बावरे मन...भाग-5

बावरे मन..भाग 5 (ओके.........मला 10 मिनिटात सगळया लोनच्या फाईल्स हव्या आहेत....... ओके सर......मी सगळया फाईल्स ?

बावरे मन..भाग 5

(ओके.........मला 10 मिनिटात सगळया लोनच्या फाईल्स हव्या आहेत.......

ओके सर......मी सगळया फाईल्स आणते.......)

आता पुढे....

सर मी येवू.......ओके...... Go Now….रेवा बाहेर येते.....हा खडुस माझ्याशी एवढ छान बोलत होता.....माझा माझ्याच कानावर विश्वास बसत नाहीये...अस म्हणत रेवा फाईल आणण्यासाठी जाते.....

10 मिनिटात रेवा सगळया लोनच्या फाईल्स सरांच्या केबिन मध्ये घेवून जाते.......सर हया सगळया फाईल्स.....ओके..........मी चेक करतो आणि तूम्हाला बोलवतो ओके.........

ओके सर.....रेवा

रेवा बाहेर येते आणि आपल काम करु लागते.....मग स्नेहा तिच्या जवळ येते....काय ग का बोलवले होते सर........अग ते लोनच्या सर्व फाईल्स हव्या होत्या सरांना.....अस होय..मला वाटल आज आणि कोणत कारण सापडल की काय ओरडायला खडुसला...स्नेहा हसत रेवाकडे बघते

तुला खुप मज्जा वाटतेय होय.....अग रेवा अस काही नाहीये......मला वाटल आज परत ओरडतात की काय.......म्हणुन अस म्हणाले ग.....

हो ग स्नेहा मला ही तसच वाटल होत.......पण नाही ओरडले....बर चल काम करुया नाही तर खरच ओरडा मिळेल......सगळे आपल्या कामात लागतात......

थोडयावेळाने........लंच ब्रेक होतो व सगळे जेवायला जातात.........सगळे छान गप्पा मारत जेवत असतात.......तेवढयात शरद.... रेवा मॅडम लंच झाल्यावर सरांनी तुम्हाला बोलवल आहे........बर जाईन मी शरद.......

लंच आवरुन रेवा सुजयच्या केबिनकडे जाते...... मे आय कमिंग सर...एस कमिंग मिस देसाई......

मिस देसाई…लोन डिपार्टमेंटच एवढ काम पेंन्डिग का...?...सुजय चिडला आहे हे रेवाच्या लक्षात आल............

सर.....ते राकेश सुट्टीवर आहे त्यामुळे पेन्डिंग आहे......अस ऐकल्यावर सुजयला जास्त राग येतो..व तो रेवा वर चिडतो.....

तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करणार का......तुम्हाला पगार ह्यासाठी दिला जातो का.........आपण सुट्टीवर जातोय तर आपल काम कोणाला तर सोपवून जाता येत नाही एवढा हलगरजीपणा......अजिबात चालणार नाही.......

त्या राकेश पाटीलला बोलवून घ्या...रेवा थोडी घाबरलीच होती.......पण तसच ती बोलली........सर पण राकेशच लग्न आहे त्यासाठी तो सुट्टीवर आहे......त्याला कस बोलावुन घ्यायच......ओके ते बघतो मी काय करायच........You May Go Now....

ओके सर..........रेवा....

रेवा बाहेर आली तीला सुजय चा खुप राग आलेला .......तो राकेश सुट्टीवर आहे त्याला मी काय करू......ते त्याच काम आहे.......त्याला ते कळायला नको का.......‍ आणि हा मला ओरडतोय.......खडूस ..........अस पुटपुटत ती तिच्या डेस्क वर येवून बसते......

रेवा चिडलेली बघुन स्नेहा ‍तिच्या डेस्कजवळ येते........काय ग काय झाल........अग हा खडूस बग ना त्या राकेश ने काम पेन्डिंग ठेवलय आणि माझ्यावर ओरडत आहे........

तु शांत हो आधी हे पाणी घे.......रेवा थोड पाणी पिते............आता बरं वाटतय का.......हममम.........तु नको लक्ष देवु त्याच्याकडे...ऐकायच आणि सोडून द्यायच ग.......

हममम..आता तेच करणार आहे......रोज रोज कोण मुड ऑफ करुन घेणार......रेवा त्याच्या बोलण्याकडे दूर्लक्ष करते व आपल्या कामाला लागते......

