बावरे मन...भाग-4

बावरे मन..भाग 4 (रेवा जाताना रमाकांतराव हसायला लागले........कारण त्याच्या लक्षात आल होत की रेवा का जा

बावरे मन..भाग 4

(रेवा जाताना रमाकांतराव हसायला लागले........कारण त्याच्या लक्षात आल होत की रेवा का जात आहे.....

सुजय घरी पोहचतो....घरी आल्यावर तो आईला हाक मारतो.....आई...मी आलो ग...)

आता पुढे...

आई बाहेर येते.....आलास तु.......कसा होता नविन बॅकेतला पहीला दिवस........हा बरा होता......

बरा..........? का काय झाल....त्याच्या बाबांनी विचारल....ते ‍तिथेच हॉल मध्ये बसले होते...

आई,बाबा मी पहिला  फ्रेश होवून येतो आणि मग सांगतो....

बर चालेल....तु फ्रेश होवून ये तोपर्यत मी चहा करते...बर.....आलोच...सुजय फ्रेश व्हायला गेला...

आशु सुजयला चहा करतेय तु पण ये रे...हो आलो आई......आशुतोश त्याच्या रुममध्ये काम करत बसलेला असतो....

सुजयच्या घरी....त्याचे बाबा आनंदराव.....आई माधवीताई...त्याचा मोठा भाऊ आशुतोष व लहान बहिण आध्या असे 5 जणांचे कुटंब...आनंदराव ‍शिक्षक होते...आता रिटायर्ड झाले होते..... व सुजयची आई माधवीताई घरीच असायची ...व आशुतोष एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत होता व आध्या एम.बी.ए 1st year ला आहे.........अस हे छोटस....सबनीस कुटंब....

सुजय फ्रेश होवून येतो.....सुजय कसा होता आजचा दिवस...आशुतोष सुजयला विचारतो..

हा होता बरा दादु.....माधवीताई चहा घेवून येतात..सगळे चहा घेत गप्पा मारत असतात...बर सांग सुजय काय झाल....माधवीताई सुजयला म्हणाल्या...

अग आई स्टाफला कोणती शिस्त नाही काय नाही...मनात येईल तेव्हा येतात..काम सगळी पेन्डिंग......हे सगळ व्यवस्थित करायला 1 महिना जाईल माझा......कोणाला कामाच गाभिर्यच नाही....

त्यातल्यात्यात अकाउन्ट डिपार्टमेंन्टचा रिपोर्ट चांगला आहे बग...

अरे आता तु आहेस ना होईल सगळ व्यवस्थित..

हममम.... करायलाच पाहीजे....सुजय वैतागुन म्हणाला....

बर आई आध्या कुठे दिसत नाहीये.....

ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेय येईल थोडयावेळात

बर..मी आलोच म्हणुन तो आपल्या रुममध्ये गेला...

दुसरा दिवस उजाडला........आज रेवा लवकर उठलेली...कारण तिला सुजयच बोलण खुप लागल होत...त्यातुळे ती आज 7 लाच उठली होती...आज पटपट आवरुन....रेवा 9.15 लाच बॅकेत पोहचली......

शरद तिथेच साफसफाई करत होता..रेवाला लवकर बघुन त्याला आर्श्चय वाटल.....काय रेवा मॅडम आज एवढया लवकर....

हो लवकर आलेय....रोजरोज कोण ओरडा खाणार.....अस म्हणून दोघे हसायला लागतात........

शरद माझा डेस्क साफ झालाय ना रे....

हो मॅडम.........झालाय साफ.........

बर ऐक ना मला एक मस्तपैकी कॉफी आणून देना...........

आता आणतो मॅडम.......शरद कॉफी आणायला जातो...

थोडयावेळात स्नेहा येते.......रेवा आज एवढया लवकर...हो........तो खडुस यायच्या आधी आले नाही तर परत ओरडायचा..........खडुस.......नाव चांगल पाडलेयस की त्याच.... हो आहेच तो खडुस......अस म्हणुन दोघीही हसायला लागल्या......तेवढयात शरद 2 कॉफी घेवून येतो......

अरे शरद मी एकच कॉफी सांगितीली होती.........अहो रेवा मॅडम ही दुसरी कॉफी स्नेहा मॅडमाची आहे.........

तशी स्नेहा त्याच्याकडे बघत अरे पण मी सांगितीली नव्हती कॉफी.......

हो स्नेहा मॅडम.... मी तुम्ही आलेला आवाज ऐकला होता......मग रेवा मॅडमांना कॉफी देताना तुम्ही मला पण घेवुन ये बोलला असता ना म्हणून मी आधीच घेवून आलो.......

ओ........हुशार आहेस की........स्नेहा

 हो मग काय..........ही घ्या कॉफी..........शरद

मस्त झालेय कॉफी शरद.....रेवा

थॅक्यु मॅडम........शरद

थोडयावेळात सगळा स्टाफ एकएक करुन येवू लागला......सगळेजण रजिस्टर मध्ये आलेली एन्ट्री करत होते.......तेवढयात सुजय येतो......सगळेजण........त्याला गुड मॉर्निग करतात......सुजय ही सगळयांना गुड मॉर्निंग  करुन आपल्या केबिन मध्ये जातो.......

थोडयावेळाने शरद रेवा जवळ येतो......रेवा मॅडम सरांनी तुम्हाला बोलवल आहे......आ........आता का बोलावल असेल सरांनी......आज तर मी वेळेत आलेय......काय माहीत मॅडम.........बर जाते......

रेवा सुजयच्या केबिनच दार उघडत मे आय कमिंग सर …..एस कमिंग मिस देसाई ...रेवा खूर्ची जवळ येवुन उभा राहते.....तस तिच लक्ष सुजयकडे जात तस ती त्याला बघतच राहते (बघणारच ना सुजय आहेच तसा....)......पण तिला कालचा प्रकार आठवतो आणि ती भानावर येते...

हॅव अ सिट मिस देसाई ..अस म्हटल्यावर तिला आर्श्चयच वाटत........हा मला बस म्हणत आहे........हया विचारतच रेवा खुर्चीवर बसते...सर तुम्ही मला बोलवत...हो.....

लोन डिपार्टमेंन्ट कोण कोण बघत..........सर मी आणि राकेश.......राकेश पाटील ओके......राकेश पाटील  कुठे आहेत.......

सर तो 1 महिन्याच्या सुट्टीवर आहे........

ओके.........मला 10 मिनिटात सगळया लोनच्या फाईल्स हव्या आहेत.......

ओके सर......मी सगळया फाईल्स आणते.......

🎭 Series Post

View all