बावरे मन...भाग-11

बावरे मन..भाग 11 (अहो.....नाही दुसरी बॅक आम्हाचा 4 दिवसात लोन देतो बोलली आहे.......सुजय त्याला खुप समजाव?

बावरे मन..भाग 11

(अहो.....नाही दुसरी बॅक आम्हाचा 4 दिवसात लोन देतो बोलली आहे.......सुजय त्याला खुप समजावतो पण तो काही तयार होत नसतो......शेवटी रेवा सुजयला विचारते सर मी बोलू का......हा बोला ना.......)

आता पुढे...

मिस्टर शहा.....दुसरी बॅक तुम्हाला जेवढ लोन देणार आहे त्याच्या पेक्षा आम्ही जास्त देतोय......आणि व्याजदर ही त्याच्यापेक्षा कमी आहे.....आणि लोन बाबतचे फायदे खुप आहेत...

रेवा खुप चांगल्या प्रकारे त्यांना समजावते.....आणि ती पार्टी तयार ही होते.......सुजय रेवाकडे बघतच राहतो......

किती मस्त समजावुन सांगितल हीने.....1 तास झाल या मानसाला समजावतोय हा तयार होत नव्हता आणि हीन 15 मिनिटात त्याला तयार केल......सुजय मनातल्या मनात बोलत होता......सुजयला तिची काम करण्याची पद्धत आवडली.....

मिस्टर. शहांच राहीलेले डॉक्यूमेंन्ट घेवुन त्यांच्या लोनच फायनल करुन ते निघतात.....

एकएक कस्टमरच काम करेपर्यत संध्याकाळ होते.....बाकीच काम आता उदया करुया.....आता जाऊया घरी सुजय रेवाला सांगत गाडित बसतो.....मिस देसाई तुम्हाला मी कुठे ड्रॉप करु.....

सर मला बॅकेच्या स्टॉप वर सोडा मी जाईन तिथून रिक्षाने...

अहो नको मी सोडतो घरी खुप वेळ झालाय......रेवा ला हे ऐकून आर्श्चय वाटत....

खडूसला काळजी पण करता येते म्हणायची........ती मनातल्या मनात बोलली.....बर..

मिस देसाई तुमची काम करण्याची पध्दत आवडली मला.... तुम्ही एवढ चांगल convenience करता माहित असत तर आधीच्या 3 कस्टमर तुम्हालाच हॅडल करायला सांगितल असत......

समोरच्या कस्टमरला समजावण्याची पद्धत आवडली मला....

(हा खडूस माझ कौतुक करतोय.......रेवा ला आर्श्चयच वाटल.....) थॅक्स सर....

सुजय रेवाला घरी सोडतो......व उद्या 8 ला या म्हणून सांगतो..........ओके सर......

रेवा घरी येते.....आज ती खुप दमलेली असते........त्यामुळे जेवुन झोपी जाते.....

सुजयची पण सेम कंन्डीशन असते.....तो ही लवकर झोपी जातो......

दुसऱ्या दिवशी दोघेही लवकर बॅकेत येतात......नेहमी प्रमाणे शरदला कॉफी आणायला सांगतात.....कॉफी घेत थोडा वेळ ऑफीस वर्क करतात व विजीटला निघतात......

गाडीतच कोणत्या कस्टमरला भेटायच कोणत्या कस्टमरची डॉक्युमेंन्ट पेंन्डिंग आहेत......हे सगळ...डिसकस करुन...त्यांना भेटलायला जातात......

कालच्या सारखच रेवा कस्टमरला convenience करत असते...

सुजयलाही तिची काम करण्याची कस्टमरला समजून सागण्याची पध्दत आवडत असते...

एकएक कस्टमर करत आपल काम करत असतात.........नंतर.......एका बिजनेस लोन साठी एका कस्टमर कडे जातात....सुजय रेवालाच ते हॅडल करायला सांगतो......रेवाही हो म्हणते......

रेवा त्याच्याशी बोलत असते.....त्याला व्यवस्थित समजुन सांगत असते.....पण तो कस्टमर खुप उर्मट असतो.....रेवाशी खुप उध्दटपणे बोलत असतो..........

रेवालाही खुप राग येत असतो.......पण नायलाज म्हणून गप्प बसते.....

पण सुजय ला खुप राग येतो........तो त्याच्यावर खुप चिडतो.....

मिस्टर रावत ही तुमची बोलण्याची पध्दत बरोबर नाही.........आम्ही तुमच्याकडे आलोय याचा अर्थ तुम्ही कसही बोलाल अस होत नाही.......

गरज फक्त आम्हालाच नाहीये......तुम्हाला ही लोन ची गरज आहे म्हणून आलोय आम्ही......तुम्ही लोन साठी अपलाय केला होता......आम्ही आलो नव्हतो तुमच्याकडे.......

आणि एक महत्वाच तुम्ही एका स्त्रीशी बोलताय हे लक्षात असुदया....त्या तुम्हाला काही बोलत नाहीत ह्याचा अर्थ तुम्ही कसही बोलाल त्यांच्याशी.... अस होत नाही.....कळल....

एका स्त्री चा आदर करायला शिका........सुजय तिच्यासाठी एवढ बोलतोय हे ‍बघुन तिला आर्श्चयच वाटत......ती एकटक सुजयकडेच बघत असते........

आणि हो मिस्टर रावत..............हे लोन मीच कॅन्सल करतोय.....तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज नाहीये....चला मिस देसाई........अस म्हणुन तो व रेवा तिथून निघून जातात......... सुजय

बाहेर आल्यावर रेवा सुजयला समजवत असते.......सर तुम्ही थोड शांत व्हा.........हे पाणी घ्या.......

तो तुमच्याशी उध्दटपणे बोललेल मला अजीबात आवडलेल नाही.......हो सर तो चुकीचाच होता....पण तुम्ही शांत व्हा प्लीज............हमममम.....

रेवा त्याचा मुड शांत करण्यासाठी कॉफीसाठी विचारते.......सर कॉफी घेऊया का......तुम्हाला ही थोड बर वाटेल......आणि आपल्याला काम करायलाही थोडी एनर्जी येईल.........ओके चालेल.........

ते दोघे एका कॉफी शॉपमध्ये जातात.......वेटर ऑर्डर घ्यायला येतो.....

तुम्ही काय घ्याल.......सुजय...

सर तुम्ही करा ऑर्डर......काही पण चालेल मला.....रेवा..

मग सुजय.......वेटरला 2 हॉट कॉफी सांगतो........

थोडावेळाने दोघेही एकदमच...........तुम्हाला काम करताना कॉफी लागते ना.........अस बोलतात...

ह्यांना कस कळल या विचारात दोघेही एकमेकाकडे बघतात..........

सर तुम्हाला कस कळल...मला काम करताना कॉफी लागते........रेवा..

ते शरद तुमच्यासाठी कॉफी घेऊन येत होता तेव्हा तो बोलता बोलता बोलला......

ओ......रेवा

पण तुम्हाला कस कळल.........सुजय..

शरदने.....म्हणजे......तो कॉफी आणायला वेळ केलेला ना......तेव्हा येवढा का वेळ विचारल्यावर बोलला......बर........रेवा

सेम चॉईस.......परत दोघेही एकदमच बोलतात....हसायला लागतात..

कॉफी घेऊन दोघांनाही थोड फ्रेश वाटत.....कॉफी घेऊन दोघे पुढच्या कस्टमरकडे जातात.....

असे एकएक कस्टमर करत कसा वेळ जातो हे त्यांना ही कळत नाही......काम आवरल्यावर ते दोघे घरी जायला निघतात......

रेवा गाडीचा दरवाजा उघडत असताना तिच्या हातातुन फाईल खाली पडते.....मग ते उचलण्यसासाठी दोघेही खाली बसतात....आणि फाईल उचलताना दोघांच्या हाताचा स्पर्श होतो......

दोघेही त्या स्पर्शाने मोहरुन जातात........न कळत का होईना पण दोघानाही तो स्पर्श आवडतो.......दोघेही एकमेकांच्या डोळयात हरवुन जातात.......नंतर गाडीच्या हॉर्नचा आवाज आल्यावर दोघेही भानावर येतात........

थोडावेळ दोघेही काही बोलत नाहीत.........नंतर सुजय निघूया का अस विचारतो..........हो.......

दोघे ही जायला निघतात तेढयात  सुजयला रस्त्याच्या पलिकडे एक वृध्द आजोबा दिसतात....

1 मिनिट मिस देसाई......मी आलोच.........सुजय..

रेवाला काही कळेनाच हा कुठे जात आहे......ती त्याच्याकडेच बघत राहते.........

सुजय त्या आजोबाचा हात धरून रस्त्याच्या पलिकडे आणतो......त्या आजोबांना रस्ता ओलांडता येत नसतो.....

रेवाला सुजयची ही बाजू बघून खुप छान वाटत........आपण याला जेवढ खडुस समजत होतो तेवढा नाहीये हा..........सकाळी माझ्यासाठी त्या कस्टमरशी भांडला आणि आता हया आजोबांना मदत करतोय...........कसला भारी आहे हा.........रेवा सुजयकडेच बघत असते.......तिला सुजय साइडला आला आहे हयाच सुध्दा भान नसत.......

निघुया मिस. देसाई......... सुजय

सुजयच्या आवाजाने रेवा भानावर येते.........आ........हो सर निघुया......गाडीच दार उघडत स्वत:शीच हसते........आणि गाडीत बसते......

दोघानाही तो एकमेकांचा जाणवलेला स्पर्श सारखा आठवत असतो....... पण काही तरी विषय काढतात व बोलत बोलत रेवाच घर कधी आल हे त्यांना कळल नाही.........

उदया भेटुया म्हणुन सुजय रेवाला सोडून घरी जातो.....

रेवा घरी येते..........नेहमी सारख फ्रेश होऊन हॉलमध्ये येवुन बसते....मालतीताई रेवाला चहा देतात.......

मग रेवा कसा गेला आजचा दिवस......मालतीताई..

रेवा एक्साइट होऊन.....खुप मस्त.........

हो का.......... आज तो खुडूस ओरडला नाही होय.....मालतीताई

अगं नाही आई......मी जेवढ त्याला खडूस म्हणत होते तेवढा नाहीये तो.......

म्हणजे......रमाकांतराव रेवा ला विचारतात..........

मग रेवा सकाळी घडलेला सगळा प्रकार आई बाबा ना सांगते...........व त्या आजोबांना कशी मदत केली तेही सांगते.......

बग रेवा त्याला खडुस म्हणत होतीस......पण तो तसा नाही...........मालतीताई

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रत‍िक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all