बावरे मन...भाग-7

बावरे मन..भाग 7 (May I Coming Sir…….. Yes Coming…Miss. Desai…Have a Sit) आता पुढे..... सुजयच्या समोर एवढया फाईल्स बघून रेवाला क?

बावरे मन..भाग 7

(May I Coming Sir……..

Yes Coming…Miss. Desai…Have a Sit)

आता पुढे.....

सुजयच्या समोर एवढया फाईल्स बघून रेवाला काही समजेना......एवढया फाईल्स का काढल्या असतील हयाने.......असा विचार करत असते तेवढयात सुजय बोलायला लागतो.........

मिस. देसाई.....हया सर्व लोन ‍डिपार्टमेंन्टच्या  फाईल्स आहेत........हया सर्व मी चेक केल्या आहेत...... खुप काम पेन्डिंग आहे....आणि हे सर्व काम 1 महिन्यात Complete करायच आहे.........काल Aria Manger sir फोन केले होते......त्यानी 1 महिन्याचा वेळ दिले आहेत......

पण सर एवढ काम कस पुर्ण होणार.......ह्यातील 60% काम तर राकेशच आहे......आणि तो तर सुट्टीवर आहे.......मग कस पुर्ण होणार......

राकेशची येण्याची वाट नाही बघू शकत आणि त्याला बोलवू ही नाही शकत.....त्यामुळे हे काम आपल्यालाल करायच आहे.......

आपल्याला म्हणजे......रेवा जरा शॉक होवून विचारते..........

मी आणि तुम्ही...........

सर तुम्ही...?.........

हो.......मी... त्याशिवाय 1 महिन्यात हे काम नाही पुर्ण होणार.......

पण सर तुमच्यासोबत.....अस म्हणून रेवा थांबते..........

मिस देसाई तुम्हाला माझ्यासोबत काम करायला काही प्रॉबलेम आहे का.......

सर ते ते.....नाही......आहे तर कस बोलणार डायरेक्ट... गप्प बसलेल बर....रेवा मनातल्या मनात बोलली......

आणि प्रॉबलेम असला तरी..........तुम्हाला काम करावच लागणार आहे......तुमच्याजवळ दुसरा ऑपशनच नाहीये........कारण लोन डिर्पाटमेंन्ट मध्ये फक्त तुम्ही आणि राकेशच आहात........आता तो नाहीये....तर तुम्हालाच कराव लागणार आहे........

ओके सर...........रेवा तोंड पाडून बोलते.......

बर शरद ला सांगुन ह्या सगळया फाईल्स तुमच्या डेस्कवर घेवून जा....आणि कोणाच कीती काम पेन्डिंग आहे.....कोणाचे कोणकोणते डॉक्युमेंन्ट राहीलेत.......नविन कीती लोन सॅगशन करायच आहे.....हया सगळयाची लिस्ट काढा....आणि हे आजच्या आज व्हायला हव...........

आजच्या आज.....रेवा शॉकच होते......

हो आजच्या आज..... कीती पण वेळ होऊदे पण पुर्ण करायच......

ओके सर......

आता येवू शकता तुम्ही....

रेवा बाहेर येते...व शरद ला बोलवते....शरद सरांच्या टेबलवरच्या सगळया फाईल्स माझ्या डेस्कवर आणून ठेव.......

ओके रेवा मॅडम.......शरद

शरद ला सांगुन रेवा तीच्या डेस्क वर येवून बसते....

रेवा मॅडम ह्या घ्या फाईल्स.........शरद

ठेव इथे.....

 रेवाच्या डेस्कवर एवढया फाईल्स बघुन सगळा स्टाफ शॉकच होतो...ते बघुन स्नेहा रेवाच्या डेस्क जवळ येते........

काय ग हे रेवा एवढया फाईल्स......

बग ना यार.......हया सरांला काय प्रॉबलेम आहे माझ्याशी काय माहीत.......

अग पण काय झाल..........

हया सगळया फाईल्स ची माहीती आजच्या आज काढायची म्हणे.........

आजच्या आज........? हा काय वेडा झालाय काय ग........

बग ना ग......बर नंतर  बोलूया कामाला लागते......नाही तर पुर्ण झाल नाही म्हणून पुन्हा ओरडायला लागेल........

मी काही मदत करु का ग रेवा...

अग नको.....परत तुला पण ओरडा नको.......तुझ पण काम पेन्डिंग रहायला नको......करते जा मी...

बर......Best Luck….

Thanks....रेवा

रेवा कामाला लागते........कामात एवढी मग्न होते की तीला लंच टाइम झालाय हे ही कळल नाही.....स्नेहाच्या ते लक्षात आल...........ती रेवाला बोलवायला आली.......

ए रेवा चल जेवायला....लंच टाइम झाला......

स्नेहा मला भुक नाही..तु जेऊन घे......

अग रेवा नंतर काम कर ग पहीला  जेवून घे चल.....

अग स्नेहा खरच भुक नाहीये मला.........

बर.........

रेवा शरदला बोलावते.....शरद मला एक कॉफी आणून दे.......

ओके मॅडम.........

अग ए......आधीच 4 कप कॉफी घेतली आहेस......आणि परत.......

हो ग स्नेहा........

कॉफी घेतल्याशिवाय मला काम करायला सुचत नाही ग...

हममम...एवढी कॉफी घेतल्यानंतर कशी भुक लागेल...

बर मग मी जाते जेवायला.......

हो जा.......बर ऐक......हा माझा पण डबा घेऊन जा.....खा सगळेजण.........

बर........

रेवाच बऱ्यापैकी काम आवरत होत........ऑफिस टाइम पर्यत होईल अस वाटत होत....तेवढयात शरद रेवा जवळ येतो..........

रेवा मॅडम सरांनी तुम्हाल बोलवल आहे..........

बर.......

लिस्ट काढुन झाली आहे का विचाराचला बोलवले असतील.......ह्याला तर गडबडच सगळयाची.......थोड आहे का हे काम.... रेवा बडबडत केबिन मध्ये जाते.....

May I Coming Sir…..Yes Coming

झाल का काम मिस देसाई

सर थोडच आहे.......होइल थोडयावेळात.......

ओके.........

त्यामध्ये आणखीण एक पॉइन्ट ॲड करा.......

कोणता पॉइन्ट...रेवा एवढस तोंड करुन म्हणते....

त्या सगळयांची पर्सनल माहीती ही ॲड करा........

सगळयांची......

हो.......

ओके सर......रेवा बाहेर येते......

🎭 Series Post

View all