बावरे मन...भाग-75 (अंतीम भाग)

बावरे मन..भाग 75 (अंतिम भाग) (मी खडुस आहे.......सुजय थोडा रागिट लुक देत बोलतो....... काय माहित तुमच्या मॅड??

बावरे मन..भाग 75 (अंतिम भाग)

(मी खडुस आहे.......सुजय थोडा रागिट लुक देत बोलतो.......

काय माहित तुमच्या मॅडमांनाच विचार.....त्यांना तु खडुस वाटतोस.....स्नेहा

हो का......तिला तर विचारणारच आहे.....पण आज नाही.......सुजय

म्हणजे काय समजल नाही..........स्नेहा)

आता पुढे....

अग वहिनी मी उदया रेवाला प्रपोज करणार आहे..........सुजय स्माईल देत बोलतो......

काय............खरच.......स्नेहा आनंदात बोलते........

हो खरच......पण तुला माझ एक काम कराव लागेल.......सुजय

हो सांग ना.........काय काम आहे.........स्नेहा

रेवाला काही तरी कारण काढुन मी तुला एक ॲड्रेस सेन्ड करतो तिथे पाठवायच किंवा तु घेवुन यायच.........सुजय

एवढच ना.....ते माझ्यावर सोंङ.........स्नेहा

ओके.....सुजय स्माईल देत बोलतो...

काही स्पेशल प्लॅन आहे का.....मी काय वेडी आहे....स्पेशलच असणार हो ना......स्नेहा सुजयला चिडवत बोलते....

ये वहिनी काय ग तु पण.....सुजय थोड हसत पण लाजत बोलतो.....

बर चला जाते बाहेर नाहीतरी तुमच्या मॅडम लगेच विचारतात.....एवढा का वेळ....स्नेहा

हो का...बर जा.......सुजय

हो.......स्नेहा

अरे यार उदयाचा दिवस कधी येतोय अस वाटत आहे......सुजय स्माईल करत बोलतो.....

***

वहिनी थोडाच वेळ राहिलाय...तु घेवुन येशील ना रेवाला........सुजय स्नेहाला मेसेज करत असतो

हो रे तु नको काळजी करुस.....मी येते तिला घेवुन.....स्नेहाही सुजयला मेसेज करुन रिप्लाय देत असते..

ओके मग मी पुढे जातो आता.....तयारी झाली का पाहतो जातो.......सुजय

हो चालेल........स्नेहा

****

सगळ सेट तर झाल आहे.......आता रेवा कधी एकदा येतेय अस झालय.......सुजय एकटाच स्वत:शी बोलत असतो....

सुजय परत सगळ व्यवस्थित आहे का चेक करत असतो......तोपर्यत स्नेहाचा मेसेज येतो......

सुजय आम्ही बाहेर आलो आहोत......रेवाला काही तर कारण काढुन आत पाठवते तयार रहा.....स्नेहा

हो.......सुजय

स्नेहा अग कुठे आणली आहेस तु......काही तरी सांग.....केव्हाची विचारतेय तुला......रेवा

सांगते ग......थांब ना काय गडबड आहे.........स्नेहा

बर बाई सांग केव्हा तरी.........रेवा

बर ऐक ना मी आशुतोष ना फोन करुन येते तु तोपर्यत आत जाऊन बस........स्नेहा

अग तु बोल ना एकदमच जाऊया ना दोघी......रेवा

अग नको  बोलताना वेळ झाला तर तुला थांबाव लागेल..तु आत जा.....मी आलेच......स्नेहा

बर...मग जाते मी......ये लवकर.......रेवा

हो आलेच.....स्नेहा

रेवा आत गेल्यावर स्नेहा परत सुजयला फोन करते.....व सांगते की रेवा आत येत आहे.....मग सुजय तयार राहतो.....

सुजयने खुप छान पध्दतीने तयारी केली होती....एका हॉटेलच्या लॉनवर त्याने सगळ ॲरेज केल होत....

रेवा आत येणार म्हणुन त्याने लॉनवरच्या सगळया लाईट्स ऑफ केल्या होत्या......तो तिचीच वाट पाहत होता.....तोपर्यत सुजयला रेवा येताना दिसते.....रेवा लॉनवर आल्यावर रेवावर लाईट्स चा फोकस पडतो...रेवा जशी पुढे येईल तसे लाईट्सचे फोकस तिच्यावरुन पडत होते.....सगळीकडे अंधार होता.....त्यामुळे रेवाला काही कळेनाच.....ती तशीच पुढे येत होती.....लॉनच्या मध्ये आल्यानंतर सगळया लाईट्स ऑन होतात.......लाईट्स ऑन झाल्यावर रेवा सगळीकडे पाहतच राहते......तिच्यासाठी हे खुप सुंदर सरप्राईज होत.......

सगळीकडे फुलांचे डेकोरेशन केले होते.....सुंदर अशी लायटिंग.........लावलेले कॅन्डल्स....पायात ठेवलेले व्हाईट रेड बलुन......आजुबाजुला पसरलेला परफ्युमचा सुगंध......चालु असलेले सॉफ्ट म्युझिक....आणि सर्वात सुंदर सरप्राईज म्हणजे......सुजय व रेवाचे आजपर्यत एकत्र घालवलेल्या क्षणांचे फोटो.....लावलेले होते व त्याच्या भोवतीने लावलेल्या लायटिंग्स......त्यामुळे ते फोटो खुपच सुंदर दिसत होते...रेवा ते फोटो एक एक करुन पाहत होती......एवढे फोटो सुजयने कधी काढले मला कळल कस नाही.......रेवा हे सगळ पाहत होती....पण सुजय तिला कुठे दिसतच नव्हता.....ती शोधत तशीच पुढे जाते......तर एक टेबलवर बुके ठेवला होता.......आणि परत त्या दोघांचे खुप सुंदर फोटो ठेवले होते....ते पाहुन रेवाला कधी एकदा सुजयला पाहते अस होत होत.......पण सुजय कुठेच दिसेना......

सुजय..........सुजय........तु कुठे आहेस..........रेवा आजुबाजुला पाहत सुजयला बोलवत होती.....

रेवा.......मागुन आवाज येतो.........सुजयचा आवाज ऐकल्यावर रेवा पटकण मागे पाहते.....

पिंक कलरचा शर्ट त्यावर नेव्ही ब्यु कलरचा ब्लेजर...... नेव्ही ब्ल्यु कलरचीच जिन्स.....आणि चेहऱ्यावर गोड अशी स्माईल.....ती गोड स्माईल देत सुजय रेवाकडे पाहत होता.......

सुजयच्या हया लुकला रेवा पाहतच राहिली.......एवढी हरवली होती की सुजय तिच्या जवळ आला तरी तिला त्याच भान नव्हत......सुजय समोर येवुन चुटकी वाजवतो तशी रेवा भानावर येते.....व सुजयला तिच्या इतक्या जवळ पाहुन लाजुन मान खाली करते......

मग कस वाटल सरप्राईज........सुजय

म्हणजे तु आणि स्नेहा मिळुन केला आहात..........रेवा

हो.......सुजय स्माईल देत बोलतो......सांग ना आवडल ना......सुजय

हो खुप.......रेवा

अजुन एक सरप्राईज आहे.........सुजय

अजुन एक......रेवा सुजयकडे पाहत बोलते.......

हो अजुन एक.......अस म्हणत सुजय बाजुला ठेवलेला एक  बॉक्स रेवाच्या समोर धरतो.......हे घे......

हे काय आहे......रेवा

बघ ना तु......मी सांगितल्यावर मग सरप्राईज काय राहिल ना.....सुजय रेवाला डोळा मारत बोलतो.....

ओ..........अस होय..........थांब बघते........अस म्हणत रेवा तो बॉक्स ओपन करते.......वॉव सुजय......किती सुंदर आहे..........रेवा

आवडला तुला............सुजय

खुपपपपपप........रेवा

मग जा ना......पटकण चेन्ज करुन ये........सुजयने रेवासाठी एक सुंदर असा वनपीस आणला होता......

इथे.........रेवा

हो.........सुजय

बर.....आले पाच मिनिटात.........रेवा

रेवा चेन्ज करायला जाते........रेवा येवु पर्यत सुजय त्याची पुढची तयारी करतो.....

रेवा चेन्ज करुन बाहेर येते.........सुजय............रेवा

रेवाचा आवाज ऐकल्यावर सुजय मागे वळतो.........आणि पाहतच राहतो.....

सुजय........सुजय......रेवा त्याच्या समोर चुटकी वाजवत बोलावते.....तसा सुजय भानावर येतो.....पण रेवा इतकी सुंदर दिसत होती की त्याची रेवावरची नजरच हटत नव्हती.....रेवाने रेड कलरचा वनपीस घातला होता......चेहऱ्यावर हलकासा मेकअप........मॅचीग लिप्स्टिक.....मॅचींग एअरिंग.......मोकळे सोडलेले केस....खुप सुंदर दिसत होती रेवा......

सुजय रेवाकडे पाहतच......गुडघ्यावर खाली बसतो......आणि रेवासाठी आणलेली रिंग रेवाच्या समोर धरतो........Will You Marry Me....?  सुजयच्या अशा अचानक प्रपोज करण्याने रेवा आनंदुन जाते....आणि क्षणाचाही विलंब न करता.....तिचा हात सुजयच्या हातात देत.....सुजयला होकार देते......रेवाचा होकार आल्यावर सुजय खुश होतो व उभा राहतो.....आणि रेवाकडे पाहतच राहतो.....I Love You Reva…सुजय

Love U To…Sujay…..अस म्हणत रेवा सुजयला मिठी मारते......रेवा मिठीत आल्यानंतर सुजय त्याची पकड घट्ट करतो......आणि किती तर वेळ दोघे एकमेकांच्या मिठीत होते.......थोडयावेळाने रेवा भानावर येते व सुजयपासुन थोडी दुर होते...

काय झाल अशी दुर का गेलीस.........सुजय

सुजय.....आजुबाजुला बग आपण बाहेर आहोत.....रेवा

त्याला काय होतय........आपल्यासाठी तर बुक केल आहे......सुजय

तरी पण.......अस म्हणत रेवा थोडी बाजुला जाते.......व सुजय व तिचे फोटोज पाहु लागते....

सुजय मागुन जाऊन रेवाला मिठी मारतो......सुजय काय करतोयस......कोणी तरी येईल ना........रेवा

कोणी नाही येत......इथे फक्त आपणच आहोत.......सुजय

सुजय हे फोटोज तु केव्हा काढले आहेस.......रेवा

अग दादा वहिनीच्या लग्नात आपल लक्ष नसताना आध्याने काढले आहेत हे फोटो.....सुजय

आणि माझा फोटो.......हा आपण विजिटला गेलो होतो तेव्हाचा आहे ना.......रेवा

हो..........तेव्हा तुझ लक्ष नव्हत ना तेव्हा मी काढला होता.....हा तुझा पहिला फोटो होता जो माझ्याकडे होता.....सुजय

म्हणजे तु तेव्हा पासुन माझ्यावर.........रेवा

तेव्हा पासुन नाही.......आपण ट्रीपला गेलो होतो ना तेव्हा पासुन तु मला आवडु लागली होतीस........सुजय

तु माझ्यावर इतक प्रेम करत होतास आणि मी.....तुला किती त्रास दिला.....रेवा एवढस तोंड करत बोलते......

सुजय रेवाला आपल्या बाजुला वळवतो.......रेवा तेव्हा दोघांची पण चुक नव्हती....परिस्थितीच तशी होती......त्याला आपण तरी काय करणार.....सुजय

हो पण तरी ही............रेवा

शुश्श्श्श्शश्‍........आता काही बोलायच नाहीये कळल......फक्त आत्ताचा क्षण एन्जॉय करुया.....सुजय

हमम.........रेवा

हमम...काय......बोल ना काही तरी.....सुजय

काय बोलु..........रेवा

मी सांगु का......काय बोलायच आहे........सुजय

हो सांग ना......रेवा

सांगायच कशाला ना डेमोच दाखवतो....सुजय

म्हणजे..........रेवा

म्हणजे.........सुजय रेवापासुन थोडा दुर होता ते तिच्या खुप जवळ येतो.....सुजयला इतक्या जवळ येताना रेवाचे हार्टबिट वाढले...सुजय काय करतोयस........काही नाही डेमो दाखवतोय तुला.....अस म्हणत सुजय रेवाला आपल्या जवळ ओढतो.......व रेवाच्या कपाळावर आपले ओठ टेकवतो.....सुजयच्या इतक्या जवळ येण्याने रेवा मोहरुन जाते......किती तर वेळ दोघे एकमेकांच्या जवळ होते.....ती रात्र आजपर्यतच्या आलेला दुरावा दुर करत होती....व दोघे एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत होते.....

***

मग रेवा मॅडम.....कालची संध्याकाळ कशी गेली.........स्नेहा रेवाला चिडवत तिच्या डेस्कवर येते....

तु ना आता मार खाणार आहेस......तुला सगळ माहीत होत तरी सुध्दा मला काहीच बोलली नाहीस.....रेवा

अग बोलले असते तर......तुला सरप्राईज मिळाल असत का.....आणि काल तुम्हा दोघांचा दिवस होता.....मग तो तुम्हाला एन्जॉय करता यावा म्हणुन काही बोलले नाही....स्नेहा

थॅक्स यार....खरच कालचा दिवस खुप मेमोरेबल होता.....रेवा

थॅक्स काय आता.....वेडाबाई........बर चल मी निघतेय घरी........स्नेहा

अग आत्ता बॅक सुरु झाली आहे ना आत्ता कुठे जातेयस......रेवा

अग आशुतोशच काही तरी काम आहे त्याच्यासोबत जायच आहे......सुजयकडुन सुट्टी घेतली आहे....स्नेहा

ओके........रेवा

रेवा मॅडम सरांनी तुम्हाला बोलावल आहे........शरद

ओके मी जाईन.......रेवा

रेवा मॅडम जा...तुमच्या साहेबांना तुमची आठवण आलेली दिसतेय.......स्नेहा रेवाला चिडवत बोलते......

ये अस काही नाही.......बॅकेच काही तरी काम असेल........रेवा

हो का........बर जा जा.......मी पण निघते मला पण वेळ होतोय.........बाय.......स्नेहा

हो बाय.......रेवा

स्नेहाला बाय करुन रेवा सुजयच्या केबिनमध्ये जाते.......

मे आय कम इन सर........रेवा

एस कम इन.........सुजय

तु मला बोलावलस का.......रेवा

हो........बस ना.......सुजय

ओके........म्हणुन रेवा चेअरवर बसते......हा सांग काय काम होत........रेवा

काम होय.........ते म्हणजे........मला तुला पहायच होत ना म्हणुन बोलावुन घेतल.......सुजय रेवाला डोळा मारत बोलतो.....

सुजय तु पण ना........आपण बॅकेत आहोत.....काय चाललय तुझ........रेवा चेअरवरुन उठत बोलते......

कुठे काय........तुला पाहतोय फक्त.......बाकीच कुठे काय करतोय..........सुजय

हो का.......वेडा.......जाते मी..मला काम आहे.........अस म्हणुन रेवा मागे फिरते.........तर सुजय पटकण तिचा हात पकडुन मागे ओढतो.......

सुजय काय चाललच तुझ......आपण बॅकत आहोत.......आणि बहुतेक आपण विसरला आहात वाटत.........आपल्या केबिनमध्ये कॅमेरे आहेत.........रेवा

अरे हो विसरोलच की..........सुजय

मग आता माझा हात सोडाल का......रेवा

हमम....सुजय एवढस तोंड करुन बोलतो..............

सुजयचा चेहरा पाहुन रेवाला हसायला येत........व ती हसायला लागते...........

रेवा हसताना पाहुन सुजय चिडतो......हसुन घे.......बॅक सुटल्यावर मग सांगतो तुला......कस हसायच असत........सुजय

हो का..........वेडाच आहेस.........रेवा

सुजय पुढे काही बोलत असतो........इतक्यात माधवीताईचा कॉल येतो........

आईचा फोन आहे.......थांब काय म्हणतेय पाहु....सुजय

हो...........रेवा

हा आई बोल.........सुजय

मी तुला हे सांगायला फोन केला होता.....की आज संध्याकाळी जरा लवकर ये.........माधवीताई

का...........सुजय

काम आहे.........माधवीताई

अग पण काय काम आहे........सुजय

ते तुला कशाला हव आहे.....ये म्हटल ना लवकर.......तर ये ना.........माधवीताई

बर.......येतो.........सुजय

हा.......बर आणखीण एक...........माधवीताई

काय.....सुजय

येताना रेवाला सुध्दा सोबत घेवुन ये........माधवीताई

रेवाला........तिला का........सुजय

तु ये ना घेवुन...........माधवीताई

बर बर....येतो........सुजय

हा....चल ठेवते फोन.......लवकर या घरी......माधवीताई

हो बाय...सुजय

काय झाल....काय म्हणत होत्या काकु......रेवा

संध्याकाळी लवकर ये म्हणाली.......आणि तुला सोबत घेवुन यायला सांगितली आहे......सुजय

का........रेवा

नाही माहीत.........आता गेल्यावरच कळेल......सुजय

बर......मी पटकण काम आवरते जाते मग.......रेवा

हो चालेल...........सुजय

****

सुजय व रेवा घरी येतात.........सुजय दार उघडतो.......आणि सगळीकडे अंधारच असतो.....अरे एवढा अंधार कसा आहे.......सगळे कुठे गेले.......सुजय बोलत हळु हळु आत येतो.....रेवा सावाकश ये.......

हो........रेवा

आई.......बाबा........सुजय सगळयांना बोलवत असतो......अरे कुठे गेले सगळेच कोणी नाहीये.....सुजय

अरे बाहेर गेले असतील........रेवा

अग पण दरवाजा उघडा ठेवुन कसे जातील.........आध्या.........दादु..........वहिनी........अरे कुठे आहात सगळे........सुजय

सुजय एक काम कर ना.....तु फोन कर कोणाला तर.......रेवा

हा........थांब करतो.......सुजय

सुजय फोन करत असतो.........इतक्यात सगळया लाईट्स चालु होतात......आणि सगळे एकत्र ओरडतात......सरप्राईज........

लाईट्स लागल्यानंतर...........रेवा व सुजय पाहतच राहतात......सगळेजण खुप सुंदर तयार होवुन थांबले होते.....सगळीकडे सुंदर अस डेकोरेशन केल होत.....स्टेज सजवला होता.....आणि स्टेजवर.....रेवा व सुजय अशी नाव सुध्दा घातली होती.....हे सगळ पाहुन दोघेही एकमेकांकडे पाहायला लागले...

आई बाबा......हे सगळ...........सुजय

तुम्हाला काय वाटल आम्हाला काही कळणार नाही होय.........माधवीताई

अग तस नाही मी सांगणारच होतो............सुजय

कधी..........माधवीताई

अग ते...........सुजय

रेवा......तु सुध्दा आम्हाला काही सांगितली नाहीस........मालतीताई

आई ते मी सांगणारच होते.........रेवा

केव्हा.........मालतीताई

पण तुम्हाला कस कळल.......सुजय

कस कळणार............हिच्यामुळे..........सगळे स्नेहाकडे हात करत बोलतात.....

वहिनी तु..........स्नेहा तु...........सुजय व रेवा एकदम बोलतात......

हो मीच.........तुम्ही काय मनावर घेत नव्हता म्हटल मीच सांगते घरात........मग काय सगळे तयार झाले आणि हे तुम्हला सरप्राईज........आवडल ना.......स्नेहा

हो......खुप.........थॅक्स स्नेहा........रेवा

रेवा सुजय........आम्हाला सगळयाच गोष्टी स्नेहाने सांगितल्या आहेत........माधवीताई

सगळया म्हणजे..........सुजय

म्हणजे तुम्ही दुर कसे झाला......परत रेवाचा ॲक्सिडंन्ट....सगळयाच गोष्टी...........माधवीताई

आई ते.........सुजय

काही सांगु नकोस.......आम्ही त्यावर काहीच बोलत नाहीये.....झाल ते झाल.....आता विसरुन जाऊया...आणि नव्याने सुरुवात करुया.......माधवीताई

बर चला पटकण दोघे तयार होवुन या.....गुरुजी आत्ता एवढयात येतील......मालतीताई

काका काकु.......तुम्हाला माझा राग आला असेल ना......माझ्यामुळे रेवाला इतका त्रास झाला......सुजय मालतीताईच्या व रमाकांतरावांच्या जवळ येत बोलतो.......

बाळा जे होणार होत ते तर आपण टाळु शकत नाही........आणि झाल ते झाल आम्ही कोणताच राग धरला नाही.....आम्हाला आमच्या मुलीच सुख हव आहे फक्त....आणि ते तुझ्यासोबत आहे......मालतीताई

तरी सुध्दा मी तुमची माफी मागतो.......सुजय

अरे वेडा झालायस का.......माफी वगेरे नको मागु.....रमाकांतराव

तुम्ही दोघे तयार व्हा.......स्नेहा आध्या हयांना घेवुन जा.....मालतीताई

हो काकु............स्नेहा

स्नेहा दोघांनाही तयार करायला घेवुन जाते.........स्नेहा आध्या व राधिका रेवाला तयार करतात.........व आशु आणि आकाश सुजयला तयार करतात......

रेवा व सुजय तयार होवुन एकत्र हॉलमध्ये येत असतात.....तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो.....दोघे खाली येत असतात व त्याच्यावर फुलांच्या पाकळया पडत असतात......दोघे एकत्र येवुन स्टेजवर जातात....गुरुजी सगळया विधी सुरु करतात.....सगळया विधी झाल्यानंतर दोघे एकमेकांना रिंग घालणार असतात.....

स्नेहा रेवाची रिंग घेवुन येते व आध्या सुजयची रिंग घेवुन येते........दोघे एकमेकांना रिंग घालतात.....तसे सगळे टाळया वाजवायला लागतात.....

रिंग सेरेमनी झाल्यानंतर रेवाच्या डोळयात पाणी आलेल असत........ती स्नेहाला घट्ट मिठी मारते......

ओय वेडाबाई काय झाल......रडतेयस का......स्नेहा

थॅक्स स्नेहा हा दिवस फक्त तुझ्यामुळे येवु शकला......थॅक्स.......रेवा

स्नेहा रेवाला थोड बाजुला करत........तिचे डोळे पुसते......तु ना वेडी आहेस.......जा तुझा होणारा नवरा बग माझ्याकडे कसा पाहतोय.........त्याला वाटायच ही वहिनी माझ्या बायकोला रडवत आहे.......स्नेहा मस्करी करत बोलते......

काय ग तु........अस म्हणत रेवा हसायला लागते..........

अशीच हसत रहा.......नेहमी........स्नेहा

अरे तुम्हाला पेढा भरवायचा राहिलाच की..........हा घ्या...........स्नेहा पेढा भरवते........व बाकीचे घरचे सुध्दा दोघांना पेढा भरवतात.........नंरत रेवा व सुजय सगळयांचा आशिर्वाद घेतात.......

समाप्त.


( नमस्कार.! मी लिहिलेली ही पहिलीच कथा होती. कथेची शक्य तेवढी व्यवस्तीत मांडणी करण्याचा मी प्रयत्न केला आहे.माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आपल्या ईराच्या फेसबुक पेजवरील पोस्टमध्ये किंवा मला वैयक्तिक कमेंन्ट पाठवून कळवू शकता.!

धन्यवाद.)

🎭 Series Post

View all