बाप नावाचं गारुड

ईरा : लेखणीचे मंदिर
बाप नावाचं गारुड


बाप म्हटलंकी आठवतो
तुमचा दणकट देह
पांढ-या अंगरख्यात दिसतो
प्रेमाचा तुडुंब डोह

पायजम्याची घडी
शोभे विठूरायासारखी
प्रेमळ नजर तुमची
नित्य असे रत्नपारखी

कष्टांने तुमच्या पिकं
आनंदाने डोले
धनधान्यांची राशीने
बहरले शेतातिल खळे

सहवासाने तुमच्या सारे
कुटुंब सुखावते
संस्काराने तुमच्या
आमचे आयुष्य घडते

मौनातच तुमच्या
समजत होते इशारे
विचांरांची तुमच्या
आदर करीती सारे

माणुसकीचा तुमचा
महिमा अपार
दानधर्माचा तुमच्या मनाचा
मोठेपणा फार

बाप म्हणून तुमचा
अभिमान वाटतो
तुमच्या रुपाने लेखणीतून
सा-या जगाला भेटतो

©®नामदेवपाटील