Login

बरसल्या पावसाच्या सरी भाग 5

आपल्याला काय करायच आहे हिच्याशी? उद्या पाऊस थांबला की हीचा नवरा उद्या येवून हिला घेवून जाईल हिला , हिच्यात मन गुंतवण्यात अर्थ नाही,


बरसल्या पावसाच्या सरी भाग 5

©️®️शिल्पा सुतार
........

बाबा आले, तस मनीष बाहेर जावुन बसला, अजूनही तो रागात होता, बाहेर जोरात पाऊस येत होता,

आपल्याला काय करायच आहे हिच्याशी? उद्या पाऊस थांबला की हीचा नवरा उद्या येवून हिला घेवून जाईल हिला , हिच्यात मन गुंतवण्यात अर्थ नाही,

एक मिनिट नवरा काय नवरा? होणारा नवरा आहे तिचा, अजून लग्न झालं नाही तीच, अस आशा सोडून चालणार नाही, तो बाहेरून आत बघत होता, रश्मी बाबांशी बोलत होती,

आता बर वाटतय हिला, काही व्हायला नको हिला , काय आहे हे लव अॅट फर्स्ट साइट का? , कालच्या अंधारात किती आधार वाटला हिचा, पहिल्यांदा अस एखाद्या मुलीचा हात धरला मी, आता मी हा हात सोडणार नाही, तिच्या नवर्‍याला भेटून सांगेन माझ रश्मी वर प्रेम आहे

नको अस करायला ,.. आधी रश्मीशी बोलू का? , पण अस एका दिवसात कस झाल प्रेम? अस बोलली ती तर? सरळ नकार दिला तर? , बाबांना सांगितल तर? , काय करू? आजचा दिवस आहे माझ्या कडे ,

बाबांनी खूप सामान आणल होत ते स्वयंपाकाची तयारी करत होते

"बाबा तुम्ही एवढ्या पावसात का फिरता आहात? , नका ना जावू कुठे, वाटा निसरड्या आहेत",.. रश्मी काळजी करत होती

"मला सवय आहे बेटा या ऋतूत दुर्मिळ वनस्पती मिळतात जंगलात त्या लागतात मला औषध बनवायला लागतात " ,..बाबा

" तुम्ही औषध विकतात का? ",.. रश्मी

हो...

"कसे बनवतात? चूर्ण आहेत का? ",.. रश्मी

" तिकडे घरी माझी पत्नी मदत करते मला",.. बाबा

"मुल कुठे आहेत तुमचे? ",.. रश्मी

"दोन मुल आहेत ते शहरात आहेत, नौकरी करतात, येतात ते गावी मधुन" ,.. बाबा

"मला द्या बाबा मी करते मदत, भाजी निवडते ",.. रश्मी

"नको बेटा तू बस भूक लागली असेल ना? ",.. बाबा

" मी पोळी खाल्ली आहे, मनीष ने काही खाल्लं नाही",..रश्मीला काळजी वाटत होती

" मनीष आत ये बाहेर ओला होशील, काय झालं याला?, मला मदत करशील का? ",.. बाबा

" हो बाबा सांगा",.. मनीष

"हा कांदा टोमॅटो काप, खिचडी करु या आपण",.. बाबा

"हो चालेल",.. मनीष

रश्मी मनीष कडे बघत होती, तो त्याच त्याच काम करत होता, रुसला वाटत हा,

बाबा खूप बोलत होते दोघांशी,

" बाबा तुम्ही वरती जावून सांगितल ना आम्ही इथे आहोत तसे ते लोक नाही येवू शकत का इथे",.. रश्मी

" खूप पाऊस आहे बेटा, एक दोन लोक निघाले होते ते सटकले उतारा वरून, उगीच सगळे दरीत जायचे",.. बाबा

" हो ना मग आता कस होईल? ",.. रश्मी

" जेव्हा पाऊस थांबला की येतील ते, काय झाल बेटा काही प्रोब्लेम आहे का? ",.. बाबा

"नाही बाबा तुम्ही खूप छान काळजी घेता आहात माझी, पण आईची काळजी वाटते मला, ती तब्येत खराब करून घेईल भीती वाटते",.. रश्मी

" दिला आहे निरोप काळजी करू नकोस",.. बाबा

मला नाही राहायच इथे, मनीष कडे बघून उगीच विचार मनात येतात की तो छान आहे, त्याच्या विषयी प्रेम वाटत, आई बाबांना काय सांगणार की शरद नाही तर मनीष आवडतो मला, नाही करू शकत मी अस, बाबांच काय होईल मी अस केल तर, जावू दे गप्प बसू,

मनीष अजिबात बोलत नाही, आधी छान बोलत होता माझ्याशी , काय झालं याला अचानक? चिडला हा जेव्हा त्याला समजल की माझ लग्न ठरलं आहे, त्याला राग तर नसेल आला ना , त्याला ही मी आवडते की काय? काही उपयोग नाही पण, असे चांगले मुल सोडून शरद भेटला मला

"घे बेटा पाय शेकून घे",.. बाबा

"बाबा मला बाथरुमला जायच आहे मग शकते मी पाय",..रश्मी

"उठ हळू हळू",.. बाबा

रश्मीला उठता येत नव्हत, बाबानी हात दिला तरी पाय उचलत नव्हता, ती परत खाली बसली

"पट्टी काढू का? नाही येत चालता" ,... रश्मी

"थांब मी बघतो काय झालं ते, सूज आहे अजून " ,.. बाबा पाय बघत होते,

मनीष ने हात पुढे केला, एका बाजूने तिला उचलून घेतल, मागे बाथरूम मध्ये घेवून गेला,

थॅंक्स..

"मी आहे इथे",.. मनीष

रश्मी बाहेर आली

"तू माझ्याशी बोलत का नाहीस? काही चुकलं का माझ?",.. रश्मी

तुझ नाही माझ चुकलं, काल रात्री तर भेटली तू मला, तु कोण आहे काय आहे याचा विचार न करता तुझ्यात मन गुंतवल, आता त्याचा त्रास होतो आहे मला,.... मनीष विचार करत होता

रश्मी त्याच्या कडे बघत होती,.." मनीष बोल काही? राग आला का तूला? ",

" नाही काही नाही झाल, आत जायच का ",.. मनीष

हो ..

"मनीष ऐक ना नको ना अस चिडू, आपण सोबत आहोत तो पर्यंत छान राहू ना, उद्या कोणी बघितला काय होईल, प्लीज .... फ्रेंड्स",.. रश्मी

"ठीक आहे" ,... दोघांनी हात मिळवले

"आता छान वाटतय ना ",.. रश्मी

दोघ हसत होते..

मनीष सोबत रश्मी आत आली, आता तिला बर वाटत होत, हा चिडला तरी मला त्रास झाला, हा नेहमी खुश रहायला हवं अस वाटत,

पण मी का गेली याचा रुसवा काढायला, तो रुसला तर रुसला काय फरक पडणार आहे मला, का तो बोलत नाही तर त्रास झाला मला, याच्या सोबत नाही राहता येणार मला, नको याचा इतका विचार करायला

छान झाली होती खिचडी

"बाबा माझी मदत होत नाही काही तुम्हाला काम पुरत आहे",.. रश्मी

"काही हरकत नाही ",.. बाबा

"तुम्ही इथे फसले पावसात आमच्या मूळे ",.. रश्मी

"नाही मी आता ही जावू शकतो तुमच्या साठी इथे आहे मी",.. बाबा

बाबा खूप धन्यवाद

"चांगले पोर आहात तुम्ही माझी थोडी मदत होते ते बर आहे ",.. बाबा

"तुम्ही नसते भेटले तर काय झालं असत आमच, अगदी देवा सारखे धावून आलात तुम्ही बाबा ",.. रश्मी

" औषध घे आता पड थोड ",.. बाबा

" तू ही पड रे पोरा",.. दोघ बसले होते

गावातून कोणीतरी बघायला आल,.. "तुम्ही आला नाही बाबा, आजी घाबरली आहे ",..

"उद्या या पोरी ला तिच्या घरच्यांना कडे दिली की येतो काळजी करू नका म्हणा, आत्ता वाट निसरडी आहे चालता येणार नाही हिला",.. बाबा

हो..

"तुम्ही जा घरी बाबा उद्या या",.. रश्मी

"नको आहे मी, चुलीवर स्वयंपाक पाणी जमणार नाही तुम्हाला ",.. बाबा

आता थोड पाय ठीक होता, पण जड झाला आहे, चालता आल नाही तर उद्या कस होईल, ती थोडा पाय हलवून बघत होती

"वेळ लागेल बेटा ठीक व्हायला अजून 15-20 दिवस, वाटेल बर तुला ",.. बाबा

रश्मी जरा वेळ झोपली

संध्याकाळ झाली, बाबा बाहेर मनीष शी बोलत होते, त्यांनी आत येवून रश्मीला चहा दिला, ते परत बाहेर काम करत होते, त्यांच्या बाजूला बसुन मनीष आत मध्ये रश्मी कडे बघत होता,

" हा काय बघतो असा आत, बाबांना समजल तर, बापरे मी कुठे बघु आता",.. रश्मी

रश्मी ने डायरी काढली, काल पासुन काय काय झालं ती त्यात लिहीत होती, मनीष विषयी लिहिल, त्याच नाव न लिहिता

"पाऊस फारच कमी झाला होता, बहुतेक उघडेल पाऊस, आता उद्या तुला जाता येईल घरी पोरी",.. बाबा

दोघ एकमेकांकडे बघत होते, मनीष सोबत रहावस वाटत मला, बाबा किती चांगले आहेत, जाव लागेल परत त्या प्रॅक्टीकल जगात, आई बाबा भेटतील ते छान पण शरद ही भेटेल

बाबा काहीतरी काम करत होते बाहेर, मनीष येवून रश्मी समोर बसला,.." मला बोलायच आहे तुझ्याशी ",

बापरे काय अस? रश्मी बघत होती बाबा कुठे आहेत,

"रश्मी मला तू आवडते मला तुझ्याशी लग्न करायच आहे काहीही झाल तरी",.. मनीष

रश्मी काही बोलली नाही, तिला खूप धड धड होतं होत,

"उद्या तू घरी जाशील तर लग्नाला नकार दे, मला माहिती आहे तुला ही मी आवडतो, तू म्हणत असशील तर मी घरी येवून तुझ्या घरच्यांना भेटेल, तुझ्या साठी काहीही करेन",.. मनीष

रश्मी डायरी कडे बघत होती, शरदशी लग्न ठरल्यावर अस धड धड झाल नव्हत, ना कसली ओढ वाटत होती त्याच्या बद्दल, सगळ कस प्रॅक्टीकल होत तेव्हा, आता हा लग्नाच बोलतो आहे हे शक्य नाही, पण मला राहायच आहे याच्या सोबत, शरद ऐकणार नाहीत कस होईल आता? हा हट्टाला पेटला आहे, मारामाऱ्या होतील पुढे,

रश्मी काय म्हणतोय मी, मनीष अजूनही तिच्या कडे बघत होता,

बाबा आत आले, ते स्वयंपाक तयारी करत होते, मनीष त्यांच्या मदतीला गेला,

नुसती डायरी समोर होती, त्यात काय लिहू काय बोलला मनीष, तिला काही सुचत नव्हत,

जेवण झाल, बाबा समोर बसले होते, रश्मी उठली, काय हव बेटा

"मला वॉश रूम मध्ये जायच आहे",.. रश्मी

मनीष... मनीष बाबांनी हाक मारली, बाबा बाहेर जावुन बसले

अरे याला का बोलवलं?

मनीष आला, त्याने रश्मी ला हात दिला,

रश्मी उठली, त्याच्या कडे बघायची तिची हिम्मत होत नव्हती, त्याच्या आधाराने ती बाथरुम मध्ये गेली तो बाहेर उभा होता रश्मी आली

" रश्मी मी काय म्हणतोय प्लीज समजून घे, मला या आधी कोणी अस आवडल नाही, तुला पहिल्यांदा बघितल तुझ्या बद्दल वेगळच वाटत मला, पाहिल्या नजरेत प्रेम झाल मला",.. मनीष

"हे शक्य नाही मनीष" ,..रश्मी 

का

"माझ्या घरचे.. शरद नाही ऐकणार",..रश्मी 

"कोण शरद",..मनीष 

"माझा नवरा",..रश्मी 

" होणारा नवरा",..मनीष 

हो

" तुला काय वाटतं माझ्या विषयी ते महत्वाचं आहे घरचे बाकीचे कोणी महत्वाचे नाही",..मनीष 

" आहेत घरचे महत्वाचे माझ्या साठी हे शक्य नाही",..रश्मी 

मनीष तिच्या कडे बघत होता

"मला आत जायच",..रश्मी 

" माझ्या प्रश्नाच उत्तर दे",..मनीष 

"प्लीज मला आत जायच तिने हात पुढे केला, पाय दुखतोय, माझा नकार आहे हे शक्य नाही, आपण दोन दिवस सोबत होतो विसरून जा मला, परत भेटण्याचा प्रयत्न करू नकोस ",..रश्मी 

मनीष सोबत ती आत येवून बसली, बाबा आत आले, झोपा आता मुलांनो,

बाबा झोपले, बाबा होते म्हणून मनीष गप्प होता, तिच्या शेजारी बसला होता तो,

रश्मी काही बोलली नाही, अजुन 24 तास नाही झाले याला भेटून कस सांगू काय वाटत ते, छान आहे हा मला आवडेल याच्या सोबत राहायला, पण मी आता याला काही सांगू काय आहे परिस्थिती , मला आई बाबांशी बोलायला हव

"फोन नंबर दे तुझा रश्मी",..मनीष 

तिने नंबर दिला नाही

त्याला राग आला होता, तो तिकडे तोंड करून झोपला

रश्मीच्या डोळ्यात पाणी होत, मला होकार द्यायचा आहे याला काय करू, का भेटला हा मला, का बोलले मी याच्याशी एवढ, मन गुंतल आहे माझ उद्या मला घरी जाव लागेल, शरद शी लवकर लग्न आहे माझ , हा भेटल्या पासून आशा लागली, तिला झोप लागली,

सकाळी उठली तर रेस्क्यू टीम आलेले होती ती मनीष कडे आणि बाबांकडे बघत होती, मनीष त्याची बॅग भरत होता, त्याने एकदाही तिच्या कडे बघितल नाही,

बाबांनी तिला चहा दिला चहा पिला तोपर्यंत मनीष रेडी होता, मी निघतो बाबा तुमचा खूप आधार झाला खूप धन्यवाद, रश्मी ऑल द बेस्ट, नीट रहा खुश रहा, रश्मी ने हात पुढे केला, त्याने हात मिळवला नाही, मनीष..... तो निघून गेला,

पाऊस थांबला होता, रेशमीच्या डोळ्यात पाणी होतं, मनीष निघून गेला, कसंतरी वाटत होतं तिला, जाऊ दे हेच ठीक आहे तो गेला आता त्याचा विचार करायचा नाही,

रश्मी तयार झाली,.. "येते मी बाबा, तुम्ही आणि आजी या आमच्या कडे",

"भरपूर अभ्यास कर पोरी, छान रहा, फोन कर मला बरं वाटल्यावर" ,.. बाबांनी त्यांच्या फोन नंबर दिला, गावात असल्यावर लागतो फोन,

ठीक आहे

रेस्क्यू टीमने रश्मीला स्ट्रेचर वर ठेवलं तिची बॅग घेतली, एक तासात ते रस्त्यापर्यंत आले, तिथून ॲम्बुलन्स मधुन दवाखान्यात आले, रश्मीला ऍडमिट केलं, रश्मीने घरी फोन केला, ती कुठे ऍडमिट आहे ते सांगितलं..

0

🎭 Series Post

View all