बावरे मन...भाग-65

बावरे मन..भाग 65 (बोला मॅडम काय घ्याल चहा कॉफी............सुजय काही नको.......तुला अजुन किती वेळ लागणार आहे...

बावरे मन..भाग 65

(बोला मॅडम काय घ्याल चहा कॉफी............सुजय

काही नको.......तुला अजुन किती वेळ लागणार आहे.........राधिका

का ग.........सुजय

सांग ना...........राधिका....

दहा-पंधरा मिनिट लागतील......पण का......सुजय)

आता पुढे...

आपल्याला एके ठिकाणी जायच आहे.........राधिका

कुठे..........सुजय

सांगेन काय गडबड आहे एवढी.........राधिका

बर.....हे काम तर करतो ना.......सुजय

बर...........राधिका

एक फाईल रेवाला दयायची असते.....पण रेवा तर बोलत नाहीये निट काय करु असा विचार सुजय करत असतो.......असुदे ती व्यवस्थित बोलत नाहीये म्हणुन  पण तसाच वागु का......मी तिला फोन करुन बोलावुन घेतो......

सुजय रेवाच्या डेस्कवर फोन करतो.........रेवा..केबिनमध्ये ये.......काम आहे......सुजय

ओके सर............रेवा

रेवाला का बोलवलास......अग ही फाईल दयायची आहे ना......सुजय

ओके....राधिका.......

मे आय कम इन सर.........रेवा

एस कम इन रेवा..........सुजय

सर तुम्ही बोलावलात.......रेवा

हो.......ही फाईल घे आणि उदया पर्यत हयाचे रिपोर्ट मला दे.........सुजय

ओके सर........रेवा

ये रेवा सर काय ग......सुजय म्हणायच ना......राधिका

अग सर आहेत म्हटल्यावर सरच म्हणायला हव ना........रेवा थोड तुटकपणे बोलते......

बर...राधिका

राधिका निघायच झाल माझ काम........सुजय

हो निघुया......बाय रेवा.......राधिका

बेस्ट लक राधिका..............रेवा

थॅक्स......राधिका......

हिने राधिकाला बेस्ट लक का दिल असेल......सुजय विचार करत असतो......

बेस्ट लक कशासाठी.......?....सुजय

काही नाही कळेल नंतर तुला....निघुया.......राधिका

हो चालेल........सुजय

राधिका सुजयचा हात पकडते व त्याच्यासोबत बाहेर जाते.........रेवा डोळयात पाणी आणुन हे पाहत होती........कारण आज तिचा सुजय आता तिचा राहणार नव्हता....राधिका व सुजय बाहेर गेल्यावर इतका वेळ लपवुन ठेवलेल्या अश्रुंना आता वाट मिळाली...ती गुडघ्यावर बसुन रडु लागली...पण थोडयावेळाने भानावर येते.........रेवा काय करतेयस यार.....तु बॅकेत आहेस...हे अस रडतेल कोणी पाहील तर....चल बाहेर चल.......रेवा उठुन उभा राहते......इतक्यात शरद तिथे येतो.....

सुजय आता केबिनमध्ये नाहीये म्हणुन त्याने नॉक केल नव्हत......तो डायरेक्ट आत आला होता......आणि रेवाला रडतेल तो पाहतो......

रेवा मॅडम काय झाल तुम्ही रडताय का........सर काही बोलले का.....शरद

अरे नाही काही नाही झाल......ते डोळयात काही तरी गेल.....त्यामुळे डोळयात पाणी येत होत.......रेवा डोळे पुसत उडवाउडवीची उत्तरे देते....

बर.....अस म्हणुन शरद आपल्या कामाला लागतो......

रेवा चेहरा हसरा करत बाहेर येते.....बऱ्यापैकी स्टाफ गेला होता.....त्यामुळे रेवा सुध्दा आवरुन घरी जायला निघते....

रेवा सुजयचा विचार करत करतच रोड वर येते.......आता पोहचले असतील ना ते......राधिका विचारली असेल का सुजयला.......आणि सुजय हो म्हणेल का..........का बोलणार नाही.....राधिका आवडतेच ना त्याला....मघाशी जाताना हातात हात घालुन वगेरे गेलाय म्हटल्यावर.....रेवा हया विचारात एवढी गुंग होती की ती मागुन एक गाडी येत होती आणि मगाच पासुन हॉर्न देतेय तरी ही बाजुला होत नव्हती.......ती गाडी रेवाच्या अगदी जवळुन जाते....तशी रेवा दचकते........ओ मॅडम जीव जास्त झालाय का........अस तो माणुस बोलुन पुढे जातो...

रेवा तशीच एकटक पाहत राहते......तिथेच शेजारी एक बाई उभ्या होत्या....त्या रेवा जवळ येते...बाळ काही होतय का तुला.......तब्बेत बरी नाहीये का......

नाही नाही मी ठिक आहे.....थॅक्स....मी जाते........रेवा

रेवा बस स्टॉप वर येते......आणि रिक्षा  करुन घरी जाते.

****

राधिका कुठे आणली आहेस तु......सुजय

अरे चल ना सांगेन तुला.......राधिका

राधिका सुजयला घेवुन एका हॉटेलमध्ये आलेली असते....त्या हॉटेलच्या गार्डनमध्ये खुप छान पध्दतीने डेकोरेशन केल होत......छान टेबल सजवल होत.....आणि बरच छान छान गोष्टी केल्या होत्या......

ये सुजय..........राधिका सुजयला घेवुन गार्डनमध्ये येते....ते सर्व डेकोरेशन पाहुन सुजयला काही कळतच नाही.........

राधिका हे सगळ काय आहे......सुजय

सांगेन सुजय चल आधी आपण काही तरी खाऊन घेवुया...राधिका

बर.....सुजय

थोडावेळ स्नॅक्स आणि कोल्ड्रिंग घेतल्यानंतर राधिका बोलायला सुरवात करते......

सुजय मला तुला काही तरी महत्वाच सांगायच आहे......राधिका

हो बोल ना मी मगाच पासुन तेच तर विचारत आहे....पण तु नंतर नंतर च करत आहेस.....सांग आता

हम........सुजय मी खुप दिवस झाले सांगायच म्हणत होते...पण धाडसच झाल नाही.....राधिका बोलत बोलत उठुन उभी राहते......आण सुजयकडे पाठ करुन बोलु लागते.....

राधिका उभी राहिली तशी सुजय सुध्दा उठुन उभा राहिला......आणि राधिका काय म्हणतेय हे ऐकु लागला...

पण आज ठरवल काही पण होवु दे आज बोलायचच......अस म्हणत राधिका सुजयकडे पाहते...आणि टेबलवरील एक रोज घेवुन गुडघ्यावर बसते........सुजय Will You Marry Me.......

राधिकाचे हे बोलण ऐकुन सुजयला शॉकच बसतो........पण सुजय थोड भानावर येत बोलतो.......म्हणजे तुला हे सांगायच होत....

हो.....खुप दिवस झाले तुला सांगायच म्हणत होते पण कस सांगायच तेच कळत नव्हत....राधिका गुडघ्यावर उठुन उभा राहते..आणि सुजयचा हात हातात घेते.....

सुजय खरच खुप प्रेम करते रे मी......नाही राहु शकत तुझ्याशिवाय.....खुप प्रेम करते....राधिका हे सर्व बोलत असते....

सुजय राधिकाला सांगणार असतो की मी तुझ्यावर प्रेम करत नाही.......रेवावर करतो.....पण तो थांबतो......

नाही अस डायरेक्ट नाही सांगु शकत हीला.....जर मी नाही बोललो आणि परत ही मामा गेला तेव्हा जशी वागायची तशी वागायला लागली तर......परत एकटी एकटी राहु लागली तर....नाही सुजय आता काहीच बोलु नको तिला.....दोन दिवस जाऊदेत मग शांतपणे तिचा मुड पाहुन सांगुया.....सुजय मनातल्या मनात सगळ बोलत होता.......

सुजय कुठे हरवलास.......राधिका

आ........काही नाही..तु अस अचानक बोललीस ना म्हणुन थोडा विचार करत होतो.....सुजय

अचानक म्हणजे माझ अजुन सुध्दा धाडस झाल नसत तुला सांगायच......रेवामुळे शक्य झाल.....राधिका

रेवामुळे म्हटल्यावर सुजय राधिकाकडे पाहतो.....म्हणजे.......सुजय

अरे म्हणजे मी रेवाशी बोलले होते हयाच्याबद्दल...मग तिच्याशी बोलल्यावर मला तुला विचारयच धाडस झाल.....राधिका

म्हणजे रेवाला हे सगळ माहीत होत.........सुजय मनातल्या मनात बोलत होता....आणि त्याला रेवाने दिलेल बेस्ट लक आठवल...म्हणजे रेवाला सगळ माहीत होत ही राधिकाला सपोर्ट करत होती......सुजय मनातल्या मनात बोलत त्याच्याच विचारात होता........राधिकाच बोलण सुरुच होत...

सुजय माझ्याशी लग्न करशील ना.......मी आवडते ना तुला.....राधिका बोलत सुजयला विचारात होती...

आणि सुजय विचाराच्या नादात हो म्हणुन टाकतो............

काय....खरच थॅक्स सुजय.......अस म्हणुन राधिका सुजयला मिठी मारते.....राधिकाने अशी मिठी मारल्यावर सुजय आपल्या ‍ विचारातुन बाहेर येतो.....आणि तेव्हा त्याच्या लक्षात येत की मी विचाराच्या नादात तिला हो बोलुन गेलोय......अरे यार.....हे मी काय केलो.....आता हिला कस सांगु......शट यार.......आता तर हिला काही बोलु शकत नाही...दोन दिवस होवु देत मग मी शांतपणे बोलेन तिच्याशी......बोलल्यावर ती समजुन घेईल..........सुजय मनातल्या मनात बोलत असतो.....

राधिका जाऊया का आपण सुजय राधिकाला बाजुला करत बोलतो......

हो चालेल.....राधिका

***

हॅलो रेवा........एक ना गुड न्युज आहे........राधिका

कोणती गुड न्युज......रेवा थोड मन घट्ट करुन बोलते....कारण तीला थोडा अंदाज होताच......

रेवा सुजय हो म्हणाला........राधिका

हे ऐकल्यावर रेवाच्या डोळयात पाणी आल...........पण आई बघेल म्हणुन ती पटकण पाणी पुसते.....आणि राधिकाशी बोलु लागते....

अरे वा........मस्तच की......कॉग्रच्युलेशन राधिका......रेवा

थॅक्स रेवा........हे तुझ्यामुळेच होवु शकल आहे....तुझ्याशी बोलल्यावर माझ धाडस झाल सुजयशी बोलायच....थॅक्स रेवा...........राधिका

अग थॅक्स काय ग......मैत्रिण म्हणतेस ना......मग येवढ करु शकतेच ना ग तुझ्यासाठी......रेवा

हो ग.....तरी पण थॅक्स म्हणावस वाटल ग म्हणुन म्हणाले........राधिका

बर.....चला आता तुम्ही एन्जॉय करा मी ठेवते आता फोन.......रेवा

ओके बाय.......राधिका

राधिकाशी बोलल्यावर रेवा तिच्या रुममध्ये येते.....आणि मगाच पासुन अडवलेले अश्रु बाहेर पडु लागले......रेवा हुंदके देत रडु लागली....आणि तशीच रडत झोपी जाते.......

***

दुसऱ्या दिवशी सुजय बॅकेत गेल्यावर राधिका माधवीताईशी बोलायला येते......

ये आत्तु ऐक ना मला तुझ्याशी बोलायच आहे...राधिका

हो बोल ना....मी ऐकतेय.........माधवीताई किचनमध्ये काम करत बोलत असतात....

अस नाही तु चल माझ्यासोबत बाहेर......आपण हॉलमध्ये बसुन बोलु.....राधिका

अग बोल ना इथेच.......माधवीताई

आत्तु मला महत्वाच बोलायच आहे ग चल ना.....राधिका

बर बाई चल.........दोघी बाहेर येतात.....हा बोल आता.....माधवीताई

आत्तु काल ना मी आणि सुजय बाहेर गेलो होतो......राधिका

हे सांगायच होत होय तुला....अग त्यात काय एवढ तुम्ही काय पहिल्यांदा बाहेर गेला होता काय........माधवीताई

अग ऐक तर आधी.........राधिका

बर बोल........माधवीताई

मी ना काल सुजयला प्रपोज केल..........लग्नासाठी..........राधिका

काय.......तु आणि सुजय..........अग मी हयाचा कधी विचारच केला नाही......माधवीताई

पुढे तर ऐक.......सुजयने मला होकार दिला.......राधिका आनंदाने सगळ सांगत होती......

काय.....खरच.......मी खुप खुश आहे......सुनांच सुख काय देव लगेच लगेच देत आहे की..........माधवीताई

सुन बोलल्यावर राधिका थोडी लाजते..........

अग बाई तुला लाजता पण येत..........काय ग आत्तु......अस म्हणत राधिका माधवीताईना मिठी मारते.....

अहो आलात तुम्ही.........अगदी वेळेवर आलात........माधवीताई

एवढी का वाट पाहत होता माझी.....आनंदराव

मला तुम्हाला काही तरी सांगायच आहे.....माधवीताई

हो बोल........माधवीताई

आता माधवीताई सगळ आनंदरावांना सांगतील म्हणुन राधिका लाजुन तिच्या रुममध्ये जाते......

अग बाई ही परत लाजली.........माधवीताई

लाजायला काय झाल हिला......आनंदराव

तेच तर सांगायच आहे तुम्हाला.........काल हिने सुजयला प्रपोज केल म्हणे आणि मेन म्हणजे सुजय ने होकार पण दिला म्हणे..........माधवीताई

काय.....खरच......अरे वा.......हे छान झाल की........मग माधवी आपल्याला दुसरी सुन पण येणार लवकर....आनंदराव

हो ना.......माधवीताई

मी काय म्हणतो....माधवी......आनंदराव

काय......माधवीताई

जास्त वेळ न घालवता आपण हयांचा साखरपुडा केला तर.....लग्नाच काय नंतर पाहता येईल....आनंदराव

लगेच....माधवीताई

हो काय होतय........आजकाल सगळया गोष्टी लवकरच झालेल बर असत......मुलांचा विचार कधी बदलेल सांगता येत नाही....

अहो पण आशु स्नेहा बाहेर गेलेत फिरायला.......मग कस करायच.......माधवीताई

***

क्रमश:

पुढचा भाग 4/11/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all