©️®️शिल्पा सुतार
........
........
रश्मी खुश होती तिने नेहाला फोन करून तिने आनंदाची बातमी दिली,
मनीष घरी पोहोचला,.." कुठे गेला होता मनीष एवढा उशीर झाला ",..
" आई मला तुला मागे सांगितल होत ना , मी रश्मी कडे गेलो होतो, तिच्या बाबांनी मला भेटायला बोलवलं होत ",.. मनीष
"भेटले का ते लोक ? ",.. आई
"हो जरा झाल भांडण, तीच आधी लग्न जमल होत ना तो मुलगा आला होता, मला रश्मी ला लग्न करायच आहे, आम्ही ठाम होतो तो मुलगा गेला परत" ,.. मनीष
" काही हरकत नाही, पण तो मुलगा बदला नाही ना घेणार",.. आई
" काही होणार नाही आई काळजी करू नकोस ",.. मनीष
तेवढ्यात त्याच्या दादाचा फोन आला, आई आणि दादा दोघं मिळून मनिष बद्दलच बोलत होते, मनीष आणि रश्मी बद्दल ते बोलत होते
" कुठे आहे मनीष? दे बर फोन, मनीष चांगलं चाललं आहे तुझं,.. खूप अभिनंदन",.. दादा
" दादा तू आणि वहिनी रविवारी इकडे या, आपल्याला रश्मीकडे जायचं आहे, मी आत्ता सांगणारच होतो तुम्हाला फोन करून, मी तिकडंन आलो आहे एवढ्यात",.. मनीष
ठीक आहे
" काही हरकत नाही आम्ही दोघे येतो मग जाऊ आपण रश्मीकडे, तुझ्या वहिनी शी बोल ",.. दादा
" काय भाऊजी छान झाल मग पावसाळी पिकनिक मुळे, गेले एकटे येतांना दोघे आले ",.. वहिनी
" वहिनी काहीही ह",... मनीष
" सांगा ना आम्हाला रश्मी बद्दल? कशी आहे दिसायला? फोटो पाठवा तिचा, फोन नंबर द्या उद्या इंटरव्ह्यू घेते तिचा",... वहिनी
" वहिनी काहीही करा आता तुम्ही दोघी",.. मनीष
" घाबरली पाहिजे रश्मी मला ",.. वहिनी
" बॉस झाल्या आता तुम्ही, लवकर या इकडे आता",.. मनीष
" हो आणि लग्नात पैठणी घ्या मला ",.. वहिनी
" हो नक्की",.. मनीष खूप खुश होता, वहिनींनी फोन ठेवला,
आज किती खुश होती रश्मी, छान वाटत होत तिच्या सोबत, परीक्षा झाल्यावर लग्न करू या म्हणते रश्मी, कधी आहेत परीक्षा काय माहिती? कधी येईल रश्मी माझ्या सोबत रहायला,
आई बाबा रश्मी जेवायला बसले, रश्मी ने पटकन जेवून घेतल,
"काय ग झाल ही",.. आई
हो आई.. रश्मी खूपच खुश होती, बऱ्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व झाला होता, बाबांचा जॉबही गेला नव्हता आणि लग्न ही जवळजवळ ठरल्यासारखंच होतं, रविवारी तारीख फिक्स होईल, खर वाटत नाही, मनीष लव यु, थोड्या वेळाने मेसेज करू त्याला, आज छान दिसत होता मनीष, आणि शरद शी भांडतांना एकदम डॅशिंग वाटत होता, तिला एकदम हसू आलं,
मनीष चा फोन आला,,.. "आता बोललो मी आई आणि दादा वहिनी शी, खूप खुश आहेत ते, आपल स्वप्न पूर्ण होणार आहे रश्मी, काही अडचण नाही ",..
" काही म्हटले नाही ना ते ",.. रश्मी
" नाही रविवारी येणार आहोत आम्ही सगळे तिकडे ",. मनीष
"मला खर वाटत नाही आपल लग्न जमतय ते",.. रश्मी
"खर आहे हे, तू खुश आहेस ना",.. मनीष
" हो आपण जंगलातील बाबांना सांगायला हव फोन करून",..रश्मी
" लग्नाला बोलवू आपण त्यांना आता, की तिकडे जावु लग्ना नंतर फिरायला ",.. मनीष
" काहीही काय दरीत पडायचो पाय घसरून",.. रश्मी
" मी बर पडू देईन तुला, उचलून घेवून जाईन",.. मनीष
रश्मी लाजली होती, खूप हसत होती ती
"आज तू खूप छान दिसत होती रश्मी, लाल ड्रेस छान होता तुझा ",.. मनीष
" एवढ्या भांडणात तुझ लक्ष होत का ",.. रश्मी
" हो तुझ्या साठी तिथे आलो होतो मी, आणि माझ्या साठी विशेष नाही अस भांडण",.. मनीष
"बापरे डेंजर दिसतोस तु, मला तर थोड कोणी जोरात ओरडल तरी भिती वाटते",.. रश्मी
"घाबरायचे नाही ग, अन्याय सहन करायचा नाही, बिनधास्त राहायच",.. मनीष
"छान सुरु आहे माझी ट्यूशन ",.. रश्मी
" हो सर आहे मी कॉलेजचा, अजून बर्याच गोष्टी शिकवायच्या आहेत तुला ",.. मनीष
मनीष पुरे..
" अरे अजून काही बोललो नाही मी तुला, कस होणार तुझ पुढे रश्मी ",.. मनीष
" मी ठेवते फोन ",.. रश्मी
" लव यु बोल ",..
" लव यु",..
रश्मी दुसर्या दिवशी कॉलेज ला जायला तयार होत होती, नेहा तिच्या मागे होती,.. "सांग ना काय काय झाल काल रश्मी? ",
" सांगितल ना काल ",.. रश्मी
" ते नाही अजून मनीष सर काय म्हटले ",.. नेहा
" काही म्हटला नाही मनीष, आम्हाला बोलायला वेळ नव्हता, भांडण झाल बर्याच वेळ ",.. रश्मी
आई आत आली.. "रविवारी येणार आहेत ते लोक तेव्हा तू ही ये नेहा मदतीला",..
"हो काकू",.. दोघी निघाल्या घरातून
" रश्मी मेसेज आला असेल ना मनीष सरांचा, तू काहीही सांगत नाही मला ",.. नेहा
" हो आला ना ",.. रश्मी
दाखव..
"मी आता ओरडेन ह नेहा",.. दोघी हसत होत्या,
" आता खरं वाटतय की लग्न जमल तुझ अस चिडवायला छान वाटत " ,.. नेहा
कॉलेज आल, समोर शरद उभा होता, दोघी गप्प झाल्या,
"आता काय ग रश्मी?",.. नेहा
"बघु काय म्हणतोय ते",.. रश्मी
"रश्मी मला तुझ्याशी बोलायचं आहे ",. शरद
बोला..
तो नेहा कडे बघत होता
" ती माझ्या सोबत राहीन",.. रश्मी
"चल आपण चहा घेवु",.. शरद
" नाही उशीर होतो क्लास साठी, इथे बोला नाहीतर निघतो आम्ही ",.. रश्मी
"तू मला अस अचानक नकार नाही देवू शकत रश्मी, माझ मन होत या लग्नात, जरा माझा तर विचार कर, किती छान सोबत होतो आपण, अस करता का, आपण नीट बोलून हा प्रश्न सोडवू, ऐकणार का माझ ",.. शरद
"तुमच्या वागण्यात वाटल नाही कधी अस, की तुमच मन होत माझ्या सोबत राहायच तुम्हाला फक्त अधिकार गाजवायचा होता ",.. रश्मी
"माझा स्वभाव असा आहे त्याला मी काय करू मनात खूप प्रेम आहे तुझ्या साठी, मला तु आधी पासून खूप आवडते ",.. शरद
" दुसर्याला त्रास होईल असा कसा स्वभाव?, आता स्वतःला त्रास होतो तर समजत ना, माझ नाही मन तुमच्या सोबत राहायच, आणि आपण का बोलतो आहोत आता ? , मी जाते आत, या पुढे मला भेटू नका माझ लग्न ठरलं आहे, मनीष ला नाही आवडणार अस मी तुमच्याशी बोललेलं, आणि त्याला काय वाटत हे माझ्या साठी महत्वाच आहे",.. रश्मी
" रश्मी प्लीज एकदा विचार कर माझा ",.. शरद
" माझ ठरलं आहे हे शक्य नाही, मी मनीष सोबत खुश आहे, तो माझी खूप काळजी घेतो, या पुढे मला भेटायला येवू नका ",.. रश्मी
दोघी आत निघून आल्या
" कठीण आहे ग हा, आता बरा सावकाश शांत बोलतो आहे , आधी केवढा चिड चिड करत होता ",.. नेहा
" हो ना, तो तुला आधी आगावू मुलगी बोलायचा ",.. रश्मी
" काय?.... काय म्हटलीस आधी का नाही सांगितल चांगला बघितल असत त्याच्या कडे तिथे ",.. नेहा
रश्मी हसत होती, नेहा चिडलेली होती
" पण मला आता याचा काही विचार करायचा नाही, काहीही कर म्हणा, आता मनीष आणि मी बस ",.. रश्मी
" ओ हो मॅडम, सांग ना काय आला होता मनीष चा मेसेज, थोडा फोन दाखव ",.. नेहा
" नाही ग नेहा नको त्रास देवू ",.. रश्मी हसत होती
रविवारी सकाळी रश्मी आई बाबा लवकर आवरत होते, तिचे काका काकू मदतीला आले होते, रश्मी खूप खुश होती, अगदी अशक्य वाटत होत हे अस मनीष सोबत राहण, आज प्रत्यक्षात होणार आहे ते, त्यांच्या घरचे येणार आहेत आज घरी,
ते जेवून जातील, घरी स्वयंपाक सुरू होता, नेहा आली होती मदतीला, रश्मी साडी नेसून तयार होती, मनीष कधी येईल अस झाल होत तिला,
"धड धड होते ग नेहा, मनीष च्या घरचे कसे असतिल",.. रश्मी
"चांगले असतिल तू घाबरू नकोस, मनीष तुझ्या वर फूल फिदा आहे, इथे तू प्लस पॉइंट मध्ये आहेस",.. नेहा
"हळू बोल जरा घरात पाहुणे आहेत",.. रश्मी
बाहेर गाडी थांबली मनीषची आई दादा वहिनी त्यांचा मुलगा सोनु सगळे आले होते, ते आत येवून बसले, रश्मी बाहेर जावुन सगळ्यांना भेटली, मनीष च्या आई आत बसायला गेल्या,
निळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसत होती रश्मी , मनीष तिच्या कडे बघत होता, रश्मीला समजल मनीष तिच्या कडे बघतो ते ती मुद्दाम वहिनीशी बोलत होती , दादा वहिनी खुश होते, वहिनी खूप बोलत होती, तीच रश्मीच खूप जमलं, मनीष भाऊजी मजा आहे तुमची एवढी सुंदर रश्मी बरी सापडली जंगलात, सगळे हसत होते,
खूप समजूतदार होते घरचे, खूप गप्पा मारत होते ते, जेवणा आधी सगळे एकत्र बसले, पुढे काय काय कार्यक्रम आहेत ते ठरवून घेवू
मनीष रश्मी कडे बघत होते
"माझी परिक्षा झाल्यावर करू या लग्न",.. रश्मी
"चालेल, रश्मी म्हणेन तस",.. मनीष
परत सगळे हसत होते
"भाऊजी काही खर नाही तुमच" ,.. वहिनी
काय काय असतिल प्रोग्राम ते ठरलं, दोघांना साध्या पद्धतीने लग्न करायच होत, जास्त गाजा वाजा नको होता ,
जेवण झाल, मनीष रश्मी खुश होते, देण घेण काही नव्हत, मन जुळले ते महत्वाच होत, सगळे वापस गेले, संध्याकाळी मनीषचा फोन आला
"ठीक आहे ना जे ठरलं ते रश्मी ",.. मनीष
"हो मला ही साध्या पद्धतीने लग्न करायच होत" ,... रश्मी
"हो तू मी आपल्या घरचे असले तरी पुरे, गर्दी झाली की काही सुचत नाही",.. रश्मी
हो ना..
"किती सुंदर दिसायच पण मी म्हणतो एखाद्याने, साडी फार छान दिसते तुला, नेसता येते का",.. मनीष
" हो मग काय",.. रश्मी
" आपण घेवू तुला खूप साड्या ",.. मनीष
" नको मला ड्रेस आवडतो",.. रश्मी
"ठीक आहे तू म्हणशील तस",.. मनीष
" सारख काय मी म्हणेल तस.. अस सुरू आहे तुझ सगळ्यांसमोर",.. रश्मी
" अरे मग तेच खर आहे ना, तू बॉस आहेस आता या पुढे माझी ",.. मनीष
" आज असच म्हटला तू दुपारी, बाकीचे किती हसत होते ",.. रश्मी
"हसू दे मला नाही फरक पडत, लवकर ये आता घरी लग्न करून",.. मनीष
परीक्षा खूप जवळ आली होती, अभ्यास जोरात सुरू होता, कॉलेज मध्ये मनीष भेटत होता,
आई बाबा लग्नाची तयारी हळू हळू करत होते, परीक्षा झाल्यावर लगेच लग्न होत, कॉलेज झाल होत, आता फक्त परीक्षा बाकी होती,
नेहा येत होती घरी अभ्यासाला मधुन मधुन, परीक्षा झाली चांगले गेले होते पेपर, लगेच रिजल्ट लागल्यावर पुढच अॅडमिशन घेणार होती ती पोस्ट ग्रॅज्युएशन साठी,
लग्नाची तयारी झाली होती, साड्या खरेदी झाली होती, दागिने घेतले होते, अगदी दोन दिवसावर लग्न आल होत,
मनीष कडे दादा वहिनी आले होते, तिकडे लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, उद्या पासून प्रोग्राम सुरु होणार होते
आई-बाबांना सोडून जायचं दुःख वाटत होतं रश्मीला, पण त्यापेक्षा जास्त आवडत्या मुलाबरोबर मनीष सोबत रहायला मिळत त्यामुळे ती खुश होती, मनीष रोज फोन करत होता, किती अधीर आहे तो हे बघून रश्मी खूप हसत होती, कोणी तरी आपल्या खूप प्रेमात आहे हे तिला खूप छान वाटत होत
आज मेहंदी प्रोग्राम होता, रश्मी हाताला मेहंदी लावत होती, तिच्या भरपूर मैत्रिणी जमल्या होता, घरात खूप उत्साहात वातावरण होतं, आई सगळ्यांच्या चहा फराळाच बघत होती, काकू होती मदतीला, सगळ्या मुलींना मेहंदी लावायचा आग्रह त्या करत होत्या, त्यांनीही मेहंदी लावली, नेहा होती मदतीला,खूप काम करत होती ती, सगळ्या मुलींनी खूप छान डान्स केला, धमाल आली
आता उद्या हळद लगेच परवा लग्न आई-बाबा भाऊक होतं होते, पण सासर काही लांब नाही जेव्हा पाहिजे तेव्हा जाता येईल आणि मेन म्हणजे सगळं खूप व्यवस्थित जुळून आलं होत, मनीष खूप चांगला होता त्या मुळे काळजीच कारण नव्हत त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं
दुसऱ्या दिवशी रश्मी ची मेहंदी खूप छान रंगली होती, रश्मीला मधून मधून मनीष चा फोन येत होता, आता कोणी त्याला रश्मी शी बोलू देत नव्हत, खूप त्रास देत होते, तो वैतागला होता, नेहा दे ना फोन रश्मी ला
नाही मनीष सर रश्मी आमच्या ताब्यात आहे, लग्नानंतर बोला आता काय बोलायच ते
रश्मी खूप खुश होती नेहाने तिचे खूप फोटो घेतले होते
, रश्मीने ते फोटो मनीषला पाठवून दिले,
, रश्मीने ते फोटो मनीषला पाठवून दिले,
मनीषच्या घरून हळद आली, रश्मी रेडी होती आज खूप छान झाली होती तिची तयारी, पिवळी साडी त्यावर फुलाची ज्वेलरी शोभत होती , हळद लागली, रश्मीचे आई बाबा इमोशनल झाले होते, लगेच हातात हिरवा चुडा भरला, खूप सुंदर दिसत होती रश्मी, मनीषच्या हळदीच्या रंगात रंगून गेली होती रश्मी, खूप खुश दिसत होती, नेहा आजुबाजूला होती, काय हव नको ते बघत होती,
"नेहा किती करतेस माझ",.. रश्मी
"मी करते तुझ माझ्या लग्नात कोण करेल माझ",.. नेहा
"मी येईल ना तुझ कौतुक करायला",.. रश्मी
"मनीष सर सोडतील का तुला" ,.. नेहा
"हळू.. न सोडायला काय झाल, काहीही झाल तरी मी येईन प्रॉमीस",.. रश्मी
हो..
"आधी नवरदेव तर शोध",.. रश्मी
"हो ना जाते आता मी ही पावसाळी पिकनिक ला ",.. नेहा
दोघी हसत होत्या..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा