घरी आरुषला बघून बाजूची लहान मुले आरूष सोबत खेळण्यासाठी घरी येतात.
आरुष त्यांच्यासोबत लगोरी , विटी दांडू, क्रिकेट असे खेळ खेळत. एक दिवस क्रिकेट खेळत असताना बॉल अचानक रस्त्यावरती जातो तो घेण्यासाठी आरुष धावत रस्त्यावर जातो त्याच रस्त्यावर वेगाने येणारी कार आरुषला जोरात धडक देते.
आरुष दूर फेकला जातो त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागते तसे गावातील लोक आरुषला घेऊन हॉस्पिटलला जातात.
आरुष चा एक्सीडेंट झालेला ऐकून राहुल आणि माधवी दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात.
आरुषचा एक्सीडेंट झालेली बातमी हळूहळू पूर्ण गावात पसरते दादासाहेब आणि शारदाला देखील ही बातमी समजते. आता मात्र दोघांनाही आरुषला भेटण्याची इच्छा होते.
पण तरी दादासाहेबांचा अहंकार त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ देत नव्हता.
दादासाहेब गावातील एका माणसाला विचारतात काय रे मोहन कशी आहे त्या मुलाची तब्येत आता.
मोहन बोलतो तब्येत बरी नाय साहेब त्याला रक्ताची गरज आहे.
दादासाहेब कोणता रक्तगट पाहिजे.
ए पॉझिटिव
दादासाहेब बोलतात ए पॉझिटिव्ह तर माझाच रक्तगट आहे. मोहन बोलतो दादासाहेब त्या मुलाचा जीव वाचवायचा असेल तर त्याला रक्ताची खूप गरज आहे.
शारदा बोलते अहो तुम्ही आता तुमचा अहंकार बाजूला ठेवा आता आपण आपल्या नातवाला वाचवलं पाहिजे.
शारदा चे बोलणे दादासाहेबांना देखील पटते व दोघेही हॉस्पिटल ला जाण्यासाठी निघतात.
दादासाहेबांना व शारदाला बघून माधवीला रडू कोसळते ती धावतच जाऊन आईच्या गळ्यात पडून रडू लागते.
शारदा बोलते बाळा नको रडू होईल आरुष बरा हे बघ आता तेही आलेत.
दादा तुम्ही आलात म्हणजे मला माफ केलं तुम्ही.
दादासाहेब मी माझ्या नातवासाठी इथे आलो आहे तो लवकरात लवकर बरा झाला पाहिजे .
दादासाहेब डॉक्टरांना बोलतात ....डॉक्टर तुम्ही पटकन माझे रक्त घ्या माझा रक्तगट ए पॉसिटीवच आहे.
आरुषला रक्ताचा पुरवठा झाल्यानंतर आठ ते नऊ तासांनी आरुष शुद्धीवर येतो.
आई या आजोबांना तर मी अगोदर भेटलेलो आहे
त्यादिवशी यांनी मला बागेतून खूप आंबे काढून दिले.
आरुषचे बोलणे ऐकल्यानंतर दादासाहेब नजर चोरून उगीचच इकडे तिकडे बघण्याचा आव आणतात.
हळूहळू आरुष बरा होतो.
आरुष ला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळतो त्यावेळी तिथे शारदा दादासाहेब राहूल व माधवी सगळेच आलेले असतात . माधवी बोलते चल आई मी जाते माझ्या घरी. माधवीचे बोलणे ऐकल्यानंतर दादासाहेब तिला बोलतात तू तुझ्या घरी नंतर जा आधी तू आरुषला घेऊन आपल्या घरी ये आणि त्याला पूर्णपणे बरे वाटल्यानंतरच तू तुझ्या घरी जा.
दादासाहेबांचे बोलणे ऐकून माधवी राहुल यांना खूप आनंद होतो.
आणि आरुषही हसून बोलतो आई म्हणजे मी आत्ता मामाच्या गावाला जाणार.
दादासाहेब हो हो माझं घर म्हणजेच तुझ्या मामाचं घर तुला मामा नसला तरी काय झालं आजोबांचं घर हे तुझ्या मामाचंच घर समज.
सगळे आनंदाने घरी जातात.
समाप्त.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा