणाली.

हे चौघे ही हसत खेळत जेवण करत होते.

" ही भाजी न तुझे बाबा आले कि कर तू .अगं त्यांची आवडती आहे ही भाजी.....!!!!!" आई म्हणाली.

ती इतके म्हटली कि सगळेजण स्तब्धच झाले.

एकदम आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले .

" माफ करा मुलांनो माझ्या लक्षात आले नाही . माझा अजुनही या गोष्टी वर विश्वास बसत नाही काय करु रे .अरे इतक्या वर्षाचा संसार .कसे रे पत्त्यांचा बंगला तुटल्या सारखे पडला हा....!!! असा मांडलेला डाव असा कसा मोडला...!!!"

सगळ्यांनी मिळून आईची समजूत काढली. जरा विरंगुळा म्हणून बाहेर फिरायला माॅलमध्ये गेले.तिथे कपड्यांची दुकाने होती तिथे हे सगळे गेले.तिथे एक सुंदर ड्रेस होता तो राहूल ने आपल्या बहीणीला घेतला . तसाच अजून एक आहे का विचारले तर सेम तसाच एक होता तर तो ड्रेस रुपाली ला घेतला.

माॅलमध्ये फिरत खरेदी करत वेळ कसा गेला हेच कळले नाही.तोच राहुल म्हणाला " नवा मुवी रिलीज झाला आहे तो पाहु आणि मग इथेच हाॅटेलात डिनर करून घरी जाऊ."

प्रेम कथेत गुंफलेली मुवी होती.ती पाहून बाहेरच डिनर करून हे सगळेजण घरी परतले.

" चला मी येते आता आई." रुपाली म्हणाली.

" हो राहुल सोडून येईल तुला." आई म्हणाली .

घरात जाऊन हातातील बॅग सोफ्यावर ठेवली .

तोच एकदमच त्या किंचाळल्या " आईईईई गं.....!!!!!

.................
.........
एकदमच आई किंचाळत खाली पडली हे पाहून राहुल आणि त्याची बहीण" आई. ....!!!!
आई....!!!!
आई...!!!

...करत धावले.तर आई काहीही बोलत नव्हती. ती बेशुद्ध अवस्थेत होती.
लगेच राहुलने गाडी काढली.आईला अलगद तिघांनी मिळून उचलून गाडीत घालून दवाखान्यात नेले.

" साॅरी...!!!शी इज नो मोअर.....!!!!.हार्ट अॅटॅक इतका जबरदस्त होता कि त्या तिथेच संपल्या होत्या.....!!!!" डॉक्टरांनी सांगितले.

एकच आक्रोश....!!!!

राहुल , त्याची बहीण दोघेही जोरजोरात रडू लागले.

" आई असे कसे आम्हाला सोडून गेलीस तू.आता तर कोठे तू पिंजऱ्यातून त्या बंधनातून मुक्त झाली होतीस. अशी तू कशी खचली आई.तुला आयुष्य का नको झाले.आम्हाला का नाही सांगितलेस तू तुझे दुःख.आई तू आम्हाला पोरके करून गेलीस"
********************
स्मशानभूमीतून राहूल आईचे अंतिम संस्कार करून आला.त्याला पहाताच त्याची बहीण पळतच आली. त्याच्या गळ्यात गळे घालून रडत रडत म्हणाली" राहुल आईला सोडून आलास का रे.अरे राहुल..!!!आई आपली आज खऱ्या अर्थाने पिंजऱ्यातून मुक्त झाली. बघं कशी उंच आकाशी झेप घेतली."

आलेले नातेवाईक अंतिम संस्कार झाल्यानंतर आपापल्या घरी निघून गेले.रुपाली ने आपल्या वाॅर्डन मॅम ना फोन करून सांगितले की मी आज इथेच राहीन.मैत्रिणीच्या घरी
तिच्या आईचा मृत्यू झाला आहे.ती एकटीच आहे म्हणून."

राहुल आणि त्याची बहीण जेवायला तयार झाले नाही.दोघेही भूक नाही म्हणून आपापल्या खोलीत गेले.रुपाली राहुल च्या बहीणीच्या खोलीत गेली.ती रुपाली पाहून तिच्या जवळ जाऊन तिला घट्ट मिठी मारली. रडत रडत म्हणू लागली." रुपाली मी राहूल समोर खूप कंट्रोल केले ग स्वतः वर पण आता नाही होत."

रुपाली ने तिच्या पाठीवर हात फिरवत म्हटले" आता हे काय आपल्या हातात आहे का.जीवनमृत्यू हा प्रकृतीचा नियम आहे.कोण लवकर तर कोणी वेळाने पण हे निश्चित आहे.त्यांना तुमच्या बाबांचे मनावर खोलवर जखम करून दिले.आणि ती जखमच त्यांना घेऊन गेली."

तिची समजूत काढून तिला झोपवून रुपाली खोलीची लाईट बंद करण्यासाठी उठली . बाहेर मेन डोअर बंद आहे कि नाही हे बघण्यासाठी बाहेर आली तर राहुल आईचा फोटो घेऊन रडत होता . तो काहीतरी अस्पष्ट बोलत होता.

" राहुल...!!!ये राहुल..!!!.अरे अजून जागाच तू.झोपला नाहीस."रुपाली ने म्हटले.

रूपालीचा आवाज ऐकून राहुल आणखीन भाऊक झाला आणि रडू लागला." आई गेली न आम्हाला सोडून.आता आम्ही दोघे काय करणार.आता कुठे ती बाबांचा विचार करायचे सोडून दिले होते . तोपर्यंत हे असे झाले.का आई इतके आतल्या आत धुमसत होती.तिला किती वेदना झाल्या असतील.ती किती तुटली असेल आतून. आम्ही हे समजू शकलो नाही.कशी मुले गं आम्ही." म्हणत पुन्हा तो रडू लागला.

रुपाली ने त्याच्या हातातील आईचा फोटो काढून घेतला . त्याच्या हातात हात देऊन" अरे काही पण बोलू नकोस राहुल.अरे तुम्हा दोघांसाठी तर त्यांनी आपले आयुष्य वेचले.त्यांनीच तर तुमचा सांभाळ केला. तेव्हा एक खोटी का असेना उमेद होती तुमचे बाबा.पण आता या वयात असे झाले ते सहन करु शकल्या नाहीत रे त्या.आणि हो त्यांचे इतकेच आयुष्य होते तर त्या इतकेच जगणार होत्या.विधिलिखित रे सगळे."

हे ऐकून राहुल आणखीन रडू लागला." वेडा आहेस का तू.चल जा झोप जा.तूच असा करु लागला तुझी बहिण तिला कोण सांभाळणार.तू मोठा आहेस . समजून घे रे.चल उठ चल रात्र फार झाली आहे.झोप जा.सकाळी येतील नातेवाईक.मग तेव्हा झोपून राहणार का.चल..!!!चल..!!!" म्हणत रुपाली ने त्याला हात धरून उठवून त्याच्या खोलीत नेले. त्याच्या बेडवरील बेडशीट झटकून नीट लावून झोप आता गुड नाईट म्हणत त्याच्या पाठीवर हात फिरवला .

ती बाहेर खोलीबाहेर पडणार तोच राहूल ने तिचा हात धरला आणि म्हणाला" प्लिज मला एकटा सोडून जाऊ नकोस.तू इथेच थांब.हवे तर आपण बोलत बसू.मला काय झोप येणार नाही.प्लिज रुपाली."

" ओके तुला झोप येईपर्यंत बसते मी बोलत.तसे मला सवय आहे अभ्यास करत जागायचे"

दोघे बोलत बसले.राहूल आपल्या आईच्या आठवणी सांगू लागला.कसे लहान असताना ती त्यांच्या बरोबर खेळायची.बाहेर फिरायला न्यायची.मग शाळेचा अभ्यास परीक्षा तर.याच बरोबर शाळेची पिकनिक सगळे सगळे एकटीनेच जवाबदारीने हिम्मतीने सांभाळले.हे सांगता सांगता तो इतका गहीवरला की रुपाली चा हात हातात घेऊन रडू लागला . त्याला रडताना पाहून रुपाली ही रडू लागली . त्याच्या जवळ जाऊन त्याचे डोळे पुसू लागली. ती जेव्हा त्याचे डोळे पुसत होती तेव्हा नकळत राहूल तिच्या जवळ गेला. तिच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागला. त्याला ती रडू नकोस म्हणत होती . यामध्ये नजाणे असे काही घडले कि हे दोघे जीव कधी एकजीव झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही.त्या दोघांनी भावनेच्या आहारी जाऊन कधी एकरुप झाले हेच कळले नाही.त्याचे दुःख . त्याच्या दुःखावर तिने घातलेली मायेची फुंकर यामध्ये दोघेही असे काही एकरुप झाले की सगळी बंधने एका मिनिटात तुटून पडली.

बाहेर अचानक जोरात वादळ सुरु झाले जोरजोरात वारे वाहू लागले . जोरदार पाऊस सुरू झाला.या बाहेरच्या वादळात या दोघांचेही वादळ मिसळून गेले . जेव्हा वादळ शमले तेव्हा हे दोघे भानावर आले.

राहुलला आपण असे कसे केले हे बघून स्वतः वरच राग आला त्याचबरोबर स्वतःची लाज वाटू लागली. तो रुपालीसमोर नजर चोरून उभा राहिला. एकदम हळू आवाजात म्हणाला" आय एम व्हेरी सॉरी.रुपाली.मी हे असे का वागलो.बाहेरच्या या शैतानी वादळात माझ्या अंगी पण शैतानाने थैमान घातले . मी तुझ्या वर अन्याय केला.मला माफ कर.तू जी देशील ती शिक्षा कबूल आहे मला.रुपाली खरंच माझा असा विचार नव्हता किंवा हेतूही नव्हता.गैरसमज नको."असे म्हणत तो रडू लागला.

रुपाली स्तब्ध होऊन बसली.तिला हे काय झाले कसे झाले असे व्हायला नको होते का हा नियतीचाच खेळ आहे का ???? या विचाराने डोक्यात काहूर माजवले होते.

ती तिथून तड्डक उठली बाथरुममध्ये जाऊन शाॅवर खाली उभारली.
************************
दोन दिवस झाले रुपाली ने राहून ला फोन किंवा मेसेज केला नाही किंवा त्याचा देखील फोन अथवा मेसेज आला नाही.

आज जरा लवकरच उठून रुपाली बाहेर पडली. राहुल च्या घरी गेली.तिथे राहुल बाहेर व्हरांड्यात बसून शून्य नजरेने बाहेर पहात होता.त्याला रुपाली केव्हा आली हे कळलेच नाही.

" राहुल..!!! राहुल...!!!" रुपाली ने जोरात म्हटले.

एकदम राहूल दचकलाच.
" रु...!!!!
रु...!!!!!रुपा...!!!! रुपाली.तू केव्हा आलीस???" असे घाबरत घाबरत विचारले.

" हे काय आत्ताच आले.चल ऊठ आपणास आत्ताच्या आत्ता माझ्या आई-बाबांना भेटायला जायचे आहे . आपण लग्न करतोय.मी आई बाबांना सगळे सांगितले आहे." रुपाली ने राहुलचा हात धरून म्हटले.

राहुल ला काही समजेना कि काय आपण ऐकतो आहे.इतक्यात त्याची बहीण बाहेर आली . तिनेही हे सगळे ऐकले.तिला ही काही समजेना.कि हे काय असे अचानक होतं आहे.

मग रुपाली ने तिला सगळे सांगितले.आई पिंजऱ्यातून निघून सर्व बंधनातून मुक्त झाली पण त्या एका वादळाने या दोघांना पिंजऱ्यात कैद करून गोड लग्नरुपी बंधनात अडकवले होते कायमचेच.

समाप्त....
©© परवीन कौसर...