©साक्षी माजगांवकर.
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)
*******************************************
आज सगळीकडे जरा वेगळंच वातावरण होतं....कारण आपला लाडका बाप्पा येणार आहे ना..! म्हणूनच सगळीकडे तयारी सुरू होती....
कोणी साफसफाई करत होतं, तर कोणी डेकोरेशन करत होतं.....
अर्जुनच्या घरीसुद्धा बाप्पा येणार म्हणून अर्जुन खुश होता......अर्जुन हुशार आणि चुणचुणीत मुलगा... घरात आणि सोसायटीत सगळ्यांच्या लाडक्या अशा दहा वर्षांच्या अर्जुनने बाप्पाच्या आगमनाची छान तयारी केली....
एवढंच नाही तर त्याच्या आई-बाबांनी म्हणजेच रेवती आणि सुभाष नी बाप्पाची मूर्तीसुद्धा घरात बनवली होती.... ती सुद्धा कागदाच्या लगद्याची....! हो, कागदाच्या लगद्याचीच...!...
यात सुद्धा अर्जुनने आई-बाबांना बारीक कागद कापून द्यायला मदत केली होती....अर्जुनला लहानपणीपासूनच नवीन काहीतरी करण्यात रस होता....
त्याच्या आई-बाबांनी सुद्धा त्याला कधी काही नवीन करण्यापासून अडवलं नाही..... आज तर अर्जुनने कमालच केली, घरातच youtube वर बघून आई-बाबांच्या मदतीने कागदाच्या फुलांच्या माळा तयार केल्या....
रेवतीला सुद्धा या सगळ्याची आवड होती.... म्हणून तिने बाप्पाच्या डोक्यावर नीट राहील अशी मोत्याची छत्री स्वतःच्या हाताने विणली, मोत्याचे मोदक आणि पानं, मोत्याची छानशी रांगोळी सगळं काही तिने स्वतःच्या हातांनी विणलं....
अखेर बाप्पाचं आगमन झालं..... बाप्पाच्या आजूबाजूने अर्जुनने केलेल्या कागदाच्या फुलांच्या माळा सोडल्या आणि रेवतीने केलेल्या मोत्याच्या वस्तू नीट व्यवस्थित मांडल्या.... त्यामुळे बाप्पाचं रूप अजूनच खुलून दिसत होतं....
सुभाषने स्वतः सोवळं नेसून बाप्पाची पूजा केली....आणि रीतसर आचमन करून आणि अक्षता टाकून बाप्पाची स्थापना सुभाषने केली.....
रेवतीने मोत्याचा एक मोदक बाप्पाच्या हातावर ठेवला आणि मोत्याची रांगोळी मांडताना त्या रांगोळीच्या मध्ये समई ठेवली.....
आता बाप्पा आला म्हणून अर्जुन फारच खुश होता...
रेवतीने स्वतःच्या हातांनी उकडीचे मोदक बनवले....
रेवतीने स्वतःच्या हातांनी उकडीचे मोदक बनवले....
तर इथे बाप्पा सगळ्या भक्तांच्या घरची तयारी बघायला निघाले..... बरोबर मूषकराज होतेच....
बाप्पा सगळ्यांच्या घरी जाऊन आला.... आता मात्र बाप्पा आला अर्जुनच्या घरी.... बाप्पाबरोबर मूषकराज इथेही आलेच....
आणि बाप्पा मूषकाशी बोलू लागला,"अरे मूषक...!किती प्रसन्न वाटतंय ना इथे..!
आणि बाप्पा मूषकाशी बोलू लागला,"अरे मूषक...!किती प्रसन्न वाटतंय ना इथे..!
अर्जुनने माझ्या आगमनासाठी किती छान तयारी केली आहे....माझी मूर्ती सुद्धा अगदी सुबक नसली तरी रेवती आणि सुभाष ने मनोभावे तयार केली आहे....
मूर्ती घेऊन घरात प्रवेश करताना पायावर पाणी घालून माझं औक्षण करून रेवतीने मला घरात घेतलं....
हरितालिकेचे व्रत केले.... पूजा करून पंचामृताचा आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवून हरितालिकेची कहाणी वाचली....मग दुसऱ्या दिवशी माझ्या आगमनाची तयारी सुरू झाली....
रेवतीने हरितालिकेचे उद्यापन केले आणि मग सुभाष ने माझी स्थापना केली.....
माझी पूजा करताना सुद्धा त्याने कुंकू कसंही न टाकता माझ्या पायाशी वाहिलं.... समोर पाच फळं, रुपया आणि सुपारी विड्याच्या पानांवर ठेवली....हातात छान मोत्याचा मोदक ठेवला....अर्जुनने केलेल्या फुलांच्या माळा बाजूने सोडल्या....पूजा झाल्यावर दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला.....
आणि दुपारी रेवतीने केलेल्या उकडीचे मोदक, वरण-भाताची मुद त्यावर छान घरी केलेल्या तुपाची धार, अहाहा...! छान आणि चविष्ट असा नैवेद्य अर्पण केला....त्यावर न विसरता तुळशीपत्र ठेवलं.....
मग एक-दोन दिवसांत आगमन झालं माझ्या बहिणींचं म्हणजेच गौरींचं.... ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांचं....
रेवतीने त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा मोत्याची पावलं तयार केली होती....गौरीचे आगमन करण्याआधी रेवतीने छान गौरींच्या स्टँडला साडी नेसवली, मंगळसूत्र, ठुशी, कंबरपट्टा, तन्मणी, मुखवट्याला मुकुट, नथ सर्वकाही न विसरता घातलं....
गौरी आगमनाच्या वेळी गौरींना घरात आणताना रीतसर \"गौर आली गौर आली कशाच्या पायी, सोन्यारुप्याच्या पायी\" असं म्हणत पुढे अक्षता टाकत गौरींच्या मुखवट्याने माप ओलांडून गौरी घरात आणल्या....
नंतर संपूर्ण घर गौरींना दाखवलं, जसे दाग-दागिन्यांचा लॉकर, घरातील अन्न-धान्य ठेवलेली जागा..... आणि मग दोन्ही गौरींचे मुखवटे त्या स्टँड ला लावून, एकीची गव्हानी आणि दुसरीची तांदळाने ओटी भरली....
विसर्जनासाठी खड्याच्या गौरी ठेवल्या होत्या.... त्या खड्याच्या गौरी ज्या कलशात ठेवल्या आहेत त्या कलशालापण मोत्याचे डेकोरेशन केले....
गौरी ज्या दिवशी जेवतात त्या दिवशी रेवतीने छान पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, घोसावळ्याची भजी, अळू वडी, पापड, कुरडई, असा सगळा नैवेद्य केला....नैवेद्याच्या ताटाभोवती सुंदर अशी मोत्याची महिरप ठेवली....
संध्याकाळी हळदीकुंकू केलं....हळदीकुंकवाला काकडी आणि साखर-खोबऱ्याचा प्रसाद ठेवला....
रेवती आणि सुभाषने सगळं काही साग्रसंगीत पार पाडलं...."बाप्पा हे सगळं मूषकाला सांगताना आनंदी होता.....
आता मात्र दिवस उजाडला तो विसर्जनाचा....
अर्जुनचा चेहेरा थोडा उतरला होता, पण रेवती आणि सुभाष ने त्याला समजावलं,"बाप्पा जेव्हा घरी जाईल तेव्हाच तर तो पुढच्या वर्षी लवकर येईल"....
अर्जुनचा चेहेरा थोडा उतरला होता, पण रेवती आणि सुभाष ने त्याला समजावलं,"बाप्पा जेव्हा घरी जाईल तेव्हाच तर तो पुढच्या वर्षी लवकर येईल"....
असं सांगितल्यावर अर्जुन खुश झाला....त्यांनी बाप्पाचं दारातच विसर्जन केलं.....
विसर्जन करताना छोटासा अर्जुन हिरमुसला आणि आईला म्हणाला," आई ह्या वर्षी कोरोनामुळे आपल्याकडे खूप कमी लोकं बाप्पाच्या दर्शनाला आले,त्या काकू गौरी दिवशी जेवायला येतात त्यापण नाही आल्या..... आपण किती छान तयारी केली होती.... कधी जाईल हा कोरोना?..आणि गेलाच नाही तर..!"
त्यावर रेवतीने अर्जुनला समजावलं,"अरे बाळा, असं नाहीये....बाप्पा सगळं नीट करेल....तू बाप्पाला सांग सगळं नीट होऊ देत बाप्पा ऐकेल तुझं...!"
तेव्हा मूषक बाप्पाला म्हणाला,"बघा प्रभू, तुमचे भक्त सुद्धा आता ह्या कोरोनाला कंटाळले आहेत....आता तुम्हीच काहीतरी करा..."
"माझ्या सर्व भक्तांच्या प्रार्थनेला मी पावेन, पण तेव्हाच जेव्हा ते कोरोनाशी लढण्यासाठी सरकारनी सांगितलेले नियम पाळतील....जसे मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणे....
आणि महत्वाचं म्हणजे सर्वजण जेव्हा कोरोनविरोधी लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी तयार केलेली सुरक्षित अशी लस घेतील तेव्हाच....."बाप्पा मूषकला म्हणाला....
"म्हणजे प्रभू तुम्ही तुमच्या भक्तांची परीक्षा घेताय?"मूषकने बाप्पाला विचारलं....
"तसं समज हवं तर..! पण मी माझ्या भक्तांना कधीच एकटं सोडणार नाही..."बाप्पा हसत म्हणाला....
तोवर रेवती आणि सुभाषने मिळून बाप्पाचं विसर्जन केलं..."बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये...आणि हा कोरोना लवकर नष्ट कर.." असं अर्जुन म्हणला....
तेव्हा बाप्पाने तथास्तु म्हणून त्या तिघांनाही आशीर्वाद दिला आणि घरी जायला निघाला.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा