बावरे मन...भाग-6

बावरे मन..भाग 6 (सुजयचा मुड छान होतो म्हणुन आध्या आणखिन थट्टा करत असते......तेवढयात सुजयचा फोन वाजत

बावरे मन..भाग 6

(सुजयचा मुड छान होतो म्हणुन आध्या आणखिन थट्टा करत असते......तेवढयात सुजयचा फोन वाजतो........)

आता पुढे......

ARIA MANAGER सरांचा फोन असतो......

हॅलो सर......

मिस्टर सुजय…ते लोन डिपार्टमेंन्टच काम पेन्डिंग का आहे....

सर लोन डिपार्टमेंन्ट मधील स्टाफ मेंम्बर सुट्टीवर आहे.....त्यामुळे पेंन्डिंग आहे.......

No excuse मिस्टर सुजय.....मला काम पुर्ण झालेल हव......मग तुम्ही स्वत: जाऊन ते काम करा.....मला फक्त Target Complete...हवं...मागील पेंन्डिंग काम व ह्या महिन्यातील Target तुम्हाला Mail केला जाईल....तुमच्याकडे 1 महिना आहे........1 महिन्यात मला काम पुर्ण झालेल हवयं.........

ओके सर.....मी करेन पुर्ण.......

ओके.....गुड नाईट

गुड नाईट सर.....

सरांचा फोन बंद झाल्यावर सुजय आपल्या रुम मध्ये जातो.......त्याच्या डोक्यात 1 महिन्यात सगळ काम कस पुर्ण करायचा हा विचार चालू असतो.......तेवढयात माधवीताई त्याला जेवायला बोलवतात.....

सुजय जेवायला ये....माधवीताई

हो आई आलो..... सुजय

सगळे जेवत असतात....पण सुजयच जेवणात लक्ष नसत.....

आनंदराव त्याला विचारतात काय झाल सुजय जेवणात तुझ लक्ष नाहीये....

काही नाही बाबा.......कामाच टेंन्शन.....सरांचा फोन आला होता...1 महिन्याचा वेळ दिलेत......1 महिन्यात काम कस करायच हाच विचार करत होतो....

होईल रे नको काळजी करु......आनंदराव..

हमममम.......सुजय

सुजय व्यवस्थित प्लॅनिंग कर म्हणजे काम दिलेल्या वेळेत होईल....आशुतोष

हो दादु तेच कराव लागणार आहे....त्याशिवाय काम पुर्ण नाही होणार....

काय दाद्या तु पण ना..... ‍किती टेन्शन घेशील.....होईल रे व्यवस्थित....नको टेन्शन घेवुस...आध्या

बर आजीबाई नाही घेत टेन्शन......सुजय आध्याला चिडवत म्हणतो.

ये मी आजीबाई नाहीये कळल......आध्या सुजयवर चिडते.......

तसे सगळे हसायला लागतात.....

बर तुमची थट्टा मस्करी झाली असेल तर जेवायच का......माधवीताई

हो.......सगळे एकदम बोलतात....

जेवण आटपुन सुजय त्याच्या रुम मध्ये येतो.......त्याच्या डोक्यात कामाचाच विचार सुरु असतो......नंतर त्याला काही तरी सुचत.....व झोपी जातो.......

सकाळी लवकर आवरुन सुजय नेहमीपेक्षा लवकर बॅकेत जातो...

इकडे रेवा ही लवकर उठून आवरुन लवकर बॅकेत पोहचते.....

सुजय व रेवा एकाच वेळी बॅकेत येतात........सुजय ला समोर बघून रेवा विचारातच पडते......हा कसा काय एवढया लवकर आला आहे......

तस सुजय ला ही आर्श्चय वाटत 10 मिनिट लेट येणारी मुलगी....15 ‍मिनिट लवकर आली आहे......

Good Morning Sir…

Good Morning Miss.Desai

अस म्हणुन दोघे आत मध्ये जातात.....सुजय त्याच्या केबिन मध्ये जातो.......सुजय सगळया फाईल्स व्यवस्थित चेक करत असतो.....नेमक कीती काम पेन्डींग आहे....1 महिन्यात काम कस पुर्ण करता येईल याच प्लॅनिंग करत असतो......

रेवा ही तिच्या डेस्कवर येते....आणि आपल नेमक काय काय काम पेंन्डिंग आहे हे बघत असते.....कारण तिला आज ओरडा खायचा नसतो...........काम करत तिला कॉफी प्यायची सवय असते... ती शरद ला हाक मारते.....ए शरद मला एक कॉफी आण ना...

ओके मॅडम.....शरद

शरद कॉफी आणायला जात असतो.....तेवढयात सुजय त्याला हाक मारतो.......शरद इकडे ये.....

शरद केबिन मध्ये जातो.....एस सर काही हवयं का तुम्हाला......

हो मला एक कॉफी आणशील........कॉफी घेतल्याशिवाय काही सुचतच नाही.........हो सर आता आणतो........अस म्हणुन शरद कॉफी आणायला जातो.......

थोडयावेळाने शरद कॉफी घेवून येतो........सर आत येवू.....हो शरद ये......सर ही घ्या कॉफी......थॅक्स शरद......वेलकम सर.....

शरदने 2 कप कॉफी आणलेली असते........सुजय त्याला विचारतो.......हा दुसरा कप कोणासाठी......

सर रेवा मॅडमांसाठी.......त्यांनाही काम करताना.....कॉफी लागते......

तस सुजय ला आर्श्चय वाटत.......व तो मनातल्या मनात Same Choice  अस म्हणतो.......

सर काय झाल....

काय नाही......तु जा आता.........

बर सर......

शरद रेवाला कॉफी देतो.....

थॅक्स शरद....

वेलकम मॅडम.....शरद

सरांनी तुला का बोलवल होत.....

ते होय.......ते सरांना पण कॉफी हवी होती.......त्यांना पण तुमच्यासारख काम करताना कॉफी लागते......शरद

ओ.......Same Choice…रेवाही मनातल्या मनात बोलून जाते.....

बर मी जाऊ का मॅडम....शरद

हो हो जा तु.........रेवा

थोडयावेळाने सगळे एकएक करुन येऊ लागले......

स्नेहा आल्यानंतर सरळ रेवा जवळच येते.......रेवा आज पण लवकर......वा प्रगती आहे की.......

हा मग काय........रोज रोज कोण ओरडा खाणार......बर बर....

स्नेहा दादाने तुला व्यवस्थित सोडल ना ग घरी.....हो ग....सोडले त्याने व्यवस्थित...

बर....

इकडे सुजय सगळया फाईल्स चेक करुन 1 महिन्यात काम कस पुर्ण करायचा ह्याचा प्लॅन करतो.....हे अस काम केल तर 1 महिन्यात काम होवू शकत.....स्वत:शीच बडबडत असतो......त्याने शरद ला हाक मारली......शरद एकडे ये.......

हा  सर.......शरद

मिस. देसाई ना आत पाठव......सुजय

हो सर......शरद

रेवा मॅडम सरांनी तुम्हाला बोलावर आहे.......

परत.........अरे यार हे काय रोजचच झालय.......आता का हयाने बोलवल असेल ........बर चल जाऊन येते मी......

May I Coming Sir……..

Yes Coming…Miss. Desai…Have a Sit

🎭 Series Post

View all