बॅकेच टायमिंग संपल्यावर थोडयावेळाने सगळे घरी जायला निघतात.........रेवा व स्नेहा पण आवरुन बाहेर येतात......रेवा मी आज तुझ्या घरी येते चल........खरचं.........हो ग..........चल जाऊया तेवढयाच मस्त गप्पा होतील आपल्या.......

रेवा व स्नेहा रेवाच्या घरी पोहचतात.....

आई मी आले ग......स्नेहा पण आलेय बग......रेवा

आलीस का......स्नेहा ये ना........खुप दिवस झाले आली नाहीस......... मालतीताई

अहो  काकू कामामुळे यायलाच मिळत नाही........आज मुद्दाम वेळ काढून आलेय ......सगळयांना भेटायच म्हणुन........ स्नेहा

बर झाल आलीस छान वाटल... आता जेवून जा...........मालतीताई

हो काकू..... स्नेहा

बर तुम्ही दोघी फ्रेश व्हा मी तुम्हाला चहा आणते...... मालतीताई

बर आई......रेवा व स्नेहा फ्रेश होवून हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या

 स्नेहा रेवाला म्हणाली तु त्या सरांकडे लक्षच नको देवूस उगाच रोज मुड ऑफ नको करुन घेत जाऊस........ हो ग आता त्याकडे दुर्लक्षच करणार आहे.....खडूसच आहे.....

कोण खडुस आहे... मालतीताई चहा घेवून येत विचारतात.....आमचा बॉस ग आई.....का आज पण ओरडले का सर तुला....हो बग ना ग .......रोजचच झालय याच ...........

अग पण काय झाल...उगाचच कशाला ओरडतील ते काही तरी चुकल असेल ना तुमच..........

ये आई तु माझी आई आहेस की त्याची........त्याची काय बाजू घेतेस..........

अगं मी काय बाजू घेत नाही...पण रोजरोज कशाला ओरडेल ना..काही तरी चुकल्यावरच ओरडणार ना.....

बर ते जाऊ दे..नेमक काय झाल सांग......अहो काकु ते लोन डिपार्टमेंटच काम पेंन्डिग आहे.......तो राकेश सुट्टीवर गेल्यामुळे आणि तो रेवाला ओरडत होता......

अग हो स्नेहा पण ती पण त्या डिपार्टमेंट मध्येच आहे ना मग तो हीलाच बोलणार ना.....

ये आई गप्प ग तु.. त्याची काय बाजू घेतेस.........

बर जाऊदे मी जेवणाच बघते.......तुम्ही बसा गप्पा मारत.......

दोघी गप्पा मारत असतात........तेवढयात तिथे आकाश येतो..........स्नेहा तु कधी आलीस..... कशी आहेस.......मी ठीक आहे तु कसा आहेस....मी पण मस्त..... बर बसा तुम्ही गप्पा मारत मी फ्रेश होवुन येतो........अस म्हणुन आकाश त्याच्या रुममध्ये जातो

रात्रीची जेवण आटपल्यावर आकाश स्नेहाला घरी सोडायला जातो.....

सुजय घरी येतो.....माधवीताई त्याचा  चेहरा बघून ओळखतात..की आज पण ह्याच्या मनासारख काम झाल नाहीये.........सुजय तु फ्रेश होवून ये मी चहा आणते....हो आई आलोच फ्रेश होवून.....सुजय फ्रेश होवून येतो....माधवीताई त्याला चहा देतात...

दादया आलास तु...कसा गेला आजचा दिवस....आध्या..

हमममम....बराच होता.....सुजयचा मुड ठिक नाहीये आध्याच्या लक्षात येत....ती त्याचा मुड ठिक करण्यासाठी.....

दादया तुझ्या बॅकेत खुप मुली असतील ना रे...आध्या

हो आहेत तशा का ग..?

काही नाही.....तुला बघुन फिदाच झाल्या असतील हो ना......आध्या सुजयला चिडवत म्हणाली........

ये गप्प अस काही नाही.......

हो का....

तु खुप अगाव होतेयस हा......अस म्हणुन सुजय तिला मस्करीत एक फटका मारतो....

ए दादया लागल की.........आध्या उगाच लागल्याच नाटक करते.....

ये गप्प नोटंकी.......सुजय

सुजयचा मुड छान होतो म्हणुन आध्या आणखिन थट्टा करत असते......तेवढयात सुजयचा फोन वाजतो........

🎭 Series Post

View all