बावरे मन...भाग-73

बावरे मन..भाग 73 (मागुन नर्स त्याला ओरडत असते.......त्याला सांगत असते......डॉक्टर हयांना मी खुप आडवल पण ?

बावरे मन..भाग 73

(मागुन नर्स त्याला ओरडत असते.......त्याला सांगत असते......डॉक्टर हयांना मी खुप आडवल पण हे माझ ऐकतच नाही......ती नर्स डॉक्टरांना सांगत म्हणाली.......

डॉक्टर प्लीज मला रेवाशी बोलायच आहे...प्लीज डॉक्टर.................प्लीज....सुजय

अहो पण अस नाही करता येत..........हयाचा पेशन्टवर काही परिणाम झाला तर कोण जबाबदार असणार......डॉक्टर...........)

आता पुढे....

नाही डॉक्टर रेवाला काही होणार नाही..........सुजय

सॉरी पण मी तुम्हाला हे अस करण्यासाठी परमिशन नाही देवु शकत..........डॉक्टर

डॉक्टर प्लीज........सुजय

सॉरी........मी नाही परमिशन देवु शकत.....डॉक्टर....

सुजच्या अश्या अचानक आत जाण्याने घरातल्यांना पण आश्चर्य वाटत होत.....सगळे आश्चर्यचकित झाले होते......कोणालाच सुजयच्या वागण्याचा अंदाज येत नव्हता.............

डॉक्टरांनी नाही म्हटल्यावर सुजय बाहेर जात असतो......

आता फक्त काहीच मिनिट राहिलेत आणि पेशंन्ट अजुन शुध्दीवर येत नाहीये......जर थोडयावेळात पेशंन्ट शुध्दीवर नाही आली तर.....कन्डिशन क्रिटिकल होवु शकते.....डॉक्टर्स आपापसात बोलत होते.......हे सर्व सुजयने ऐकल्यावर सुजय परत मागे फिरतो.......आणि डॉक्टरांच न ऐकता तो रेवाशी बोलु लागतो.......

रेवा..........रेवा उठ ना.........माझ्यासाठी रेवा प्लीज उठ.........तुला उठावच लागेल रेवा........प्लीज रेवा उठ ना........इतके दिवस मला त्रास देत होतीस.......आता पण असाच त्रास देणार आहेस का........असाच त्रास देणार होतीस तर मला का थांबवायला आली होतीस........का मला जाऊ दिली नाहीस........का रेवा का......बोल......तुला बोलावच लागले........का इतकी वाईट वागतेयस माझ्याशी.........सुजय रेवालाचा हात पकडुन बोलत होता.........

सुजयला रेवाशी अस बोलताना पाहुन त्यातील एक नर्स सुजयला थांबवायला जाते......ती त्याला बाहेर घेवुन जात असते........सर प्लीज तुम्ही बाहेर चला........पेशन्टला त्रास होईल सर प्लीज चला बाहेर........ती नर्स सुजयला बाहेर काढत असते........पण डॉक्टरांच लक्ष तेवढयात रेवाकडे जात......

नर्स थांबा...........डॉक्टर

सर काय झाल..............नर्स

त्यांना बोलु दया...........मि. सुजय तुमच्या बोलण्यामुळे पेशन्टवर परिणाम होतोय.......काल पासुन हयांची काहीच हालचाल नव्हती त्या काहीच रिसपॉन्स करत नव्हत्या......पण हे पहा ना.....आत्ता तुम्ही जे काही बोललात त्याचा हयांच्यावर परिणाम होतोय......त्या तुमच्या बोलण्याला रिसपॉन्स देत आहेत.....हे बघा तुमच्या बोलण्याने हयांच्या डोळयातुन पाणी येत आहे........

डॉक्टरांच बोलण ऐकल्यावर सुजय रेवाजवळ जातो..........तर रेवाच्या डोळयातुन पाणी येत असत....तो हळुवारपणे ते पाणी पुसतो........

मि. सुजय तुम्ही असेच त्यांच्याशी बोलत रहा......त्या तुम्हाला रिसपॉन्स करत आहेत........

हो डॉक्टर...........रेवा........माझ्या बोलण्याचा त्रास होतोय ना तुला....वाईट वाटतय ना माझ्या बोलण्याच.....मग उठ ना मला ओरङ........हव तर मला मार......पण उठ यार.....नाही पाहु शकत तुला अस........प्लीज रेवा उठ ना.............माझ्यासाठी तरी उठ..........सुजय डोळयात पाणी आणुन बोलत होता.......

सुजय अजुन बाहेर येत नाही म्हटल्यावर घरतल्यांनाही काळजी वाटु लागली.......आई मी पाहुन येते नेमक काय झालय...........स्नेहा घरातल्यांना सागुन आयसीयु मध्ये येते.......आणि पाहते तर सुजय रेवाशी बोलत होता.....

ठिक आहे तुला उठायच नाहीये ना.........नको उठुस........रहा अशीच.......माझ काही ऐकु नकोस.....आणि मला परत थांबवुही नकोस......मी जातोय बेंगलोरला........परत कधीच येणार नाही.........तुला माझा त्रास कधीच नाही होणार........तु रहा हॅपी माझ्याशीवाय.........एवढ बोलुन सुजय रेवाचा हात खाली ठेवतो......व तेथुन बाजुला होतो..........आणि मागे वळतो......

स्नेहाला पाहुन त्याला रडुच आवरेना........वहिनी बग ना ग ही उठतच नाहीये......मी काय करु आता......सुजय रडत बोलत होता.......इतक्यात डॉक्टर.....मि.सुजय.....हया रिसपॉन्स करतायत तुम्हाला....हे बघा.....त्यांची बोटांची हालचाल झाली......

रेवाने हालचाल केली म्हटल्यावर सुजय व स्नेहा रेवाजवळ जातात.......वहिनी आता तुच बोल.......तुझ्या बोलण्याला पण रिसपॉन्स करतेय का ते पाहु.......

रेवा.......अशी का करतेसय यार.......का कळत नाहीये तुला.........तुझा सुजय तुला सोडुन जातोय......कायमचा.......तो चाललाय रेवा.......त्याला थांबव.........तो तुला सोडुन जातोय.........ठिक आहे तुला थांबवायच नाहीये ना त्याला.......जाऊदे त्याला मग......

तु त्याच्या थोड सुध्दा खर प्रेम केली असशील तर त्याला थांबवशील रेवा.........पण तु त्याला थांबवतच नाहीयेस......म्हणजे तु कधीच त्याच्यावर खर प्रेम केली नाहीयेस........तुला त्याला थांबवण्याचा काहीच अधिकार नाहीये......तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती रेवा.......तु अशी वागशील अस वाटल नाही.....

स्नेहाच्या अशा बोलण्याचा रेवावर चांगलाच परिणाम होतो.........तिचे हार्टबिट एकदम वाढले........श्वासांची गतीही वाढली..........पण रेवा काही केल्या डोळे उघडत नव्हती........

मि. सुजय आता तुम्ही काहीच बोलु नका प्लीज.....पेशन्ट हायपर होत आहे.....त्याचा विपरीत परिणाम व्हायला नको.....

पण डॉक्टर ती आमच्या बोलण्याला रिसपॉन्स करतेय........सुजय

अहो करतेय पण त्याचा उटल परिणामही होवु शकतो..........डॉक्टर सुजयला सांगत होते......इतक्यात नर्स डॉक्टरांना बोलावते............

डॉक्टर.............पेशन्टच्या बोटांची हालचाल होत आहे........हे पहा.......

परत सगळेच रेवाकडे जातात........डॉक्टर रेवाला चेक करतात......सुजय व स्नेहा रेवाकडेच  पाहत असतात.....

आणि पाहतात तर काय........रेवा सावकाश डोळे उघडत असते......

डॉक्टर..............रेवा डोळे उघडत आहे हे पहा.........सुजय आनंदाने ओरडत डॉक्टरांना सांगतो......

सुजय अस बोलल्यावर डॉक्टर व स्नेहा रेवाकडे पाहतात......

रेवा.........सुजय रेवाकडे पाहुन रेवाला बोलावतो.........सुजयचा आवाज ऐकुन रेवा त्याच्याकडे पाहते......

मि. सुजय तुम्ही आता बाहेर जा मला पेशन्टंला चेक करायच आहे......

डॉक्टर पण............सुजय

मि. सुजय मघाशी मी तुम्हाला बोलु दिल ना.....आता तरी प्लीज ऐका माझ......प्लीज.....डॉक्टर......

सुजय डॉक्टर बरोबर बोलत आहेत......चल बाहेर जाऊ आपण......त्यांना रेवाला चेक करु दे..........स्नेहा सुजयला घेवुन जात बोलते.........

सुजय जाताना रेवाकडेच पाहत असतो.......आणि रेवा सुजयकडे.............सुजयकडे पाहताना तिच्या डोळयात पाणी येत असत.......

सुजय व स्नेहा बाहेर येतात........त्यांना बाहेर आलेल पाहुन सगळेच त्यांच्या जवळ येतात.......

सुजय काय झाल तु असा का आत गेला होतास......रेवा ठिक आहे ना.........बोल ना सुजय काय झाल.......असा शांत का आहेस.......मालतीताई काळजीने विचारत होत्या......

स्नेहा तु तर बोल काय झाल......असे आत गेला होता......रेवा ठिक आहे ना........माधवीताई

आई ते डॉक्टर रेवाला चेक करत आहेत.......ते सांगतील बाहेर येवुन.......स्नेहा

हो पण रेवाला शुध्द आली का.........मालतीताई

काकु.........ते रेवा........स्नेहा पुढे काही बोलणार इतक्यात डॉक्टर बाहेर येतात.......डॉक्टर बाहेर येताना सगळे डॉक्टरांच्याकडे जातात.....

डॉक्टर काय झाल......रेवा ठिक आहे ना.........रमाकांतराव

डॉक्टर रेवा शुध्दीवर आली का.......आकाश

डॉक्टर बोला काही तरी............मालतीताई

हो हो....सांगतो तुम्ही सगळे शांत व्हा आधी........रेवा ठिक आहे....ति शुध्दीवर आली आहे.....मी तिला चेक केल.....आता ती ठिक आहे.......आता कसलाच धोका नाही..........डॉक्टर

थॅक्स डॉक्टर.........तुमच्यामुळे आमची रेवा बरी झाली.......आकाश

अहो थॅक्स तर मि. सुजय व स्नेहा हयांना बोला त्यांच्यामुळेच आज रेवा ठिक आहे.......

डॉक्टर अस बोलल्यावर सगळे सुजय व स्नेहाकडे पाहु लागतात.....

सुजय स्नेहा........मालतीताई

काकु आपण हयावर नंतर बोलुया........मी सांगेन नंतर.........आता आपण रेवाला भेटुया का........स्नेहा

हो........डॉक्टर आम्ही रेवाला भेटु शकतो का.........आनंदराव

हो भेटु शकता.....त्यांना आता स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहे शिफ्ट केल्यानंतर तुम्ही त्यांना भेटु शकता........पण त्यांना जास्त त्रास होईल अस काही बोलु नका...........डॉक्टर

हो डॉक्टर.......आनंदराव

बर मी येतो......अस म्हणुन डॉक्टर निघुन जातात.......

थोडयावेळात रेवाला स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केल जात.......रेवाला शिफ्ट केल्यानंतर सगळे रेवाला भेटायला जातात.....

सगळयांना समोर पाहुन रेवाच्या डोळयात पाणी येत............

मालतीताई रेवाजवळ जातात......त्यांच्याही डोळयात पाणी आलेल असत............बाळा.....तु ठिक आहेस ना ग.......आम्ही किती घाबरलो होतो.....कोणाच्याच जिवात जिव नव्हता.....मालतीताई

रेवा अशक्त असल्यामुळे तिचा आवाज थोडा हळु येत होता........आई मी ठिक आहे.........तु नको काळजी करुस............रेवा

रेवा आता जास्त बोलु नकोस.....डॉक्टरांनी आराम करायला सांगितल आहे........माधवीताई

हो काकु.......रेवा माधवीताईच्याकडे बघत हसत बोलते......

सगळेजण रेवाशी बोलत होते........रेवाही सगळयांशी बोलत होती........पण रेवाची नजर सुजयला शोधत होती........तो तिला कुठेच दिसत नव्हता.......

स्नेहाच्या लक्षात येत की ती सुजयला शोधत आहे.......

ओय रेवा मॅडम......काय घाबरवलात आम्हाला...........अस करतात का कोण.....स्नेहा तिची मस्करी करत....तिच्याजवळ येते.....आता आराम करा आपल्याला काय बोलायचच आहे......पण आता तु आराम कर....नाही तर डॉक्टर ओरडतील........कळल का........आई बाबा....काका काकु आपण आता बाहेर जाऊया का.......परत रेवाला त्रास व्हायला नको ना..........स्नेहा

हो ग.....डॉक्टरांनी सांगितलच आहे.......परत त्यांनाही काही तरी चेकअप करायच असेलच ना.......मालतीताई तुमची रेवा आता बरी झाली आहे....पाहिलात ना मी म्हणाले होते तुम्हाला.....माधवीताई

हो.......तुमच्या सगळयामुळे तर मी एवढी खंबिर राहु शकले.........मालतीताई

मालतीताई आपण बाहेर बसुन बोलुया का.......जास्तवेळ रेवाला बोलायला लावायला नको.....ती थोडा आराम करुदे.........माधवीताई

हो.....जाऊया..........बाळा आम्ही आहे बाहेर काही लागल तर सांग हो........मालतीताई

हो आई........रेवा हळु आवाजात बोलते......

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all