बरसती अमृतधारा भाग 1
" हॅलो , योगिनी कदम बोलताय ना ? "
" हो , आपण कोण ? "
" मी महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागातून बोलते आहे .मिसेस पंडित . "
" बोला ना मॅडम , काय काम आहे ? "
" तुमच्या अमृतधारा संस्थेला या वर्षी महिला दिनी पुरस्कार जाहीर झाला आहे . तुम्ही आणि डॉक्टर शिल्पा दोघींची पुरस्कारासाठी निवड करताना मला मनस्वी आनंद होतोय . "
" पण मी अशा कोणत्याच पुरस्कारासाठी अर्ज केला नाही मॅडम . "
योगिनी आता जरा गोंधळली होती .
" तुमच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे . आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिफारस केली आहे."
पलीकडून उत्तर आले .
पलीकडून उत्तर आले .
" तुम्ही त्यांचे नाव सांगू शकाल का ? "
योगिनी नम्रपणे म्हणाली .
योगिनी नम्रपणे म्हणाली .
" हो , मिसेस प्रधान नाव आहे त्यांचे . "
" मला नंबर मिळू शकेल ?"
" हो, सांगते नंबर . लिहून घ्याल ? "
योगिनीने नंबर लिहून घेतला .
योगिनीने नंबर लिहून घेतला .
फोन ठेवल्यावर तिला कोणत्याही संदर्भात मिसेस प्रधान हे नाव आठवेना .
ऑफिसला जायच्या गडबडीत फोन करायला नको म्हणून योगिनीने तो कागद पर्समध्ये टाकला . आज दोन महत्वाच्या मिटिंग होत्या . त्या आटोपून मग संध्याकाळी शिल्पा मॅडमकडे जायचे होते .
घरी सगळ्या सूचना देऊन योगिनी निघाली . तर ही आहे आपल्या कथेची नायिका योगिनी कदम .
वय वर्षे बत्तीस , एका मोठ्या कार्पोरेट कंपनीत मॅनेजर , दोन मुलांची आई , एक गृहिणी अशा सामान्य भारतीय स्त्रीयांना कराव्या लागणाऱ्या सगळ्या भूमिका जगणारी .
कधी भांडणारी , चिडणारी आणि तितकेच भरभरून प्रेम करणारी . अगदी तुमच्या आमच्या सारखी बर का .
विचारांच्या गर्तेत योगिनी ऑफिसला पोहोचली . पंचिग करतानाच फोन वाजला .
" आई , माझी वही सापडत नाहीय . "
फोनवरून मुलीला वही शोधून देत योगिनी आत आली . तोपर्यंत नवऱ्याचा एक प्रेमळ मॅसेज आला होता . चेहऱ्यावर हसू घेऊन योगिनी आपल्या टीमकडे वळली .
" योगिनी , आजची डील क्रॅक व्हायलाच हवी . यू नो दीस इज मिलियन डॉलर थिंग . "
बॉसने आल्या आल्या तिला सूचना दिली .
बॉसने आल्या आल्या तिला सूचना दिली .
" ह्याला काय जातं सांगायला . "
कुमुद जरा चिडलीच होती .
" चील कुमुद . ते त्यांचे काम करतात . आपण आपले करायचे . तुझी गरज दुपारपर्यंत आहे . त्यानंतर तू घरी जा . "
चार महिन्यांची प्रेग्नंट असलेली कुमुद हे ऐकूनच खुश झाली .
प्रेझेंटेशन संपवून यामिनी बाहेर आली . तिचे समाजकार्य आणि काम अनेकांना खुपत असे . लंच टाईम मध्ये ती तिच्या दुसऱ्या कामाला वेळ द्यायची . त्याची चुगली काही जणांनी केली होती . परंतु यामिनी कामात चुकत नसल्याने बॉस तिच्यावर खुश होते .
संध्याकाळी सहा वाजता योगिनी ऑफिसातून बाहेर पडली . घरी जायच्या आधी डॉक्टर शिल्पा यांना भेटावे यासाठी तिने गाडी वळवली .
शिल्पा मॅडम तिच्या डॉक्टर आणि मैत्रीण दोन्ही होत्या . दवाखाना नेहमीप्रमाणे तुडूंब भरलेला होता . आता हाताशी वेळ असल्याने त्या मिसेस प्रधान आहेत तरी कोण ? हा किडा योगिनीच्या डोक्यात वळवळू लागला .
तिने सकाळी लिहून घेतलेला नंबर काढला आणि डायल केला .
" हॅलो, मिसेस प्रधान बोलताय का ? "
" हो , काय काम होते ? ऑफिस बंद झाले आता . "
" मॅडम , माझे काहीच काम नाही . मी योगिनी कदम बोलतेय . "
योगिनीचे नाव ऐकताच त्यांचा सूर बदलला .
" हो , काय काम होते ? ऑफिस बंद झाले आता . "
" मॅडम , माझे काहीच काम नाही . मी योगिनी कदम बोलतेय . "
योगिनीचे नाव ऐकताच त्यांचा सूर बदलला .
" योगिनी मॅडम सॉरी . पण कामासाठी अनेक लोक वेळ काळ न बघता फोन करतात . बोला तुम्ही ? "
" मॅडम , माझे नाव पुरस्कारासाठी तुम्ही सुचवले . तुम्ही मला कसे ओळखता ? "
" योगिनी , काही गोष्टी वेळ आल्यावर उलगडत असतात . तुम्ही फक्त पुरस्काराला होकार कळवा . "
काहीच संदर्भ लागू न देता त्यांनी फोन ठेवला .
काहीच संदर्भ लागू न देता त्यांनी फोन ठेवला .
पेशंट कमी झाल्यावर डॉक्टर शिल्पाने योगिनीला आत बोलावले .
" पुरस्काराचे विचारत असशील तर मला काहीच माहीत नाही . पण त्या बाईंचा आग्रह मोडायला नको वाटल्याने होकार दिला .
" " मलाही त्यांनी काहीच सांगितले नाही . "
" फक्त त्यांनी आपल्या कामाबद्दल , ते सुरू कसे झाले याबद्दल मात्र विचारले . आणखी एक , एक अनोळखी व्यक्तीने दहा लाख संस्थेच्या खात्यात भरले आहेत ."
" काय ? दहा लाख . कोणी भरले असेल ? "
" ओळख सांगायला बँकेने नकार दिला . समोरून सूचना होत्या . पण बरेच झाले . आपल्या जागा आणि मशीन असे दोन प्रश्न सुटायला याने मदत होईल . "
" योगिनी, कायमस्वरूपी जागा असायला हवी यासाठी . "
" हो , बघू काहीतरी करता येईल . सध्या ह्या रकमेतून आपल्याला काही महिने चिंता नाही . "
" उद्याच्या कामाचे सगळे डिटेल्स मुलींना देऊन जाईल . "
" मुली करतात त्यांचे काम योगिनी . तुझी धावपळ कमी कर जरा . "
दोघींनी कॉफी संपवली आणि योगिनी घरी जायला निघाली .
संध्याकाळी सगळे आवरून योगिनी खोलीत आली .
" अमोघ, मला सकाळी एका सरकारी पुरस्कारासाठी फोन आलेला . "
" काय ? मग स्वीकार की . इतके छान काम करत आहेस . लोकांना माहित व्हायला नको . "
" अमोघ , हे काम मी मानसिक आनंद मिळतो म्हणून करते . प्रसिद्धी नको . "
" योगिनी , काही वेळा आपल्या कामाचे कौतुक होणे गरजेचे असते . तू होकार कळव . आम्ही सगळे तुझ्यासोबत येणार . "
अमोघ तिला समजावत होता .
" ठीक आहे . कळवते त्यांना . "
योगिनीने दुसऱ्या दिवशी आपला होकार कळवला . ऑफिसात येतच असताना एक कमेंट ऐकू आली .
" आल्या समाजसेविका . कसली कामं करतात . थेर आहेत नुसती . पूर्वी असे काही ऐकले होते का ? "
दामले मोठ्याने म्हणाला .
दामले मोठ्याने म्हणाला .
" नाहीतर काय ? सांगायला पण लाज वाटेल असले काम करतात आणि त्याला समाजसेवा म्हणतात . "
जाधव टाळी देत म्हणाला .
आता मात्र पुरस्कार घ्यायचा तिचा निर्धार आणखी दृढ झाला होता .
काय काम करत असेल योगिनी ?
कोण असतील मिसेस प्रधान ?
वाचत रहा .
बरसती अमृतधारा .
कोण असतील मिसेस प्रधान ?
वाचत रहा .
बरसती अमृतधारा .
अष्टपैलू 2025 स्पर्धा
©® प्रशांत कुंजीर .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा