#जलदलेखनस्पर्धा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून जर त्यात नाव, स्थळ, प्रसंग, जीवंत अथवा मृत्यू व्यक्तींशी किंवा गोष्टींशी साम्य आढल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा.
विषय:- उपकार
शीर्षक:- बांधील भाग -३(अंतिम)
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा होती. सर्व लवकर उठून आवरत होते. क्षितिजा मात्र आरामात उठून चहा कधी तिला मिळेल ह्याची वाट पाहत होती.
पूजेला बसल्यावर खूप वेळ पूजा चालू होती. एवढं वेळ बसणे शक्य नसल्याने तिने पुजाऱ्यांना लवकर वाचायला सांगितले. आपण कोणत्या मुलीला सून म्हणून आणले म्हणून नीरवचे आई-वडील विचारात पडले कारण आता सर्व नातेवाईक क्षितिजाच्या वागणुकीबद्दल काहीना काही बोलत होते.
आता मात्र नीरवने तिला समजावण्याचे ठरवले.
"क्षितिजा, थोडे नीट वाग ना. सर्व काही ना काही बोलत आहेत. मान्य आहे इथे सर्व तुला नवीन आहे पण तुझ्यासोबत आता माझे नाव पण आहे. त्यामुळे बोलताना आणि वागताना विचार कर." त्याने एका खोलीत जावून तिला समजावले.
"हे बघ, मला काही हे सगळे आवडत नाही. माझ्या घरी एसी होता. तुझ्या इथे साधा ते पण नाहीये. पाणी फ्रीज मधले असते तुझ्याकडे ती बेसिक गोष्ट नाहीये. माझे घरचे देत होते तर तेही तुझ्या गरीब आई बाबांनी घेतले नाही. त्यात कोण मला काय बोलते ह्याचा मी विचार करत नाही. मघाशी पूजेसाठी एवढा वेळ मांडी घालून बसणे मला जमणार नव्हते म्हणून मी बोलले. मला कोणी घरात जाब विचारला नाही आणि तू काय मला विचारत आहेस रे? " रागाने ती म्हणाली.
हे सर्व त्याच्या आईसोबत आत्याने पण ऐकले आता हे सगळीकडे पसरायला वेळ लागणार नव्हता.
"अक्का, तुम्ही काही कोणाला याबद्दल बोलू नका. नाहीतर आधीच हे नाराज आहेत तर अजून भांडणाला कारण होईल." कांता नीरवच्या आत्याला समजून सांगत होती.
"वहिनी, म्हणून जरा इतर लोकांना आणि बाहेर चौकशी करून लग्न ठरवायचे असते. तुमच्या भावाने उपकार केले पण त्याची परतफेड करताना पाहा आता नाकीनऊ नाही आले म्हणजे झाले. मी तर तोंड बंद करेल पण जे सर्वांना दिसत आहे त्यांचे डोळे कसे बंद करणार?" असे म्हणून आत्या स्वयंपाकघरात निघून गेली.
कुलदैवताच्या दर्शनाला दोघे जावून आले. रीतीनुसार लग्न झाल्यानंतर माहेरी दोन दिवस राहायला ती गेली.
आता लग्न झाले तर करायचे सहन म्हणून नीरव आणि त्याचे कुटुंब शांत राहीले.
"मामा, क्षितिजा आणि आमच्या घरातील परिस्थितीत खूप तफावत आहे. ती खुलून बोलत नाही. मी तिला त्यासाठी आधी विचारले होते की लग्नासाठी स्वतःहून तयार आहेस का तर तेव्हा ती हो बोलली होती. तिचे माहेरचे उठताबसता माझ्या आई आणि बाबांचा गरीब म्हणून पाणउतारा करतात. हे मला पटत नाही. आता नातेवाईक पण माघारी काहीही बोलतात." नीरवने मनातील गोष्ट मामाला फोन करून सांगितली.
"अरे, तू कशाला लक्ष देतो. नवीन लग्न झाले आहे तिला तुम्हाला समजून घ्यावे लागेल. एवढी सुंदर मुलगी तुला बायको म्हणून लाभली ते नशीब मान. नाहीतर तुझ्या पगारात कोणत्या बापाने त्याची मुलगी तुला दिली असती सांग? माझ्यामुळे त्यांनी तुम्हाला खर्च पण करायला सांगितला नाही." मामा आवाज चढवत म्हणाला.
कोणीच ऐकत नाही म्हणून त्याने शेवटी शांत बसणे हाच त्याने पर्याय निवडला.
दोन दिवसांनी तो तिला आणायला तिच्या माहेरी गेला. त्यांनी तिला अजून राहायचे म्हणून त्याला तिच्याशी न भेटवता पुन्हा पाठवले.
"अहो, आता काय करायचे?" क्षितिजाची आई भीत म्हणाली.
"आता मला कशाला विचारते? शोध कुठे ती गेली ते. तुला त्यासाठी तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते." क्षितिजाचे वडील चिडलेले होते.
पुन्हा तो एक आठवड्यानंतर गेला तेव्हा पण त्याला काहीतरी कारण दिले. आता त्याला राग अनावर झाला होता पण मामाने शांत राहायला सांगितले.
तो बाहेर जाणार तर एक वयस्कर माणूस त्याला रस्त्यात भेटला.
"तुम्ही क्षितिजाचे धनी ना?" त्याने विचारले.
"माझेच क्षितिजा सोबत लग्न झाले आहे." त्याने सांगितले.
त्यानंतर त्याने जे सांगितले ते ऐकून त्याच्या पाया खालची जमीन सरकली.
थोड्याच वेळात काही पोलीस घेवून त्याने क्षितिजाचे घर गाठले.
तेव्हा पोलिसांनी जेरबंद करू अशी भीती दाखवल्यावर क्षितिजा घरातून कोणा मुलासोबत माहेरी आल्यावर रात्रीच दहा दिवसांपूर्वी पळून गेल्याचे त्यांनी कबूल केले.
फसवणुकीचा गुन्हा दाखल करून नीरव घरी परत आला.
"नीरव, मी तुम्हाला तेच सांगितले होते की कोणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नसतो. उपकार केले म्हणून आजन्म आपण त्या व्यक्तीशी बांधील राहत नाही. आता हे झाले म्हणून नाही म्हणत पण फक्त पैसा आणि सौंदर्य पाहून लग्न करायचे नसते बाळा. तुझ्यासाठी मला वाईट वाटते पण आता ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुला शोधावा लागणार."
नीरवचे बाबा खिन्न मनाने म्हणाले.
नीरवचे बाबा खिन्न मनाने म्हणाले.
त्याच्या आईने तर हे सर्व ऐकून आणि आपल्या मुलाची झालेली वाताहत बघून आजारी पडून अंथरूण धरले.
मामाने स्वत:च्या फायद्यासाठी एका मुलीचे लग्न हे आपल्या भाच्याशी लावले होते. त्या दिवसापासून मामाने गाव सोडले आणि दुसरीकडे राहायला गेला. जसे मुलाची पडताळणी करतात तशी मुलीची पडताळणी करणे किती महत्त्वाचे असते हे नंतर नीरव सर्वांना स्वानुभवातून सांगत होता.
जबरदस्तीचे नाते संबंध हे जास्त काळ तग धरत नाही.तसेच चौकशी करून निर्णय घेणे कधीही चांगले असते. उपकाराची परतफेड करताना नीट विचार करूनच योग्य वेळी नकार देता आला पाहिजे.
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा आवडल्यास लाईक करून तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा