चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
बापरे..!दुसरी ही मुलगीच?? भाग दोन
मागील भागात आपण पाहिलं कि विनयला मुलगी झाली म्हणून त्याला हिणवतात आता पाहूया पुढे,
आता दोन्ही मुलं दोन वर्षांची झाली होती. घरच्यांनी पुन्हा आपला धोशा सुरू केला.
“अरे विनय, आता तरी दुसऱ्या बाळाच तोंड दाखव. यावेळी मुलगा झालाच पाहिजे. नाहीतर खरंच घराचा मान कमी होईल.”
विनय गप्प राहिला पण साक्षी ठामपणे म्हणाली,
“मुलगा-मुलगी होणे हे आपल्या हातात नाही. बाळ देव देतो ते प्रेमाने स्वीकारायचं. आम्हाला दोघंही सारखीच प्रिय असतील.”
“मुलगा-मुलगी होणे हे आपल्या हातात नाही. बाळ देव देतो ते प्रेमाने स्वीकारायचं. आम्हाला दोघंही सारखीच प्रिय असतील.”
काही महिन्यांनी पुन्हा आनंदाची बातमी आली.
साक्षीला दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. घरच्यांची प्रचंड अपेक्षा होती,
साक्षीला दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. घरच्यांची प्रचंड अपेक्षा होती,
“यावेळी मुलगा झालाच पाहिजे. नाहीतर खरंच वंश थांबेल.”
साक्षी हसत म्हणायची,
“देवाने जे दिलं ते मान्य करायचं. बाळ मुलगा असो वा मुलगी, मला फरक पडत नाही. "
“देवाने जे दिलं ते मान्य करायचं. बाळ मुलगा असो वा मुलगी, मला फरक पडत नाही. "
विनय वरून तरी शांत होता, पण आतून त्याला दबाव जाणवायचा.मित्र-नातेवाईक सगळे त्याला बोलायचे.
“विनय, लेका यावेळी तरी मुलगा झाला पाहिजे. नाहीतर लोकं कायं म्हणतील? तुझी वंशवेल इथेच खुंटेल. "
शेवटी दिवस आला. साक्षीच्या कुशीत पुन्हा गोंडस परी सिया आली. घरातलं वातावरण बिघडलं. जणू कसलं सावटचं पसरल आहे.बघायला येणारे हळूच कुजबुज करायचे,
“दुसरी पण मुलगीच झाली...”कोणीतरी हळहळ व्यक्त करायचे,
“आता विनयचं काही खरं नाही. दोन मुली म्हणजे फक्त खर्चाचं ओझं. ह्यांना म्हातारपणी कोण बघेल आता????”
साक्षी मात्र डोळ्यांत पाणी घेऊन आपल्या दोन्ही मुलींना कवटाळून म्हणायची,
“या माझ्या लेकी लक्ष्मी आहेत. लोकं कायं म्हणतात याची मला पर्वा नाही.”
दुसरीकडे, रितालाही त्याच वेळी बाळ झालं.
या वेळेस पुन्हा मुलगा झाला तिला. आता गावातले सगळेच म्हणायचे,
या वेळेस पुन्हा मुलगा झाला तिला. आता गावातले सगळेच म्हणायचे,
“परेश भाग्यवान आहे हो..., त्याला दोन मुलगे झाले. वारस मिळाले घराला. "
ते ऐकून परेशला गर्व जास्तच चढला.
तो मुद्दाम विनयला चिडवत म्हणाला,
“कायं रे विनय, दुसरी पण मुलगीच झाली तुला?? तुझं बाप होणं म्हणजे नुसतं खर्चिक. माझं बघ, दोन मुलगे झाले मला. मी भाग्यवान आहे. "
विनय काही न बोलता तिथून निघून गेला. पण तो जास्तच दुःखी झाला होता, आतून तो फारच खचला होता. घरी गेल्यावर साक्षी जवळ येऊन तो मुळुमुळू रडू लागला.
“साक्षी… आपलं नशीब एवढं का खराब? देवाने दुसऱ्यांदा पण मुलगीच दिली आपल्याला. लोकं कायं-कायं बोलतात, मला सहन होत नाही…खरंच माझा वंश इथेच खुंटला. आपल्याला म्हातारपणी कोण बघेल आपल्याला. एवढा हुंडा कुठून आणायचा....”
हे सगळं ऐकून पहिल्यांदा तर साक्षीला धक्काचं बसला.
विनय ह्यातून बाहेर पडेल का?
साक्षी त्याला समजावेल का??
साक्षी त्याला समजावेल का??
क्रमश:-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा