"हळूहळू गाडी जशी गावच्या दिशेने जात असते तस-तशा माधवी आणि राहुलच्या मनामध्ये लहानपणीच्या सर्व आठवणी जाग्या होतात" .
गावच्या वेशीवर बांधलेले जोतिबाचे मंदिर , मारुती काकांचे पडलेले घर, आणि शेती लागत बांधलेली नवनवीन घरे, नदीवरील पडलेला जुना पूल, आणि गावाबाहेरचा पडका वाडा.... राहुल आणि माधवी दोघेही जुन्या आठवणींमध्ये हरवून जातात. तेवढ्यात आरुष बोलतो आई-बाबा तुम्ही लहानपणी कुठे खेळायचा? तुम्ही दोघे एकाच गावात राहत होता ना?
राहुल आणि माधवी आयुषला त्यांच्या लहानपणीच्या सर्व आठवणी सांगत असतात.
काहीच वेळात ते घरी येऊन पोहोचतात .खूप वर्ष घर बंद असल्यामुळे घरामध्ये झालेली धूळ साफ करण्यासाठी माधवीचा खूप वेळ जातो. तर राहुल लाईटचे कनेक्शन जोडून झाल्यानंतर आरुषला घेऊन शेतामध्ये फेरफटका मारण्यासाठी जातो.
आयुषला गावी गेल्यामुळे खूप छान वाटत असते. लहानपणापासून त्याने गाव कधीच बघितलेले नव्हते. गावाकडची माणसे , हिरवीगार झाडे , शेतामध्ये डोलणारी पिके हे बघून त्याला खूप आनंद होतो.
इकडे घरात माधवी साफसफाई करत असते...
गावातील येणारी जाणारी माणसे घराकडे डोकावून बघू लागतात .घरात लाईट लागली म्हणजे माधवी आली वाटत.
गावात हळूहळू चर्चा सुरू होते," अहो पाटलांची मुलगी माधवी आली वाटतं".
दादासाहेब पाटील व शारदाताई यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचते.
शारदाताई व दादासाहेब म्हणजेच माधवीचे आई वडील..
माधवी आल्याचे समजल्यानंतर दोघेही भारावून जातात... पण तरीही दादासाहेब मनात झालेला आनंद चेहऱ्यावर दाखवत नाहीत व ते शारदाला बोलतात हे बघा माधवी आली असली तरीही तिला भेटण्याचा प्रयत्न करू नका.....
अहो , पण... आपली लेक इतक्या वर्षांनी गावात आली तिला भेटायचं नाही म्हणजे......
हे माधवीने पळून जाऊन लग्न करण्याआधी विचार करायला हवा होता . आता त्यांना जाऊन भेटण्याची काही गरज नाही.
खरंतर दादासाहेबांनाही माधवीला भेटण्याची इच्छा होती, पण त्यांच्या हट्टी स्वभावामुळे ते घरातील कोणालाही माधवीला भेटण्यासाठी परवानगी देत नाहीत.
एक दिवस माधवी गावातील विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात दर्शनासाठी जात असते त्यावेळी तिला लांबून आई घराच्या गॅलरीमध्ये उभी असलेली दिसते. तिला बघून माधवीच्या डोळ्यांमध्ये पाणी येते तिकडे आईच्या देखील डोळ्यात पाणी येते दोघीही एकमेकींच्या कडे बघून हात वरती करतात पण दादासाहेब बघतील म्हणून शारदा मात्र हात लगेच खाली करते.
माधवी सोबत मुलाला बघून शारदाला खूप आनंद होतो.
आपल्या नातवाला जवळ घ्यावे. त्याचे लाड करावे असे शारदाला वाटू लागते पण दादासाहेबांच्या हट्टापुढे तिचे काही चालत नाही.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा