बरसती अमृतधारा भाग 2
मागील भागात आपण पाहिले की योगिनीला पुरस्कार जाहीर होतो . काही प्रसंग घडतात आणि योगिनी पुरस्कार स्वीकारायचे ठरवते . आता पाहूया पुढे .
" अमोघ , रिया , पराग आवरा लवकर . योगिनी तुझ्या आई बाबांना कळवलेस का ठिकाण ? "
" आई अहो लोकेशन दिले आहे . अजून चार तास आहेत . किती अधीर होताय तुम्ही ? "
" अधीर असणारच . तुझे काम काय आहे मी जाणते . आज संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना जेवण देणार . "
सासूबाई म्हणाल्या .
सासूबाई म्हणाल्या .
अखेर सगळेजण आवरून समारंभाच्या ठिकाणी पोहोचले . डॉक्टर शिल्पा आधीच कुटुंबासह पोहोचल्या होत्या . सरकारी समारंभ असल्याने अनेक मान्यवर राजकारणी , मोठे अधिकारी उपस्थित होते .
आपापल्या क्षेत्रात किंवा काही वेगळे काम करणाऱ्या स्त्रियांना हा पुरस्कार दिला जात होता . प्रत्येक पुरस्कारार्थी जाहीर झाल्यावर त्यांची ओळख निवेदिका करून देत होती .
" आता या पुढील पुरस्कार जातोय अमृतधारा संस्थेला आणि डॉक्टर शिल्पा वैद्य यांना . परंतु अमृतधारा विषयी बोलण्यासाठी खास व्यक्ती आहे . मी आमंत्रित करते महिला आणि बालकल्याण सचिव आदरणीय माधवी प्रधान मॅडम ."
" नमस्कार , मी माधवी प्रधान . आज मला सांगायला आनंद वाटतो की मला पुरस्कार द्या अशी ढीगभर शिफारस पत्रे माझ्या कार्यालयात येतात . दरवर्षी त्यातून निवड करत असते .
परंतु यावर्षी एक नाव आधीच माझ्या डोक्यात होते . आता योगिनी आणि शिल्पाच्या प्रश्नाचे उत्तर देते . स्नेहा बर्वे आठवते का ? "
माधवी प्रधान यांनी हे नाव घेताच डॉक्टर शिल्पा आणि योगिनी दोघींनाही आश्चर्य वाटले .
" स्नेहा बर्वे , माझी मोठी मुलगी . हुशार , कर्तबगार . सगळे परीट घडीचे आयुष्य . नवराही तसाच मिळाला . यथावकाश गोड बातमी मिळाली आणि सगळे आनंदात न्हाले . नेमकी तिच्या डिलिव्हरी वेळी मी चार महिने परदेशी .
तर या माझ्या राजकन्येच्या आयुष्यात पहिल्यांदा दुःखद अश्रू आले . बाळ झाल्याचा आनंद मानावा की आपल्याला अतिशय कमी दूध येते याचे दुःख ? बाळाला मानवी दूध मिळणे वाढीसाठी उत्कृष्ट . त्याचवेळी देवदूत बनून ह्या दोघी आल्या . आता वळूयात अमृतधारा जन्मली कशी ? ह्या गोष्टीकडे .
तर गोष्ट आहे दोन वर्षांपूर्वीची अमोघ आणि योगिनी दोघांनी दुसरा चान्स घेतला . डॉक्टर शिल्पा आणि त्यांच्या दवाखान्यात दिलेली प्रेमळ वागणूक यामुळे ते आनंदाचे दिवस आणखीच गोड होते . यथावकाश मुलगा झाला आणि सगळ्यांना आनंद झाला .
" आई , अग इथे बघ गाठ लागतेय . "
यामिनी तिच्या आईला म्हणाली .
यामिनी तिच्या आईला म्हणाली .
" अगं दूध येत असल्याने तुला तसे वाटत असेल . मसाज केल्यावर बरे वाटेल . "
आईने समजावले .
आईने समजावले .
दोन दिवसांनी अंघोळ करताना योगिनीला जाणवले की खरच स्तनात गाठ आहे . तिने सरळ दवाखाना गाठला . तोपर्यंत नाना शंका तिच्या मनात येत होत्या . गाठ साधीच असेल की.... नुसते मनात उच्चारले तरी थरकाप उडत होता .
आपले एक महिन्याचे बाळ आणि त्याच्या ताईचे काय होईल ? यामिनीचे डोळे भरून येत होते . डॉक्टरांनी तिला तपासले .
" यामिनी दूध खूप येत आहे . बाळाचे पोट भरूनही जास्तीचे दूध स्तनात राहिल्याने कदाचित गाठ आली असेल . "
" डॉक्टर असेच असायला हवे . मला खूप भिती वाटतेय . "
" वेडे असेच असणार . औषधे तर मी देतेच पण जास्तीचे दूध ब्रेस्ट पंप वापरून काढ . "
डॉक्टर शिल्पा तिला समजावत होत्या .
डॉक्टर शिल्पा तिला समजावत होत्या .
तोपर्यंत बाहेर एक बाळ सतत रडत होते .
" कोणाचे बाळ रडत आहे ? "
योगिनी म्हणाली .
योगिनी म्हणाली .
" अगं माझी एक पेशंट आहे . तिला हार्मोनल प्रॉब्लेम मुळे खूपच कमी दूध येतेय . बाळ चार दिवसांच असल्याने फार वरचे पण देता येत नाही . आपल्याकडे ब्रेस्ट मिल्क बँक वगैरे सोय नाही काहीच . "
औषधे लिहून देताना डॉक्टर उत्तर देत होत्या .
औषधे लिहून देताना डॉक्टर उत्तर देत होत्या .
" सिस्टर प्लीज , कितीही महाग औषधे द्या . काहीतरी उपाय असेलच यावर . "
स्नेहा डोळ्यात पाणी आणून विनंती करत होती .
" उपाय असता तर डॉक्टर मॅडमनी केला असता केव्हाच . काही वेळा डॉक्टरी उपाय देखील अपुरे असतात ताई ."
सिस्टर तिला समजावत होत्या .
बाहेरचे दूध पचत नसल्याने बाळ आता ते प्यायला तयार नव्हते . आपले आईपण असे अपूर्ण का ? स्नेहाला काहीच सुचत नव्हते . तिच्या सासूबाई डॉक्टरांशी बोलायला आल्या .
" डॉक्टर , इथल्या कोणी नाही का बाळाला एखाद वेळ दूध पाजणार ? "
" मावशी , आपल्याकडे असे कोणी तयार होईलच असे नाही सांगता येणार . वाटल्यास तुम्ही विनंती करून बघा . "
शेवटी स्नेहाच्या सासूबाईंनी तिथल्या काही महिलांना विनंती केली . परंतु उद्या आमच्या बाळाला दूध नाही पुरले तर ? अशी शंका घेऊन त्यांनी नकार दिला .
भुकेने रडणारे बाळ पाहताना आपण असहाय्य असल्याची जाणीव मन कुरतडून टाकत होती .
" आई , जास्तीचे दूध काढायला मदत कर . "
योगिनी तिच्या आईला म्हणाली .
योगिनी तिच्या आईला म्हणाली .
" आई , ह्या दुधाचे करायचे काय पण ? "
" अग पूर्वी असे दूध सरळ पाण्यात सोडून दिले जायचे . "
" बरं , सध्या तू फ्रीजमध्ये ठेव . " योगिनी म्हणाली .
तितक्यात डॉक्टर शिल्पा मॅडमचा फोन आला .
" योगिनी ब्रेस्ट पंप वापरायला तुला जमतय ना ? "
" हो , सरावाने जमेल डॉक्टर . "
" काय निसर्गाची किमया , एकाला अगदी टाकून द्यावे लागेल इतके भरभरून द्यायचे आणि दुसऱ्याला भूक भागेल इतकेही नाही . "
असे म्हणत शिल्पा मॅडमनी फोन ठेवला .
योगिनी मात्र ते वाक्य विसरू शकली नाही . तिला तिचा मार्ग सापडला होता . आता उद्याची पहाट एक नवीन सुरुवात घेऊन येणार होती . त्यासाठी योगिनी सज्ज होती . इकडे काहीही करून बाळाची भूक भागवू शकेल अशी व्यवस्था व्हावी यासाठी स्नेहाच्या सासूबाई गजाननाला साकडे घालत होत्या .
काय होईल पुढे ?
योगिनी काय मार्ग काढेल ?
पाहूया अंतिम भागात
वाचत रहा
बरसती अमृतधारा
अष्टपैलू 2025 स्पर्धा .
©® प्रशांत कुंजीर .
©® प्रशांत कुंजीर .