Login

बापरे....! दुसरी ही मुलगीच? भाग तीन

साक्षी विनय ला समजावते
चॅम्पियन ट्रॉफी 2025
जलद कथालेखन स्पर्धा

बापरे..!दुसरी ही मुलगीच?? भाग तीन



मागील भागात आपण पाहिलं की विनयला सगळे हीनवतात. त्यांच्यामुळे तो खूप दुःखी होतो आणि तो साक्षी जवळ जाऊन रडतो. आता पाहूया पुढे,


ते ऐकून साक्षीने त्याचे हात घट्ट धरले.
“विनय, लोकांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. सांग बर मला तू तुझ्या आजोबांचं नाव किती वेळा घेतोस? त्याच्याही पुढे तुझ्या खापरआजोबाचं नाव माहिती आहे का तुला? अरे, दोन पिढ्यानंतर कुणाचं नाव कुणाला आठवत नाही. मग या ‘वंश’ खुंटेल या गोष्टीचा एवढा गवगवा कशाला?”

ते ऐकून विनय शांत झाला, ते पाहून साक्षी पुढे म्हणाली,

“विनू अरे, वंशाने नाही रे, तर चांगल्या संस्कारांनी आणि कामांनी माणसाचं नाव टिकून राहतं. तू बघच आपल्या मुली आपल नाव काढतील. त्या आपला अभिमान बनतील. देवाने एक सोडून दोन लक्ष्मी दिल्यात आपल्याला, हे आपलं भाग्य आहे. कारण आपण त्यांना जपू, त्यांचा सन्मान करून देवाला माहिती होतं म्हणूनच तर त्यांनी आपल्या पदरात हे सोने दिले. "


साक्षीच्या या शब्दांनी विनयचा डोळ्यांतून पाणी वाहिलं, मन सुद्धा हलकं झालं. तो म्हणाला,

“तुझं बरोबर आहेस साक्षी. आता मी हा विचारच मनातून काढून टाकतो. आपल्याला देवाने मुली दिल्यात, तर त्या घडवायच्या ही आपली जबाबदारी आहे. मी आजच सोडून उगाच भविष्याचा विचार करत बसलो.”


" हो...उगाच तू नको त्या गोष्टी मध्ये अडकत आहेस, आता मला सांग ना, माझा दादा परदेशात निघून गेला, मग आई-वडिलांना मीच सांभाळतेय ना? आता कोणाला कधी प्रश्न पडला मुलगी का सांभाळते.. प्रेम आणि जबाबदारी निभावणं महत्वाचं असतं, नुसतं वंश चालवणं नाही.”


विनयने साक्षीकडे बघून मान डोलावली. त्याला नव्या विचारांची जाणीव झाली. त्याला विचार करताना बघून साक्षी अजून बोलतच राहिली,

"विनू, अरे मुलगी किंवा मुलगा काहीही असो, आपण आईवडील होणे महत्वाचे नाही का?"

त्यावर विनयच्या डोळ्यात पाणी आले,

" साक्षी माफ कर मला... मी उगाच लोकांच्या हिनवण्याचा विचार करत होती... "


त्यावर साक्षीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हटल,

" आणि नवरोबा, आपण आपल्याला मुलींना चांगल शिकवू, त्यांच्या पायावर उभ करू... लग्न करू... आणि दोघ म्हातारे म्हातारी आपण सगळं जग फिरू... मग आपल्याला हे ही टेन्शन राहणार नाही कि हा मुलगा सांभाळेल कि तो... कधी वाटलं तर ह्या लेकीकडे कधी त्या लेकीकडे जाऊ.. म्हतारपणी आपण आपले छंद जोपसू... जे तुला म्हणत आहेत हुंडा द्यावा लागेल..
त्यांना म्हण आम्ही आमच्या मुलींना एवढं काबील बनवू कि त्याची गरजच लागणार नाही.. उलट तुम्ही प्रॉपर्टी वरून होणारी भांडणे कशी थांबवता येतील ह्याचा विचार करा... "


ह्यावर दोघेही खळखळून हसले..


बघूया आता तरी विनय लोकांना उत्तर देईल का????