अर्धांगिनी – भाग 2
दीर्घाकथा लेखन स्पर्धा
रात्र शांत आणि भयाण होती.
बाहेरच्या गल्लीतील कुत्र्यांचे आवाज, आत बंदिस्त मुलींचा हलक्या रडण्याचा हुंदका — या सगळ्यांच्या मध्ये शर्वरी कोपऱ्यात बसून भिंतीकडे पाहत होती.
अहमद क्रूरपणे तिला सांगून गेला होता,
"तुला एक महिन्यात दुबईला पाठवणार आहे. तिथे ‘काम’ खूप आहे."
शर्वरीच्या आत एक भीतीचा महाकाय गोळा फुगत होता…
पण त्याचवेळी एक दृढतेचा छोटासा दगडही त्याला तडा देत होता.
पण त्याचवेळी एक दृढतेचा छोटासा दगडही त्याला तडा देत होता.
दुसऱ्या दिवशी पहाटेच दार उघडलं.
अहमदच्या दोन माणसांनी हिनाला बाहेर ओढलं.
“नाही! नाही!”
हिना रडतं होती, किंचाळत होती.
हिना रडतं होती, किंचाळत होती.
शर्वरी थिजली.
त्या क्षणी तिला समजलं,इथे कुणाची किंमत नाही.
त्या क्षणी तिला समजलं,इथे कुणाची किंमत नाही.
हिनाला ओढत नेताना तिचा हात शर्वरीच्या हाताला स्पर्शला…
एक क्षणभर दोघींनी एकमेकींच्या डोळ्यांत पाहिलं.
आणि त्या नजरेत एकच गोष्ट होती,“आपण दोघीही लढत राहणार.”
एक क्षणभर दोघींनी एकमेकींच्या डोळ्यांत पाहिलं.
आणि त्या नजरेत एकच गोष्ट होती,“आपण दोघीही लढत राहणार.”
तिच्या त्या नजरेने शर्वरीच्या अंगात पुन्हा जिद्द आली.
संध्याकाळी अहमद पुन्हा खोलीत आला,त्याच्या हातात एक लांब काळी चादर आणि हिजाब होता.
“उद्यापासून तुला ‘तयार’ करायचं आहे.
भाषा, वागणूक, नियम — सगळं शिकायचंय.
दुबईला पाठवताना चुकलीस तर पैसे वाया जातील.”
भाषा, वागणूक, नियम — सगळं शिकायचंय.
दुबईला पाठवताना चुकलीस तर पैसे वाया जातील.”
शर्वरी पहिल्यांदा त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली,
“मी पळून जाईन.”
अहमदचा चेहरा काही क्षण शांतच राहिला.
मग तो जवळ येऊन तिच्या चेहऱ्याजवळ वाकला आणि तीच्या एक कानाखाली वाजवून म्हणाला..“इथून कधी कुणी पळून जातं नाही?
आणि तुही जाणार नाहीसं,लक्षात ठेव, आणि तो रागात निघून गेला.
मग तो जवळ येऊन तिच्या चेहऱ्याजवळ वाकला आणि तीच्या एक कानाखाली वाजवून म्हणाला..“इथून कधी कुणी पळून जातं नाही?
आणि तुही जाणार नाहीसं,लक्षात ठेव, आणि तो रागात निघून गेला.
शर्वरीचा श्वास अनियमित झाला…
पण तिच्या मनातला आवाज जोरात म्हणू लागला,
पण तिच्या मनातला आवाज जोरात म्हणू लागला,
ती स्वतःशी पुटपुटते, “मी जगणार.
आता मी हार मानणार नाही.”
पहिल्यांदाच…
तिच्या अंधारात प्रकाशाची एक रेष दिसली.
तिच्या अंधारात प्रकाशाची एक रेष दिसली.
खिडकीतून बाहेर पाहताना शर्वरीला पहिल्यांदाच जाणवलं,
आज कुणीतरी खाली थांबलं होतं.
अहमदचे दोन माणसे नाही… कुणीतरी वेगळाच.
तो माणूस काळ्या हुडीमध्ये होता, प्रकाशात चेहरा दिसत नव्हता,
पण त्याचं लक्ष सतत त्या खिडकीवर…
पण त्याचं लक्ष सतत त्या खिडकीवर…
शर्वरीचे श्वास वेगाने चालू झाले.हा कोण?
अहमदचा माणूस नाही वाटत आहे ?
की कोणीतरी दुसराच?
अहमदचा माणूस नाही वाटत आहे ?
की कोणीतरी दुसराच?
पण एका क्षणात तो मागच्या गल्लीमध्ये गायब झाला.
त्या रात्री तिला झोप येईनाशी झाली.
हिनाला त्यांनी कुठे नेलं असेल?
ती जिवंत असेल की नाही? ह्याच विचारांनी ती अस्वस्थ होती.
हिनाला त्यांनी कुठे नेलं असेल?
ती जिवंत असेल की नाही? ह्याच विचारांनी ती अस्वस्थ होती.
सकाळ झाली,दार जोरात उघडलं गेलं,
अहमदची माणसं आत आली.
“चल. तयारी सुरू.”
तिला खाली नेण्यात आलं,ती एक अंधारी मोठी खोली—जिथे आणखी तीन मुली शांत बसवलेल्या,सगळ्यांच्या डोळ्यात भीती होती.
एक मुलगी हळूच म्हणाली,
“काल रात्री कोणीतरी सिस्टीमशी छेडछाड केली… कॅमेरेही १५ मिनिटं बंद होते.”
“काल रात्री कोणीतरी सिस्टीमशी छेडछाड केली… कॅमेरेही १५ मिनिटं बंद होते.”
शर्वरीचा श्वास थांबला.
१५ मिनिटं?तोच का?
त्या काळ्या हुडीवाल्यामुळेच?
१५ मिनिटं?तोच का?
त्या काळ्या हुडीवाल्यामुळेच?
अहमद रागाने ओरडत खोलीत आला.
“ज्याने कॅमेरा बंद केला… तो सापडलं तर जिवंत सोडणार नाही!”
“ज्याने कॅमेरा बंद केला… तो सापडलं तर जिवंत सोडणार नाही!”
सगळ्या मुली घाबरून खाली पाहू लागल्या.
पण शर्वरीचं मन वेगळ्या दिशेला धावत होतं,
कॅमेरे बंद, कोणीतरी वाचवायला येतंय कां..…
पण शर्वरीचं मन वेगळ्या दिशेला धावत होतं,
कॅमेरे बंद, कोणीतरी वाचवायला येतंय कां..…
अहमदचा संशय वाढायला लागलात्याने घरात सुरक्षा दुप्पट केली,
नवीन गुप्त कॅमेरे बसवले, खिडक्यांना लहान लॉक लावले.
नवीन गुप्त कॅमेरे बसवले, खिडक्यांना लहान लॉक लावले.
मुलींवर नजर कडक झाली.
आता एक मिनिटही एकट्याला ठेवत नव्हते.
आता एक मिनिटही एकट्याला ठेवत नव्हते.
शर्वरीने स्वतःशी सतत म्हणत राहिली,,
“मी जगणं थांबवणार नाही.
पण आता… पळून जाणार नाही.
मी लढेन.”
“मी जगणं थांबवणार नाही.
पण आता… पळून जाणार नाही.
मी लढेन.”
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरीला दुबईला नेलं जातं आणि मग तिच्यासोबत अजून काय काय घडतं ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
(सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही")
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा