अष्टपैलू लेखक महासंग्राम
फेरी तिसरी (रहस्य कथा)
बंगला… एक अव्यक्त रहस्य
भाग ३
-©®शुभांगी मस्के…
दोघेही हॉस्पिटलमधून निघाले. गावाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. गावाला पोहचायला जवळ जवळ चार तास लागणार होते.
कारमध्ये एका जागी बसून, सृष्टीचा पाय अजूनच आखडला होता. अखेर कार गावात घरासमोर येऊन थांबली. स्वत:चा तोल सांभाळत सांभाळत, लंगडत लंगडत सृष्टी घरात यायला लागली.
राघवने सामानाच्या बॅगा कार मधून काढल्या आणि पाठोपाठ तो ही आला.
"काय गं, काय झालं पायाला?अशी लंगडत का बरं आहेस?"
"खूप लागलं का? पट्टी बांधली आहेस ते"
"जखम मोठी आहे का?"
"कधी लागलं?"
" कळवलं नाही, फोन केला होता, सांगितलं नाहीस"
पट्टी बांधलेल्या बोटाकडे बघत, आईच्या म्हणजे सृष्टीच्या सासूबाईंची एकावर एक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली.
"हो हो आई! एका दमात किती ते प्रश्न?"," दम घेशिल की नाही".. राघव बोलला.
"अरे प्रश्न नाही तर काय? तुम्ही पोरं आमच्या जीवाला नुसता घोर लावता".. आईने डोळ्यांना पदर लावला.
"आई गं.. सुखरूप आहोत ना, आपण सगळे, ते महत्वाचं"...
" बघ सिंगल हड्डी गेलो तसा आलोय.
"फिर बताओ काहे, को.........रोना!!!
"से बाय टू कोरोना..
"से बाय टू कोरोना..
राघव आईची समजूत काढत बोलला.
"अहो आई, आज घर बघायला गेलेलो"
"तिथे चालताना पायरीवर तनगडली, ठेच लागली पायला"... सृष्टी बोलली.
"बरोबर लक्ष देऊन चालायचं ना गं!"..
"कुठे लक्ष होत तुझं?"
"बघ... गेल्या गेल्या ठेच लागली".. "आणि दुखापत करून घेतलीस".
"आता, पाणी आणशील लेकरांना प्यायला, की त्यांना प्रश्न विचारून विचारून त्यांची तहान भूक भागवशिल", माई आतून बाहेर येत बोलल्या.
माईने दहाची दहा बोटे कानशिलावर नेऊन कडाकडा मोडले आणि दोघांची दृष्ट काढली.
"हे बघा ना, माई.. पोरीने दुखापत करून घेतलीय पायाला",
"बघून चालायचं ना!" पायावरच्या पट्टीकडे बघत आईने काळजी व्यक्त केली. स्वयंपाक घरातून दोन ग्लास पाणी आणून दोघांना ही दिलं.
"घर बघायला गेली!" आणि, "गेल्या गेल्या, ठेच लागली पोरीला"...
"काही सुचवायचं तर नसेल ना!", आईने मनातली शंका बोलून दाखवली?
"नाही म्हणजे, तुमच्यासारखी जुनी जाणती लोक बोलून गेलीत"..
"पुढच्यास ठेच मागचा शहाणा!" तसं काही...
"जमलं तर दुसरं बघा घरं, उगाच कशाला विषाची परीक्षा?" आईने मनातली शंका बोलून दाखवली.
"ए बाई, काही भलतसलतं नको त्यांच्या डोक्यात भरवूस तू" हल्ली,भलत्या दिशेने धावत तुझा डोकं".
"डॉक्टर आहेत आपली लेकरं, तू त्याच लेकरांची आई आहेस, विसरु नकोस"..आईच्या बोलण्यावर आप्पांनी निर्भिडपणे मत व्यक्त केलं.
"आईचं मन हो आप्पा, शारीरिक बरोबर मानसिक दुर्बलता जास्त मनाला पोखरते अनुभवलयं ना आपण, मागच्या काही महिन्यात". काळजी वाटते लेकरांची. आई स्पष्टच बोलली.
"नको त्या जुन्या आठवणी! विसरु बघतायत सगळे तर विसरु दे सर्वांना, उगाच तेच तेच विषय चघळत बसण्यात अर्थ नाही"... आप्पांनी दटावल.
"नाही हो आप्पा", " लेकरं एकटी दुकटी राहणार आहेत". नवी जागा, नवं घर, नवी माणसं, वास्तू कशी? काय? काळजी वाटतेच ना हो.
"गेल्या गेल्या बघा कशी जोरात ठेच लागली पोरीला" .. "घरात पाय ठेवल्या ठेवल्या, दुखापत झालीच ना", आई कळकळीने बोलत होती.
"हा केवळ योगयोग नसू शकतो का?" की प्रत्येक गोष्टींचे उखारेपाखारे काढायलाच पाहिजे. बाबा बोलले, बाहेरून येताना बाबांनी, सृष्टीला आवडतो म्हणून छान रानमेवा आणला होता.
"तुला वेळ काळ काही कळत नाही. कुठल्या कुठे घेऊन जातेस विषयाला".. "एवढ्या महिन्यानंतर, आलीत लेकरं आणि तुझं झालं आपलं सुरु".. बाबांनी आईकडे रागातच पाहिलं.
"नाही हो बाबा! आईची काळजी"... "समजू शकतो आम्ही".. सृष्टीने आईंची बाजू घेतली.
"आजवर हॉस्टेलच्या सेफकोट मध्ये राहायचो आणि आता पहिल्यांदाच, घर घेतोय.. आईला काळजी वाटणारच ना!"
"काळजीच्या मागे आईचं प्रेमच, समजूच शकतो", सृष्टीने बाजू घेतली आणि आईंचे डोळे पाणावले.
"सगळं ठीक असू दे रे बाबा देवा"... बोलताना आईने दोन्ही हात जोडले आणि नमस्कार केला...
"विश्वास आहे ना तुझा.. मग दे त्याच्यावर टाकून"... "काही सुद्धा होणार नाही लेकरांना".
"तोच भगवंत आहे आपल्या लेकरांच्या पाठीशी उभा"..
तेवढ्यात, राघवच्या मोबाईलवर एक कॉल आला.. अननोन नंबरवरून कॉल आला होता.
" ये डॉक्टर!" आणि फोन कट झाला. थोडा धमकावल्याचा सुर होता.
राघवने एक नंबर डायल केला.. "ऐक, मला मिळाले सगळे रिपोर्ट्स, कलेक्ट केले मी.. आणि हो, सगळेच नाही पण बरेच रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत".
कर चौकशी तू?". एवढं बोलून राघवने फोन ठेवला. घरात येऊन पुन्हा गप्पांमध्ये गुंतला..
"अगं आई.. अमेरिकेला राहतो घराचा मालक"....
"छान आहे घर, आवडेल तुम्हा सगळ्यांना"...
"चला तुम्ही पण! बघून घ्या वाटलं तर".. राघव बोलला.
नाही रे बाबा, येऊ कधीतरी, आता पाहिले तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढा. खूप दिवस काढलेत तुम्ही.. आई मध्येच बोलली.
"काय ते तुमचं स्पेशलयझेशन, काय ते तुमचं न संपणार शिक्षण,करिअरच्या मागे धावताना, काय तो तुमच्या वाट्याला आलेला विरह".. ते काय कमी होत तर, कोरोनाने भर घातली ती वेगळीच..
"आता नको रे बाबा.. खऱ्या अर्थानं संसार सुर होतोय तुमचा.. सुखाने संसार करा आता".. माई बोलल्या.
"आणि राघव, आता उगा भानगडी नकोत बर.. डॉक्टर आहेस म्हणून काय? माणूसच आहेस ना! माई काळजीच्या सुरात बोलल्या.
ये बाई, "त्या तूझ्या नवऱ्याला सांग.. उगा काही उपद्वाप नको करू म्हणावं आता!". लाख भानगडी डोक्यामागे लावून घेतो". काही तरी, आठवून माईंच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या..
"ये माई"... राघवने माईंना दोन्ही हातांनी कवटाळून घेतलं.
"मला जाऊ द्या हो घरी, आमची ही एकटी आहे घरी!!" काकुळतीने विनंती करणाऱ्या आजोबांचे ते शब्द.. आणि अस्वस्थ होणारा राघव…
आमच्या आप्पांच्या वयाचे ते आजोबा!! कसलंस गिल्ट घेऊन जगतोय आजवर… कसलं ते कळायला मार्ग नाही.. पण!! दडपण मात्र आहे… जे मला अस्वस्थ करत नेहमी. राघव विचारात गुंतला.
काय झालं रे? कसला विचार करतोयस एव्हढा.. माईंनी केसात हात फिरवत विचारलं.
"डॉक्टर पण माणूसच असतो ना ग माई, प्रत्येक गोष्ट माणसाच्या हाती नसतेच"," आपले शंभर टक्के देणं आपल्या हाती, बाकी भगवंताची कृपा!" पण हे का समजून घेत नाही आपला समाज"..
काही गोष्टी असतात मात्र आपल्या हातात.. भ्रष्ट समाजाचा नायनाट व्हायलाच हवाय. त्यातच समज हित आहे, आणि ती प्रत्येकाची जबाबदारी आहे अस मी मानतो. राघव बोलला.
"आजही... कधी कधी तेच ते डोळ्यासमोर येतं. आणि मन विचलित होत. बोलताना, सृष्टी भाऊक झाली"..."
म्हणूनच म्हणते, "आता पुन्हा तुमच्यात कुठलाच अडसर नको"..."अगदी आमचा ही नको?" माईंनी सृष्टीचा हात हातात घेतला.
"सुखी राहा!" म्हणत आशीर्वाद दिला.
"काही काय माई, अडसर वगैरे!" सृष्टी बोलली.
"गंमत गं", माई गंमतीतच बोलता बोलता हसल्या..
"खरं सांगू का बाळा",
"आयुष्य गेलंय या घरात आमचं, श्वास अडकलाय या घरात".
"अखेरचा श्वास याच घरात यावा हीच शेवटची इच्छा".
"बोलवण येईल वरच्याच", " तेव्हा जायचं त्याच्या मागे मागे, दूरच्या प्रवासाला निघून"..
"त्यापेक्षा दुसरा वेगळा प्रवास झेपत नाही आता". माई बोलत होत्या.
"ओह!! मेरी जोहरो जबी.. तुझे मालूम नही तू अभी तक है हसी, और मैं जवा... तुझ पे कुरबान मेरी जान मेरी जान"...माईंना उभ करून, राघवने माईंना.. गोल गोल फिरवलं.
माई : "हेट मेल्या!"... "जोहर जबी ... तू अभी तक है हसी" ...म्हणे…. "आणि दात काढून हसतोयस का रे, लबाडा!"
"हसी तो फसी", म्हणत राघवने दोन्ही हातात माईंना कवटाळून घेतलं.
कुठलं वळण घेईल कथा.. वाचत राहा कथेचे पुढचे भाग. कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट नक्की करा.. तुमच्या प्रतिक्रिया लिखाणात हुरूप वाढवतात. धन्यवाद…
-©®शुभांगी मस्के…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा