बावरे मन...भाग-8

बावरे मन..भाग 8 (हो....... ओके सर......रेवा बाहेर येते......) आता पुढे...... काय यार हा ......आधी सांगायला काय झाल ह

बावरे मन..भाग 8

(हो.......

ओके सर......रेवा बाहेर येते......)

आता पुढे......

काय यार हा ......आधी सांगायला काय झाल होत हयाला.....आता परत सगळया फाईल्स चेक करु का......रेवा एवढस तोंड करते व आपल्या डेस्क वर येते.........आणि काम करु लागते.....

ऑफिस टायमिंग संपत......सगळे जायची तयारी करतात.......स्नेहा सुद्धा आवरुन रेवाला बोलवायला येते....

रेवा आवरल तुझ.. चल जाऊया........

अग कुठल आवरतय.....अजुन मला वेळ लागेल.......तु जा मी नंतर येईन.....

मी थांबू का ग थोडी मदत पण करते तुला.....

अग नको...जा तु.....थोडयावेळात येईन मी......परत तुला ही घरी काम आहेच ना...जा तू......

बर जाते मी.......पटकन आवर आणि जा घरी.......

हो जाते.....रेवा

सगळा स्टाफ निघून गेला.......ऑफिसमध्ये फक्त रेवा सुजय व शरद तिघेच होते...सुजय सुद्धा काम करत थांबला होता........

तासाभरात रेवाच काम आवरल...व ती लिस्ट घेऊन सुजयच्या केबिनमध्ये जाते....सर झाली लिस्ट काढून....

ओके Good...

बाकीच सगळ तुम्हाला उद्या सांगतो कस काय काम करायच......

ओके सर.......

रेवा काम आवरुन घरी पोहचते..........मालतीताई तिचीच वाट बघत बसलेल्या असतात....

अग रेवा आज एवढा का वेळ..........आणि वेळ होणार होता तर एक फोन करता येत नाही का....

अगं आई ऐक तर आधी.........

हममम......बोल.......

अग आई आज सरांनी मला खुप काम दिल होत....ते पुर्ण करायलाच वेळ झाला.........आणि काम लवकर आवरायच्या नादात मी फोन करायलाच विसरले........सॉरी आई यापुढे वेळ होणार असेल तर फोन करत जाईन........

बर.....फोन करुन सांगायच ग काळजी वाटते.........

सॉरी ना ग आई.....Next Time नक्की सांगेन..........

बर......जा फ्रेश होऊन ये जा......तुला चहा देते.......

आई चहा नको काही तरी खायलाच दे भुक लागलेय........बर आवरुन ये देते.........

सुयज ही घरी येतो......माधवीताई त्याला पाणी देतात.......आज तो खुप दमलेला असतो........

खुप काम होत का रे.........माधवीताई

हो ग आई..आता महिनाभर खुप काम आहे........रोज वेळच होणार यायला......

बर.......तु फ्रेश होऊन ये मी चहा करते तुला......माधवीताई

बर आलोच.......सुजय

सुजय फ्रेश होऊन येतो.........माधवीताई त्याला चहा देतात......

आई आज जेवण लवकर कर....जेवून लवकर झोपेन........उदया बॅकेत लवकर जाणार आहे....

बर तु थोडा वेळ आराम कर.. मी बनवते जेवण.....सुजय लवकर जेवुण झोपी जातो.......

रेवा सुध्दा खुप दमलेली असते त्यामुळे जेवुन लवकर झोपते......

सकाळी लवकर सुजय बॅकेत पोहचतो....

शरद मिस देसाई आल्या की त्यांना ‍कस्टमरची लिस्ट घेवुन माझ्या केबीनमध्ये पाठव.....सुजय

ओके सर....शरद

थोडयावेळाने रेवा येते.....आपल्या डेस्क वर येवुन बसते व काम करायला सुरवात करते.......

रेवा आलेली बघुन शरद तिथे येतो......रेवा मॅडम सरांनी तुम्हाला कस्टमरची लिस्ट घेवुन केबीनमध्ये बोलवल आहे........

ओके शरद.....रेवा

 रेवा काल काढलेली कस्टमरची लिस्ट घेऊन केबिन मध्ये येते......सर  ही लिस्ट .......

मिस. देसाई....उदया पासुन हया सर्व कस्टमरकडे आपली विजीट असेल....

उदयापासुन.....रेवा

हो......सुजय

आपली म्हणजे.....रेवा

मी आणि तुम्ही....सुजय

बर......सरांसोबत काम करायच म्हणजे..हिला टेन्शन येत....दिवसभर ह्याच्यासोबत कस काम करायच.....ती विचारातच पडली.....

उदया पासुन बॅकेत लवकर यायच......दुपारपर्यत सगळ ऑफीस वर्क करायच व दुपारी विजीटल जायच.........सुजय

ओके सर........रेवा

मी शरद कडून एक लिस्ट पाठवतो....ते तेवढे फॉर्मस तेवढे काढुन घ्या उदया सोबत घ्या.......सुजय

ओके सर.....रेवा

रेवा आपल्या डेस्कवर येते.......

शरद... सरांनी दिलेली लिस्ट घेऊन येतो..हे घ्या रेवा मॅडम.....

हो ठेव इथे...शरद ऐक ना एक कॉफी घेऊन ये ना.....हो येतो घेऊन.....

सरांनी पण सांगितल आहे आणयला.....बर आण लवकर.......

 रेवा शरद  कॉफी घेऊन येवू पर्यत सरांनी दिलेल्या लिस्ट नुसार सगळे फॉर्म काढून ठेवते.......

तेवढयात शरद सुजयला कॉफी देवुन रेवाला दयायला येतो....हे घ्या मॅडम कॉफी.........

थॅक्स शरद....रेवा

वेलकम मॅडम......शरद

रेवा कॉफी घेत स्नेहच्या डेस्कजवळ जाते....स्नेहा आवरल काम......

आहे अजुन.....आज कस्टमर खुप आहेत ना ग....त्यामुळे वेळ लागतोय .....तुला का बोलावल होत सरांनी........

🎭 Series Post

View all