बावरे मन...भाग-71

बावरे मन..भाग 71 (सुजय मी आले......मी येते तिथे.....अस म्हणुन स्नेहा फोन ठेवते व हॉस्पिटला जायला निघते...

बावरे मन..भाग 71

(सुजय मी आले......मी येते तिथे.....अस म्हणुन स्नेहा फोन ठेवते व हॉस्पिटला जायला निघते.....

जाता जाता.....रेवाच्या घरी आकाशला फोन करुन सांगते.....आशुला पण फोन करुन  सांगते.....थोडयावेळात स्नेहा हॉस्पिटलमध्ये पोहचते......सुजय एकटाच बसलेला तिला दिसतो.......ती धावत सुजय जवळ जाते......

सुजय...........स्नेहा सुजयच्या खांदयावर हात ठेवत त्याला हाक देते........)

आता पुढे....

स्नेहाचा आवाज ऐकल्यावर सुजय मागे वळतो...... स्नेहाला पाहिल्यावर त्याला रडुच आवरत नाही........वहिनी रेवा बग ना ग......उठतच नाहीये.....किती बोलवत होतो मी तरी सुध्दा उठत नाहीये......वहिनी रेवाला काही होणार नाही ना ग........रेवाला काही झाल तर मी स्वत:ला कधीच माफ करु शकणार नाही..... सुजय रडत हे बोलत होता........

सुजय तु शांत हो.......रेवाला काहीच होणार नाही....तु नको काळजी करु........शांत हो पाहु.......स्नेहा सुजयला शांत करत त्याच्या शेजारी बसते.......

डॉक्टर काय म्हणाले......स्नेहा

डोक्याला खुप मार लागलाय........त्यामुळे खुप रक्त गेल आहे.......ऑप्रेशन कराव लागणार म्हणाले.....मी काहीच विचार न करता ऑप्रेशन करा म्हणुन सांगितल......पण वहिनी रेवाच्या घरी मी काहीच सांगितल नाही त्यांना एकदा विचारायला हव होत......सुजय

अरे तु नको काळजी करु......मी आकाशला फोन करुन सांगितले आहे......तो येतच असेल.....आणि ऑप्रेशनच पण त्यानी तु जो निर्णय घेतलास तोच घेतला असता........स्नेहा

स्नेहा व सुजय बोलत होते.....तोपर्यत रेवाच्या घरचे येतात....मालतीताईची अवस्था पण काही वेगळी नव्हती त्यांना सुध्दा रेवाचा ॲक्सिडन्ट झालाय कळल्यावर रडायलाच लागल्या ते अजुन पर्यत त्या रडत होत्या......त्या रडत स्नेहाजवळ येतात.........स्नेहा रेवा कुठे आहे....बरी आहे ना ग ती.......जास्त लागल नाही ग तिला........मालतीताई रडत रडत सगळ विचारत होत्या........

काकु...........तुम्ही शांत व्हा.......या इकडे बसा या......स्नेहा त्यांना खाली बसवते....काकु आपल्या रेवाला काही होणार नाहीये......ती लवकर बरी होणार आहे......स्नेहा मालतीताईना समजावत होती......

आकाश सुजय जवळ जातो.....आणि रेवाची नेमकी काय कन्डीशन आहे ते त्याला विचारतो......सुजय नेमक मला सांगशील का डॉक्टर काय म्हणाले........

सुजय थोड बाजुला जाऊन आकाशला नेमकी काय कन्डिशन आहे ते सांगतो.......ते ऐकल्यावर आकाशला सुध्दा रडु येत असत पण परत मालतीताईनी पाहिल तर त्या जास्तच रडायला लागतील म्हणुन तो स्वत:ला सावरतो.......

पाठोपाठ सुजयच्या घरचे सुध्दा हॉस्पिटलमध्ये येतात.....माधवीताई मालतीताईच्या जवळ जातात......माधवीताईना पाहुन मालतीताई रडायला लागल्या........मालतीताई शांत व्हा....आपल्या रेवाला काही होणार नाहीये........ती ठणठणीत बरी होणार आहे.....आणि नेहमीसारखी दंगा मस्ती करते की नाही पहा.......शांत व्हा पाहु........माधवीताई मालतीताईना समजावत असतात....

आनंदरावही ही रमाकांतरावांना धीर देत होते........

सगळे डॉक्टरांची वाट पाहत होते.......खुप वेळ ऑप्रेशन चालु होत........आणि एकदाच ऑप्रेशन संपत व डॉक्टर बाहेर येतात........डॉक्टर बाहेर आल्यावर सगळे डॉक्टरांच्या जवळ जातात....

डॉक्टर रेवा कशी आहे.......सुजय

डॉक्टर ऑप्रेशन कस झाल......आकाश

डॉक्टर आम्ही रेवाला भेटु शकतो का..........मालतीताई

एकएक मिनिट मला बोलु तर दया..........डॉक्टर......

सॉरी सॉरी डॉक्टर......प्लीज लवकर सांगा....आमची रेवा कशी आहे......आनंदराव..

ऑप्रेशन व्यवस्थित झाल आहे......रेवाही ठिक आहे........त्यामुळे काळजीच काहीच कारण नाही.......ऑप्रेशन व्यवस्थित पार पडलय.......डॉक्टर

डॉक्टरांचे हे शब्द ऐकल्यावर सगळयांचा जिव भांडयात पडला.....

डॉक्टर आम्ही भेटु शकतो का तिला.......माधवीताई

नाही आत्ता लगेच भेटता येणार नाही..........ऑप्रेशन थोड क्रिटिकल होत त्यातुळे.....तिला आयसीयु मध्येच ठेवाव लागणार आहे.......तासाभरात तिला शुध्द आली की तिला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यांनंतर भेटु शकता........

बर डॉक्टर आम्ही तासाभराने तिला भेटु.........माधवीताई

आता तो एक तास सुध्दा एका वर्षासारखा वाटु लागला......सगळे रेवाकधी शुध्दीवर येते याची वाट पाहु लागले........सुजय सारखा आयसीयुच्या काचेतुन रेवा शुध्दीवर येतेय का ते पाहत होता......बघता बघता तास उलटुन जातो.......तरी पण रेवा शुध्दीवर येत नव्हती........आता सगळयांना काळजी वाटु लागली......

अहो तासभर तर होवुन गेला.....पण आपली रेवा अजुन शुध्दीवर येत नाहीये....तुम्ही डॉक्टरांना बोलुन आणा ना.....मालतीताई

वहिनी शांत व्हा.....मी आणतो बोलावुन........आनंदराव.........

आनंदराव डॉक्टरांना बोलावुन आणतात......डॉक्टर रेवाला चेक करतात.......व बाहेर येतात

डॉक्टर काय झाल....रेवा अजुन का शुध्दीवर येत नाहीये........सगळ ठिक आहे ना......रमाकांतराव

कस असत एखादया पेशन्टला शुध्दीवर येण्यास वेळ लागतो....आम्ही नॉर्मली एक तास सांगतो पण काही पेशंन्ट दोन तास वगेरे घेतात....आपण आणखी तासभर वाट पाहु रेवा शुध्दीवर येते का हयाची.......डॉक्टर

बर डॉक्टर.........आनंदराव

आणखीन तासभर बोलल्यावर सगळयांनाच काळजी वाटु लागली.......कधी हा तास संपतो अस वाटत होत.....पण काही केल्या वेळ जात नव्हती....सगळे काळजीत होते.......कोण इकडे तिकडे फेऱ्या मारत होते......कोण एकमेकांना आधार देत होते......... स्नेहाला दिसत होत सुजय किती काळजीत आहे......पण त्याला घरच्यांसमोर ते दाखवता पण येत नव्हत......स्नेहा सुजयजवळ जाते......

सुजय......नको काळजी करुस.......रेवा येईल शुध्दीवर........मला कळतय..तुला खुप काळजी वाटतेय पण सगळयासमोर तुला ती काळजी दाखवता येत नाहीये.......पण नको काळजी करुस......स्नेहा

कशी काळजी करु नको वहिनी.......बग ना दोन तास होत आले तरी रेवा शुध्दीवर येत नाहीये......मला खुप टेन्शन येत आहे.....सुजय

सुजय होईल रे सगळ ठिक......डॉक्टरांनी सांगितलय ना.......एखदया पेशन्टला वेळ लागतो शुध्दीवर यायला......स्नेहा

अग हो वहिनी पण..........वहिनी डॉक्टर आले.......डॉक्टर आल्यावर सुजय त्यांच्याजवळ जातो.....

डॉक्टर अजुन रेवा शुध्दीवर आली नाहीये.......एवढा का वेळ लागतोय तिला......सुजय

डॉक्टरपण आता टेन्शनमध्ये होते.......मी परत तिला चेक करतो....काही प्रॉब्लेम आहे का ते पाहतो.......अस म्हणुन डॉक्टर रेवाला चेक करायला आत जातात.....

प्रॉब्लेम म्हटल्यावर आता सगळेच काळजीत होते....सगळे डॉक्टर कधी एकदा बाहेर येतात व काय सांगतात हयाची वाट पाहत होते.......थोडयावेळांनी डॉक्टर बाहेर येतात......

डॉक्टर काय झाल.......रेवा अजुन का शुध्दीवर येत नाहीये........रमाकांतराव

डॉक्टर सगळ ठिक आहे ना.......सुजय

मी रेवाला चेक केल.........आतापर्यत ती शुध्दीवर यायला हवी होती......आता पुढील चोविस तासात जर ती शुध्दीवर नाही आली तर कन्डिशन क्रिटिकल होईल.....

काय............मालतीताई अस म्हणुन रडु लागल्या........

डॉक्टर क्रिटिकल म्हणजे......काय ते स्पष्ट सांगा डॉक्टर.....आकाश

म्हणजे.......चोविस तासात जर ती शुध्दीवर नाही आली तर......ती कोमात जाऊ शकते....आणि कोमात गेल्यावर ती केव्हा शुध्दीवर येईल हे सांगता येत नाही........डॉक्टर

सांगता येत नाही म्हणजे......माधवीताई

म्हणजे........कोमात गेल्यावर ती दोन दिवसात शुध्दीवर येवु शकते......महिन्यानी दोन महिन्यानी किवा एक वर्षानी सुध्दा........आता सगळ परमेश्वराच्या हातात आहे.....मी आलोच म्हणुन डॉक्टर निघुन जातात.....

डॉक्टरांच बोलण ऐकुन सगळयांच्या पायाखालची जमीनच सरकली......मालतीताई रडायला लागल्या.....बाकिच्याची अवस्था काही वेगळी नव्हती.......

सुजयची अवस्था तर जास्तच अवघड झाली होती........त्याला काय वाटत......काय वाटत आहे.......हे सगळ कोणासमोर दाखवता पण येत नव्हत......रडायला येत असताना रडता येत नव्हत......

मालतीताई रडताना माधवीताई त्याच्याजवळ जातात......मालतीताई शांत व्हा ओ.......आपल्या रेवाला काही होणार नाही......नका काळजी करु.....माधवीताई

सगळे रेवा शुध्दीत येण्याची वाट पाहत बसले होते......पाहता पाहता खुप वेळ होतो.....रात्रीचे 11 वाजतात.....

हॉस्पिटलमध्ये आता सगळयांना थांबता येणार नव्हत.....त्यामुळे सगळयांना घरी जायला सांगितल होत.....कोणी तरी दोघे थांबु शकत होते....

आई बाबा मी थांबतो इथे तुम्ही जा घरी.......आकाश

नाही मी रेवाला सोडुन कुठे जाणार नाहीये......मालतीताई रडत म्हणाल्या.......

अग आई ऐक ना......इथे थांबलीस की परत तुलाच त्रास होईल.....तु आणि बाबा घरी जा मी आहे इथे.....बाबा तुम्ही तर सांगा ना आईला.......आकाश

मालती....आकाश बरोबर बोलतोय......सगळयांना थांबता येणार नाही इथे.....आपण सकाळी लवकर येवु या ना.....चल जाऊया घरी......

अहो पण........रेवा............मालतीताई

आपल्या रेवाला काही होणार नाहीये.......आपण सकाळी येवु पर्यत बग ती शुध्दीवर आली असेल......आणि आपल्याशी बोलेल पण.....ती नेहमी सारखी थट्टा मस्करी पण करेल........रमाकांतराव

हो माधवीताई....आणि आमच्याच घरी चला.......तिथे दोघेज जाऊन काय करताय.......परत घरी जाऊन रडत बसाल.......माधवीताई

अहो वहिनी कशाला आम्ही जातो.......रमाकांतराव

अरे काय जातो........नको चला आमच्याच घरी..........आनंदराव

सुजय चल निघुया का आपण........माधवीताई

सुजयचा तर तिथुन पायच निघत नव्हता......तो स्नेहाकडे पाहतो........स्नेहा डोळयानेच खुनवुन काही तरी सांगते.......

आई मी थांबतो इथे.......आकाश एकटाच काय काय करेल ना........त्याला माझी मदत होईल.........तुम्ही जा सगळे......सुजय

हो आई सुजय बरोबर बोलतोय.......आकाशची एकटयाची धावपळ होईल सुजय असेल तर त्याला थोडी मदत होईल......स्नेहा

बर चालेल......माझ्या लक्षातच आल नाही ते.......तु रहा सुजय आम्ही जातो........तुमच्या दोघांच जेवण पाठवुन देते आशुकडुन.......माधवीताई

आई मला काही नको......आकाशसाठी तेवढच पाठव........सुजय

काकु मला पण नको काही...........आकाश

अरे अस उपाशी राहुन कस चालेल.........माधवीताई

नाही काकु खरच नको.......काही खायची इच्छा नाहीये.........आकाश

आई अग नको........काही वाटलच तर आम्ही कॅन्टीनमध्ये काही तरी खाऊ........सुजय

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all