*चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा
जलद कथालेखन स्पर्धा
बापरे..!दुसरी ही मुलगीच?? भाग एक*
विनय आणि परेश हे दोघेही चुलत भाऊ, लहानपणापासून एकत्र वाढलेले. म्हणून त्यांची अगदी घट्ट मैत्री होती, पण स्वभाव मात्र वेगवेगळे होते.
विनय शांत, समजूतदार; तर परेश थोडा अहंकारी, स्वतःचं कौतुक करणारा होता.
विनय शांत, समजूतदार; तर परेश थोडा अहंकारी, स्वतःचं कौतुक करणारा होता.
योगायोग असा की दोघा भावांचं लग्न एकाच मांडवात झालं. वर्षभरातच घरात आनंदाची बातमी देखील आली.
काही दिवसांच्या फरकाने विनय आणि साक्षीच्या घरी पहिली मुलगी झाली, तर परेश आणि रिताच्या घरी मुलगा जन्माला आला.
काही दिवसांच्या फरकाने विनय आणि साक्षीच्या घरी पहिली मुलगी झाली, तर परेश आणि रिताच्या घरी मुलगा जन्माला आला.
सगळं कुटुंब आनंदात होतं,पण कुठे तरी फरक जाणवू लागायचा दोन्ही मुलांमध्ये.परेशला मनांत गर्व वाटायचा
“माझा वंश पुढे चालेल कारण मला मुलगा झाला.”
तो आडून आडून विनयला चिडवायचाही प्रयत्न करायचा.
एकदा चौकात उभं राहून तो म्हणाला,
एकदा चौकात उभं राहून तो म्हणाला,
“कायं रे विनय, तुझा वंश इथेच थांबणार की कायं? त्यात मुलगी म्हणजे खर्चाचं ओझं! लग्नात हुंडा द्यायची सोय आतापासूनच कर बरं, नाहीतर नंतर भारी पडेल. माझं बरंय, मला मुलगा झालाय. मला टेन्शन नाही.”
विनय तेव्हा नुसतं हसून गप्प राहायचा. मनांत मात्र त्याला वेदना व्हायच्या. त्याला आपली मुलगी देवाची देणगी वाटायची, पण लोकांच्या बोलण्याने त्रासही व्हायचा.
घरी येऊन तो साक्षीसमोर मन मोकळं करायचा,
“लोक बोलतात साक्षी… मला खरंच कधी कधी प्रश्न पडतो, आपल्याला मुलगी झाली तर कायं बिघडलं. आपण दोघ तर खूश आहोत ना? मगं लोक का उगाच बोलतात? "त्यावर साक्षीने आपली मुलगी अन्वीला कवटाळून हसत हसत उत्तर दिलं,
“मुलगा असो वा मुलगी, बाळ म्हणजे देवाची देणगी असते. लोकांचं बोलणं मनाला लावू नकोस विनय. आपली मुलगी हिच आपली खरी ताकद आहे.”
दिवस सरत गेले. साक्षी आपल्या मुलीला नीट संस्कार देण्यात वेळ घालवत होती,
“अन्वी, नेहमी मोठ्यांचा मान ठेवायचा, खोटं बोलायचं नाही, मेहनत सोडायची नाही.”
दुसरीकडे रिता मात्र मुलगा रितेशचे लाड पुरवण्यात गुंतलेली.
“माझ्या राजाला काहीही कमी पडता कामा नये!”
असच ती सारखी म्हणायची.त्याला त्याच्या प्रत्येक हट्टात गरजेपेक्षा जास्त देत होती.गावात सगळे जमले की आपोआप तुलना होईच.
असच ती सारखी म्हणायची.त्याला त्याच्या प्रत्येक हट्टात गरजेपेक्षा जास्त देत होती.गावात सगळे जमले की आपोआप तुलना होईच.
“रिताचा मुलगा आहे, त्यामुळे त्याचं पारडं जड आहे. साक्षीला मात्र मुलगीच आहे.”
साक्षी हे ऐकूनही शांत राहायची पण मुलीला पाहून मनोमन ठरवायची.
“आज लोक कमी लेखत आहेत पण उद्या हीच मुलगी आपला खरा अभिमान बनेल. आम्ही तिला तेवढं स्ट्रॉंग बनवू. "
साक्षी आणि विनय बनवतील का अन्वी ला मजबूत?
कि लोकांच्या टोमण्याने अजून दुखावतील???
क्रमश :-
लेखिका - हर्षला " सान्वी "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा