Login

बरसल्या पावसाच्या सरी... भाग 1

धुंद अश्या या पावसाळी वातावरणात तू मी आणि एक कप चहा, सांगशील का तुझ्या मनातली भावना मला, कोठे तरी दवडून ठेवलेल्या,


बरसल्या पावसाच्या सरी... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
........

पावसाळी कथा मालिका स्पर्धा
ही कथा पूर्ण काल्पनिक आहे, छोटीशी सुंदर प्रेमकथा आहे, कथा हळू हळू फुलत जाते, पात्र काल्पनिक आहेत, त्याचा कोणाशी काहीही संबंध नाही, कोणाच मन दुखवायचा हेतू नाही.....
वाचकांचे खूप आभार...
........

धुंद पावसाच्या सरी बरसती अंगणी ,
भान हरपुन जाई असा सुगंध दरवळे सभोवताली , हवहवस आहे तुझ सान्निध्य ,
आतुर मन माझं झालं वेडापिसं,
आता आस फक्त तुझ्या भेटीची ,
केव्हा येशील तू माझ्या कवेत,
तुझ्या वाटेकडे डोळे लावून उभी मी ,
मन माझ आतुर झाल ,
केव्हा बरसशील तू ,
केव्हा बरसशील तू...

"रश्मी... रश्मी कुठे आहेस ग तू काय करते आहेस सकाळी सकाळी?, कुठे गेली ही? ",.. आई हाका मारत होती

आली... रश्मीने डायरी बंद केली

आई बाबांची एकुलती एक रश्मी, आपल्या दुनियेत रममाण, लाडात वाढलेली, कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या रश्मी, खूप हुशार होती, चांगल्या स्वभावा मुळे बर्‍याच जणींनी ती आवडायची,

" काय करते ग छतावर? ",.. लता ताई

"आई किती छान पाऊस येतो आहे",.. रश्मी

" काही लिहिल का मग? ",.. लता ताई

" हो वाचू का ",.. रश्मी

हो..

रश्मी वाचत होती, आई ऐकत होती,.." किती मनापासून लिहिते ग तू ",

" आई साधच आहे ग, मी माझ्या साठी लिहिते ",.. रश्मी

" कस होणार आहे हीच? स्वप्नाच्या दुनियेत वावरते ही, आटोप ग कॉलेजला नाही जायचं का आज?",.. लता ताई

हो

कॉलेजचा छान ग्रुप होता तिचा मैत्रिणींचा, नेहा बेस्ट फ्रेंड होती तिची , ती ही हिच्या सारखी हळवी, खूप पटायचं त्यांच

रश्मी नेहा सोबत कॉलेजला आली, थोडे दिवस राहिले होते परीक्षेसाठी, नंतर कोणी पुढच अ‍ॅडमिशन घेणार होत तर कोणाच लग्न जमल होत, पुढे बर्‍याच मुलींच्या वाटा वेगळया होणार होत्या, रश्मीच नुकताच लग्न जमल होत शरद सोबत

सगळ्या कॅन्टीनमध्ये येवून बसल्या होत्या, कॉलेजला लागून दोन दिवस सुट्टी होती, सगळ्या मिळून एक पावसाळी सहल आयोजित करायचा विचार करत होत्या, खूप मजा येणार आहे यावर्षी, खूप पाऊस आहे छान, लग्नाच्या आधी एकदा फिरून आलेले बर, नंतर काय माहिती?

सगळ्याच मैत्रिणी उत्साही होत्या, हो चालेल जावू या, उद्या काय काय करायचं सगळ्या ठरवत होत्या,

"छत्री रेनकोट सोबत घ्या नाहीतर पावसात भिजू आपण, परत सर्दी खोकला होईल" ,..

कपडे काय घालायचे सगळे ठरवत होत्या,

"आपण सगळ्यांनी जीन्स घालूया म्हणजे त्याच्यावर टी-शर्ट असला की रेनकोट लवकर घालता येतो",.. नेहा

" चालेल, एक्स्ट्रॉ एखादा ड्रेस सोबत ठेवा प्लास्टिकच्या पिशवीत",.. रश्मी

हो..

सगळ्यांनी मिळून थोडेथोडे खाण्याचे पदार्थ आणायचे अस ठरल होत, दोन दोन मुलींचा एक एक ग्रुप केलेला होता, कधीकधी पिकनिकला गेल्यानंतर तिथे काहीच खाण्याची व्यवस्था नसते, थोडा खाऊ सोबत असला की बर पडत, म्हणून इतर वरचं खाणं आणणार होते सगळे,

रश्मी कॉलेजमधुन घरी यायला निघाली,

"मी येते ग तुझ्याकडे संध्याकाळी",.. नेहा बोलली

"आपण सगळं सामान व्यवस्थित आहे का ते बघून घेऊ",.. रश्मी

" आपल्याला दोघींना मिळून चिवडा पाण्याची दोन बाटल्या घ्यायच्या आहेत",.. नेहा

रश्मी घरी आली, सरळ ती आज बेडरूम मध्ये गेली,.. "आई माझी जिन्स कुठे आहे? मला उद्या पिकनिकला तीच घालायची आहे" ,

"अगं आता कुठे पॅन्ट शर्ट घालते, तुझ्या नवऱ्याला चालणार आहे का? आत्ताच लग्न जमलं आहे ना तुझं?",.. लता ताई

" नुसत जमल ना, झाल तर नाही ना, आणि हे असं चालणार नाही आई, मी माझ्या मनाने जे घालायचं तेच घालेल, हे काय ग त्यांचं असं? सारखं हे करू नको ते करू नको, आम्ही उद्या पिकनिकला जातो आहोत देवळात नाही, मी मुळीच ओढणीचा ड्रेस घालणार नाही ",.. रश्मी

" मला काय बाई तू त्यांना सांग बोलून बघ ",.. लता ताई

" मी नाही विचारणार, बाबा चांगले तु चांगली आहेस आई, हे शरद का असे? ",.. रश्मी

" अस बोलू नये बेटा, होते हळू हळू सवय ",.. लता ताई

रश्मीच नुकतच शरद शी लग्न जमल होत, सरकारी ऑफिस मध्ये मोठ्या पोस्ट वर असलेला शरद खूप प्रॅक्टीकल माणूस होता,

त्या उलट रश्मी अतिशय अल्लड स्वच्छंदी कवी मनाची छोट्या छोट्या गोष्टी आनंद बघणारी, आई बाबां मुळे तिने या लग्नाला होकार दिला होता, परीक्षा झाल्यावर लगेच लग्न होत,

जरा वेळाने नेहा आली, दोघींनी मिळून उद्याच्या पिकनिक ची तयारी केली,.. "उद्या वेळेवर उठ रश्मी",..

हो... त्या दोघी बोलत असतांना शरद आले, ते जावून आत बसले, बाबा होते घरात

" मी निघते रश्मी",.. नेहा

हो..

चहा पाणी झाल, चला मी निघतोय,

रश्मी नेहमी प्रमाणे त्यांना सोडायला बाहेर पर्यंत गेली,..

"आम्ही उद्या जातो आहोत पिकनिक ला" ,.. रश्मी

" कुठे पावसाळी पिकनिक का?",.. शरद

हो..

"उत्साह आवर जरा, काय गरज आहे पण मी म्हणतो अश्या पिकनिकची, मुली मुली जाणार आहात का? कोणी आहे का मोठ सोबत?",.. शरद

"आम्ही मुली आहोत की मोठ्या , कोणाच्या आधाराची काय गरज",.. रश्मी चिडली होती

" केव्हा निघणार",.. शरद

" उद्या सकाळी ",.. रश्मी

" केव्हा येणार",.. शरद

"लगेच संध्याकाळी ",.. रश्मी

" ही नेहा आहे का सोबत? आगाऊ मुलगी आहे ती",.. शरद

" नाही खूप छान आहे ती ",.. रश्मी

" पँट शर्ट घालणार का? ",.. शरद

हो..

"वाटलच मला.. घरच्यांना मुळीच चालणार नाही हे ,आधीच सांगितल होत मी, ड्रेस ठीक आहे ",.. शरद

" सासरी थोडी प्रोग्राम आहे, मी पिकनिकला जाते आहे ना आणि मी काय करायच ते मला ठरवू द्या ",.. रश्मी

"खूप बोलतेस तू, एकदा बोलाव लागेल तुझ्या बाबांशी ",.. शरद रागाने निघून गेला

रश्मी तणतण करत आत आली

" बाबा तुम्हाला माझ लग्न ठरवायची काय एवढी घाई झाली होती? ते ही अश्या जुन्या विचाराच्या लोकांशी? हे घालू नको ते घालू नको, मी कोणाच ऐकणार नाही ",.. रश्मी

"अग होईल हळू हळू नीट, काय झालं आता? जरा शांततेत घेत जा",.. बाबा

आई काळजीने समोर बघत होती,.. "अहो काय होईल हो पुढे? , पोरगी खुश राहिली पाहिजे ",

" तू काळजी करू नको लता होईल नीट ",.. बाबा
.........

सकाळी लवकर उठून रश्मी नेहा आणि ग्रुप पिकनिकला निघाल्या...

सुंदर वळणदार रस्ता, पावसाळा त्यामुळे समोर हिरवा गार निसर्ग, किती छान , जागोजागी बहरलेले झाड , सुंदर हिरवळ, परदेशात आहोत जस, हिरव्या रंगाचे किती शेड, मधुन दिसणारे छोटे पाण्याचे झरे, नुकताच पाऊस पडून गेला होता , पानावर साठलेले पाणी मोत्या प्रमाणे भासत होत,

" अगदी भान हरायला होत ना नेहा अश्या वातावरणात, किती मनमोहक आहे हा निसर्ग",.. रश्मी

हो रश्मी...

तू मी आणि या पावसाच्या सरी,
वेगळ नात आहे ना आपल,
तू ही या पावसा सारखाच आहेस
हवा हवासा, माझा प्रिय,
माझ्या सोबत हातात हात घालून येशील का
या छान रानोमाळी,
मूक संवाद साधशील का या निसर्गाशी,...

रश्मी डायरीत लिहीत होती

" काय लिहितेस रश्मी दाखव",.. नेहा

"नाही नेहा पर्सनल डायरी आहे ही",.. रश्मी

"रश्मी काय हे मी बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी",.. नेहा

हे बघ..

पाऊस बघितल की रश्मी भाग हरपुन जायची, धरतीच ते सुंदर रूप, खूप मनापासून आवडायच तिला, अश्यात सुंदर सुंदर ओळी तिला सुचत होत्या, त्यात तिच्या मनात बसलेला तिचा प्रियकर होता सोबत, त्याच्या सोबत खूप सुंदर प्रेमाच नात होत तीच,

" बापरे खूप सुंदर लिहिल रश्मी, शरद असा आहे का",.. नेहा

"नाही ग.. एकदम विरुद्ध जोडी आहे आमची, त्यांना ही पावसाळी पिकनिक, कविता, लेख, कथा यात काहीही इंट्रेस्ट नाही, काल आमच ही जिन्स घालण्या वरुन भांडण झाल",.. रश्मी

"खर की काय ",.. नेहा

हो..

"जग कुठे चालल तुम्ही कुठे आहात ",.. नेहा

" बघ ना काय करू",.. रश्मी

" साखरपुडा झाला ना फक्त, अजून चान्स आहे, नकार दे ",.. नेहा

" बाबांच्या मित्राचा मुलगा आहे तो, तिकडून जमल आमच लग्न, उगीच मी काही बोलली तर बाबांची बदनामी होईल",.. रश्मी

"मग काय? असच सहन करणार का त्यांना ",.. नेहा

"बाबा बोलतात होईल नीट, सुरुवातीला समजून घ्यायला वेळ लागतो ",.. रश्मी

" रश्मी आज आपल्याला लवकर निघाव लागेल इथून",.. नेहा

का ग?

" थोड्या वेळाने पावसाला सुरुवात होणार आहे इथे",.. नेहा

" कोणी सांगितल",. रश्मी

"त्या वॉचमन काकानी",.. नेहा

" ठीक आहे निघू तो पर्यंत एन्जॉय कर ",... रश्मी

" सावध राहायला हवं इथून थोड्या अंतरावर जंगल सुरू होत माहिती आहे ना, ते क्रॉस केल्यावर आपल गाव आहे",.. नेहा

"हो ग. पण त्यात एवढं घाबरण्यासारखं नाही, झाडी आहेत फक्त",.. रश्मी

"तू असशील शूर वीर मी नाही ",.. नेहा

गाणे गप्पा गोष्टी झाल्या, जेवण झाल, आता पर्यंत तुरळक पाऊस पडून गेला होता, मुली मस्त एंजॉय करत होत्या

" चला निघू या आपण",.. सगळे बस कडे आले, बस निघाली, थोडी पुढे गेल्यावर समजल बसच चाक पंक्चर आहे, सगळ्यांना खाली उतरवल,

समोर एक चहाची टपरी होती, तुम्ही सगळे बसा इथे, मी काढतो पंक्चर,.. ड्रायवरने सांगितल

"धुंद अश्या या पावसाळी वातावरणात तू मी आणि एक कप चहा, सांगशील का तुझ्या मनातली भावना मला, कोठे तरी दवडून ठेवलेल्या, झर झर कोसळती धारा तन मन हरपती, तुझ्या समवेत घे मला, नकळत माझे भान हरपती",..

काय लिहितेस रश्मी? शरद ला पत्र का?... एका मैत्रिणीने चिडवल

"किती बोर तो शरद, त्यांना समजणार तरी आहे का हे पत्र? हे वातावरण? ... माझ मन? , त्यांनी या पेपर वर भजी ठेवून खाल्ली असती",..

दोघी हसत होत्या...

"केवढी समजूतदार आहेस ग तू, पुढच्या वर्षी लग्न होईल तुझ, शरद ने पाठवल नाही पावसाळी पिकनिकला तर ",..

" शक्य नाही, मी पाऊस मध्ये कोणी नाही येवु शकत",.. रश्मी

"चल चहा घेतेस का तू",..

"नको मी बसते इथे",.. रश्मी

तिची मैत्रीण चहा घ्यायला निघून गेली, समोर एक खूप सुंदर झाड होत, त्याच्या बाजूला एक बाक होता , रश्मी त्याच्या मागे जावून बसली , तिच्या स्वप्नाच्या दुनियेत रममाण होती ती, बर्‍याच वेळ तिथे बसुन होती, निसर्ग सौंदर्य बघत,

बसचा हॉर्न वाजला, चला बस आली, निघाल पंक्चर, काका बोलवत होते,

रश्मी उठली, निसरड्या वाटेवरून पाय सरकला, थेट खाली दरीत कोसळली ती, पुष्कळ खाली जावून एका झाडांवर अडकली, तिने तिची डायरी गट्ट धरली होती, काय होतय आता? वरच निमंत्रण येत की काय? , बरच खरचटलं होतं तिला, तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते, बापरे पायाला लागल जोरात, काही खर नाही, तिच्या डोळ्यात पाणी होत.

0

🎭 Series Post

View all