बटाटा वेफर्स
साहित्य - पाच किलो बटाटे, तुरटी एक मोठा खडा आणि चवीप्रमाणे मीठ.
कृती -
१) बटाटे बाजारातून आणतानाच चांगले मोठे घेऊन यावे.
२) सर्व बटाट्याचे साल काढून घेणे.
३) मशीनवर त्याचे वेफर्स करून घेणे. थोडे जाडसर करायचे जास्त पातळ नाही करायचे.
४) सर्व वेफर्स पाण्यात पूर्णपणे बुडतील इतके पाणी त्यात घालायचे.
५) त्यात तुरटी टाकून ठेवायची म्हणजे वेफर्स काळे होत नाही. रात्रभर हे पाण्यात भिजत ठेवणे.
६) सकाळी उठून हे वेफर्स पुन्हा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे.
७) आता मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन ते चांगले गरम झाले की त्यात मीठ घालून वेफर्स थोडे थोडे करून शिजवून घेणे.
८) प्रत्येक वेळी वेफर्स घालताना मिठाचे प्रमाण चेक करावे. कमी वाटल्यास आणखी थोडे घालावे.
९) असे करून सर्व वेफर्स शिजवून घेणे, साधारण वेफर्स शिजायला पंधरा ते वीस मिनिटे तरी लागतात.
१०) आता साडीवर एक एक वेफर्स वाळत घालायचा. म्हणजे तो छान वाळतो.
११) दोन दिवस तरी हे वेफर्स उन्हात वाळवून घेणे आणि नंतर डब्यात भरून ठेवणे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा