बरोबरी (भाग ५ अंतिम)
“आई, तुझं जरा आहे अतिच होत नाहीये का?” अंकित
“म्हणजे?” शालूताईंना प्रश्न पडला.
“मला वाटतं तू प्रत्येक गोष्टी पल्लवीची बरोबरी करते आहेस. तिच्यासोबत स्पर्धा करत आहेस. पल्लवीपेक्षा आपण कसं सरस आहोत हे सिद्ध करत आहेस. आई, असं सिद्ध करायची काही गरजच नाहीये. तू वेगळी आहेस, पल्लवी वेगळी आहे. तुमच्या दोघींमध्ये तुलना होऊ शकत नाही.” अंकित त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करत होता.
“अंकित, काहीही बोलू नकोस.” शालूताईंचा आवाज चढला होता.
“का नको बोलू आई? अगं पंधरा-वीस दिवस झालोय बघतोय, पल्लवीनं भाजी केली की दुसऱ्या दिवशी तू लगेच त्याच भाजीचा दुसरा प्रकार बनवतेस. हे सिद्ध करायला की तू केलेली भाजी किती चांगली लागते. पल्लवीनं दोन दिवसांपूर्वी मार्केटमध्ये जाऊन कपडे आणले की लगेच तू लगेच स्वतःसाठी साड्या आणल्या.
या तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण तू तर घरांची ही तुलना केलीस. अगं, मी घर घ्यायचं म्हटलं तर लगेच तिकडे घराचं काम काढलं आणि मी जसा सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ पाठवला होता, अगदी तसंच घर रिनोव्हेट केलस. का आई? अशी पल्लवी सोबत सगळ्या गोष्टी तुलना, बरोबरी का? आज तर कहरच केलास, तिने काल हार आणला म्हणून आज तुही रुसून बसलीस हारासाठी.” अंकित म्हणाला.
“अंकित, तू तुझ्या आईसोबत बोलतोय एवढं लक्षात ठेव.” महेशराव त्याला म्हणाले.
“बाबा एका हाताने टाळी वाजतच नसते. तुम्हीही आईच्या प्रत्येक गोष्टीला होकार भरता म्हणून तीही सगळ्या गोष्टी करू शकते.” अंकित म्हणाला.
“अंकित, अरे बायकांचं असंच असतं… कुठं काही पाहिलं की त्या लगेच स्वतःसाठी त्या गोष्टी करतच असतात.” महेशराव म्हणाले.
“फरक आहे बाबा. कुठं काही पाहण्यात आणि आपल्या सून आणि लेकासोबत सगळ्या गोष्टी बरोबरी साधन्यात. एवढा पैसा खर्च करून तुम्ही गावाला घर उभं केलं; पण तुम्ही हा विचार केलात का की तुम्ही किती दिवस राहणार? जोपर्यंत तुमचे हात-पाय चालू आहेत तोपर्यंतच ना? पण नंतर तुम्हाला इथेच येऊन राहावं लागणार आहे. त्या घराला कामापुरतं दुरुस्त करून राहिले असते आणि ते पैसे मला दिले असते तर माझ्या डोक्यावर एवढा कर्जाचा डोंगर उभा राहिला नसता.
आपले पिल्लं उडायला लागले की आई वडील त्यांच्या पंखात ताकद भरतात, असं ऐकलं होतं; पण इथं आम्ही उडायचा प्रयत्न करतोय तर आमच्या आई वडील काय करत आहेत, स्वतः किती उंच उडू शकतो हे आम्हाला दाखवत आहेत. हे बघा आई-बाबा जेव्हा तुमचं करायची वेळ ही तेव्हा मी जर माझे हात वर केले तर तुम्ही मात्र त्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण एका हातानं टाळी वाजतच नसते.” अंकित म्हणाला आणि तिथून निघून आतल्या खोलीत गेला.
आपले पिल्लं उडायला लागले की आई वडील त्यांच्या पंखात ताकद भरतात, असं ऐकलं होतं; पण इथं आम्ही उडायचा प्रयत्न करतोय तर आमच्या आई वडील काय करत आहेत, स्वतः किती उंच उडू शकतो हे आम्हाला दाखवत आहेत. हे बघा आई-बाबा जेव्हा तुमचं करायची वेळ ही तेव्हा मी जर माझे हात वर केले तर तुम्ही मात्र त्याचं वाईट वाटून घेऊ नका कारण एका हातानं टाळी वाजतच नसते.” अंकित म्हणाला आणि तिथून निघून आतल्या खोलीत गेला.
महेशराव आणि शालूताई मात्र विचारात हरवले होते.
दुसऱ्याच दिवशी दोघे परत गावी निघून आले. शालूताईंच्या अशा वागण्याचा अंकितला फार राग आला होता. एरवी महिन्या दोन महिन्यात घरी चक्कर टाकणाऱ्या त्याने वर्ष होत आलं होतं तरी घरी चक्कर टाकली नव्हती.
दुसऱ्याच दिवशी दोघे परत गावी निघून आले. शालूताईंच्या अशा वागण्याचा अंकितला फार राग आला होता. एरवी महिन्या दोन महिन्यात घरी चक्कर टाकणाऱ्या त्याने वर्ष होत आलं होतं तरी घरी चक्कर टाकली नव्हती.
***************
“मग बरं का मंडळी, नव्या आलेल्या सुनेला सगळ्या सासवा नावं ठेवतात. पण एका हातानं टाळी वाजत नाही. सुना चुकीचं वागतही असतील तरी त्याला सासवाही तेवढ्याच जबाबदार असतात.” कीर्तनकार सासू सुनेचा दाखला देऊ लागले. शालूताई मात्र लगेच तिथून उठल्या.स्वतःच्या वागण्याचा त्यांना पश्चाताप झाला होता.
शालूताई घरी आल्या. त्यांनी अंकित आणि पल्लवीला फोन लावायला फोन घेतला. तितक्यात अंकितचाच व्हिडीओ कॉल आला.
“अंकित, पल्लवी. मला माफ करा. मी खूप चुकीचे वागले.” शालूताईंच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते.
“अहो आई, प्लिज अशी माफी वगैरे नका मागू. घर म्हटल्यावर अशा थोड्याफार गोष्टी चालतच राहतात; पण माझ्याकडे तुम्हाला सांगायला एक बातमी आहे.” पल्लवी
“काय गं, कसली बातमी?” शालूताई
“तुम्ही आजी होणार आहात.” पल्लवी म्हणाली.
“हो का! अभिनंदन… अंकित तुझंही अभिनंदन बरं का.” शालूताई एकदम आनंदात म्हणाल्या.
“माझं कशाला? मी काय केलं?” अंकित
“तू काय केलं म्हणे, मला सांग एका हाताने टाळी वाजत असते का?” शालूताई म्हणाल्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
“अहो मी काय म्हणतेय.” शालूताईंनी आपला मोर्चा महेशरावांकडे वळवला.
“आता, ह्या वयात! अंकितला भाऊ बहीण आणणं शक्य नाही बरं.” महेशराव थट्टेने म्हणाले.
“गप बसा हो, तुमचं आपलं काहीतरीच… उद्याची तिकीटं काढा. अंकितकडं जाऊया. पल्लवीला आता गरज आहे माझी.” शालूताई म्हणाल्या आणि तयारीला लागल्या.
पुढं चालून घरात नात आली आणि तिच्यासोबत जगण्यात शालूताई मात्र पुरत्या बदलून गेल्या, हे सांगायची गरजच नाही.
समाप्त
©® डॉ. किमया मुळावकर
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा