बावरे मन...भाग-72

बावरे मन..भाग 72 (आई मला काही नको......आकाशसाठी तेवढच पाठव........सुजय काकु मला पण नको काही...........आकाश अरे ??

बावरे मन..भाग 72

(आई मला काही नको......आकाशसाठी तेवढच पाठव........सुजय

काकु मला पण नको काही...........आकाश

अरे अस उपाशी राहुन कस चालेल.........माधवीताई

नाही काकु खरच नको.......काही खायची इच्छा नाहीये.........आकाश

आई अग नको........काही वाटलच तर आम्ही कॅन्टीनमध्ये काही तरी खाऊ........सुजय)

आता पुढे....

बर.....काळजी घ्या.......आणि काही लागल तर लगेच फोन करा........रेवा शुध्दीत आली तर कळवा......माधवीताई

हो आई.........सुजय

सगळे घरी जायला निघतात.......स्नेहा सुजयला थोड बाजुला घेवुन जाते........सुजय काळजी करु नकोस सगळ व्यवस्थित होईल रेवा शुध्दीवर येईल.......स्नेहा

हम........वहिनी मला एक सांग.....रेवा तिथे काय करत होती............सुजय

तुला थांबवायला आली होती......स्नेहा

म्हणजे..........सुजय

स्नेहा मग घडलेला सगळा प्रकार सुजयला सांगते.......

काय.........म्हणजे रेवा पण माझ्यावर प्रेम करते..........सुजय

हो सुजय........त्यासाठी तर धावत तुला थांबवायला आली होती......आणि हे काय होवुन बसल........अस म्हणुन इतकावेळ खंबिर असलेल्या स्नेहाच्या डोळयात पाणी आल.......

वहिनी माझ्या रेवाला काही नाही होणार.......मी काही होवुच देणार नाही........सुजय

हो काही नाही होणार रेवाला.........बर चल मी जाते.......आई बाबा वाट पाहत असतील बाहेर.......काळजी घ्या......आणि काही लागल तर फोन कर.......स्नेहा

हो.......सुजय

सुजय व आकाशची सकाळपासुन खुप धावपळ झाली होती दोघेही खुप दमले होते.....सुजय आकाश जवळ जातो........

आकाश तु खुप दमला आहेस थोड फ्रेश होवुन ये जा ना.....आणि काही तरी खावुन पण घे थोङ......सुजय

नाही सुजय मला भुक नाहीये........आकाश

आकाश अस कस करुन चालेल......थोड खाऊन ये जा ना.....सुजय

नाही सुजय मी रेवाला सोडुन कुठेही जाणार नाहीये........आकाश

आकाश.....मी आहे ना....तु नको काळजी करु....जा फ्रेश होवुन थोड खावुन ये जा.....सुजय

अरे पण........आकाश

पण वगेरे काही नाही......जा बर तु......सुजय

बर......पण रेवाकडे लक्ष दे हा.....आकाश

हो आकाश तु नको काळजी करुस......मी आहे......सुजय

हमम.....मी आलोच.........आकाश

आकाश गेल्यावर सुजय एकदा रेवाला पहायला जातो.....बाहेरुनच काचेतुन रेवाला पाहत असतो.......पण त्याला रेवाला जवळुन पहायच असत.....तो रेवाला काचेतुन पाहत असताना आतुन एक नर्स बाहेर येत असते......

नर्स मी थोडयावेळासाठी आत जाऊ शकतो का.....प्लीज.......सुजय

नाही......डॉक्टरांनी कोणाला आत पाठवुन दयायच नाही म्हणुन सांगितल आहे........नर्स

नर्स प्लीज......मी फक्त पाच मिनिटात जाऊन बाहेर येईन प्लीज.......प्लीज नर्स.........सुजय त्या नर्सला कन्विन्स करत होता.......

सुजयचा एवढासा चेहरा पाहुन व त्याची तगमग पाहुन ती नर्स तयार होते.........ओके तुम्ही जाऊ शकता....पण पाच मिनिटात बाहेर या नाही तर डॉक्टर मला ओरडतील.....नर्स

हो नर्स मी पाच मिनिटात बाहेर येईन...थॅक्स नर्स.........अस म्हणुन सुजय आयसीयु मध्ये जातो.....रेवाला अस पाहुन त्याला रडायला यायला लागल.....तो रेवाजवळ जातो........

सुजय रेवाचा हात हातात घेतो.......आणि तिला एकटक पाहत राहतो...........रेवा उठ ना प्लीज माझ्यासाठी........प्लीज रेवा.......उठ ना रेवा प्लीज........सुजय रडत रडत बोलत होता.....

ती नर्स परत येते......पाच मिनिट झाली तुम्ही प्लीज बाहेर जा......डॉक्टर येतील आता.......नर्स

सुजयला तेथुन जावस वाटत नव्हत पण दुसरा ऑपशन नव्हता.......तो रेवाचा हात इच्छा नसताना खाली ठेवुन बाहेर येतो.....व काचेतुन रेवाला पाहत राहतो......

तेवढयात मागुन आकाश येतो.........सुजय.......आकाशचा आवाज ऐकुन सुजय पटकन आपले डोळे पुसतो.....

आलास तु..........सुजय

हो.......रेवा ठिक आहे ना...........आकाश

हो ठिक आहे.....पण अजुन काहीच हालचाल करत नाहीये........सुजय एवढस तोंड करुन बोलतो.....

आकाशसुध्दा रेवाला बाहेरुनच काचेतुन पाहत राहतो....रेवाला आशा अवस्थेत पाहुन त्याच्यासुध्दा डोळयात पाणी येत.......

***

मालतीताई व रमाकांतरांवाची पण काही वेगळी अवस्था नव्हती.....मालतीताई तर आल्यापासुन नुसत्या रडत होत्या.....आल्यापासुन घरच्या देवाऱ्याजवळ बसुन होत्या....रेवा बरी होवु दे अशी प्रार्थना करत होत्या....

मालतीताई चला थोड जेवुन घ्या.......तुम्ही काहीच खाल्ल नाहीये.......माधवीताई

नको माधवीताई मला काहीच नको.....मालतीताई

अहो अस कस करुन चालेल.........थोड तर खाऊन घ्या......अस उपाशी राहिला तर तुमची पण तब्बेत बिघडेल......मग रेवाला शुध्द आल्यावर तिची देखभाल कोण करणार.....सांगा पाहु........चला दोन घास खाऊन घ्या.......माधवीताई

रेवाच नाव घेतल्यावर मालतीताई आणखीन रडायला लागल्या..........काय होवुन बसल बघाना माधवीताई......माझ्या रेवाला अस कधी मी पाहीलच नाही......माझी लेक हसत खेळत असायची.......ती शुध्दीवर येईल ना ओ.......अस म्हणुन मालतीताई रडायला लागल्या......

मालतीताई अहो नका रडु आपल्या रेवाला काही होणार नाही........बघा ती ठणठणीत बरी होते की नाही........तुम्ही शांत रहा..नका त्रास करुन घेवु.....माधवीताई

काकु रेवाला काही नाही होणार.....आपला बाप्पा तिला काही होवु देणार नाही......मी सांगितलय बाप्पाला रेवाला लवकर बर कर............आध्या पण डोळयात पाणी आणुन मालतीताईची समजुत काढत होती.....

हो काकु रेवाला काही नाही होणार......ती लवकर बरी होईल...........प्लीज तुम्ही थोड खावुन घ्या.....नंतर रेवाला कळल ना तुम्ही जेवला नाही तर ती आम्हालाच ओरडेल.....माझ्या आईला काही खाऊ पण घातल नाही का म्हणेल.......राधिका

काकु प्लीज चला ना थोड खाऊन घ्या........आध्या

आध्या व राधिकाला पाहुन मालतीताईना रेवाचा भास झाला.......हो ग बाळानों.....तुम्ही पण माझ्या रेवासारख्याच मला......तुमच नाही ऐकलो तर रेवा मला पण ओरडेल.......मालतीताई आध्या व राधिकाला मिठी मारुन रडु लागल्या......

*****

पाहता पाहता सकाळ कधी झाली कळलच नाही......सगळे लवकर हॉस्पिटलमध्ये आले....सगळे रेवा शुध्दीवर येण्याची वाट पाहत होते......डॉक्टर पण सारखे रेवाला चेक करत होते.......पण रेवाच्या कन्डिशनमध्ये काहीच फरक नव्हता.....ती काही हालचालच करत नव्हती.......

आता सगळयांना टेन्शन येवु लागल होत....चोविस तास संपायला आता फक्त तासभरच उरला होता....पण रेवा काहीच रिसपॉन्स करत नव्हती....मालतीताई तर जास्तच रडायला लागल्या..रमाकांतराव व आकाशची काही वेगळी अवस्था नव्हती.....ते सुध्दा टेन्शनमध्ये होते...

सगळेच आता काळजी करायला लागले.....सुजय तर जास्तच काळजी करु लागला.....त्यालाही टेन्शन येवु लागला.........सुजची अवस्था पाहुन स्नेहा त्याच्या जवळ जाते....

सुजय नको काळजी करु येईल शुध्दीवर......आजुन तासभर आहे सुजय.........स्नेहा

वहिनी आता फक्त तासभरच राहिला आहे......मला खुप टेन्शन येत आहे ग.......येईल ना रेवा शुध्दीवर.....सुजय

नको काळजी करु सुजय.....येईल रेवा शुध्दीवर.............बाप्पा आहे ना......तो सगळ व्यवस्थित करेल.....

स्नेहाच्या तोंडात बाप्पाच नाव ऐकताच...........वहिनी मी आलो........अस म्हणुन सुजय तेथुन निघुन जातो.....

सुजय कुठे चालायस......ऐक तर.....सुजय..........स्नेहा मागुन ओरडते पण सुजय काहीच ऐकत नाही तो तसाच पुढे निघुन जातो.....

स्नेहाला सुजयच्या अशा जाण्याने टेन्शन येत.....ती तशीच सुजयच्या मागे जाते......पुढे जाऊन पाहते तर सुजय बाप्पाला नमस्कार करत होता....

बाप्पा मी इतक काय वाईट केलय का वागतोयस माझ्याशी असा........आता कुठे मला माझी रेवा भेटणार होती........तर तिला माझ्यापासुन का दुर करतोयस.....का करतोयस असा........का इतका वाईट वागतोयस माझ्याशी........मी कोणाच काय इतक वाईट केलय......ज्याची शिक्षा मला असा देतोयस......सांग बाप्पा.......सुजय रडत बोलत होता........सुजयचे हे शब्द ऐकुन स्नेहाच्या डोळयात पाणी येत......

बाप्पा तु माझ्या रेवाला माझ्यापासुन दुर नाही करु शकत.........सुजय

सुजय बाप्पा तुला तुझ्या रेवापासुन दुर नाही करणार......स्नेहा मागुन येत बोलते.....

वहिनी रेवा आली का शुध्दीवर.......स्नेहाला आलेल पाहुन सुजयला वाटत रेवा शुध्दीवर आली आहे.....

स्नेहा एवढस तोंड करत नाही बोलते...सुजय फक्त थोडाच वेळ राहिला......आता रेवा शुध्दीवर नाही आली तर.........अस म्हणुन स्नेहा रडु लागली.........

का नाही येणार शुध्दीवर........तीला शुध्दीवर यावच लागेल.......माझ्यासाठी.......माझ्या प्रेमासाठी तिला शुध्दीवर यावच लागेल......यावच लागेल तिला......कशी येत नाही बघतोच आता.........अस म्हणत सुजय आयसीयू कडे जाऊ लागला...........

सुजय थांब काय करतोस......सुजय ऐक.........काय करतोयस सुजय..........स्नेहा सुजयच्या मागुन जात होती......

सुजय सरळ आयसीयुमध्ये जावु लागतो.......नर्स त्याला खुप आडवायचा प्रयत्न करते पण सुजय ऐकण्याच्या मनस्थित नव्हता......तो त्या नर्सला न जुमानता आयसीयु मध्ये जातो........आणि रेवाजवळ जातो.......

मागुन नर्स त्याला ओरडत असते.......त्याला सांगत असते......डॉक्टर हयांना मी खुप आडवल पण हे माझ ऐकतच नाही......ती नर्स डॉक्टरांना सांगत म्हणाली.......

डॉक्टर प्लीज मला रेवाशी बोलायच आहे...प्लीज डॉक्टर.................प्लीज....सुजय

अहो पण अस नाही करता येत..........हयाचा पेशन्टवर काही परिणाम झाला तर कोण जबाबदार असणार......डॉक्टर...........

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all