Login

अर्धांगिनी - भाग -1

Bayko
अर्धांगिनी – भाग  - 1


दीर्घकथा लेखन स्पर्धा


पुण्याच्या कोथरुडमधल्या आयटी कंपनीतून शिफ्ट संपल्यावर शर्वरी नेहमीप्रमाणे बसस्टॉपकडे चालत होती. थंडीचा गारवा आणि दिवसभराच्या दमणुकीनंतर ती फक्त घरी जाऊन आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं इतकंच विचार करत होती.


पण त्या रात्री…
तिच्या आयुष्याचं चाकच वेगळ्या दिशेला वळणार होतं.


“शर्वरी!”
कोणीतरी आवाज दिला.

ती मागे वळली.
तिचा कॉलेज सिनिअर— समीर.
शांत, साधा, हसऱ्या चेहऱ्याचा मुलगा.

“समीर? तू इथे?”
“हो, मी इथेच जवळच राहतो. चलं तुला घरी सोडतो, हो चालेल, त्या निमित्ताने गप्पा पण होतील, असं बोलून शर्वरी समीरच्या गाडीत बसली.


शर्वरीला तो सुरक्षित वाटला, कॉलेजची जुनी ओळख…
ती गाडीत बसली.

गाडी शहरातून बाहेर निघू लागली तेव्हा तिच्या मनात नकळत विचार आला,
आपण थोड्या वेगळ्या रस्त्याने जातोय का?

“समीर, हा रस्ता वेगळा वाटतोय असं ती म्हणाली,
“शर्वरी, जरा ट्रॅफिक आहे. शॉर्टकटने नेतोय तुला ,” तो म्हणाला.

त्या “शॉर्टकट” चा शेवट अंधारात जात होता.


शर्वरीने डोळे उघडले तेव्हा डोकं जणू फाटणार एवढं दुखतं होतं,
हात-पाय जड झालेले,खिडक्यांना लोखंडी सळ्या, थंडगर खोली.
आणि समोर उभा— अहमद.


“शेवटी उठलीस.”
त्याचा आवाज अति शांत, पण एखाद्या शिकाऱ्यासारखा निर्दयी.

“मी… कुठे आहे? समीर कुठे आहे ? मला घरी जायचंय!”
शर्वरी हादरलेल्या आवाजात ओरडली.

अहमद गडगडाटी हसला

“समीर?”
तो मोबाईलवर फोटो दाखवतो,,समीर आणि अहमद एका गाडीत हसत आहेत.

“माझा माणूस आहे समीर. चार महिन्यांपासून तुला फॉलो करत होता. योग्य वेळ येण्याची वाट बघत होता.”

शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली.

“काय म्हणाली होतीस? घरी जायचं?
तुला आता याचं ‘घरात’ रहायचं आहे.”


अहमदने बाहेर जाऊन दार लॉक केलं.
खिडकीच्या बाहेर गल्ली, पण बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नाही.
एक मुलगी— हिना— तिच्याजवळ येते.


“रडून काही होणार नाही दीदी… .”
शर्वरी थिजून तिच्याकडे पाहत राहिली.

“ते… मला कुणाला… विकणार आहेत का?”
तिचा आवाज कापरा.

हिनाने मान हलवली.
“हो. तुला ‘बाहेर’ न्यायला इथे आणलंय. दुबईला. एक महिन्यात.”

त्या क्षणी शर्वरीच्या अंगातलं संपूर्ण रक्त जणू गोठलं.

रात्री शर्वरीने खोलीत पडलेला तुटका लोखंडी तुकडा उचलला.
खिडकीतून पळून जाण्याचा विचार करून तिने सळ्यांवर वारंवार आवाज न होता मारायला सुरुवात केली, पण दहा मिनिटांतच दारात अहमद उभा दिसला.


त्याने तिचा हात पकडून भिंतीवर आपटला.
शर्वरीच्या डोळ्यातून पाणी आलं.


“पहिल्या दिवसापासूनच इतकं धाडस?
तुला माहित नाही अजून इथली शिक्षा काय असते.
पण काळजी करू नकोस… तुला मी ‘मऊ’ करेन.”

तो निघून गेला.
शर्वरी खाली बसली.


त्या क्षणी तिला कळलं,इथून सुटण्याचा एकच मार्ग आहे…
मरून किंवा लढून.

आणि तिने मनात ठरवलं,मी मरणार नाही, मी सुटणार.
पळणार.
आणि स्वतःला वाचवणार.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी ह्या सगळ्यातून सुटते की अजूनच ह्या सगळ्यात अडकून पडते.)


( सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all