बावरे मन...भाग-66

बावरे मन..भाग 66 (जास्त वेळ न घालवता आपण हयांचा साखरपुडा केला तर.....लग्नाच काय नंतर पाहता येईल....आन??

बावरे मन..भाग 66

(जास्त वेळ न घालवता आपण हयांचा साखरपुडा केला तर.....लग्नाच काय नंतर पाहता येईल....आनंदराव

लगेच....माधवीताई

हो काय होतय........आजकाल सगळया गोष्टी लवकरच झालेल बर असत......मुलांचा विचार कधी बदलेल सांगता येत नाही....

अहो पण आशु स्नेहा बाहेर गेलेत फिरायला.......मग कस करायच.......माधवीताई)

आता पुढे....

अग त्यांना सरप्राईज देवुया ना.....ते आल्यावरच करायचा ना सारखरपुडा........आनंदराव

हो चालेल पण एकदा सुजयशी पण बोलायला हव ना.....माधवीताई

अग हो मी कुठे त्याला न विचारता बोलायच म्हणतोय.......तो संध्याकाळी आला की बोलु त्याच्याशी त्याला काही प्रॉब्लेम नसेल तर साखरपुडा करुया........चालेल ना......आनंदराव

काही हरकत नाही.......पण नुसत राधिका बोलली म्हणुन आपण हे सगळ ठरवु शकत नाही ना......सुजयशी व्यवस्थित बोलायला हव.......माधवीताई

अग हो मी कुठे नाही म्हणतोय......त्याला न विचारता थोडीच करायचे आहे.....त्याच्याशी बोलुनच सगळ ठरवायच.......तो नाही म्हणाला आत्ता साखरपुडा तर नाही करायचा.....शेवटी त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे....त्यालाच ठरवु देवुया ना........फक्त माझा बोलण्याचा उद्देश्‍ हा होता की....आपली राधिका माहीतेय ना किती चंचल आहे.....आज हो म्हणेल आणि दोन दिवसांनी नाही......त्यामुळे एकदाचा साखरपुडा झाला की झाल ना.......आनंदराव

तुमच बरोबर आहे.....संध्याकाळी सुजय आला की त्याच्याशी बोलु.......माधवीताई

बर चालेल......आनंदराव

खरच मी खुप खुश आहे.....दादा गेल्यानंतर खुप एकटी पडली होती हो....खुप काळजी वाटायची........तेव्हा सुजयमुळे हयातुन बाहेर पडली आणि आता सुजय तिला आयुष्यभर साथ देणार ती आपल्यासोबत राहणार......दादा वरुन सगळ पाहत असेल....खुप आनंद झाला असेल त्याला.......माधवीताई डोळयात पाणी आणत बोलतात...

माधवी शांत हो.....अग एवढी आनंदाची गोष्ट आहे आणि डोळयात पाणी का आणतेयस.......आनंदराव

दादाची आठवण आली ओ........आणि आनंदही झालाय म्हणुन डोळयात पाणी आल.....माधवीताई

आता मला एक कप चहा मिळेल का......नाही तर सुनांच्या विचारात आम्ही उपाशी.......आनंदराव माधवीताईची मुड चांगला करण्यासाठी त्यांची थट्टा करत बोलतात........

काय ओ.........तुमच आपल काही तरीच असत..........आणते थांबा.........माधवीताई

****

रेवा तिच्या डेस्कवर काम करत बसलेली असते.......इतक्यात सुजय तिच्या बाजुने जात असतो....ती त्याला पाहुन न पाहिल्या सारख करते व आपल काम करु लागते......पण सुजय रेवालाच पाहत थांबला.....पण स्वत:ला भानावर आणत तो आपल्या केबिनमध्ये जातो......

रेवाने अस का केल असेल......मी आवडत नाही का तिला.........वहिनी तर म्हणत होती.......मी तिला आवडतो म्हणुन......म्हणजे तिचा अंदाज होता....पण तस काही वाटल्याशिवाय वहिनी तस बोलणार आहे का.....काहीच कळत नाहीये........वहिनी यार कधी येणार तु......सगळच कॉप्लिकेटेड झाल आहे......काय कराव कळेना.........सुजय आता तु राधिकाला कस सांगायचा हा विचार कर.........मी पण मुर्खासारखा काय करुन बसलो......रेवाच्या विचारात कधी हो बोलुन गेलो कळच नाही.......आता राधिकाला समजावल पाहिजे.........कोणाला काही कळायच्या आत राधिकाला सगळ सांगाव लागेल नाही तर ती घरी बोलली तर आवघड होईल........सुजय एकटाच स्वत:शी बोलत असतो.....

रेवासुध्दा सुजयचा विचार करत होती....त्याच्या समोर कस जायच हाच विचार करत होती........तीला एका फाईलवर सुजयची साईन हवी होती.......आणि ती कोणाला सांगु पण शकत नव्हती.......काय करु यार साईन तर आजच्या आज घ्यायची आहे........आणि मला सुजय समोर जायच नाहीये.....काय करु......

रेवा अस कस करुन चालेल......तुझ्या पर्सनल गोष्टीचा तु तुझ्या कामावर परिणार नाही होवु देवु शकत......जा आणि साईन घेवुन ये........रेवा स्वत:शीच बोलत होती.......

मे आय कमिंग सर.........रेवा

एस कम इन.......सुजय

सर हया डॉक्यमेन्टवर तुमच्या सहया हव्या आहेत.....रेवा सुजयकडे फाईल देत बोलते.....

किती रुड वागतेय ही.......अस एवढ काय झाल आहे......साध माझ्याकडे पाहत ही नाही ही......निट बोलत नाहीये........सुजय भान हरपुन तिच्याकडे पाहत मानातल्या मनात बोलत असतो........

सर सहया करताय ना.......रेवा

रेवाच्या आवाजाने सुजय भानावर येतो व तिच्या हातातील फाईल घेतो..........व सही करुन देतो......

थॅक्स........रेवा सुजयकडील फाईल घेत बोलते.........आणि बाहेर जाऊ लागते.....पण अचानक थांबते....आणि मागे वळते.....कॉग्रॅच्युलेशन........सर

कॉग्रॅच्युलेशन बोलल्यावर सुजय वर पाहतो.......कशासाठी

राधिकाने सांगितल मला सगळ......तुम्ही तिला लग्नासाठी हो म्हणालात ते......त्याच्यासाठी बोलले.....रेवा जड मनाने हे सगळ बोलत होती.....

म्हणजे राधिका जे बोलली त्यावर तुझी काहीच हरकत नाही.......सुजय

माझी काय हरकत असेल......तुम्हा दोघांसाठी मी हॅपी आहे....राधिका खुप छान आहे......आणि तुमच्यावर ती खुप प्रेम करते........आणि त्यापेक्षा तुम्ही जे तिच्यासाठी केला अहात तिच्या वाईट काळात तिची साथ दिला आहात त्याची जाणीव आहे तिला..........रेवा

रेवाला काहीच हरकत नाही म्हटल्यावर सुजयला वाईट वाटत.......

सर मी येते......रेवा अस म्हणुन केबिनच्या बाहेर येते......बाहेर  येते व स्टाफरुम मध्ये जाते.....आणि इतकावेळ मला काहीच फरक पडत नाही......असे दाखवणाऱ्या डोळयातुन आश्रु वाहायला लागतात............

सॉरी सुयज....तुझ्याशी खोट बोलले मी....तु बोललास ना तुझी काय हरकत आहे का........खुप हरकत आहे रे......तुझ्याशिवाय कशी राहणार आहे नाही माहित....रेवा स्वत:शी रडत बोलत असते.......रेवा काय करतेयस हे.तु बॅकेत आहेस.......कोणी पाहिल तर.....चल उठ फ्रेश हो आणि कामाला लाग आता हे रोज तुला सहन कराव लागणार आहे अस रडत बसुन नाही चालणार.........रेवा डोळे पुसते व आपल्या कामाला लागते......

****

माधवीताई सुजचीच वाट पाहत असतात.....इतक्यात सुजय येतो.....

आलास तु.......थांब हा तुला चहा आणते..........माधवीताई

सुजय खुप दमल्यासारखा वाटतोयस........आनंदराव तिथेच हॉलमध्ये बसले होते....

हो बाबा.....खुप काम होत ना त्यामुळे......सुजय

हा चहा घे तुला फ्रेश वाटेल.......माधवीताई

थॅक्स आई हयाची गरज होतीच आत्ता........सुजय

सुजय आम्हाला तुझ्याशी थोड बोलायच होत.......माधवीताई

हो बोला ना त्यात विचारायच काय........सुयज

ते राधिकाने आम्हाला सांगितल सगळ......माधवीताई

राधिकाच नाव ऐकल्यावर सुजय माधवीताईच्याकडे पाहतो.........सगळ म्हणजे.....?.....सुजय

म्हणजे तिने तुला प्रपोज केल ते ‍आणि तु पण तिच्याशी लग्न करायला तयार आहेस हे....सगळच सांगितली......माधवीताई

अरे यार......हया मुलीने काय घोळ घातला......आता आई बाबांना कस सांगु.....नाही सुजय आता गप्प बसुन नाही चालणार नाही तर गोष्टी खुप वाढतील......तु आई बाबांना सांग सगळ खर.......सुजय मनातल्या मनात बोलत असतो...

काय रे कुठे हरवलस......आनंदराव

आ काही नाही बाबा........सुजय

बरोबर बोलले ना मी........माधवीताई

अग आई हो बरोबर आहे तिने मला प्रपोज केल...आणि मी पण हो बोललो..........पण.........सुयज

पण आणि काय आता.......ऐक ना आम्ही काय ठरवल आहे...माधवीताई सुजय पुढे काही बोलणार एवढयात त्या बोलायला सुरवात करतात........मी आणि तुझ्या बाबांनी अस ठरवल आहे की....तुमचा सारखरपुडा करुन ठेवुया आणि तुम्ही म्हणाल तेव्हा लग्न करुया.....माधवीताई

काय....साखरपुडा......सुजयला हे एकल्यावर शॉकच बसतो......अरे यार हया गोष्टी कुठल्या कुठे चालल्या आहेत......हि राधिका पण ना......सुजय आता वेळ घालवुन काही उपयोग नाही.......खर काय आहे ते आई बाबांना सांगुन टाक.....सुजय

आई आई ऐक ऐक जरा........मला काय बोलायच आहे ते तर ऐक........सुयज

हा बोल ना......माधवीताई

आई ते मी राधिका.........अरे सुजय तु केव्हा आलास.....मी केव्हाची वाट पाहतेय तुझी......सुजय पुढे काय बोलणार इतक्यात राधिका तिथे येते......

शट्ट आता कस सांगु आई बाबांना..हिच्या समोर तर काही बोलु शकत नाही......

अरे कुठे हरवलास..........राधिका

आ....काही नाही........सुजय

मग सुजय तुझ काय मत आहे.....करुया ना साखरपुडा.......आनंदराव

आता बाबांना तर काही बोलु शकत नाही......फक्त साखरपुडा तेवढा पुढे ढकलता येईल.....सुजय विचार करत असतो.....

अरे एवढा कसला विचार करतोयस.......बोल ना......आनंदराव

बाबा आता बॅकेत खुप कामाचा लोड आहे.......त्यामुळे आत्ता साखरपुडा नको.....थोडे दिवसांनी बघु ना मग.....एवढी काय गडबड आहे......सुजय

बर......तु म्हणशील तस करुया.......राधिका तुला चालेल ना ग.........माधवीताई

हो ग आत्तु..........राधिका

तुमचा साखरपुडा आत्ता आम्ही साध्या पध्दतीनेच करणार होतो.........पण आता मोठयानेच करुया......चालेल ना ओ.......माधवीताई

कोणाचा सारखरपुडा करताय..........आध्या

अग राधिका आणि सुजयचा............माधवीताई

काय..........?........आध्या सुजयकडे पाहते तिला हे ऐकल्यावर शॉकच बसतो...दादया पण.......आध्या पुढे काही बोलणार इतक्यात सुजय तिला खुणवुन गप्प बस म्हणुन सांगतो..........

काय ग काय झाल धक्का बसला ना....आम्हाला पण कळाल तेव्हा असच वाटल होत........माधवीताई

धक्का नाही आई शॉकच बसला आहे........आध्या

बर मी आलो.....सुजय

सुजय त्याच्या रुममध्ये जातो............

ये आई मी आलेच अस म्हणुन आध्या सुजयच्या मागे जाते........

दादया हे काय आहे...........तु राधिका दी शी कस काय......आणि रेवाच काय...........आध्या

शांत हो......आधी माझ ऐकशील का.......सुजय

हमम.....बोल.........आध्या

सुजय झालेला सगळा प्रकार आध्याला सांगतो.......

अरे दादया मग तु लगेच का सगळ तिला सांगितला नाहीस........तु तिला बोलला असतास तर गोष्टी एवढया पुढे गेल्या असत्या का.....आध्या

कस सांगु सांग.........तुला माहितेय ना....मामा गेल्यावर तीची काय अवस्था होती.......तिला कस आपण हयातुन बाहेर काढलय........आणि मी पण तिला डायरेक्ट नाही म्हणालो असतो.......तर..... ती परत एकटी पडेल......मागची पुनरावृत्ती होईल आध्या........कळतय का तुला.......सुजय

दादया मला तुझ सगळ पटतय.....पण रेवाच काय.......आध्या

काय रेवाच.........मी तिला नाही आवडत.....आणि आवडत असतोच तर तीने राधिकाला मदत केली नसती....सुजय

अस कस होवु शकत.......मला सतत वाटायच की ती तुला लाईक करते.......आध्या

अग वाटण आणि लाईक करन हयात काही फरक असतो की नाही.......सुजय

अरे पण.......आध्या

आध्या.....मला ना आता काही सुचत नाहीये......तुझ्या कोणत्याच प्रश्नाची उत्तरे नाहीयेत माझ्याकडे.....सुजय वैतागुन बोलातो

तु शांत हो आधी........बस इथे......हे बग साखपुडा आता तुला करायला जमणार नाही म्हटलायस ना....मग तुझ्याकडे थोडा वेळ आहे.....तु त्यावेळेत राधिका दी ला समजवु शकतोस.......आध्या

सगळ मान्य आहे आध्या.....पण तिला हे सगळ कस सांगु कळत नाहीये......मी तिला खर सांगितल आणि ती परत पुर्वी सारख करु लागली तर......तुलाही माहितेय त्यावेळी काय अवस्था होती तिची.....आणि माझ्या बोलण्याने ती परत तशीच वागु लागली तर......खुप भिती वाटतेय.......सुजय

दादया तु शांत हो आधी........हे बग......फक्त तुच तिला व्यवस्थित समजाऊन सांगु शकतोस.....आणि ती फक्त तुझच ऐकते......त्यामुळे आधी तु व्यवस्थित सगळा विचार कर आणि मग बोल तिच्याशी......आध्या

हो......सुजय

वहिनीला हे माहितेय.......आध्या

ये नाही.....तु काही बोलु नकोस तिला.....उगाच त्याचा मुड खराब व्हायला नको......आणि तसही परवा येणारच आहे की....तेव्हा बोलेन मी तिच्याशी.....सुयज

बर......आध्या

***

बघता बघता दोन दिवस कधी जातात कळतच नाही....सुजय राधिकाला सांगाण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला सांगायला जमतच नाही.......आज स्नेहा व आशु परत येणार होते....सगळे त्यांचीच वाट पाहत होते.......

ये आई दादु आणि वहिनी कधी येणार ग.......आध्या

अग किती घाई ट्राफिक लागल असेल ना......आणि सुजयच आणायला गेलाय ना त्यांना...येतील की एवढयात......माधवीताई

दादया गेलाय म्हणजे आत्ता एवढयात येतील मग ते.....आध्या अस म्हणायला आणि गाडीचा हॉर्न वाजतो......ये आई आले मग दादु आणि वहिनी.....

वेलकम वहिनी......आध्या स्नेहाच स्वागत करत बोलते......

थॅक्स आध्या......स्नेहा

वहिनी तु आलीस......वेलकम........राधिका

थॅक्स राधिका......स्नेहा

वहिनी प्रवास कसा झाला..........आध्या

मस्त झाला........स्नेहा

बर तुम्ही दोघे जाऊन आधी फ्रेश होऊन या.....मग गप्पा मारत बसुया ओके.....माधवीताई

हो आई आम्ही आलोच फ्रेश होउन........स्नेहा

स्नेहा व आशु थोडयावेळात फ्रेश होऊन येतात......आणि हॉलमध्ये सगळयाच्यासोबत चहा घेत गप्पा मारत बसलेले असतात....

स्नेहाच लक्ष सुजयकडेच होत......तो तिला शांत वाटत होता.....आध्या स्नेहाच्या बाजुलाच बसलेली होती......

आध्या सुजयची तब्बेत बरी नाहीये का.....शांत का वाटतोय.....गाडीत पण जास्त काही बोलत नव्हात......काही झालय का......स्नेहा हळुच आध्याला विचारते.....

वहिनी ते....नंतर सांगते ना तुला....आध्या

काही प्रॉब्लेम आहे का........स्नेहा

अग नाही......नंतर बोलु ना आपण......आध्या

बर......स्नेहा

थोडावेळ आशाच गप्पा मारत बसलेले असतात....

स्नेहा आशु तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे.....माधवीताई

सरप्राईज.......?.......कोणत.....स्नेहा

स्नेहा तुला लवकरच जाऊबाई येणार आहे......माधवीताई

काय..........म्हणजे सुजय तु........स्नेहा

स्नेहा तुला माहितेय.....माधवीताई

हो आई.....सुजयने सांगितलय मला.....स्नेहा

अग वहिनी.......ऐक तर........आध्या

आध्या कसली आनंदाची बातमी दिलात तुम्ही......स्नेहा

अग ऐक तर........आध्या

अग काय......एवढी आनंदाची बातमी आणि तुम्ही आम्हाला आत्ता सांगताय.....स्नेहाला सुयज आणि रेवाच फायनल झालय अस वाटत होत.....त्यामुळे त्या आनंदात बोलत होती.....

सुजय तु काय फास्टच निघालस की......कॉग्रच्युलेशन....आशु

आशु एवढ कॉग्रट्स करत होता पण सुजयच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रीया नव्हती.....

मी आलोच......तुमच चालु दे..मला काम आहे....अस म्हणुन सुजय त्याच्या रुममध्ये जातो......

***

क्रमश:

पुढचा भाग 6/11/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all