Login

बंधनात्यांचे (भाग एक)

Bandhnatyanche
आयुष आम्ही मामाच्या गावाला निघालो...
चल बाय बाय...
पिंट्या... आयुषला बाय करून गाडीत बसतो.
पिंट्याचे बोलणे ऐकल्यानंतर आयुष धावतच घरी जातो. घरी गेल्यानंतर आईला बोलतो आपणही मामाच्या गावाला जाऊया  ना?
माझे सगळे मित्र उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जातात पण तुम्ही मला कधीच गावी घेऊन जात नाही.
आयुषने मामाच्या गावाला जाण्याचा विषय काढल्यानंतर, माधवी विषय बदलण्याचा प्रयत्न करते ....
आयुषला बोलते तुझ्या बाबांना सुट्टी लागली की आपण गावी जाऊया?
आयुष अजिबात नाही! "आई प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टी तू अशीच बोलते आणि गावाला घेऊनच जात नाही".
दिवसभर आयुषचे बोलणे ऐकून माधवी चिडते आणि त्याला गप्प बसायला सांगते.
राहुल ऑफिस वरून घरी येतो .
आयुष राहुल जवळ येतो व बोलतो" बाबा तुम्ही तरी आईला सांगा ना" मलाही गावाला जायचं आहे.
राहुल बोलतो चालेल पण आता तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप.
राहुल आयुषची समजूत काढतो म्हणून तो त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो.
राहुल माधवीला बोलतो "जातेस का तू गावाला".
माधवी "माझं गावी न जाण्यामागचं कारण तुला चांगलाच माहिती आहे" .
राहुल ' माझी आई हे जग सोडून गेली आणि पुन्हा आपण दोघेही गावाला गेलोच नाही'.
"आपण दोघेही गावाला गेलो नाही कारण अजूनही माझे आई बाबा आपल्या सोबत बोलत नाहीत, कारण आपण दोघांनी पळून जाऊन लग्न केलं म्हणून ते माझ्यावर रागावलेले आहेत" .
आज आपल्या लग्नाला बारा वर्षे झाली पण अजून माझ्या आई बाबांनी मला एकदाही फोन केला नाही की माझी चौकशी सुद्धा केली नाही तिथे गेल्यानंतर पुन्हा मी त्यांच्या नजरेला नजर कशी देऊ , माधवी बोलते
'राहुल बोलतो आपण गाव सोडून तरी किती दिवस शहरात राहणार. कधीतरी आपल्यालाही गावी जावस वाटणार ना , ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो त्या गावाबद्दल मनामध्ये आपुलकी असणारच ना .
आई गेल्यानंतर आपण आपल्या गावाला गेलोच नाही .
आता आयुष बोलतोय तर जाऊया का गावाला ?
ठीक आहे . 'तू म्हणतोयस म्हणून जाऊया'.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर.....
आयुष ..." बाबा तुम्ही बोलला होता , आपण गावी जाणार आहोत म्हणून"?
राहुल होय रे आयुष आपण गावी जाणार आहोत.
राहुलच्या बोलण्याने आयुषला खूप आनंद होतो.
तो पूर्ण घरभर उड्या मारत बोलतो आम्ही गावाला जाणार, आम्ही गावाला जाणार असे बोलत उड्या मारत असतो.
आयुष त्याच्या सगळ्या मित्रांना सांगतो मी सुद्धा आता आमच्या गावी जाणार आहे , मी सुद्धा तुमच्या सारखी धमाल मस्ती करणार आहे.
माधवी कपड्यांची बॅग पॅक करते. दुसऱ्या दिवशी सकाळीच तिघेही गाडी घेऊन गावाला जाण्यासाठी निघतात. एकीकडे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील असतो .तर दुसरीकडे माधवीचे आई-वडील आपल्याला माफ करतील का याची चिंता देखील.