बावरे मन...भाग-67

बावरे मन..भाग 67 (सुजय तु काय फास्टच निघालस की......कॉग्रच्युलेशन....आशु आशु एवढ कॉग्रट्स करत होता पण

बावरे मन..भाग 67

(सुजय तु काय फास्टच निघालस की......कॉग्रच्युलेशन....आशु

आशु एवढ कॉग्रट्स करत होता पण सुजयच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रीया नव्हती.....

मी आलोच......तुमच चालु दे..मला काम आहे....अस म्हणुन सुजय त्याच्या रुममध्ये जातो......)

आता पुढे.....

असा काय हा.....एवढी आनंदाची बातमी आहे आणि हयाच्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत......स्नेहा आध्याला बोलते.....

अग काम असेल म्हणुन गेला असेल....आध्या

बर.......स्नेहा

स्नेहा तुझ्या जाऊबाईला भेटणार नाहीस का........माधवीताई

काय.....ती इथे आहे.........स्नेहा

हो.......भेटणार........माधवीताई

हो आई नक्कीच आवडेल मला......स्नेहा

माधवीताई राधिका हात पकडुन स्नेहा समोर आणतात......ही बग तुझी जाऊ........माधवीताई राधिकाकडे हात करत बोलतात......

माधवीताईचा हात राधिकाकडे पाहुन स्नेहाला शॉकच बसतो.....तिला थोडावेळ काहीच कळत नाही......ती तशीच उभी असते......

अग काय झाल.....तुझ्या होणाऱ्या जावेला भेटणार नाहीस का........माधवीताई

स्नेहा थोड भानावर येत........कॉग्रच्युलेशन राधिका...........

थॅक्स वहिनी........राधिका.....

राधिकाला कॉग्रट्स करुन झाल्यावर स्नेहा आध्याकडे पाहते........आध्या स्नेहाला नंतर सांगतो म्हणुन खुणवुन सांगते.......पण स्नेहाला काही केल्या चैन पडेना हे अस कस होवु शकत हाच विचार तिच्या डोक्यात होता......

आई मी आले.......एवढच बोलुन ती सुजयच्या रुममकडे जाते.....

आता ही कुठे गेली.......माधवीताई

आई दमली असेल ग वहिनी रुममध्ये गेली असेल....थांब मी बघुन येते......अस म्हणुन आध्या सुध्दा स्नेहाच्या मागे जाते......

स्नेहा सुजयच्या रुममध्ये येते......सुयज त्याच्या मोबाईल मधील रेवाचा फोटो पाहत बसलेला असतो......

सुजय मी काय ऐकतेय.....तु आणि राधिका.........कस शक्य आहे.....आणि रेवाच काय.......स्नेहा

अग वहिनी त्याच ऐकुन तर घे.......तो काय म्हणतोय..........आध्या स्नेहाच्या मागुन येत बोलते.....

काय ऐकु आध्या.........मी मगाच पासुन रेवाच आहे म्हणुन एवढया आनंदात बोलत होते......पण राधिका...........कस शक्य आहे........स्नेहा

सुजय बोल ना.........काही तरी बोल.......तु कसा काय तयार झालास.........स्नेहा

वहिनी ते.........सुजय

ते काय.....बोल.........स्नेहा आता थोड चिडुन बोलत होती.......

वहिनी आधी तु शांत हो........मी सगळ सांगतो तुला......सुजय स्नेहाला बसवत बोलतो.......

सुजय आता पर्यत रेवा कशी वागत होती......राधिकाने कस प्रपोज केल........तिला रेवाने कसा सपोर्ट केला हे सगळ सुजय स्नेहाला सांगतो......

काय......रेवाने सपोर्ट केला.........स्नेहा बेडवरुन उठत ओरडते........

अग हो वहिनी.........रेवाने सर्पोट केला होता राधिका दीला..........आध्या

पण कस शक्य आहे....तुझा काही तरी गैरसमज झाला असेल सुजय........स्नेहा

का शक्य नाही वहिनी............ती तर माझ्यावर प्रेम करतच नाही ना.......सुजय

सुजय ती तुझ्यावर..........स्नेहा पुढे काही  बोलणार इतक्यात तिला रेवाने सुजयला काही सांगु नको बोलले आठवल......आणि ती शांत झाली......

ती तुझ्यावर काय वहिनी...बोल ना पुढे...........सुजय

काही नाही........मला रेवाशी बोलायच आहे.........तिच्याशी बोलुनच मला काय ते कळेल.........स्नेहा

दादया पण राधिका दीच काय........आता तिला कस सांगणार..........आध्या

तेच तर कळत नाहीये...तिला कस सांगु.......सुजय

सांगायला तर हव ना दादया.........आध्या

आध्या मला सुजयशी थोड बोलायच आहे....स्नेहा

बर बोला तुम्ही मी आले.........आध्या

आध्या गेल्यावर स्नेहा सुजय जवळ येते......

सुजय काही तरी चुकतय.......मला थोडावेळ दे........मी सगळ व्यवस्थित करेन..स्नेहा

वहिनी आता काही व्यवस्थित नाही होणार ग.........रेवा तर माझ्यावर प्रेम करतच नाही.......माझ्यावर प्रेम करत असती तर.......ती राधिकाला सपोर्ट केलीच नसती ना........हे सगळ बोलताना सुजयच्या डोळयात पाणी आल...

सुजयच्या डोळयात पाणी पाहुन स्नेहाला कस तर वाटु लागल......सुजय तु शांत हो सगळ ठिक होईल.........स्नेहा

तिच अस वागण पाहुन खुप त्रास होतोय मला.......इतकी का रुड वागतेय माझ्याशी कळतच नाहीये.......खुप बदलली आहे रेवा.......... नाही ग राहु शकत वहिनी मी रेवाशिवाय सुजय अस बोलुन खाली बसुन रडायला लागला........

सुजयची ही अवस्था पाहुन स्नेहाला रेवाचा राग येत होता...........सुजय प्लीज शांत हो.........मला थोडा वेळ दे मी सगळ व्यस्थित करेन.......स्नेहा त्याला धीर देत बोलत होती.........

अस का करत आहेस रेवा.......तु स्वत: मला सांगितलेय यार....तुला सुजय आवडतो...किती खुश होतीस.......सुजयच नाव जरी घेतल तर किती लाजायचीस.....मग का करतेयस अशी........स्नेहा मनातल्या मनात बोलत होती.......

सुजय तु शांत हो मी सगळ ठिक करेन.......स्नेहा

****

दुसऱ्या दिवशी स्नेहाला कधी एकदा बॅकेत जाते आणि रेवाशी बोलते अस झाल होत.....

ती आणि सुजय बॅकेत जायला निघाले.......थोडयावेळात दोघेही बॅकेत पोहचले....

वहिनी तु रेवाला जास्त काही बोलु नकोस हा........सुजय स्नेहाला सांगत होता....

सुजय तु नको काळजी करु मी जास्त काही बोलत नाही....मी व्यवस्थित करेन हॅडेल........चल जाऊया आत......स्नेहा

दोघे आत येतात......सुजय तिथे न थांबता सरळ त्याच्या केबिनमध्ये जातो.......स्नेहा रेवाजवळ येते...

स्नेहाला पाहुन रेवा उभी राहते...........अरे तु आलीस पण.........काही बोलली पण नाहीस येणार आहे वगेरे.......रेवा

हममम नाही बोलले.......तस ही तुही कुठे मला सगळया गोष्टी सांगतेस आता.......स्नेहा

स्नेहाच बोलण ऐकुन रेवाला अंदाज येतो......की हिला सगळ कळल आहे वाटत.....ती विषय जास्त न वाढवता........बर चला काम करुया........नंतर बोलु आपण......रेवा

बोलायच तर आहेच मला.........पण नंतर बोलु......आता काम करुया..........अस म्हणुन स्नेहा तिच्या डेस्कवर जाऊन बसते......

स्नेहाचा चेहरा पाहुन रेवाला अंदाज आला होता......की ही त्याच विषयावर बोलणार आहे......आता रेवाला टेन्शल आल काय सांगायच आता स्नेहाला.....रेवाला काहीच सुचेना.........जाऊदे काय सुचेल ते बोलेन......अस म्हणुन रेवा कामाला लागते...

स्नेहा कधी एकदा ब्रेक होता हयाची वाट पाहत होती.......आणि थोडयावेळात म्हणजे लंच ब्रेक झाला.......

स्नेहा रेवाजवळ येते.......स्नेहाला आलेल पाहुन रेवा पटकण हातात टिफिन घेते........चला जाऊया ना जेवायला.........

जेवुया त्याआधी मला बोलायच आहे तुझ्याशी.........स्नेहा

बोलुया ना काय गडबड आहे...आधी जेवुन तर घेवुया....रेवा

मला आत्ता बोलायच आहे चल.......अस म्हणुन स्नेहा रेवाचा हात पकडुन स्टाफरुमध्ये घेवुन जाते.......

अग हो एवढ काय बोलायच आहे तुला..........आणि एवढी का चिडलेस तु...........रेवा

का तुला माहित नाहीये......स्नेहा

काय माहित नाहीये मला....कशाबद्दल बोलतेयस.........रेवा काही माहित नाही असा आव आणत बोलते....

खरच माहित नाहीये.........की माहित नाही असा आव आणतेयस..........स्नेहा आता थोड ‍चिडुन बोलु लागली.......

नाही माहित मला.........रेवा स्नेहाकडे पाठ करत बोलते.....

बर तुला माझ्याच तोंडातुन ऐकायच आहे ना.........मग मीच बोलते............का केलीस तु अस......का अशी वागतेयस.......अस काय झालय........की तु अशी वागु लागलेयस....स्नेहा

अशी म्हणजे..........रेवा

म्हणजे तुला माहित नाहीये का तु कशी वागतेयस........काय झालय रेवा का वागतेयस तु अशी....स्नेहा

अग कुठे काय झालाय.....ठिक आहे सगळ.........रेवा

सगळ ठिक आहे.....?....मग राधिकाच मध्येच काय हे.........स्नेहा

राधिकाच नाव घेतल्यावर रेवाच्या चेहऱ्यावरचे भावच बदलतात........

तु राधिकाला सुजयला प्रपोज करायला सपोर्ट केलास......हो ना............स्नेहा

अस काही नाही.........ती फक्त करु का प्रपोज विचारत होती........मग मी कर बोलले.....बाकी मी सपोर्ट वगेरे काही केला नाहीये......

अग तुला तिने सांगितल होत ना.ती प्रपोज करणार आहे.......मग तु तिला कर म्हणालीस........तुला कळतय का तु काय बोलतेयस......वेडी झाली आहेस का रेवा तु..........स्नेहा

मला सगळ कळतय...........रेवा

हो कळतय ना......मग कळत असत ना तर तु अस केली नसतीस.......तु प्रेम करतेस ना सुजयवर मग तिला कस प्रपोज कर म्हणु शकतेस तु...........स्नेहा

मी........आणि सुजयवर प्रेम..........?.........रेवा

का नाही करत...........स्नेहा

रेवा दिर्घ श्वास घेते......डोळे मिटते.....आणि मनावर दगड ठेवुन बोलते.............नाही.........रेवा

काय............कककाय म्हणालीस............स्नेहा

मी सुजयवर प्रेम नाही करत.........रेवा

हेच तु माझ्याडोळयात पाहुन बोल.......स्नेहा

आता रेवाला बोलण अवघड होवुन बसल.......पण आता तिला कमकुवत पडण शक्य नव्हत....ती स्नेहाकडे पाहते व तिच्या डोळयात पाहुन बोलते.........हो मी नाही करत सुजयवर प्रेम.......अस बोलुन लगेच पाठ फिरवते..........झाल आता कळल ना..........रेवा

अस नाही होवु शकत रेवा....तु स्वत: मला बोलली होतीस.........मी सुजय प्रेम करु लागलेय....मला सुजय आवडु लागलाय.......बोलली होतीस ना........की ते पण खोट होत...........स्नेहा

हो बोलले होते.........पण त्यावेळी तस वाटल होत फक्त........ते काहीवेळा पुरत ॲट्रॅक्शन होत बाकी काही नाही.....

तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती रेवा.........स्नेहा

अग स्नेहा......आम्ही दोघे पण एकमेकांवर प्रेम नाही करत....मी हयाच्यावर बोलुन काय उपयोग सांग.........रेवा

सुजय तुझ्यावर प्रेम करत असेल तर.......स्नेहा

तो माझ्यावर प्रेम करत असता तर तो राधिकाला हो बोलला नसता ना..........रेवा

हे सगळ ऐकुन आता स्नेहाला काय बोलाव कळेनाच ती सरळ बाहेर निघुन जाते..........स्नेहा बाहेर गेल्यावर इतकावेळी चेहऱ्यावर मला काही फरक पडत नाही असा चढवलेला मुखवटा बाजुला होतो.......आणि त्याची जागा डोळयातील अश्रु घेतात...........

सॉरी स्नेहा मला तुला अस दुखवायच नव्हत ग..........खुप रुड वागले तुझ्याशी......पण काय करु ग.....माझा पण नाईलाज होता........मी अजुन पण सुजयवर प्रेम करते हे कळल असत तर तु सुजयला जाऊन सांगितली असतीस.......आणि हे मला नको होत........कारण सुजय माझ्यावर प्रेम करत नाही ग......तो राधिकावर प्रेम करतो...........रेवा रडत मनातल्या मनात हे सगळ बोलत होती.......

रेवा हे अस कमकुवत होवुन नाही चालणार.........तुला खंबिर व्हावच लागणार आहे......हे सगळ आता सहन करायच आहे तुला........त्यामुळे अस रडुन नाही चालणार......चल बाहेर आणि तुला हया सगळयाचा काही फरक पडत नाही..हे असच वागाव लागणार आहे तुला.....रेवा डोळे पुसते व बाहेर येवुन आपल्या कामाला लागते.......

पण स्नेहाच्या डोक्यातुन रेवाचे शब्द जात नव्हते........अस कस बोलु शकते रेवा..........काही तरी चुकतय एवढच तिला सारख वाटत होत.........पण आता तिला काय कराव कळत नव्हत......

दोन दिवस असेच जातात..........हया सगळयामुळे घरातील वातावरण सगळच बदलल होत......स्नेहा व रेवा सुध्दा व्यवस्थित बोलत नव्हत्या तेवढया पुरत तेवढच बोलण असायच..........सुजयच्या घरात आता परत साखरपुडयाचा विषय सुरु झाला होता......

सुजय तु मनापासुन तयार आहेस का राधिकाशी साखरपुडा करायला....स्नेहा अस बोलल्यावर सुजय स्नेहाकडे पाहतो......तु नाहीयेस तयार माहितेय मला पण तु राधिकाशी केव्हा बोलणार सुजय....आई बाबा परत सारखरपुडयाचा विषय काढले होते....परत हया गोष्टी वाढत गेल्या तर खुप प्रॉब्लेम होणार आहे......स्नेहा

हो ग वहिनी सगळ कळतलय मला........पण तिच्याशी कस बोलु हेच कळत नाहीये मला.......म्हणजे भिती वाटतेय.......मी तिला सांगितलो आणि ती काही चूकीच वागली किंवा पहिल्यासारख वागायला लागली तर काय करु.......

मला मान्य आहे मी तिच्यावर प्रेम करत नाही........तीच्याशी सारखपुडा पण करायचा नाहीये मला.....पण तिला सांगण्याच धाडसच होत नाहीये......ती कशी रिॲक्ट होईल हयाची कल्पनाच करु शकत नाहीये मी........सुजय

अरे हो पण सांगायला हवच ना........आणि नाही सांगितलास तर तिच्याशी लग्न करायला तयार आहेस का तु........स्नेहा

नाही ग वहिनी तिच्याशी कस लग्न करु सांग ना.......एक बायको म्हणुन तिला तो अधिकार ते प्रेम मी नाही देवु शकणार........

माझ तिच्यावर प्रेमच नाहीये तर कस करु लग्न........तुला माहिती आहे ना वहिनी माझ रेवावर प्रेम आहे....मी नाही राहु शकत तिच्याशिवाय.......सुजय डोळयात पाणी आणुन हे सगळ बोलत होता.....

अरे हो पण.........स्नेहा पुढे काही बोलणार इतक्यात तिच लक्ष दाराकडे जात......आणि तिला काय बोलाव कळेनाच......

वहिनी......तुच सांग आता मी काय करु......मला काहीच कळत नाहीये.......सुयज

सुजय ते..........म्हणजे ते........स्नेहाला काय बोलाव कळेना.....ती ततपप करु लागली.....

***

पुढचा भाग 6 तारखेला पोस्ट करते म्हणुन सांगितले होते पण काही वैयक्तीक कारणामुळे मी वेळेवर पोस्ट नाही करु शकले....तुम्ही सर्वजण पुढच्या भागाची प्रतिक्षा करत असता......मी जेव्हा सांगते त्यावेळी पुढचा भाग पोस्ट करत असते पण हयावेळी माझी काही अडचण होती त्यामुळे पुढचा भाग वेळेत पोस्ट नाही शकला.....तुम्हा सर्वाना खुप वाट पहावी लागली....हयापुढील भागही लवकरात लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन....

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all