स्पर्धेसाठी लिहिलेली रेसिपी
आपण जेव्हा एखादा पदार्थ बनवण्याचा विचार करतो.... त्यावेळी सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न पडतो की, हा आपला घरच्यांसाठी हेल्दी असेल का? आपली लहान मुले या पदार्थाला खाऊ शकतील का? तर असाच एक खूप हेल्दी आणि टेस्टी पदार्थ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे....... हा पदार्थ तुमच्या घरातील लहान मुले ही आवडीने खाऊ शकतात, शिवाय उपासच्या दिवशीही तुम्ही हा पदार्थ बनवून याचा आनंद घेऊ शकता.......
बटाटा आणि मखानाचे कटलेट
दोन मध्यम आकाराचे बटाटे आणि एक मोठ्या आकाराचा रताळा आधी शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा........ ते शिजे पर्यंत आपण मखाना तव्यावर थोडा रोस्ट करून घेऊया आणि त्याची मिक्सर मधून फाईन पावडर बनवून घेऊया.......
रताळ आणि बटाटा शिजल्यावर त्याची साल काढून एका भांड्यात घेऊन त्याला व्यवस्थित कुस्करून घ्या....... आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या चार-पाच हिरव्या मिरच्या , एक छोटी वाटी शेंगदाण्याचा कूट , सेंधा मीठ, मखान्या ची पावडर टाकून त्याचा नीट सारण तयार करा....... तुम्हाला जर त्याच्यामध्ये थोडी गोड चव हवी असेल तर तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील टाकू शकता...... ज्या गृहिणी ही रेसिपी उपासासाठी नसून आपल्या लहान मुलांसाठी किंवा फक्त नाश्त्याला खाण्यासाठी बनवत असाल ,तर तुम्ही त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकू शकता..........
तयार झालेल्या सारणाचे तुम्हाला आवडेल तसा शेप देऊन कटलेट बनवून घ्या...... आपल्या कटलेट ला उरलेल्या मखानाच्या पावडर मध्ये कोट करून घ्या........ हे बनवलेले कटलेट तुम्ही एअरफ्राय ही करू शकता किंवा मग नॉनस्टिक पॅनमध्ये थोडं तूप किंवा तेल टाकून शालो फ्राय ही करू शकता........
तर मग झाले आपले कुरकुरीत असे उपासाचे हेल्दी आणि टेस्टी कटलेट तयार....... हे कटलेट तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकता........ तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा......... सोबतच मी घरी बनवलेल्या कटलेट चा फोटो जोडत आहे.......
एकता निलेश माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा