Login

अर्धांगिनी - भाग -3

Bayko
अर्धांगिनी – भाग - 3


दीर्घकथा लेखन स्पर्धा

अहमदने सुरक्षा दुप्पट केली होती.
खिडक्यांना लहान लोखंडी गज, नवीन कॅमेरे… आणि प्रत्येक दाराबाहेर शस्त्रं घेऊन दोन माणसं उभी.

शर्वरीचं जग आता एका पिंजऱ्यापेक्षा छोटं होत चाललं होतं.

तरीही…तिच्या मनात एकच गोष्ट जिवंत होती,मी सुटणार...

आणि तो ब्लॅकहुडीवाला मुलगा कोण होता?
का आला होता?कसा आला?
कोणाला माहिती न देता कॅमेरा कसा बंद केला?

हे प्रश्न तिच्या मनात झडप घालत होते.


त्या रात्री…

शर्वरीला अचानक पोटात मळमळायला लागलं.तीला तिकडे सुकी भाकरी किंवा चपाती आणि एखादी भाजी असं जेवण दिलं जातं होतं, त्यामुळे तिचं पोट अपसेट झालं होतं.

अंधार गडद झाला होता, मुली झोपल्या होत्या, फक्त शर्वरी जागी होती.

अचानक…
खिडकीच्या खाली हलकासा आवाज झाला.

टक…टक…टक…


ती खिडकीजवळ गेली, पण यावेळी तिला कोणीच दिसलं नाही.
सावलीही नाही, फक्त अंधार.


सकाळ झाली,

“चल. तयारी.कर ” अहमदचा राक्षसी आवाज आला.

शर्वरीला एका काळ्या प्लास्टिकच्या पिशवीत स्वतःचे दोन कपडे, हिजाब, आणि एक बनावट आयडी कार्ड देण्यात आलं.

त्यावर नाव लिहिलं होतं — रुकैया फारूक.

ती चकित झाली.

“हे माझं नाव नाही,” ती पुटपुटली.

अहमदचा माणूस हसला आणि म्हणाला.
“आता तू कोणती शर्वरी? इथून गेल्यावर तू फक्त माल आहेस.
जे नाव आम्ही देऊ… तेच तुझं नावं ”

शर्वरीच्या डोळ्यात राग, भीती आणि असहायता तिच्या डोळ्यात धुरासारखी पसरली.


एक मोठा पांढरा ट्रक मागच्या गल्लीत उभा होता.
त्यात तीन मुली आधीच बसवलेल्या.
सगळ्यांच्या हातापायांना हलक्या साखळ्या.

शर्वरीलाही आत ढकललं गेलं.
ट्रकमध्ये अंधार होता, फक्त एक छोटा पिवळसर बल्ब.

ट्रकचा दरवाजा बंद झाला…
आणि कुलूप टक करून लॉक.


गाडी चालायला लागली.


ट्रकच्या आत…

अंधारात एक मुलगी म्हणाली, आता आपण कायमचं अडकलो,,

शर्वरी एकदम दचकली,


ती मुलगी थोडावेळ शांत राहिली…
तिचे डोळे भीतीने चमकत होते.

शर्वरीची हृदयाची धडधड वाढली.

मुलगी थरथरत पुन्हा म्हणाली,
“हो. आपण अडकलो आता.

अचानक ट्रक जोरात थांबला.
हलकासा धक्का बसला.

शर्वरी चिंतेने पुढे वाकली.

माणसांचे आवाज…


ट्रकचे दरवाजे उघडले अजून दोन माणसं आतं आली.
प्रकाश आत घुसला.


अहमदचा माणूस शिव्या देत ओरडत होता, चलो जल्दी...

शर्वरीचा श्वास थांबू पाहत होता.

तिच्या शेजारची मुलगी म्हणाली, काय होणारं आपलं कांय माहित, देवा वाचव आम्हाला..

ही फक्त सुरुवात होती.
अंधारातली लढाई आता सुरू झाली होती.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी दुबईला पोचल्यावर तीच्यासोबत कायं घडते ते )

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


(सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही")
0

🎭 Series Post

View all