बावरे मन....भाग 1

(काही कारणामुळे स्टोरीतील थोडा भाग बदल करण्यात आला आहे स्टोरीतील थोडी नाव ही बदलेली आहेत..त्या??

बावरे मन..भाग 1

अगं रेवा उठ लवकर किती वाजले बग.. आज बॅकेत जायच आहे की नाही…रेवा ची आई तिला किचन मधुन बोलवत असते…...

रेवाचे बाबा : अग झोपू दे तीला जायच नसेल आज बॅकेत.... झोप ग रेवा तु...

रेवाची आई : अहो झोपु दे काय…. आज काय सुट्टी आहे का तीला..... उगाच नसते लाड नका करत जाऊ...

ए रेवा उठ लवकर...कस होणार या मुलीच... सासरी काय अस करुन चालेल काय...सासु ओरडायला लागेल....स्वत:ची काम स्वत: करायला नको का... परत वेळ झाला की धावपळ करायची...

सासरच नाव घेतल्यावर रेवाला जाग आली...घडयाळात बघते तर 8.30 वाजले होते...ती एकदम दचकुनच उठते...काय ग आई लवकर उठवायच ना ग... 8.30 वाजले....

रेवाची आई : हा...? दीड तास झाले उठवतेय तुला ...तुला उठवायच्या नादात माझी चपाती करपली...

रेवा : बर मी आवरते पटकन..आज मला बॅकेत लवकर जायच आहे...

रेवा... 21 वर्षाची सुंदर तरुणी. गोरी, लांब काळेभोर केस, सडपातळ बांधा. कॉलेज पुर्ण झाल्यावर एका बॅकेत लोन डिपार्टमेंट मध्ये कार्यरत होती...

रेवाला एक मोठा भाऊ होता त्याच नाव आकाश....आकाश इंनजिनियर होता...व एका आयटी कंपनी मध्ये कार्यरत होता.. व रेवा सर्वात लहान.......लहान असल्यामुळे घरात सर्वाची लाडकी........रेवा चे बाबा रमाकांत शिक्षक होते...आता रिटायर्ड झाले होते..... व रेवाची आई मालती घरीच असायची.....अस हे छोटस....देसाई कुटंब....

आज रेवाला बॅकेत लवकर जायच असत..कारण तिच्या आधिच्या मॅनेजरची बदली झालेली असते... त्यामुळे आज  नविन मॅनेजर येणार असतो...

 ए आई आवर ग लवकर डबा दे मला....रेवा हॉलमधुन आईला ओरडत होती.....हो ग देते...आधी नाश्ता करुन घे....नको ग मला खुप वेळ झालाय..मला लवकर जायच आहे...

हममम.. तो नाश्ता कर आधी...लवकर उठायला नको....रेवाची आई तिला ओरडते आणि नाश्त करायला सांगते...तोपर्यत ती डबा व पाण्यची बॉटल घेवून येते...

रेवा: थॅक्स आई...चल पळते आता...खुप वेळ झालाय..

थोडा वेळ झाला तर होऊ दे पण सावकाश जा...हो ग आई....जाते मी.. बाय..

काय यार रेवा कधी लवकर उठायला ‍शिकणार....बॅक इतकी जवळ असुन तुला रिक्षाने जाव लागतय..कधी पैसे वाचवायला शिकणार... रेवा स्वत:लाच ओरडत होती....

पुढच्या 10 मिनिटात रिक्षा बॅकेसमोर थांबली...रेवा रिक्ष्यावाल्याला पैसे देवुन आत जात असते...हा नविन मॅनेजर कसा असेल..आधिचे मॅनेजर एखादया वेळेस वेळ झाला की समजुन घेत होते..हा कसा आहे काय माहीत...रेवा असा विचार करत तीच्या डेस्कजवळ येते....आपली बॅग ठेवुन...कॉमप्युटर ऑन करते..बॉटल उघडून पाणी पिणार तोपर्यत....शरद तिथे येतो...

रेवा मॅडम तुम्हाला नविन मॅनेजर साहेबांनी आत बोलावल आहे....(शरद...त्यांच्या बॅकेतला शिपाई...)

सरांनी बोलवल आहे ऐकल्यावर रेवा खुर्ची वरुन उठुन उभीच राहते....ती शरदला विचारते का बोलवल आहे सरांनी....? मला काय माहीत नाही मॅडम...आत मध्ये गेल्यावरच तुम्हाला कळेल... अस म्हणून तो तेथुन निघुन गेला....

रेवा सरांनाच्या केबिनजवळ आली.........तीच लक्ष केबिनच्या दारावर बदलेल्या नावाकडे गेल..

सुजय सबनिस.... ओ.....सुजय सबनिस नाव आहे तर नविन मॅनेजरच....नाव वाचल्यानंतर ती केबिनच दार उघडली.....

सुजय सबनिस 24 वर्षाचा तरुण. ‍गोरा, उंच, देखणा, रुबाबदार, हुशार..कोणीही पाहताक्षणी प्रेमात पडेल असा...पण कामाच्या बाबतीत एकदम करेक्ट....प्रत्येक काम वेळेतच व्हायला हव....असा त्याचा निर्धार असे...

मे आय कम इन सर.... एस कमिंन्ग……रेवा केबीन मध्ये आली...मनात थोडी ‍भीती होती सरांनी कशाला बोलवले असतील हा विचार तिच्या डोक्यात होता..असा विचार करत ती खुर्ची जवळ येवून थांबली...आणि तीची नजर सुजयकडे जाते...

कसला मस्त आहे यार हा...ती मनातल्या मनात बोलत होती....ह्याच्याकडे बघतच रहाव अस वाटतय....कसला हॅडसम आहे....आणि एवढया लहान वयात मॅनजरची पोस्ट वा...

सुजय कॉमप्युटर मध्ये काही तरी काम करत होता..रेवा समोर येवुन थांबल्यावर तीच्याकडे बघत.. मिस देसाई.....सुजयच्या आवाजाने रेवा भानावर आली..(सर चिडले आहेत हे रेवाच्या लक्षात आलं.)

एस सर....किती वाजले मिस देसाई....तशी रेवा जरा घाबरली...सर..ते..ते...

सर ते काय....किती वाजले मिस देसाई... सुजय जरा आवाज वाढवून विचारला..........

सर 9.45..

बॅक कितीला ओपन होते....

सर..9.30 ला......

मग तुम्ही किती वाजता बॅकेत आलात....

सर 9.40....तुम्ही 10 मिनिट लेट आला आहात...

सर...ते मला थोडा उशिरर...

रेवा चे बोलणे मध्येच थांबवत सुजय तिच्यावर ओरडला....उशिर होण्याची कारणं चालणार नाहीत.... मला उशिर झालेला आजीबात चालत नाही...वेळेतच आल पाहीजे...बॅक 9.30 उघडते तर शार्प 9.30 ला इथे टच हव..ओके....

🎭 Series Post

View all