बावरे मन...भाग-64

बावरे मन..भाग 64 (सुजय ती फाईल चेक करुन राकेशच्या डेस्कवर फोन करतो...... हॅलो राकेश.......आता तु एक फाईल ?

बावरे मन..भाग 64

(सुजय ती फाईल चेक करुन राकेशच्या डेस्कवर फोन करतो......

हॅलो राकेश.......आता तु एक फाईल पाठवली आहेस......सुजय

हो सर......त्यांनी आज लोन साठी अपलाय केलाय.....ती त्याचीच फाईल आहे.....ते तुम्ही त्याच लोन पास होईल का ते पाहुन सांगाल का त्यांना मला मग कळवता येईल........राकेश

ओके......मी चेक करतो.......सुजय)

आता पुढे....

सुजय फोन ठेवल्यानंतर ती फाईल चेक करतो आणि त्याला काही तरी सुचत.......तो रेवाला डेस्कवर कॉल करुन केबिनमध्ये बोलावुन घेतो........

मे आय कम इन सर.........रेवा

एस कम इन रेवा......सुजय

सर तुम्ही बोलवलत........रेवा

रेवा आता केबिनमध्ये कोणीच नाहीये.....तु नाव घेवु शकतेस.......सुजय

नाही सरच ठिक आहे.........रेवा

अग पण.......सुजय

सुजय पुढे काही बोलायच्या आतच.......काय काम होत..........रेवा

हा......ते आज एक लोनसाठी एका पार्टीने अप्लाय केला आहे......मग त्या फाईलच काम तुला सांगण्यासाठी बोलावल होत........सुजय

सॉरी सर......पण माझी तब्बेत बरी नाहीये.......तुम्ही ते काम राकेशला सांगा........मघाशी तोच मला ही फाईल देवुन हयाच्यावर काम सुरु कर म्हणुन सांगत होता पण मी त्याला तु कर म्हणुन सांगितले.......रेवा

बर वाटत नाहीये का......आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया का......सुजय

नाही आहे मी बरी........आणि तस काही वाटलच तर मी जाईन माझ मी........रेवा

बर......मग तुला थोड बर वाटल्यावर हे काम कर........सुजय

नाही त्यानंतर पण मला नाही जमणार मला आधीचे काम खुप पेन्डिंग आहेत........राकेशला एवढ लोड नाहीये तो करेल तुम्ही त्यालाच सांगा.....रेवा

म्हणजे तुला हयाच्यावर काम करायच नाहीये का........सुजय

नाही......रेवा हे सगळ सुजयकडे न पाहताच बोलत होती.....

ओके........मग मी राकेशला सांगतो............सुजय राकेशला कॉल करतो........हॅलो राकेश.......मी फाईल चेक केली.....आपण त्यांच लोन ॲप्र्युअल करु शकतो........तु त्यांना सांग व त्यावर काम सुरु कर.......सुजय

ओके सर........राकेश.....

रेवा ते.......सुजय

मी येते आता.........सुजयच काही ऐकुन न घेता रेवा त्याच्या केबिनमधुन बाहेर पडते....

अरे..........अशी काय ही..........वेगळीच वागतेय.......तब्बेत बिघडेय म्हणुन अस करत असेल पण एवढ.......अवघड आहे सुजय तुझ.......लग्नानंतर हिचे नखरे झेलायला तयार रहा आता...सुजय स्वत:शी बोलत हसतो......

****

दुसऱ्या दिवशी सुजय नेहमीप्रमाणे बॅकेत येतो......रेवा सुध्दा तिच काम करत बसलेली असते.......

सुजय रेवाशी काही न बोलता त्याच्या केबिनमध्ये जातो......

रेवा सुजयला जाताना पाहते पण पाहुन न पाहिल्यासारख करते......ती सुजयच्या विचारातच होती तेवढयात स्नेहाचा फोन येतो......तशी रेवा भानावर येत.........फोन उचलते.......

बोला मॅडम झाली का तयारी.......रेवा

हो ग झाली तयारी......थोडयावेळात निघणार आहे.....स्नेहा

हो का........हॅपी जर्नी...........एन्जॉय करा......रेवा

हो ग.......स्नेहा

बाय द वे आमचे देवरजी काय म्हणतायत........स्नेहा रेवाला चिडवत बोलते.........

बर स्नेहा ऐक ना कस्टमर आलेत मी तुला नंतर फोन करते.......रेवा

ओके ओके चालेल..........बाय.....स्नेहा

बाय......परत एकदा.....हॅपी जर्नी...........रेवा

थॅक्स........बाय.........स्नेहा

रेवा फोन ठेवते........स्नेहा तस बोलल्यावर रेवाच्या डोळयात पानी आलेल असत......परत स्नेहाला संशय येईल म्हणुन ती कस्टमर आलेत अस खोट सांगितलेली असते.....

ती कोणी तरी पाहेल म्हणुन आपले डोळे पुसते......आणि आपल्या कामाला लागते........तेवढयात शरद तिथे आला......

रेवा मॅडम.......सरांनी तुम्हला मोहीतेची लोनची फाईल घेवुन बोलवल आहे.....शरद

नुसती फाईलच हवी आहे ना.....मग तु घेवुन जा ना........रेवा

तुम्हालाच बोलावल आहे........शरद

बर मी बघते जा.........रेवा

काय करु आता.......मी त्याच्या समोर जेवढ जायच टाळतेय तेवढ हा मला त्याच्या समोर बोलावतोय....काय करु काय करु..........त्याला पहिल की...मला राधिका बोलेल आवठवत......परत मी इमोशन होणार.....रेवा विचार करत असते......तेवढयात राकेश तिथे येतो.......

रेवा काय कुठे हरवली आहेस......राकेश

आ........अरे काही नाही असच.........राकेशलच पाठवल तर.....रेवाच्या मनात विचार येतो.......हो चालेल त्यालाच पाठवते............राकेश माझ एक काम आहे करशील.......रेवा

हा बोल ना..........राकेश

ही मोहीतेची फाईल सर मागत आहेत ती देवुन येशील.......मला थोड काम आहे........रेवा

एवढच ना.....देईन की त्यात काय एवढ......दे देवुन येतो.........राकेश

थॅक्स राकेश......रेवा

इट्स ओके यार........आलोच मी फाईल देवुन........राकेश

रेवा आता फाईल घेवुन येईल.....आणि त्यानिमित्ताने तिला पाहता येईल.....तिच्याशी बोलता येईल म्हणुन सुजय हॅपी होता.......

केबिनच दार कोणी तरी नॉक करत....बहुतेक रेवाच आहे वाटत......एस कम इन..........सुजय

राकेश आत येतो.......तसा सुजयचा चेहरा पडतो..........

सर तुम्ही मोहीतेंची फाईल मागवली होती ना.....हे घ्या.........राकेश

हो मागवली होती.....पण मी हे रेवाला सांगितल होत........सुजय

हो पण ती थोड कामात होती म्हणुन तिने मला जायला सांगितल.......राकेश

बर.......मी पाहतो........सुजय

ओके सर मी येतो..........राकेश

रेवा अशी का करतेय.....फाईल घेवुन यायला काय प्रॉब्लेम होता....एवढ काय काम आहे........नक्कीच काही तरी झालय.......पण मला काही कळतच नाहीये.........नाही काय झालय ते मला कळायलाच हव........अस म्हणुन सुजय रेवाच्या डेस्कवर फोन करतो.........

हॅलो रेवा...........दोन मिनिट केबिनमध्ये येवुन जा.......सुजय

सर फाईल तर मी पाठवुन दिलेय.........रेवा

मी केबिन मध्ये यायला सांगितल आहे.......तेवढ कर.........सुजय थोड चिडुन बोलतो....

ओके.........म्हणुन रेवा फोन ठेवते....

मे आय कम इन सर..........रेवा

एस कम इन.........सुजय

रेवा आत येते व शांत उभी राहते.....

मी मघाशी तुला बोलवल होत.....फाईल घेवुन आली का नाहीस तु........सुजय

ते मला काम होत.........राकेशला पाठवल होत की......रेवा

पण मी तुला बोलवल होत..........सुजय

फाईल मिळाली ना.......मग कोणी का येवुन दिली तर झाल ना......रेवा

म्हणजे तुला यायच नव्हत का.......केबिनमध्ये...........सुजय

अस काही नाही......रेवा

रेवा दोन दिवस झाले पाहतोय मी.......तु माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाहीयेस.......माझ्याशी बोलायच टाळतेयस..........काय झालय माझ काही चुकलय का.....सुजय

अस काही नाहीये........काम आहे म्हणुन अस वाटत असेल तुम्हाला......रेवा

हे बग........तु नेहमी केबीनमध्ये आलीस की मला सुजय म्हणायचीस......आणि आता सरच म्हणतेयस.....सुजय

सर आहात तर सरच म्हणायला हव ना..........रेवा

अग पण काय झालय......हया आधी नाही वाटल का मी सर आहे ते.....सुजय

काही झाल नाहीये.........काही काम नसेल तर मी जाऊ का.......रेवा

ओके..........जा...........सुजय थोड चिडुनच बोलतो........

सुजय जा बोलल्यावर रेवा बाहेर येते........आणि आपल्या डेस्कवर येवुन बसते........सुजय तिच्यावर  चिडल्यामुळे तिच्या डोळयात पाणी आल होत......पण कोणी तरी पाहतील म्हणुन ती स्वत:ला आवरते.....आणि काम करु लागते....

काय झालय यार हिला काही कळतच नाहीये...अशी का वागतेय ही......वहिनीला सांगुया म्हटल तर उगाच ती टेन्शन घेत बसेल.....जाऊदे चार दिवसाचा तर प्रश्न आहे आल्यावर सांगु तिला तिच बोलेल रेवाशी.....सुजय एकटाच बोलत असतो.

****

दुसऱ्या दिवशी रेवा तिच्या डेस्क वर बसलेली असते......सुजय साईडनेच जातो पण त्याच्याकडे ही पाहत पण नाही....ते पाहुन सुजयला वाईट वाटत.....तो तसाच केबिनमध्ये जातो......

रेवा सुजय गेल्यावर त्याच्याकडे पाहत राहते.....इतक्यात राधिकाचा फोन येतो....

हॅलो......हा बोल राधिका........रेवा

ऐक ना तु आता थोडी फ्री आहेस का.........म्हणजे बोलू शकतेस का......राधिका

का ग काही महत्वाच बोलायच आहे का......रेवा

हो सुजय बद्दल आहे......राधिका

ओके पाच मिनिट थांब मी स्टाफरुमध्ये जाऊन बोलते........रेवा

ओके.........राधिका........

हिला काय बोलायच असेल सुजय बद्दल..........ती त्याला प्रपोज तर करणार नाही ना......रेवा विचार करत करत स्टाफरुमध्ये पोहचते....

हो बोल राधिका........रेवा

मी ना सुजयला उदया प्रपोज करुया म्हणतेय.....राधिका

राधिकाच बोलण ऐकल्यावर रेवाच्या डोळयात पाणी येत.......ती दोन मिनिट काहीच बोलत नाही.......

हॅलो रेवा.....आहेस ना ग......हॅलो.........राधिका

आ........हा बोल ना.....मी ऐकतेय.........रेवा

तुला काय वाटत मी करु ना उदया प्रपोज.........राधिका

हो कर......रेवा जड मनाने बोलते.....

ओके चालेल मी उदया तुमची बॅक सुटली ना तेव्हा येते आणि अचानक सुजयला घेवुन जाते तो नाही बोलणार नाही........मग छान सरप्राईज देईन त्याला......राधिका

राधिकाच बोलण ऐकुन रेवाच्या डोळयात पाणी येत होत.....पण ती डोळयातील पाणी पुसते....आणि राधिकाशी बोलते........अरे वा ही मस्त आयडिया आहे.......चालेल......छान सरप्राईज मिळेल त्याला......रेवा

ओके डन चालेल मग मी येते उदया........बाय........राधिका

ओके बाय........रेवा

***

दुसरा दिवशी कशी वेळ जाईल तशी रेवा अस्वस्थ होवु लागली.....राधिका कधी पण येईल......आणि सुजयला घेवुन जाईल हेच विचार तिच्या डोक्यात सुरु होते......

ओय.....कुठे हरवली आहेस......मागुन आवाज येतो.....तशी रेवा मागे पाहते......आणि पाहते तर राधिका आलेली असते......

तु एवढया लवकर......अजुन बॅक सुटायला पंधरा मिनिट बाकी आहेत....रेवा

हो पण मला रहावेनाच म्हणुन मग आले......थोडोवेळ सुजयशी बोलत बसेन.........राधिका

ओके चालेल ना......तेवढाच वेळ मिळेल दोघांना.....रेवा

ओके मी आले हा.........राधिका अस म्हणत सुजयच्या केबिनमध्ये जाते.......

मे आय कम इन सर.........राधिका

एस कम इन......सुजय अस बोलत वर पाहतो तर राधिका असते......

तु इथे कशी........सुजय

असच आलेय........यायच नाही का........राधिका

मी अस म्हणालो का........काय तु पण.......आणि हे सर वगेरे काय आहे.........सुजय

असच मज्जा म्हणुन.......राधिका

बर बस.........सुजय

बोला मॅडम काय घ्याल चहा कॉफी............सुजय

काही नको.......तुला अजुन किती वेळ लागणार आहे.........राधिका

का ग.........सुजय

सांग ना...........राधिका....

दहा-पंधरा मिनिट लागतील......पण का......सुजय

***

क्रमश:

पुढचा भाग 2/11/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all